Aionian Verses

Genesis 37:35 (उत्पत्ति ३७:३५)
(parallel missing)
याकोबाच्या सर्व मुलांनी व मुलींनी त्याचे सांत्वन करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तो समाधान पावला नाही. तो म्हणाला, “मी मरेपर्यंत माझ्या मुलासाठी शोक करीत राहीन व अधोलोकात माझ्या मुलाकडे जाईन.” असा त्याचा बाप त्याच्याकरता रडला. (Sheol h7585)
Genesis 42:38 (उत्पत्ति ४२:३८)
(parallel missing)
परंतु याकोब म्हणाला, “मी बन्यामिनाला तुमच्याबरोबर पाठविणार नाही. त्याचा भाऊ मरण पावला आणि तो एकटाच राहिला आहे. ज्या वाटेने तुम्ही जाता तेथे त्यास काही अपाय झाला तर माझे पिकलेले केस अतिशय दुःखाने कबरेत पाठवाल.” (Sheol h7585)
Genesis 44:29 (उत्पत्ति ४४:२९)
(parallel missing)
आणि आता माझ्या या मुलाला तुम्ही माझ्यापासून घेऊन गेला आणि त्यास जर काही अपाय झाला तर तुम्ही माझे पिकलेले केस शोकाने मृतलोकात जायला कारण व्हाल. (Sheol h7585)
Genesis 44:31 (उत्पत्ति ४४:३१)
(parallel missing)
असे होईल की, मुलगा नाही हे पाहून तो मरून जाईल. आणि तुमचा चाकर, आमचा बाप याचे पिकलेले केस शोकाने मृतलोकात जायला तुझे सेवक कारण होतील. (Sheol h7585)
Numbers 16:30 (गणना १६:३०)
(parallel missing)
पण जर परमेश्वराने या लोकांस वेगळ्या नव्या रीतीने मारले. तर तुम्हास कळेल की त्यांनी परमेश्वराविरूद्ध पाप केले होते. हा पुरावा आहे. धरती दुभागेल आणि त्या लोकांस आपल्या पोटात घेईल. ते जिवंतपणीच त्यांच्या कबरेत जातील. आणि त्यांची सर्व चीजवस्तू त्यांच्याबरोबर जाईल.” (Sheol h7585)
Numbers 16:33 (गणना १६:३३)
(parallel missing)
ते लोक जिवंतपणी कबरेत गेले आणि त्यांची सगळी चीजवस्तूही त्यांच्याबरोबर गेली. नंतर जमीन पूर्ववत झाली. ते नष्ट झाले-लोकांतुन नाहीसे झाले. (Sheol h7585)
Deuteronomy 32:22 (अनुवाद ३२:२२)
(parallel missing)
माझा क्रोध धगधगणाऱ्या अग्नीप्रमाणे आहे. अधोलोकाच्या तळापर्यंत तो जाळत जातो. पृथ्वी व तिच्यावरील वनस्पती, पर्वतांचे पायथे यांनाही तो भस्मसात करतो. (Sheol h7585)
1 Samuel 2:6 (1 शमुवेल २:६)
(parallel missing)
परमेश्वर जिवे मारतो व जिवनात आणतो. तो अधोलोकास नेतो व वर आणतो. (Sheol h7585)
2 Samuel 22:6 (2 शमुवेल २२:६)
(parallel missing)
अधोलोकाचे पाश माझ्या भोवती आवळले होते. मृत्यूचा सापळा माझ्यासमोर तयार होता. (Sheol h7585)
1 Kings 2:6 (1 राजे २:६)
(parallel missing)
तुझ्याजवळ असलेल्या ज्ञानाने यवाबाबरोबर, जसे तुला योग्य वाटेल तसा तू वाग व त्याचे पिकलेले केस शांतीने कबरेत उतरू देऊ नको. (Sheol h7585)
1 Kings 2:9 (1 राजे २:९)
(parallel missing)
पण आता त्यास तू निर्दोष समजू नकोस. तू सुज्ञ मनुष्य आहेस, त्यास काय करायचे ते तुला समजते. त्या पिकलेल्या केसाच्या म्हाताऱ्याला रक्ताचे स्नान घालून कबरेत पाठव.” (Sheol h7585)
Job 7:9 (ईयोब ७:९)
(parallel missing)
ढग दिसेनासा होतो आणि निघून जातो. त्याचप्रमाणे मनुष्य मरतो आणि थडग्यात पुरला जातो. तो पुन्हा कधीही परत येत नाही. (Sheol h7585)
Job 11:8 (ईयोब ११:८)
(parallel missing)
