< Romans 2 >

1 Therefore you are without excuse, O man, whoever you are who judge. For in that which you judge another, you condemn yourself. For you who judge practice the same things.
तेव्हा दुसर्‍याला दोष लावणार्‍या अरे बंधू, तू कोणीही असलास तरी तुला सबब नाही; कारण तू ज्या गोष्टींत दुसर्‍याला दोष लावतोस त्यामध्ये तू स्वतःला दोषी ठरवतोस; कारण दोष लावणारा तूही त्याच गोष्टी करतोस.
2 We know that the judgment of God is according to truth against those who practice such things.
पण आपल्याला माहीत आहे की, अशा गोष्टी करणार्‍यांविरुद्ध, देवाचा सत्यानुसार न्यायनिवाडा आहे.
3 Do you think this, O man who judges those who practice such things, and do the same, that you will escape the judgment of God?
तर अशा गोष्टी करणार्‍यांना दोष लावणार्‍या आणि आपण स्वतः त्याच गोष्टी करणार्‍या, अरे बंधू, तू स्वतः देवाच्या न्यायनिवाड्यातून सुटशील असे मानतोस काय?
4 Or do you despise the riches of his goodness, forbearance, and patience, not knowing that the goodness of God leads you to repentance?
किंवा देवाची दया तुला पश्चात्तापाकडे घेऊन जात आहे हे न ओळखून तू त्याच्या ममतेचे, क्षमाशीलतेचे आणि सहनशीलतेचे धन तुच्छ मानतोस काय?
5 But according to your hardness and unrepentant heart you are treasuring up for yourself wrath in the day of wrath, revelation, and of the righteous judgment of God,
पण तू आपल्या हटवादीपणाने व आपल्या पश्चात्तापहीन मनाने आपल्या स्वतःसाठी देवाच्या क्रोधाच्या व यथोचित न्यायाच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी क्रोध साठवून ठेवत आहेस.
6 who “will pay back to everyone according to their works:”
तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देईल.
7 to those who by perseverance in well-doing seek for glory, honor, and incorruptibility, eternal life; (aiōnios g166)
म्हणजे जे धीराने सत्कर्मे करीत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवू पाहतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच; (aiōnios g166)
8 but to those who are self-seeking and don’t obey the truth, but obey unrighteousness, will be wrath, indignation,
परंतु जे तट पाडणारे सत्याला न मानता अनीतीला मानतात त्यांना भयानक क्रोध व भयानक कोप.
9 oppression, and anguish on every soul of man who does evil, to the Jew first, and also to the Greek.
संकट व क्लेश हे येतील. म्हणजे दुष्कृत्य करणारा मनुष्य प्रथम यहूदी आणि मग हेल्लेणी अशा प्रत्येकाच्या जीवावर ती येतील.
10 But glory, honor, and peace go to every man who does good, to the Jew first, and also to the Greek.
१०पण प्रत्येक चांगले करणार्‍या प्रथम यहूद्याला आणि मग ग्रीकास गौरव, शांती व सन्मान ही मिळतील.
11 For there is no partiality with God.
११कारण देवाजवळ पक्षपात नाही.
12 For as many as have sinned without the law will also perish without the law. As many as have sinned under the law will be judged by the law.
१२कारण, नियमशास्त्राशिवाय असलेल्या जितक्यांनी पाप केले असेल ते नियमशास्त्राशिवाय नाश पावतील आणि नियमशास्त्राखाली असलेल्या जितक्यांनी पाप केले असेल त्यांचा नियमशास्त्रानुसार न्याय होईल.
13 For it isn’t the hearers of the law who are righteous before God, but the doers of the law will be justified
१३कारण नियमशास्त्राचे श्रवण करणारे देवापुढे नीतिमान आहेत असे नाही, पण नियमशास्त्राचे आचरण करणारे नीतिमान ठरतील.
14 (for when Gentiles who don’t have the law do by nature the things of the law, these, not having the law, are a law to themselves,
१४कारण ज्यांना नियमशास्त्र नाही असे परराष्ट्रीय जेव्हा स्वभावतः नियमशास्त्रातील गोष्टी करतात तेव्हा त्यांना नियमशास्त्र नाही तरी ते स्वतः स्वतःसाठी नियमशास्त्र होतात.
15 in that they show the work of the law written in their hearts, their conscience testifying with them, and their thoughts among themselves accusing or else excusing them)
१५आणि एकमेकांतील त्यांचे विचार जेव्हा एकमेकांवर आरोप करतात किंवा एकमेकांचे समर्थन करतात आणि त्यांचे विवेकही त्यांच्या जोडीला साक्ष देतात तेव्हा ते त्यांच्या हृदयावर लिहिलेल्या नियमशास्त्राचा परिणाम दाखवितात.
