< 2 Rois 10 >

1 Or Achab avait soixante-dix fils dans Samarie: Jéhu écrivit donc des lettres, et il les envoya à Samarie aux grands de la ville, aux anciens et à ceux qui élevaient les enfants d’Achab, disant:
शोमरोनात अहाबाला सत्तर पुत्र होते. शोमरोनातील अधिकारी आणि वडिलधारी मंडळी यांना येहूने पत्रे पाठवली. व इज्रेलच्या अधिकाऱ्यांना तसेच ज्यांनी या अहाबाच्या मुलांना वाढवले त्यांनाही पाठवली. पत्रात त्याने लिहिले.
2 Aussitôt que vous aurez reçu ces lettres, vous qui avez les enfants de votre maître, les chars, les chevaux, les villes fortes et les armes,
“हे पत्र मिळाल्यावर तुमच्या धन्याच्या मुलांपैकी जो सगळ्यात गुणी आणि लायक मुलगा असेल त्याची निवड करा. रथ, घोडे इत्यादी तुमच्याजवळ आहेच. तुमचे वास्तव्यही मजबूत शहरात आहे.
3 Choisissez le meilleur et celui qui vous plaira davantage, d’entre les fils de votre maître, et mettez-le sur le trône de son père, et combattez pour la maison de votre maître.
तुमच्याकडे शस्त्रास्त्रे आहेत. तुम्ही ज्या मुलाची निवड कराल तो उत्तम व योग्य असेल त्यास त्याच्या वडिलाच्या सिंहासनावर बसवा. मग आपल्या धन्याच्या घराण्यासाठी लढा द्या.”
4 Ceux-ci furent saisis d’une grande crainte, et ils dirent: Voilà que deux rois n’ont pu subsister devant lui, et comment nous, pourrons-nous résister?
पण हे वाचून ती अधिकारी आणि वडिलधारी मंडळी फारच घाबरली. ते सर्व म्हणाले, “योराम आणि अहज्या हे दोन राजे सुद्धा येहूला रोखू शकले नाहीत, तेव्हा आम्ही काय त्यास अडवणार?”
5 Les intendants de la maison du roi, les chefs de la ville, les anciens et ceux qui élevaient les princes, envoyèrent donc vers Jéhu, disant: Nous sommes vos serviteurs, tout ce que vous nous commanderez, nous le ferons; nous ne nous établirons point de roi: tout ce qu’il vous plaît, faites-le.
मग, अहाबाच्या घराची देखभाल करणारा अधिकारी, नगराधिकारी, वडिलधारी मंडळी आणि त्या मुलांचे पालक यांनी येहूला खालील प्रमाणे संदेश पाठवला, “आम्ही तुझे सेवक आहोत. तू म्हणशील ते आम्ही करु. आम्ही कोणालाच राजा करत नाही. तुला योग्य वाटेल ते कर.”
6 Or il leur écrivit des lettres une seconde fois, disant: Si vous êtes à moi, et que vous vouliez m’obéir, coupez les têtes des fils de votre maître, et venez vers moi à cette même heure demain, à Jezrahel. Or, les fils du roi, soixante-dix individus étaient élevés chez les grands de la ville.
येहूने मग त्या अधिकाऱ्यांना आणखी एक पत्र पाठवले. त्यामध्ये त्याने लिहिले, “तुमचा मला पाठिंबा असेल आणि तुम्ही माझ्या आज्ञेत असाल तर अहाबाच्या मुलांचा शिरच्छेद करा. साधारण याच वेळेला इज्रेल येथे त्यांना माझ्याकडे आणा.” अहाब राजाची सत्तर मुले होती आणि नगरातील अधिकाऱ्यांकडे ती होती. त्या अधिकाऱ्यांनी त्यांना वाढवले होते.
7 Et lorsque les lettres leur furent parvenues, ils prirent les fils du roi, et tuèrent ces soixante dix individus; ils mirent leurs têtes dans les corbeilles, et les envoyèrent à Jezrahel.