त्याचे शहाणपण आकाशाच्या उंचीइतके आहे, तू काय करु शकतोस? ते अधोलोकापेक्षा खोल आहे. तू काय जाणू शकतोस? (Sheol h7585)
Job 14:13 (ईयोब १४:१३)
(parallel missing)
तू मला अधोलोकापासून लपव, संकटा पासून वाचव, आणि तुझा राग निवळेपर्यंत तू मला तिथे लपवावेस. नंतर तू माझी मदत नियमित करून माझी आठवण करशील तर किती बरे होईल. (Sheol h7585)
Job 17:13 (ईयोब १७:१३)
(parallel missing)
थडगेच माझे नवीन घर असेल अशी मी आशा करतो. अंधाऱ्या थडग्यांत माझे अंथरुण घालण्याची इच्छा मी धरतो. (Sheol h7585)
Job 17:16 (ईयोब १७:१६)
(parallel missing)
माझी आशा माझ्याबरोबरच मृत्युलोकात जाईल तेव्हा मातीत एकदाच आम्हास विसावा मिळते.” (Sheol h7585)
Job 21:13 (ईयोब २१:१३)
(parallel missing)
ते त्यांचे दिवस भरभराटीत घालवतात, नंतर ते शांतपणे खाली अधोलोकात जातात. (Sheol h7585)
Job 24:19 (ईयोब २४:१९)
(parallel missing)
हिवाळ्यातल्या बर्फापासून मिळालेले त्यांचे पाणी उष्ण आणि कोरडी हवा शोषून घेते. त्याप्रमाणे त्या पापी लोकांस थडग्यात नेले जाते. (Sheol h7585)
Job 26:6 (ईयोब २६:६)
(parallel missing)
देवापुढे अधोलोक नग्न आहे, त्याच्यापुढे विनाशस्थान स्वत: ला झाकून घेवू शकत नाही. (Sheol h7585)
Psalms 6:5 (स्तोत्रसंहिता ६:५)
(parallel missing)
कारण मरणात तुझे कोणीही स्मरण करत नाही. मृतलोकांत तुझी उपकारस्तुती कोण करणार? (Sheol h7585)
Psalms 9:17 (स्तोत्रसंहिता ९:१७)
(parallel missing)
दुष्ट मृतलोकांत टाकला जाईल, जे राष्ट्रे देवाला विसरले आहेत त्यांचे असेच होईल. (Sheol h7585)
Psalms 16:10 (स्तोत्रसंहिता १६:१०)
(parallel missing)
कारण तू माझ्या जीवाला मृतलोकांत राहू देणार नाही, ज्याच्याजवळ तुझी प्रेमदया आहे, त्यास तू अधोलोक पाहू देणार नाहीस. (Sheol h7585)
Psalms 18:5 (स्तोत्रसंहिता १८:५)
(parallel missing)
अधोलोकांच्या बंधनांनी मला घेरीले, मृत्यूच्या सापळ्याने मला अडकवले. (Sheol h7585)
Psalms 30:3 (स्तोत्रसंहिता ३०:३)
(parallel missing)
हे परमेश्वरा तू माझ्या जीवाला मृतलोकांतून वर काढून आणलेस. मी खाचेत उतरू नये, म्हणून तू मला जिवंत राखले आहे. (Sheol h7585)
Psalms 31:17 (स्तोत्रसंहिता ३१:१७)
(parallel missing)
परमेश्वरा, मला निराश होऊ देऊ नकोस, कारण मी तुला हाक मारतो, दुष्ट निराश केला जावो, मृतलोकांत तो निःशब्द होवो. (Sheol h7585)
Psalms 49:14 (स्तोत्रसंहिता ४९:१४)
(parallel missing)
ते कळपाप्रमाणे नेमलेले आहेत, जे मृतलोकांत जातात. मरण त्यांचा मेंढपाळ आहे. सरळ त्यांच्यावर धनीपण करतील असे सामर्थ्य त्यांना असेल. (Sheol h7585)
Psalms 49:15 (स्तोत्रसंहिता ४९:१५)
(parallel missing)
परंतु देव मृतलोकांच्या सामर्थ्यापासून माझा जीव खंडून घेणार. तो मला जवळ करणार. (Sheol h7585)
Psalms 55:15 (स्तोत्रसंहिता ५५:१५)
(parallel missing)
मृत्यू त्यांच्यावर अकस्मात येवो. जीवंतपणी ते मृतलोकांत खाली जावोत. कारण त्यांच्या जगण्यात दुष्टपण आहे. (Sheol h7585)
Psalms 86:13 (स्तोत्रसंहिता ८६:१३)
(parallel missing)
कारण माझ्यावर तुझी महान दया आहे; तू माझा जीव मृत्यूलोकापासून सोडवला आहेस. (Sheol h7585)
