< Exodus 34 >

1 Yahweh said to Moses, “Cut two tablets of stone like the first tablets. I will write on these tablets the words that were on the first tablets, the tablets that you broke.
मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “पहिल्या दोन पाट्यांप्रमाणे आणखी दोन दगडी पाट्या घडून तयार कर म्हणजे फोडून टाकलेल्या पहिल्या पाट्यांवर जी वचने होती ती मी त्याच्यावर लिहीन.
2 Be ready by morning and come up Mount Sinai, and present yourself there to me on the mountain top.
पहाटेस तयार हो व सीनाय पर्वतावर चढून ये आणि तेथे पर्वताच्या शिखरावर माझ्यासमोर हजर राहा.
3 No one is to come up with you. Do not let anyone else be seen anywhere on the mountain. No flocks or herds are even to graze in front of the mountain.”
तुझ्याबरोबर कोणी चढून वर येऊ नये पर्वतावरील कोणत्याच ठिकाणी कोणी मनुष्य दिसू नये; तसेच शेरडेमेंढरे कळप व गुरेढोरे ह्यांना त्या पर्वताच्या पायथ्याशी चरू देऊ नकोस.”
4 So Moses cut two tablets of stone like the first ones, and he got up early in the morning and went up Mount Sinai, as Yahweh had instructed him. Moses carried the tablets of stone in his hand.
तेव्हा मोशेने पहिल्या पाट्यांसारख्याच आणखी दोन दगडी पाट्या घडून तयार केल्या; सकाळीच उठून त्या हाती घेऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सीनाय पर्वतावर चढून गेला;
5 Yahweh came down in the cloud and stood with Moses there, and he pronounced the name “Yahweh.”
तेव्हा मोशे पर्वतावर आल्यावर परमेश्वर एका ढगातून त्याच्याकडे खाली उतरला व तेथे त्याच्यापाशी उभा राहिला; आणि त्याने परमेश्वर या नावाची घोषणा केली.
6 Yahweh passed by before him and proclaimed, “Yahweh, Yahweh, God is merciful and gracious, slow to anger, and abounding in covenant faithfulness and trustworthiness,
परमेश्वर त्याच्यापुढून अशी घोषणा करीत गेला: “परमेश्वर, परमेश्वर, दयाळू, कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर,
7 keeping covenant faithfulness for thousands of generations, forgiving iniquities, transgressions, and sins. But he will by no means clear the guilty. He will bring the punishment for the fathers' sin on their children and on their children's children, as far as the third and fourth generations.”
हजारो जणांवर दया करणारा, अन्याय, अपराध व पाप यांची क्षमा करणारा, पण अपराधी जनांची मुळीच गय न करणारा, असा तो वडिलांच्या दुष्टाईबद्दल पुत्रपौत्रांचा तिसऱ्या व चौथ्या पिढीपर्यंतही समाचार घेतो.”
8 Moses quickly bowed his head to the ground and worshiped.
मग मोशेने ताबडतोब भूमीपर्यंत वाकून परमेश्वरास नमन केले.
9 Then he said, “If now I have found favor in your eyes, my Lord, please go among us, for this people is stubborn. Pardon our iniquity and our sin, and take us as your inheritance.”
मग तो म्हणाला, “हे प्रभू, तुझी कृपादृष्टी जर माझ्यावर झाली असेल तर तू आमच्याबरोबर चालावे. हे लोक ताठ मानेचे आहेत हे मला माहीत आहे; तरी आमचा अन्याय व पाप यांची तू आम्हांला क्षमा कर आणि आपले वतन म्हणून आमचा स्वीकार कर.”
10 Yahweh said, “See, I am about to make a covenant. Before all your people, I will do marvels such as have not been done in all the earth nor in any nation. All the people among you will see my deeds, for it is a fearful thing that I am doing with you.
१०मग परमेश्वर म्हणाला, “पाहा, मी तुझ्या सर्व लोकांबरोबर हा करार करीत आहे; आतापर्यंत पृथ्वीवरील कोणत्याही राष्ट्रासाठी यापूर्वी कधीही केलेले नाहीत ते चमत्कार मी करीन; ज्या लोकांमध्ये तू राहशील ते सर्व लोक परमेश्वराची कृती पाहतील, कारण जे मी तुझ्याबरोबर करणार आहे ते भयानक आहे.
11 Obey what I command you today. I am about to drive out before you the Amorites, Canaanites, Hittites, Perizzites, Hivites, and Jebusites.
