< 1 Chronicles 25 >

1 And David and the heads of the host separate for service, of the sons of Asaph, and Heman, and Jeduthun, who are prophesying with harps, with psalteries, and with cymbals, and the number of the workmen is according to their service.
दावीद आणि निवासमंडपाच्या अधिकाऱ्यांनी मिळून आसाफाच्या मुलांना एका खास कामासाठी निवडले. हेमान व यदूथून ही ती अपत्ये. वीणा, सतारी आणि झांजा ही वाद्ये, वाजवून देवाचा संदेश देणे असे त्यांच्या कामाचे स्वरूप होते. हे काम करणाऱ्या लोकांची यादी:
2 Of sons of Asaph: Zaccur, and Joseph, and Nethaniah, and Asharelah, sons of Asaph, [are] by the side of Asaph, who is prophesying by the side of the king.
आसाफाच्या वंशातले: जक्कूर, योसेफ, नथन्या आणि अशेराला, हे आसाफाचे पुत्र राज्याच्या देखरेखीखाली आसाफाच्या मार्गदर्शनाखाली संदेश देत होते.
3 Of Jeduthun: sons of Jeduthun, Gedaliah, and Zeri, and Jeshaiah, Hashabiah, and Mattithiah, Shisshah, [are] by the side of their father Jeduthun; with a harp he is prophesying, for giving of thanks and of praise to Jehovah.
यदूथूनाचे वंशज: गदल्या, सारी, यशया, हशब्या व मत्तिथ्या हे सहाजण, आपला पिता यदूथून याच्या मार्गदर्शनाखाली वीणा वाजवून परमेश्वराचे उपकारस्मरण आणि स्तवन करून संदेश देत असे.
4 Of Heman: sons of Heman: Bukkiah, Mattaniah, Uzziel, Shebuel, and Jerimoth, Hananiah, Hanani, Eliathah, Giddalti, and Romamti-Ezer, Joshbekashah, Mallothi, Hothir, Mahazioth;
हेमानाचे वंशज: बुक्कीया, मत्तन्या, उज्जियेल, शबुएल, यरीमोथ, हनन्या, हनानी, अलियाथा, गिद्दल्ती, रोममती-एजेर, याश्बकाशा, मल्लोथी, होथीर आणि महजियोथ.
5 all these [are] sons of Heman — seer of the king in the things of God — to lift up a horn; and God giveth to Heman fourteen sons and three daughters.
हेमान हा राजाचा संदेष्टा होता, हे सर्व हेमानाचे पुत्र शिंग वाजवायला होते. देवाने हेमानाला चौदा मुले आणि तीन मुली देऊन सन्मानीत केले.
6 All these [are] by the side of their father in the song of the house of Jehovah, with cymbals, psalteries, and harps, for the service of the house of God; by the side of the king [are] Asaph, and Jeduthun, and Heman.
हे सर्व आपल्या पित्याच्या मार्गदर्शनाखाली परमेश्वराच्या घरात ही अपत्ये झांजा, सतारी आणि वीणा वाजवून गीते गाण्यासाठी आणि देवाच्या घरातील सेवेसाठी होते. आसाफ, यदूथून व हेमान हे राजाच्या देखरेखीखाली होती.
7 And their number, with their brethren — taught in the song of Jehovah, all who are intelligent — is two hundred, eighty and eight.
ते आणि त्यांचे नातेवाईक गायनकलेत पारंगत व परमेश्वरासाठी गायनाचे प्रशिक्षण घेतलेले दोनशे अठ्याऐशींजण होते.
8 And they cause to fall lots — charge over-against [charge], as well the small as the great, the intelligent with the learner.
त्यांनी लहानथोर, गुरु-शिष्य सर्वानी आपल्या कामासाठी सारख्याच चिठ्ठ्या टाकल्या व कामे वाटून घेतली.