Psalms 88:3 (स्तोत्रसंहिता ८८:३)
(parallel missing)
कारण माझा जीव क्लेशांनी भरला आहे, आणि माझे जीवन मृतलोकाजवळ आले आहे. (Sheol h7585)
Psalms 89:48 (स्तोत्रसंहिता ८९:४८)
(parallel missing)
कोण जिवंत राहिल आणि मरणार नाही किंवा कोण आपला जीव अधोलोकातून सोडवील? (Sheol h7585)
Psalms 116:3 (स्तोत्रसंहिता ११६:३)
(parallel missing)
मृत्यूचे दोर माझ्याभोवती आवळले, आणि मला अधोलोकांच्या यातना झाल्या, संकट व क्लेश मला झाले. (Sheol h7585)
Psalms 139:8 (स्तोत्रसंहिता १३९:८)
(parallel missing)
मी जर वर आकाशात चढलो तर तिथे तू आहेस; जर मी खाली मृत्यूलोकात अंथरूण केले तरी, पाहा, तेथे तू आहेस. (Sheol h7585)
Psalms 141:7 (स्तोत्रसंहिता १४१:७)
(parallel missing)
जमीन नांगरताना आणि ढेकळे फोडताना जशी माती विखरली जाते, तशीच आमची हाडे अधोलोकांच्या तोंडाशी विखरली गेली आहेत. (Sheol h7585)
Proverbs 1:12 (नीतिसूत्रे १:१२)
(parallel missing)
जसे अधोलोक निरोग्यांना गिळून गर्तेत पडणाऱ्यांसारखे करतो तसे आपण त्यांना जिवंतपणीच गिळून टाकू. (Sheol h7585)
Proverbs 5:5 (नीतिसूत्रे ५:५)
(parallel missing)
तिचे पाय मृत्यूकडे खाली जातात; तिची पावले सर्व मार्गात अधोलोकात लागतात. (Sheol h7585)
Proverbs 7:27 (नीतिसूत्रे ७:२७)
(parallel missing)
तिचे घर म्हणजे अधोलोकाकडचा मार्ग आहे; तो मृत्यूच्या खोल्यांकडे खाली उतरून जातो. (Sheol h7585)
Proverbs 9:18 (नीतिसूत्रे ९:१८)
(parallel missing)
पण तेथे मरण पावलेले आहेत हे त्यांना समजत नाही, तिचे पाहुणे मृतलोकाच्या खोल स्थानात आहेत हे त्यास माहित नाही. (Sheol h7585)
Proverbs 15:11 (नीतिसूत्रे १५:११)
(parallel missing)
अधोलोक आणि विनाशस्थान परमेश्वरापुढे उघडे आहे; तर मग मनुष्यजातीच्या वंशाची अंतःकरणे त्याच्या दृष्टीपुढे किती जास्त असली पाहिजेत? (Sheol h7585)
Proverbs 15:24 (नीतिसूत्रे १५:२४)
(parallel missing)
सुज्ञाने खाली अधोलोकास जाऊ नये म्हणून त्याचा जीवनमार्ग वर जातो. (Sheol h7585)
Proverbs 23:14 (नीतिसूत्रे २३:१४)
(parallel missing)
जर तुम्ही त्यास छडीने मारले, तर तुम्ही त्याचा जीव अधोलाकापासून वाचवाल. (Sheol h7585)
Proverbs 27:20 (नीतिसूत्रे २७:२०)
(parallel missing)
मृतलोक आणि विनाशस्थान ही कधीही तृप्त होत नाही. त्याचप्रमाणे मनुष्याचे डोळे कधी तृप्त होत नाही. (Sheol h7585)
Proverbs 30:16 (नीतिसूत्रे ३०:१६)
(parallel missing)
मृत्यूची जागा, वांझ उदर, पाण्याने तहानलेली पृथ्वी आणि जो अग्नी पुरे कधी म्हणत नाही. (Sheol h7585)
Ecclesiastes 9:10 (उपदेशक ९:१०)
(parallel missing)
जे काही काम तुझ्या हाती पडेल ते सर्व तू आपल्या सामर्थ्याने कर. कारण ज्या कबरेत आपण सर्व जाणार आहोत त्यामध्ये काम, विचार, ज्ञान आणि शहाणपणही नसते. (Sheol h7585)
Song of Solomon 8:6 (गीतरत्न ८:६)
(parallel missing)
तू आपल्या हृदयावर शिक्क्याप्रमाणे, आपल्या बाहूवर शिक्क्यासारखी मला ठेव. कारण प्रेम मृत्यूसारखेच शक्तीशाली आहे. प्रेमसंशय मृतलोकासारखा कठोर आहे. त्याची ज्वाला, अग्नीज्वालेसारखी, किंबहुना प्रदीप्त केलेला तो अग्नीच आहे. (Sheol h7585)