११मी आज तुला ज्या आज्ञा देतो त्या तू पाळ म्हणजे मग मी अमोरी, कनानी, हित्ती, परिज्जी, हिव्वी व यबूसी या लोकांस तुझ्यासमोरुन घालवून देतो.
12 Be careful not to make a covenant with the inhabitants of the land where you are going, or they will become a trap among you.
१२सावध राहा, नाही तर तू ज्या देशात जात आहेस त्यामध्ये राहणाऱ्या लोकांबरोबर कोणत्याही प्रकारे करारमदार करशील आणि तो तुला पाश होईल.
13 Instead, you must break down their altars, smash their stone pillars, and cut down their Asherah poles.
१३परंतु त्यांच्या वेद्या पाडून टाक; त्यांचे स्तंभ तोडून टाक; त्यांच्या अशेरा मूर्ती फोडून टाक.
14 For you must worship no other god, for Yahweh, whose name is Jealous, is a jealous God.
१४तू तर कोणत्याही दुसऱ्या देवाला नमन करू नये; कारण ज्याचे नाव ईर्ष्यावान असे आहे; तो परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे.
15 So be careful not to make a covenant with the inhabitants of the land, for they prostitute themselves to their gods, and they sacrifice to their gods. Then one of them will invite you and you will eat some of his sacrifice,
१५तू सावध राहा. या देशातील रहिवाशाबरोबर कोणत्याही प्रकारचे करारमदार करू नको; ते व्यभिचारी मतीने आपल्या देवामागे लागून त्यांना बलिदान करतील. त्यातल्या कोणी तुला बोलावले असता तुम्ही त्यांच्या बलिदानातले काही खाल.
16 and then you will even take some of his daughters for your sons, and his daughters will prostitute themselves to their gods, and they will make your sons prostitute themselves to their gods.
१६त्यांच्या कन्यांची तुम्ही आपल्या पुत्रांसाठी पत्नी म्हणून निवड कराल; त्यांच्या कन्या व्यभिचारी मतीने आपल्या देवाच्यामागे जातील आणि त्या तुमच्या पुत्रांना व्यभिचारी बुध्दीने त्यांच्या नादी लावतील.
17 Do not make for yourselves gods of molten metal.
१७तू आपल्यासाठी ओतीव देव करू नको.
18 You must keep the Festival of Unleavened Bread. As I commanded you, you must eat bread without yeast for seven days at the fixed time in the month of Aviv, for it was in the month of Aviv you came out from Egypt.
१८बेखमीर भाकरीचा सण पाळ, मी दिलेल्या आज्ञेप्रमाणे नेमलेल्या वेळी अबीब महिन्यातील सात दिवसपर्यंत तू बेखमीर भाकर खावी, कारण अबीब महिन्यात मिसर देशातून तू बाहेर निघालास.
19 All the firstborn are mine, even every male firstborn of your cattle, both of oxen and sheep.
१९प्रत्येक प्रथम जन्मलेला माझा आहे; तसेच तुझ्या गुरांढोरापैकी गायीचे व मेंढराचे प्रथम जन्मलेले नरवत्स माझे आहेत.
20 You must buy back the firstborn of a donkey with a lamb, but if you do not buy it back, then you must break its neck. You must buy back all the firstborn of your sons. No one may appear before me empty-handed.
२०गाढवीचे पहिले शिंगरु खंडणी दाखल एक कोकरू देऊन सोडवून घ्यावे, पण त्यास तसे सोडवले नाही तर त्याची मान मोडावी. तुझ्या मुलांपैकी प्रत्येक ज्येष्ठ पुत्राला मोबदला देऊन सोडवून घ्यावा. कोणी रिकाम्या हाताने माझ्यासमोर येऊ नये.
21 You may work for six days, but on the seventh day you must rest. Even at plowing time and in harvest, you must rest.
२१सहा दिवस तू आपले कामकाज कर, परंतु सातव्या दिवशी विसावा घे; नांगरणीच्या व कापणीच्या हंगामातही सातव्या दिवशी तू विसावा घे.
22 You must observe the Festival of Weeks with the first yield of the wheat harvest, and you must observe the Festival of Ingathering at the year's end.
२२तू सप्ताहाचा, म्हणजे गव्हाच्या कापणीच्या प्रथम पिकाचा सण पाळावा.
23 Three times a year all your men must appear before Lord Yahweh, the God of Israel.
२३तुमच्या सर्व पुरुषांनी वर्षातून तीनदा इस्राएलाचा देव प्रभू परमेश्वर ह्यासमोर हजर रहावे.
24 For I will drive out nations before you and expand your borders. No one will desire to have your land as their own when you go up to appear before Yahweh your God three times in a year.