या अधिकाऱ्यांना हे पत्र मिळाले तेव्हा त्यांनी या राजाच्या सर्व सत्तर राजपुत्रांना एकत्र आणून ठार केले. मग त्यांची मस्तके टोपल्यांमध्ये भरली. या टोपल्या येहूकडे इज्रेल याठिकाणी पाठवल्या.
8 Or le messager vint et l’annonça à Jéhu, disant: Ils ont apporté les têtes des enfants du roi. Jéhu répondit: Mettez-les en deux tas à l’entrée de la porte jusqu’au matin.
निरोप्याने येऊन येहूला सांगितले, “या लोकांनी राजपुत्रांची मुंडकी आणली आहेत.” त्यास येहू म्हणाला, “नगराच्या वेशीजवळ त्या मुंडक्यांचे दोन ढीग करून सकाळपर्यंत तिथे ठेवा.”
9 Et lorsqu’il fit jour, il sortit, et s’arrêtant, il dit à tout le peuple: Vous êtes justes; si c’est moi qui ai conspiré contre mon maître, et si je l’ai tué, qui est celui qui a frappé tous ceux-ci?
सकाळी येहू निघाला आणि लोकांपुढे उभा राहून त्यांना म्हणाला, “तुम्ही निरपराध आहात. मी माझ्या धन्याविरुध्द कट रचून त्यास ठार केले. पण अहाबाच्या या मुलांची हत्या कोणी केली? तुम्हीच त्यांना मारलेत.
10 Voyez donc maintenant qu’il n’est tombé par terre aucune des paroles du Seigneur, que le Seigneur a prononcées contre la maison d’Achab, et que le Seigneur a fait ce qu’il a dit par l’entremise de son serviteur Élie.
१०परमेश्वर बोलतो त्याप्रमाणेच सर्व घडते हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. अहाबाच्या कुटुंबाबद्दल परमेश्वराने एलीयाकडून वदविले होते. आता परमेश्वराने आपण ज्या गोष्टी करु म्हणून सांगितले होते त्या सर्व करून दाखवल्या आहेत.”
11 Jéhu frappa donc tous ceux qui restaient de la maison d’Achab dans Jezrahel, tous les grands de sa cour, ses familiers et ses prêtres, jusqu’à ce qu’il ne demeurât pas de restes de lui.
११आणि येहूने इज्रेलमधल्या अहाबाच्या सर्व कुटुंबियांना ठार केले. सर्व प्रतिष्ठित माणसे, जिवलग मित्र याजक यांची त्याने हत्या केली. अहाबाच्या नातलगांपैकी कोणीही जिवंत राहिले नाही.
12 Et il se leva et il vint à Samarie; et lorsqu’il fut venu près de la Cabane des pasteurs, en son chemin,
१२इज्रेल सोडून येहू शोमरोनला आला. वाटेत तो मेंढपाळांच्या तळावर थांबला. मेंढपाळ लोकर कातरतात त्या ठिकाणच्या एका घरात तो गेला.
13 Il trouva les frères d’Ochozias, roi de Juda, et il leur demanda: Qui êtes-vous? Ceux-ci répondirent: Nous sommes les frères d’Ochozias, et nous sommes descendus pour saluer les fils du roi et les fils de la reine.
१३यहूदाचा राजा अहज्या याच्या नातेवाईकांना तो भेटला. येहूने त्यांची चौकशी केली, “तुम्ही कोण आहात?” ते म्हणाले, “आम्ही यहूदाचा राजा अहज्या याचे नातेवाईक. राजाची मुले आणि राजमातेची मुले यांची विचारपूस करायला आम्ही जात आहोत.”
14 Et Jéhu dit: Prenez-les vivants. Et, lorsqu’ils les eurent pris vivants, ils les égorgèrent sur une citerne près de la Cabane, au nombre de quarante-deux hommes, et il n’en resta pas un seul.