Isaiah 5:14 (यशया ५:१४)
(parallel missing)
यास्तव मृत्यूने आपली भुक वाढवली आहे आणि आपले तोंड मोठे उघडले आहे. आणि त्यांचे उत्तम लोक, त्यांचा समुदाय, त्यांचे अधिकारी, आणि त्यांच्यातील मौजमजा करणारे आणि आनंदी, हे अधोलोकात जातील.” (Sheol h7585)
Isaiah 7:11 (यशया ७:११)
(parallel missing)
“तुझा देव परमेश्वर याला चिन्ह माग, खाली पाताळात माग किंवा वर आकाशात माग.” (Sheol h7585)
Isaiah 14:9 (यशया १४:९)
(parallel missing)
जेव्हा तू अधोलोकात खाली जाशील तेव्हा तुला भेटण्यास ते उत्सुक आहे. तो तुजसाठी पृथ्वीवरील मरून गेलेल्या सर्व राजांना उठवील, सर्व राष्ट्रांच्या राजांना आपल्या सिंहासनावरून उठवीत आहे. (Sheol h7585)
Isaiah 14:11 (यशया १४:११)
(parallel missing)
तुझा थाटमाट, तुझ्या तंतुवाद्यांच्या आवाज अधोलोकात खाली जात आहे. तुझ्याखाली अळ्या पसरल्या आहेत आणि किडे तुला झाकत आहेत.’ (Sheol h7585)
Isaiah 14:15 (यशया १४:१५)
(parallel missing)
तथापि तुला आता खाली अधोलोकात, खोल खळग्यात आणले आहे. (Sheol h7585)
Isaiah 28:15 (यशया २८:१५)
(parallel missing)
तुम्ही म्हटले, “आम्ही मृत्यूबरोबर करारनामा केला आहे. अधोलोकाशी आम्ही करार केला आहे म्हणून आम्हांला शिक्षा होणार नाही, जेव्हा बुडवणारी शिक्षा पार केली जाईल तेव्हा ती आमच्यापर्यंत येऊ शकणार नाही; कारण आम्ही कपटाच्या मागे लपलो आहोत व असत्याला आपले आश्रय केले आहे.” (Sheol h7585)
Isaiah 28:18 (यशया २८:१८)
(parallel missing)
तुमचा मृत्यूशी असलेला करारनामा विरवला जाईल आणि अधोलोकाशी तुमचा झालेला करार रद्द केला जाईल. जेव्हा प्रकोपाचा पूर पार केला जाईल, त्या द्वारे तुम्ही झाकले जाल. (Sheol h7585)
Isaiah 38:10 (यशया ३८:१०)
(parallel missing)
मी म्हणालो, मी माझ्या आयुष्याच्या अर्ध्यामार्गात असता मी मृतलोकांच्या द्वारात जाईन; माझ्या राहिलेल्या वर्षात मला विसाव्यासाठी तेथे पाठवले. (Sheol h7585)
Isaiah 38:18 (यशया ३८:१८)
(parallel missing)
कारण अधोलोक तुझे आभार मानीत नाही. मृत्यू तुझी स्तुती करत नाही; जे खाली खोल खड्ड्यात जातात त्यांना तुझ्या सत्याची आशा नसते. (Sheol h7585)
Isaiah 57:9 (यशया ५७:९)
(parallel missing)
तेल घेऊन तू राजा समोर गेलीस; आणि आपली सुगंधी द्रव्ये पुष्कळ केलीस. तुझे दूत तू अति दूर पाठवले, आणि तू अधोलोकात गेलीस. (Sheol h7585)
Ezekiel 31:15 (यहेज्केल ३१:१५)
(parallel missing)
प्रभू परमेश्वर असे म्हणतोः ज्या दिवशी जेव्हा तो मृत्युलोकांत गेला, त्यादिवशी मी पृथ्वीवर शोक आणला. मी त्याच्याकरता जलाशय झाकला आणि समुद्राचे पाणी मागे धरून ठेवले. मी महाजले रोखली आणि त्याच्यासाठी लबानोनाला शोक करायला लावले. त्याच्यासाठी शेतातील सर्व झाडे म्लान झाली. (Sheol h7585)
Ezekiel 31:16 (यहेज्केल ३१:१६)
(parallel missing)
गर्तेत जाणाऱ्याबरोबर मी त्यास अधोलोकी लोटून दिले तेव्हा त्याच्या कोसळण्याच्या आवाजाने मी राष्ट्रांस थरथर कांपविले; आणि मी तेव्हा पृथ्वीच्या अधोभागी असलेले एदेनाचे सर्व झाडे, पाण्याने पोसलेले निवडक व अति सुंदर असे लबानोनाचे झाडाचे समाधान झाले! म्हणून शेतातील सर्व झाडांनी त्याच्यासाठी शोक केला. (Sheol h7585)