२४मी तर परराष्ट्रांना तुझ्यापुढून घालवून देईन; मी तुझ्या देशाच्या सीमा वाढवीन; आणि वर्षातून तीनदा तू आपला देव परमेश्वर ह्याच्यामोर हजर राहायला जाशील त्या वेळी तुझ्या देशाचा कोणीही लोभ धरणार नाही.
25 You must not offer the blood of my sacrifice with any yeast, nor may any meat from the sacrifice at the Festival of the Passover be left over to the morning.
२५माझ्या यज्ञबलीचे रक्त खमिराच्या भाकरीबरोबर अर्पू नये; आणि वल्हांडण सणाच्या यज्ञपशूचे काहीही सकाळपर्यंत राहू देऊ नये.
26 You must bring the best of the firstfruits from your fields to my house. You must not boil a young goat in its mother's milk.”
२६हंगामाच्या वेळी तुझ्या जमिनीच्या उत्पन्नातील प्रथम पिकाचा सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर, ह्याच्या मंदिरात आणावा. करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवू नये.”
27 Yahweh said to Moses, “Write down these words, for in accordance with these words I have made a covenant with you and with Israel.”
२७मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “ही वचने लिहून ठेव, कारण याच वचनांप्रमाणे मी तुझ्याशी व इस्राएल लोकांशी करार केला आहे.”
28 Moses was there with Yahweh for forty days and nights; he did not eat any food nor drink any water. He wrote on the tablets the words of the covenant, the Ten Commandments.
२८मोशे तेथे परमेश्वराजवळ चाळीस दिवस व चाळीस रात्री राहिला; त्या दिवसात त्याने अन्न खाल्ले नाही, आणि तो पाणीही प्याला नाही; आणि त्या पाट्यांवर परमेश्वराने कराराची वचने म्हणजे दहा आज्ञा लिहून ठेवल्या.
29 When Moses came down from Mount Sinai with the two tablets of the covenant decrees in his hand, he did not know that the skin of his face had become radiant while speaking with God.
२९मग मोशे, साक्षपटाच्या त्या दोन पाट्या घेऊन सीनाय पर्वतावरून खाली उतरला; परमेश्वराशी बोलल्यामुळे त्याच्या चेहऱ्यातून तेजाचे किरण निघत आहेत ह्याचे त्यास भान नव्हते.
30 When Aaron and the Israelites saw Moses, the skin of his face was shining, and they were afraid to come near him.
३०अहरोन व सर्व इस्राएल लोक यांनी मोशेच्या चेहऱ्यावरील तेजस्वी किरणे पाहिली तेव्हा ते त्याच्याजवळ जायला घाबरले;
31 But Moses called to them, and Aaron and all the leaders of the community came up to him. Then Moses spoke with them.
३१परंतु मोशेने अहरोन व मंडळीचे प्रमुख ह्याना बोलावले, तेव्हा अहरोन व मंडळीचे प्रमुख त्याच्याकडे परत आले, तो त्यांच्याशी बोलू लागला.
32 After this, all the people of Israel came up to Moses, and he told them all the commands that Yahweh had given him on Mount Sinai.
३२त्यानंतर सर्व इस्राएल लोक जवळ आले आणि जे काही परमेश्वराने त्यास सीनाय पर्वतावर सांगितले होते ते सगळे त्याने त्यांना आज्ञा देऊन सांगितले.
33 When Moses had finished speaking with them, he put a veil over his face.
३३लोकांशी आपले बोलणे संपविल्यावर मोशेने आपला चेहरा आच्छादनाने झाकला.
34 Whenever Moses went before Yahweh to speak with him, he would remove the veil, until he came out. When he came out, he would tell the Israelites what he was commanded to say.
३४जेव्हा कधीही मोशे परमेश्वराबरोबर बोलावयास त्याच्यासमोर आत जाई, तेव्हा तो बाहेर येईपर्यंत आपल्या चेहऱ्यावरील आच्छादन काढीत असे; मग तो इस्राएल लोकांकडे बाहेर येऊन परमेश्वर जी काही आज्ञा देई ती तो त्यांना सांगत असे.
35 When the Israelites saw Moses' face shining, he would put the veil over his face again until he went back in to speak with Yahweh.
३५मोशेचा तेजाने तळपणारा चेहरा इस्राएल लोक पाहत तेव्हा तो पुन्हा आपला चेहरा झाकून घेई; आणि तो परमेश्वराकडे बोलावयास आत जाईपर्यंत तो आपला चेहरा झाकून ठेवत असे.

< Exodus 34 >