9 And the first lot goeth out for Asaph to Joseph; [to] Gedaliah the second; he, and his brethren and his sons, twelve;
तेव्हा आसाफाच्या मुलांच्या संबंधीत: पहिली चिठ्ठी योसेफाची निघाली; दुसरी गदल्याची त्याची अपत्ये आणि भाऊबंद यांच्यातून बाराजणांना घेतले.
10 the third [to] Zaccur, his sons and his brethren, twelve;
१०तिसरी चिठ्ठी जक्कूरचे पुत्र आणि भाऊबंद यांच्यामधून, बाराजणांना घेतले.
11 the fourth to Izri, his sons and his brethren, twelve;
११चौथी चिठ्ठी इस्रीची, त्याचे पुत्र आणि आप्त यांच्यामधून बाराजणांना घेतले.
12 the fifth [to] Nethaniah, his sons and his brethren, twelve;
१२पाचवी नथन्याची त्याचे पुत्र व नातलग यामधून बाराजण.
13 the sixth [to] Bukkiah, his sons and his brethren, twelve;
१३सहावी चिठ्ठी बुक्कीयाची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
14 the seventh [to] Jesharelah, his sons and his brethren, twelve;
१४सातवी यशरेलाची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
15 the eighth [to] Jeshaiah, his sons and his brethren, twelve;
१५यशयाची आठवी. या चिठ्ठीनुसार पुत्र आणि भाऊबंद यामधून बाराजण.
16 the ninth [to] Mattaniah, his sons and his brethren, twelve;
१६नववी मत्तन्याची. त्याचे पुत्र आणि नातलग यामधून बाराजण.
17 the tenth [to] Shimei, his sons and his brethren, twelve:
१७दहावी शिमीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
18 eleventh [to] Azareel, his sons and his brethren, twelve;
१८अकरावी अजरेलाची. त्याचे पुत्र आणि नातलाग यांमधून बाराजण.
19 the twelfth [to] Hashabiah, his sons and his brethren, twelve;
१९बारावी हशब्याची. त्याचे पुत्र आणि त्याचे नातलग यांमधून बाराजण.
20 at the thirteenth [to] Shubael, his sons and his brethren, twelve;
२०तेरावी शूबाएलाची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
21 at the fourteenth [to] Mattithiah, his sons and his brethren, twelve;
२१चौदावी मत्तिथ्याची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण.
22 at the fifteenth [to] Jeremoth, his sons and his brethren, twelve;
२२पंधरावी यरेमोथची. त्याचे पुत्र आणि नातेवाईक यांमधून बारा.
23 at the sixteenth [to] Hananiah, his sons and his brethren, twelve;
२३सोळावी हनन्याची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
24 at the seventeenth [to] Joshbekashah, his sons and his brethren, twelve;
२४सतरावी याश्बकाशाची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
25 at the eighteenth [to] Hanani, his sons and his brethren, twelve;
२५अठरावी हनानीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
26 at the nineteenth [to] Mallothi, his sons and his brethren, twelve;
२६एकुणिसावी मल्लोथीची. त्याचे पुत्र आणि आप्त यांमधून बाराजण.
27 at the twentieth [to] Eliathah, his sons and his brethren, twelve;
२७विसावी अलीयाथची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण.
28 at the one and twentieth [to] Hothir, his sons and his brethren, twelve;
२८एकविसावी होथीरची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
29 at the two and twentieth [to] Giddalti, his sons and his brethren, twelve;
२९बावीसावी गिद्दल्तीची. त्याचे पुत्र आणि नातलग यांमधून बाराजण.
30 at the three and twentieth [to] Mahazioth, his sons and his brethren, twelve;
३०तेविसावी महजियोथची. त्याचे पुत्र आणि भाऊबंद यांमधून बाराजण.
31 at the four and twentieth [to] Romamti-Ezer, his sons and his brethren, twelve.
३१चोविसावी रोममती-एजेरची. त्याचे पुत्र आणि नातलगामधून बाराजण.

< 1 Chronicles 25 >