Ezekiel 31:17 (यहेज्केल ३१:१७)
(parallel missing)
जी कोणी राष्ट्रे त्यांच्या छायेत राहत होती. ते त्याचे बलवान बाहू असे होते तेही त्यांच्याबरोबर तलवारीने वधले होते त्यांच्याकडे खाली अधोलोकात गेले. (Sheol h7585)
Ezekiel 32:21 (यहेज्केल ३२:२१)
(parallel missing)
योद्ध्यातले जे बलवान ते त्याच्याशी व त्यास सहाय्य करणाऱ्याशी अधोलोकातून बोलतील; ते खाली उतरले आहेत. हे बेसुंती तलवारीने वधले ते तेथे पडले आहेत. (Sheol h7585)
Ezekiel 32:27 (यहेज्केल ३२:२७)
(parallel missing)
बेसुंती लोकांपैकी जे योद्धे पडून आपल्या सर्व लढाईच्या शस्रांसह अधोलोकी गेले व ज्यांच्या तलवारी त्यांच्या डोक्याखाली ठेवण्यात आल्या अशांबरोबर हे पडून राहीले नाहीत काय? कारण जिवंताच्या भूमीत ते योद्ध्यास दहशत घालत म्हणून त्यांची पातके त्यांच्या हाडांवर आहे. (Sheol h7585)
Hosea 13:14 (होशेय १३:१४)
(parallel missing)
मी त्यांना खरोखर अधोलोकाच्या बळापासून सोडवीन काय? मी त्यांना खरोखर मरणातून सोडवणार काय? मरणा, तुझ्या महामाऱ्या कोठे आहेत? आणि इथे कळवळा माझ्या समोरुन लपलेला आहे. (Sheol h7585)
Amos 9:2 (आमोस ९:२)
(parallel missing)
ते खणून मृतलोकांत जरी गेले, तरी माझा हात त्यांना तेथून ओढून काढीन. ते आकाशात उंच चढून गेले, तरी मी त्यांना तेथून खाली आणीन. (Sheol h7585)
Jonah 2:2 (योना २:२)
(parallel missing)
तो म्हणाला, “मी आपल्या आपत्तीमध्ये परमेश्वरास हाक मारली, आणि त्याने मला उत्तर दिले; मी मृत्यूलोकाच्या पोटातून मदतीकरता हाक मारली! तू माझा आवाज ऐकलास. (Sheol h7585)
Habakkuk 2:5 (हबक्कूक २:५)
(parallel missing)
कारण द्राक्षरस तर विश्वासघात करणारा आहे, तो उन्मत्त तरूण पुरुष आहे आणि घरी राहत नाही. परंतू तो कबरेसारख्या आपल्या इच्छा वाढवतो, तो मृत्यूसारखा असतो, तो कधीच तृप्त होत नाही. तो आपल्याजवळ प्रत्येक राष्ट्र एकत्र करतो आणि आपल्यासाठी सर्व लोकांस एकत्र करतो. (Sheol h7585)
Matthew 5:22 (मत्तय ५:२२)
(parallel missing)
मी तर तुम्हास सांगतो, जो कोणी आपल्या भावावर (उगाच) रागावेल तो न्याय‍सभेच्या शिक्षेस पात्र होईल; जो कोणी आपल्या भावाला, ‘अरे वेडगळा,’ असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या पात्र होईल आणि जो कोणी त्याला, ‘अरे मूर्खा,’ असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. (Geenna g1067)
Matthew 5:29 (मत्तय ५:२९)
(parallel missing)
तुझा उजवा डोळा तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो उपट आणि फेकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. (Geenna g1067)
Matthew 5:30 (मत्तय ५:३०)
(parallel missing)
तुझा उजवा हात तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे, यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. (Geenna g1067)
Matthew 10:28 (मत्तय १०:२८)
(parallel missing)