१४तेव्हा येहू आपल्याबरोबरच्या लोकांस म्हणाला, “यांना जिवंत ताब्यात घ्या.” तेव्हा येहूच्या लोकांनी त्यांना ताब्यात घेतले. ते सगळे मिळून बेचाळीस होते. बेथ-एकेद जवळच्या विहिरीपाशी येहूने त्या सर्वांना ठार केले. येहूने कोणालाही जिवंत ठेवले नाही.
15 Et lorsqu’il fut parti de là, il trouva Jonadab, fils de Réchab, à sa rencontre; et il lui souhaita toute sorte de prospérités. Il lui demanda ensuite: Est-ce que ton cœur est droit, comme mon cœur avec ton cœur? Et Jonadab répondit: m’est. S’il l’est, reprit-il, donne la main. Celui-ci lui donna sa main. Alors Jéhu le fit monter auprès de lui dans son char.
१५तिथून निघाल्यावर येहूला रेखाबाचा मुलगा योनादाब भेटला. तो येहूला भेटायलाच निघाला होता. येहूने त्याचे कुशल विचारुन म्हटले, “मी तुझा विश्वासू मित्र आहे, तसाच तूही आहेस ना?” यहोनादाब म्हणाला, “होय, मी तुझा विश्वासू मित्र आहे.” येहू म्हणाला, “तसे असेल तर मला तुझा हात दे.” आणि येहूने त्याचा हात धरुन त्यास आपल्या रथात घेतले.
16 Et il lui dit: Viens avec moi, et vois mon zèle pour le Seigneur. Et l’ayant mis dans son char,
१६येहू योनादाबाला म्हणाला, “चल माझ्याबरोबर. परमेश्वराबद्दल मला किती उत्कंठा आहे ती बघ.” तेव्हा यहोनादाब येहूबरोबर त्याच्या रथातून निघाला.
17 Il les conduisit à Samarie. Or il tua tous ceux qui étaient restés d’Achab à Samarie, jusqu’au dernier, selon la parole que le Seigneur avait dite par Elle.
१७शोमरोनला पोहोचल्यावर येहूने अहाबचे जे कोणी कुटुंबिय अजून जिवंत होते त्या सर्वांना मारले. एलीयाला परमेश्वराने सांगितले होते ते सर्व येहूने केले.
18 Ensuite Jéhu assembla tout le peuple, et il leur dit: Achab a honoré un peu Baal; mais moi je l’honorerai davantage.
१८येहूने मग सर्वांना एकत्र बोलावले. त्यांना तो म्हणाला, “अहाबाने बआलाची थोडी सेवा केली. पण येहू मात्र त्याची बरीच सेवा करणार आहे.
19 Maintenant donc, appelez vers moi tous les prophètes de Baal, tous ses serviteurs et tous ses prêtres; qu’il n’y en ait aucun qui ne vienne; car c’est un grand sacrifice que je veux faire à Baal: quiconque y manquera, ne vivra plus. Or, Jéhu faisait cela insidieusement pour perdre les adorateurs de Baal;
१९आता बआलाच्या सर्व संदेष्टयांना आणि याजकांना बोलावून घ्या. तसेच जे जे बआलाची पूजा करतात त्यांनाही बोलवा. यामध्ये कोणीही गैरहजर असता कामा नये. बआलसाठी मला मोठा यज्ञ करायचा आहे. इथे जो येणार नाही त्यास मी ठार करीन हे नक्की,” येहूची ही सर्व बतावणी होती. त्यास बआलाच्या पूजकांचा संहार करायचा होता.
20 Et il dit: Sanctifiez un jour solennel en l’honneur de Baal; et il y invita;
२०येहू म्हणाला, “बआलसाठी पवित्र मेळ्याची तयारी करा.” तेव्हा याजकांनी त्याची घोषणा केली.