16 in the day when God will judge the secrets of men, according to my Good News, by Jesus Christ.
१६देव, माझ्या सुवार्तेप्रमाणे जेव्हा मनुष्यांच्या गुप्त गोष्टींचा ख्रिस्त येशूकडून न्याय करील त्यादिवशी हे दिसून येईल.
17 Indeed you bear the name of a Jew, rest on the law, glory in God,
१७आता जर तू स्वतःला यहूदी म्हणतोस, नियमशास्त्राचा आधार घेतोस आणि देवाचा अभिमान मिरवतोस;
18 know his will, and approve the things that are excellent, being instructed out of the law,
१८तू त्याची इच्छा जाणतोस आणि चांगल्या गोष्टी पसंत करतोस, कारण तुला नियमशास्त्रातून शिक्षण मिळाले आहे;
19 and are confident that you yourself are a guide of the blind, a light to those who are in darkness,
१९आणि तुझी खातरी आहे की तूच अंधळ्यांचा वाटाड्या आहेस जे अंधारात आहेत त्यांचा प्रकाश,
20 a corrector of the foolish, a teacher of babies, having in the law the form of knowledge and of the truth.
२०अल्पबुद्धी लोकांचे शिक्षक आणि लहान बाळांचा गुरु आहेस; कारण तुझ्याजवळ नियमशास्त्रात ज्ञानाचे व सत्याचे स्वरूप आहे;
21 You therefore who teach another, don’t you teach yourself? You who preach that a man shouldn’t steal, do you steal?
२१तर मग जो तू दुसर्‍याला शिकवतोस तो तू स्वतःला शिकवीत नाहीस काय? चोरी करू नये, असे जो तू घोषणा करतोस तो तू चोरी करतो काय?
22 You who say a man shouldn’t commit adultery, do you commit adultery? You who abhor idols, do you rob temples?
२२व्यभिचार करू नये, असे जो तू सांगतोस तो तू व्यभिचार करतोस काय? जो तू मूर्तींचा विटाळ मानतोस तो तू देवळे लुटतोस काय?
23 You who glory in the law, do you dishonor God by disobeying the law?
२३जो तू नियमशास्त्राचा अभिमान मिरवतोस तो तू नियमशास्त्राचे उल्लंघन करून देवाचा अपमान करतोस काय?
24 For “the name of God is blasphemed among the Gentiles because of you,” just as it is written.
२४कारण शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे देवाच्या नावाची परराष्ट्रीयात तुझ्यामुळे निंदा होत आहे.
25 For circumcision indeed profits, if you are a doer of the law, but if you are a transgressor of the law, your circumcision has become uncircumcision.
२५कारण जर तू नियमशास्त्राचे आचरण केलेस तर सुंता खरोखर उपयोगी आहे; पण जर तू नियमशास्त्राचे उल्लंघन करतोस तर तुझी सुंता झालेली असूनही ती न झाल्यासारखीच आहे.
26 If therefore the uncircumcised keep the ordinances of the law, won’t his uncircumcision be accounted as circumcision?
२६म्हणून कोणी मनुष्य जर सुंता न झालेला असूनही, नियमशास्त्राचे नियम पाळील तर त्याची सुंता न होणे हे सुंता असे गणण्यात येणार नाही काय?
27 Won’t those who are physically uncircumcised, but fulfill the law, judge you, who with the letter and circumcision are a transgressor of the law?
२७आणि देहाने सुंता न झालेला कोणी जर नियमशास्त्राचे पालन करीत असेल, तर ज्या तुला शास्त्रलेख व सुंताविधी मिळाले असूनही तू नियमशास्त्राचे उल्लंघन करतोस त्या तुझा तो न्याय करणार नाही काय?
28 For he is not a Jew who is one outwardly, neither is that circumcision which is outward in the flesh;
२८कारण बाहेरून यहूदी आहे तो यहूदी नाही किंवा बाहेरून देहात सुंता आहे ती खरोखर सुंता नाही.
29 but he is a Jew who is one inwardly, and circumcision is that of the heart, in the spirit, not in the letter; whose praise is not from men, but from God.
२९कारण जो अंतरी यहूदी आहे तो यहूदी होय आणि जी आध्यात्मिक अनुसरून आहे, शास्त्रलेखाला अनुसरून नाही, अशी जी अंतःकरणाची सुंता आहे ती सुंता होय आणि त्याची प्रशंसा मनुष्याकडून नाही परंतु देवाकडून होईल.

< Romans 2 >