जे शरीराला वधतात पण आत्म्याचा वध करू शकत नाहीत त्यांना भिऊ नका, तर त्यापेक्षा आत्म्याला व शरीराला जो मारू शकतो व नरकात टाकू शकतो त्यास भ्या. (Geenna g1067)
Matthew 11:23 (मत्तय ११:२३)
(parallel missing)
आणि तू कफर्णहूम शहरा, तू आकाशापर्यंत उंच होशील काय? तू नरकापर्यंत खाली जाशील, कारण जे चमत्कार तुझ्यामध्ये करण्यात आले ते जर सदोमात करण्यात आले असते तर ते नगर आतापर्यंत टिकले असते. (Hadēs g86)
Matthew 12:32 (मत्तय १२:३२)
(parallel missing)
एखादा मनुष्य जर मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल तर त्यास क्षमा करण्यात येईल पण जो कोणी पवित्र आत्म्याविरूद्ध बोलेल त्यास क्षमा होणार नाही. त्यास या युगातही क्षमा होणार नाही व येणाऱ्या युगातही होणार नाही. (aiōn g165)
Matthew 13:22 (मत्तय १३:२२)
(parallel missing)
काटेरी झाडामध्ये पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह ही वचनाची वाढ खुंटवतात आणि तो निष्फळ होतो. (aiōn g165)
Matthew 13:39 (मत्तय १३:३९)
(parallel missing)
ते पेरणारा शत्रू हा सैतान आहे; कापणीही युगाची समाप्ती आहे; आणि कापणारे हे देवदूत आहेत; (aiōn g165)
Matthew 13:40 (मत्तय १३:४०)
(parallel missing)
तेव्हा जसे निदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल. (aiōn g165)
Matthew 13:49 (मत्तय १३:४९)
(parallel missing)
तसे युगाच्या समाप्तीस होईल; देवदूत येऊन नीतिमानातून दुष्टांना वेगळे करतील. (aiōn g165)
Matthew 16:18 (मत्तय १६:१८)
(parallel missing)
आणखी मी तुला असे सांगतो की, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्यापुढे मृतलोकाच्या द्वारांचे कांहींच चालणार नाही. (Hadēs g86)
Matthew 18:8 (मत्तय १८:८)
(parallel missing)
जर तुमचा उजवा हात किंवा पाय तुम्हास पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो कापून टाका व फेकून द्या. दोन हात व दोन पाय असून सर्वकाळच्या कधीही न विझणाऱ्या अग्नीततुम्ही टाकले जाण्यापेक्षा व्यंग किंवा लंगडे होऊन सार्वकालिक जीवनात जावे जास्त बरे होईल. (aiōnios g166)
Matthew 18:9 (मत्तय १८:९)
(parallel missing)
जर तुमचा डोळा तुम्हास पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो उपटून फेकूनच द्या कारण एकच डोळा असला आणि तुम्हास सार्वकालिक जीवन मिळाले तर ते जास्त बरे आहे. दोन डोळ्यासह तुम्ही नरकात टाकले जाण्यापेक्षा ते जास्त बरे आहे. (Geenna g1067)
Matthew 19:16 (मत्तय १९:१६)
(parallel missing)
नंतर पाहा, कोणीएक मनुष्य येशूकडे आला आणि त्याने विचारले, “गुरूजी सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत?” (aiōnios g166)
Matthew 19:29 (मत्तय १९:२९)
(parallel missing)
ज्याने ज्याने माझ्यामागे येण्याकरता आपले घर, भाऊ, बहीण, आईवडील, मुले, शेतीवाडी सोडली असेल तर त्यास त्यापेक्षा कितीतरी जास्तपटीने लाभ होईल व त्यास सार्वकालिक जीवन मिळेल. (aiōnios g166)
Matthew 21:19 (मत्तय २१:१९)
(parallel missing)