21 Il envoya donc dans tous les confins d’Israël, et tous les serviteurs de Baal vinrent, et il ne s’en trouva pas même un seul qui ne vint. Ainsi ils entrèrent dans le temple de Baal; et la maison de Baal fut remplie depuis une extrémité jusqu’à l’autre extrémité.
२१येहूने मग इस्राएलभर संदेश पाठवला. बआलाचे समस्त पूजक जमले. एकही मागे राहिला नाही. बआलाच्या देवळात ते आल्यावर देऊळ भरुन गेले.
22 Il dit ensuite à ceux qui gardaient les vêtements: Apportez des vêtements à tous les serviteurs de Baal. Et ils leur apportèrent des vêtements.
२२वस्त्र भांडार सांभाळणाऱ्याला येहू म्हणाला, “बआलाच्या या सर्व पूजकांसाठी वस्त्रे दे.” तेव्हा त्याने सर्वासाठी वस्त्रे दिली.
23 Et Jéhu, étant entré avec Jonadab, fils de Réchab, dans le temple de Baal, dit aux adorateurs de Baal: Cherchez, et voyez que personne parmi vous ne soit des serviteurs du Seigneur; mais qu’il n’y ait que les seuls serviteurs de Baal.
२३मग येहू आणि रेखाबाचा मुलगा योनादाब बआलाच्या देवळात शिरले. येहू तेथे जमलेल्या बआलाच्या सर्व पूजकांना म्हणाला, “तुमच्यात कोणी परमेश्वराचा सेवक नाही ना ते एकदा पाहून खात्री करून घ्या. बआलाच्या पूजा करणारेच सर्व इथे आहेत ना ते पाहा.”
24 Ils entrèrent donc dans le temple pour sacrifier des victimes et des holocaustes: or Jéhu s’était préparé dehors quatre-vingts hommes, et il leur avait dit: Quiconque s’échappera d’entre les hommes que je remettrai moi-même en vos mains, l’âme de celui-ci sera pour l’âme de celui-là.
२४यज्ञ आणि होमार्पणे करण्यासाठी बआलाचे सर्व पूजक बालाच्या देवळात शिरले. बाहेर येहूने ऐंशीजणांना तयार ठेवले होते. त्यांना येहूने सांगितले होते, “कोणालाही आतून निसटू द्यायचे नाही. एखादा कोणी गेलाच तर त्यास जाऊ देणाऱ्याला आपला जीव गमवावा लागेल.”
25 Il arriva donc que, lorsque l’holocauste eut été achevé, Jéhu donna cet ordre à ses soldats et à ses officiers: Entrez, tuez, et qu’aucun n’échappe. Et les officiers et les soldats les frappèrent du tranchant du glaive, et les jetèrent dehors; ensuite ils allèrent dans la ville où était le temple de Baal,
२५स्वत: यज्ञात होमबली अर्पण केल्यावर लगेच हुजऱ्यांना आणि सरदारांना येहूने सांगितले, “आता, आत जा आणि बालाची पूजा करणाऱ्यांना ठार करा. कोणालाही देवळातून जिवंत बाहेर येऊ देऊ नका.” तेव्हा सरदारांनी धारदार तलवारींनी सर्व पूजकांना ठार केले. त्यांनी आणि हुजऱ्यांनी बाल देवतेच्या पूजकांचे मृतदेह बाहेर टाकले ते बआलाच्या देवळाच्या गर्भगृहात गेले
26 Et ils enlevèrent la statue de Baal du temple, et ils la brûlèrent,
२६स्मृतीस्तंभ त्यांनी उखडून टाकले आणि बआलाची देऊळ जाळले.
27 Et la réduisirent en poudre. Ils détruisirent aussi le temple de Baal, et firent à sa place des latrines qui ont subsisté jusqu’à ce jour.
२७बआलाच्या स्मृतीस्तंभाचा त्यांनी चुराडा केला. बआलाच्या देवळाचाही विध्वंस केला. त्या देवळाचे त्यांनी प्रसाधनगृह करून टाकले. अजूनही लोक त्याचा तसाच वापर करतात.
