< 2 Corinthians 2 >

1 I judged (for *N+kO) within myself this not again in grief to you to come.
कारण मी स्वतःशी ठरवले होते की, मी पुन्हा दुःख देण्यास तुमच्याकडे येऊ नये.
2 If for I myself grieve you again who (is *k) the [one] gladdening me except not the [one] being grieved by me?
कारण जर मी तुम्हास दुःख देतो, तर ज्याला माझ्यामुळे दुःख होते त्याच्यावाचून मला आनंदित करणारा कोण आहे?
3 And I wrote (to you *k) this same thing, so that not having come grief (I may have *N+kO) from [those] of whom it was necessary me to rejoice having trusted in all you that my joy of all of you is.
आणि मी हेच लिहिले होते, म्हणजे मी आल्यावर ज्यांच्याविषयी मी आनंद करावा त्यांच्याकडून मला दुःख होऊ नये, मला तुम्हा सर्वांविषयी विश्वास आहे की, माझा आनंद तो तुम्हा सर्वांचादेखील आहे.
4 Out of for much affliction and anguish of heart I wrote to you through many tears, not that you may be grieved, but the love that you may know that I have more abundantly toward you.
कारण, मी दुःखाने, मनाच्या तळमळीने व अश्रू गाळीत तुम्हास लिहिले ते तुम्ही दुःखी व्हावे म्हणून नाही पण तुमच्यावर जी माझी प्रीती आहे तिची खोली तुम्हास समजावी.
5 If however anyone has caused grief, not me myself has he grieved but in part — that not I may burden all you.
जर कोणी दुःख दिले असेल, तर त्याने केवळ मलाच दुःख दिले, असे नाही, तर काही प्रमाणात तुम्हा सर्वांना दिले आहे. त्यासंबंधी मी फार कठीण होऊ इच्छीत नाही.
6 Sufficient to such a one [is] the punishment this which [is] by the majority,
अशा मनुष्यास ही बहुमताने दिली ती शिक्षा पुरे.
7 so that on the contrary rather for you to forgive and to comfort [him], lest perhaps by more excessive sorrow may be overwhelmed such a one.
म्हणून, उलट त्यास क्षमा करून तुम्ही त्याचे सांत्वन करावे; यासाठी की अति दुःखाने तो दबून जाऊ नये.
8 Therefore I exhort you to confirm toward him love.
म्हणून मी तुम्हास विनंती करतो की, त्याच्यावर तुमची प्रीती आहे अशी त्याची खातरी करून द्या.
9 For this indeed also did I write, so that I may know the proof of you, whether to everything obedient you are.
कारण मी तुम्हास या हेतूने लिहिले आहे की, तुम्ही परीक्षेत टिकता की नाही व प्रत्येक बाबतीत तुम्ही आज्ञाधारक राहता की नाही हे पाहावे.
10 To whomever now anything you forgive, I also myself; I also myself; and for I myself (to whom *N+kO) I have forgiven, if anything I have forgiven, [it is] for you in [the] presence of Christ,
१०ज्या कोणाला तुम्ही कशाची क्षमा करता त्यास मीही क्षमा करतो, कारण मी क्षमा केली असेल तर ज्या कशाची कोणाला मी क्षमा केली आहे, त्यास तुमच्याकरीता, मी ख्रिस्ताच्या समक्ष केली आहे.
11 so that not we may be outwitted by Satan; not for of his schemes we are ignorant.
११यासाठी सैतानाने आपल्याला ठकवू नये; कारण आपण त्याच्या दुष्ट योजना जाणत नाही असे नाही.
12 Having come now to Troas for the gospel of Christ also a door to me having been opened in [the] Lord,
१२आणि पुढे जेव्हा मी ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी त्रोवस शहरास आल्यावर आणि प्रभूकडून माझ्यासाठी एक द्वार उघडले गेले,
13 not I have had rest in the spirit of mine in the not finding my Titus the brother of mine, instead having taken leave of them I went out to Macedonia.
१३माझा बंधू तीत हा मला सापडला नाही म्हणून माझ्या जीवाला चैन पडेना. मग तेथल्या लोकांचा निरोप घेऊन मी मासेदोनियास निघून गेलो.
14 However to God [be] thanks to the [One] always leading in triumph us in Christ and the fragrance of the knowledge of Him making manifest through us in every place,
१४पण देवाचे आभार मानतो जो ख्रिस्तामध्ये नेहमी आम्हास विजयाने नेतो आणि त्याच्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध प्रत्येक ठिकाणी आमच्याद्वारे सगळीकडे पसरवितो.
15 For of Christ a sweet perfume we are to God in those being saved and in those perishing,
१५कारण ज्यांचे तारण होत आहे अशा लोकात आणि ज्यांचा नाश होत आहे अशा लोकात आम्ही देवाला ख्रिस्ताचा सुवास आहोत.
16 to one indeed an odor (from *no) death to death, to one however a fragrance (from *no) life to life. And for these things who [is] sufficient?
१६ज्या लोकांचा नाश होत आहे, मृत्युचा मरणसूचक वास आणि जे तारले गेले आहेत, जीवनाकडे नेणारा जीवनाचा वास आहोत आणि या गोष्टींसाठी कोण लायक आहे?
17 Not for we are like the (many *NK+O) peddling the word of God, but as of sincerity, but as of God, (before *N+kO) God in Christ we speak.
१७कारण दुसर्‍या कित्येकांसारखे देवाच्या वचनाची भेसळ करणारे आम्ही नाही पण आम्ही शुद्ध भावाने, देवाचे म्हणून देवाच्या दृष्टीपुढे ख्रिस्तात बोलतो.

< 2 Corinthians 2 >