रस्त्याच्या कडेला त्यास अंजिराचे एक झाड दिसले. ते पाहून तो जवळ गेला. पण पानाशिवाय त्यास एकही अंजीर दिसले नाही. येशू त्या झाडाला म्हणाला, “यापुढे तुला, कधीही फळ न येवो!” आणि ते झाड लगेच वाळून गेले. (aiōn g165)
Matthew 23:15 (मत्तय २३:१५)
(parallel missing)
परूश्यांनो व नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात कारण तुम्ही एक मतानुसारी करण्यासाठी समुद्र व भूमी पालथी घालता आणि तुम्हास तो मिळाला म्हणजे तुम्ही त्यास आपल्याहून दुप्पट नरकपुत्रासारखे करून टाकता. (Geenna g1067)
Matthew 23:33 (मत्तय २३:३३)
(parallel missing)
तुम्ही साप व विषारी सापाची पिल्ले आहात. तुम्ही नरकाच्या शिक्षेपासून कसे पळाल? (Geenna g1067)
Matthew 24:3 (मत्तय २४:३)
(parallel missing)
मग तो जैतूनाच्या डोंगरावर बसला असताना, त्याचे शिष्य त्याच्याशी एकांतात येऊन म्हणाले, “आम्हास सांगा की या गोष्टी कधी होतील? आपल्या येण्याचा आणि युगाचा शेवट होण्याचा समय जवळ आला आहे हे आम्ही कोणत्या चिन्हावरून ओळखावे?” (aiōn g165)
Matthew 25:41 (मत्तय २५:४१)
(parallel missing)
मग राजा जे आपल्या डाव्या बाजूला आहेत त्यांस म्हणेल, माझ्यापासून दूर जा. तुम्ही शापित आहात, सार्वकालिक अग्नीत जा, हा अग्नी सैतान व त्याच्या दूतांसाठी तयार केला आहे. (aiōnios g166)
Matthew 25:46 (मत्तय २५:४६)
(parallel missing)
“मग ते अनीतिमान लोक सार्वकालिक शिक्षा भोगण्यास जातील, पण नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगण्यास जातील.” (aiōnios g166)
Matthew 28:20 (मत्तय २८:२०)
(parallel missing)
आणि जे काही मी तुम्हास शिकविले आहे ते त्या लोकांस पाळायला शिकवा आणि पाहा, युगाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर आहे.” (aiōn g165)
Mark 3:29 (मार्क ३:२९)
(parallel missing)
पण जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील, त्याची कधीच क्षमा होणार नाही आणि तो मनुष्य सार्वकालिक पापाचा दोषी आहे.” (aiōn g165, aiōnios g166)
Mark 4:19 (मार्क ४:१९)
(parallel missing)
परंतु संसाराची चिंता, संपत्तीचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते. (aiōn g165)
Mark 9:43 (मार्क ९:४३)
(parallel missing)
जर तुझा उजवा हात तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक. दोन हात असून नराकात न विझणाऱ्या अग्नीत जाण्यापेक्षा एक हात नसून जीवनात जाणे बरे. (Geenna g1067)
Mark 9:45 (मार्क ९:४५)
(parallel missing)
आणि जर तुझा पाय तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो काढून टाक. दोन पाय असून नरकात फेकले जावे यापेक्षा लंगडे होऊन जीवनात गेलेले बरे. (Geenna g1067)
Mark 9:47 (मार्क ९:४७)
(parallel missing)
जर तुझा उजवा डोळा तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो काढून टाक. दोन डोळे असून जेथे त्यांना खाणारे किडे मरत नाहीत आणि अग्नी विझत नाही अशा नरकात फेकले जावे यापेक्षा एक डोळा असून देवाच्या राज्यात जाणे हे बरे (Geenna g1067)
Mark 10:17 (मार्क १०:१७)
(parallel missing)