28 C’est ainsi que Jéhu extermina Baal du milieu d’Israël;
२८अशा प्रकारे इस्राएलमधली बआलाची पूजा येहूने मोडून काढली.
29 Mais quant aux péchés de Jéroboam, fils de Nabath, qui fit pécher Israël, il ne s’en écarta pas, et il n’abandonna pas les veaux d’or qui étaient à Béthel et à Dan.
२९पण नबाटचा मुलगा यराबाम याने जी पापे इस्राएलाला करायला लावली त्यापासून येहू पूर्णपणे परावृत्त झाला नाही. बेथेल आणि दान इथली सोन्याची वासरे त्याने उध्वस्त केली नाहीत.
30 Le Seigneur dit donc à Jéhu: Parce que tu as fait avec zèle ce qui était droit et plaisait à mes yeux, et que tout ce qui était en mon cœur, tu l’as fait contre la maison d’Achab, tes enfants, jusqu’à la quatrième génération, seront assis sur le trône d’Israël.
३०परमेश्वर येहूला म्हणाला, “तू चांगली कामगिरी केलीस. माझ्या मते जे उचित तसेच तू वागलास. अहाबाच्या कुटुंबाचा मला हव्या त्या पध्दतीने तू विध्वंस केलास. तेव्हा आता तुझ्या पुढच्या चार पिढ्या इस्राएलवर राज्य करतील.
31 Cependant Jéhu n’eut pas soin de marcher dans la loi du Seigneur Dieu d’Israël en tout son cœur, et il ne s’écarta par des péchés de Jéroboam, qui avait fait pécher Israël.
३१पण परमेश्वराच्या नियमांना अनुसरुन मन: पूर्वक वर्तन ठेवणे येहूला जमले नाही. यराबामाच्या ज्या दुष्कृत्यांमुळे इस्राएल पापाच्या गर्तेत गेला ते करण्यापासून तो स्वत: ला थोपवू शकला नाही.”
32 En ces jours-là, le Seigneur commença à se lasser d’Israël, et Hazaël les battit sur toutes les frontières d’Israël,
३२याचवेळी परमेश्वराने इस्राएल प्रदेशाचे लचके तोडायला सुरुवात केली. अरामाचा राजा हजाएल याने इस्राएलच्या सर्व सीमांवर पराभव केला.
33 Depuis le Jourdain, vers le côté oriental, ruinant toute la terre de Galaad, Gad, Ruben et Manassé, depuis Aroër, qui est sur le torrent d’Arnon, et Galaad, et Basan.
३३यार्देन नदीच्या पूर्वेकडील प्रदेश त्याने जिंकला गाद, रऊबेन आणि मनश्शे यांच्या कुटुंबांच्या ताब्यातील प्रदेशासकट सगळा गिलाद त्यामध्ये आला. तसेच आर्णोन खोऱ्यातील अरोएर पासून गिलाद आणि बाशानपर्यंतचा प्रदेश हजाएलने जिंकला.
34 Mais le reste des actions de Jéhu, tout ce qu’il a fait, et son courage, n’est-ce pas écrit dans le Livre des actions des jours des rois d’Israël?
३४“इस्राएलच्या राजांचा इतिहास” या पुस्तकात येहूच्या इतर पराक्रमांची नोंद आहे.
35 Et Jéhu dormit avec ses pères, et on l’ensevelit à Samarie, et Joachaz, son fils, régna en sa place.
३५येहू मरण पावला आणि आपल्या पूर्वजांना मिळाला. लोकांनी त्याचे दफन शोमरोनात केले. येहूचा मुलगा यहोआहाज त्यानंतर इस्राएलचा राजा झाला.
36 Or les jours durant lesquels Jéhu régna sur Israël, en Samarie, furent de vingt-huit ans.
३६येहूने शोमरोन मधून इस्राएलवर अठ्ठावीस वर्षे राज्य केले.

< 2 Rois 10 >