येशू प्रवासास निघाला असता एक मनुष्य त्याच्याकडे धावत आला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, “उत्तम गुरूजी, सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी मी काय करावे?” (aiōnios g166)
Mark 10:30 (मार्क १०:३०)
(parallel missing)
अशा प्रत्येकाला शेवटच्या काळी छळणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही. (aiōn g165, aiōnios g166)
Mark 11:14 (मार्क ११:१४)
(parallel missing)
नंतर तो त्यास म्हणाला, “यापुढे सर्वकाळ तुझे फळ कोणीही खाणार नाही.” त्याच्या शिष्यांनी हे ऐकले. (aiōn g165)
Luke 1:33 (लूक १:३३)
(parallel missing)
तो याकोबाच्या घराण्यावर सर्वकाळासाठी राज्य चालवील आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.” (aiōn g165)
Luke 1:55 (लूक १:५५)
(parallel missing)
आपल्या पूर्वजास त्याने सांगितल्याप्रमाणे अब्राहाम व त्याचे संतान यांच्यावरील दया सर्वकाळ स्मरण करावी. त्याने आपला सेवक इस्राएल याला साहाय्य केले आहे.” (aiōn g165)
Luke 1:70 (लूक १:७०)
(parallel missing)
हे देवाने त्याच्या पवित्र संदेष्ट्यांद्वारे युगाच्या प्रारंभापासून सांगितले होते. (aiōn g165)
Luke 8:31 (लूक ८:३१)
(parallel missing)
आणि तू आम्हास अगाधकूपात जाण्याची आज्ञा करू नको, अशी ती भूते त्यास विनंती करीत होती. (Abyssos g12)
Luke 10:15 (लूक १०:१५)
(parallel missing)
हे कफर्णहूमा, तू आकाशापर्यंत उंचावला जाशील काय? तू नरकापर्यंत उतरशील. (Hadēs g86)
Luke 10:25 (लूक १०:२५)
(parallel missing)
नंतर एक नियमशास्त्राचा शिक्षक उभा राहिला आणि त्याने येशूची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला, तो म्हणाला, “गुरुजी, अनंतकाळचे जीवन मिळण्यासाठी मी काय केले पाहीजे?” (aiōnios g166)
Luke 12:5 (लूक १२:५)
(parallel missing)
तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हास सांगतो. तुम्हास ठार मारल्या यानंतर तुम्हास नरकात टाकून देण्यास ज्याला अधिकार आहे, त्याची भीती धरा. होय, मी तुम्हास सांगतो, त्याचेच भय धरा. (Geenna g1067)
Luke 16:8 (लूक १६:८)
(parallel missing)
अन्यायी कारभाऱ्याने शहाणपण केले. यावरुन धन्याने त्याची वाहवा केली; कारण या युगाचे लोक आपल्यासारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात. (aiōn g165)
Luke 16:9 (लूक १६:९)
(parallel missing)
मी तुम्हास सांगतो, तुमच्यासाठी, तुमच्या अनीतीच्या धनाने मित्र मिळवा. यासाठी की, जेव्हा हे धन संपेल तेव्हा त्यांनी तुम्हास सार्वकालिक वस्तीत घ्यावे (aiōnios g166)
Luke 16:23 (लूक १६:२३)
(parallel missing)
श्रीमंत मनुष्य मृतलोकात यातना भोगीत होता, तेथून त्याने वर पाहीले व दूरवर असलेल्या अब्राहामाला आणि लाजराला त्याच्या बाजूला पाहिले, (Hadēs g86)
Luke 18:18 (लूक १८:१८)
(parallel missing)
एका यहूदी अधिकाऱ्याने त्यास विचारले, “उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन मिळविण्यासाठी मी काय करू?” (aiōnios g166)
Luke 18:30 (लूक १८:३०)
(parallel missing)
त्यांना या काळी पुष्कळ पटीने व येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळणार नाही असा कोणी नाही.” (aiōn g165, aiōnios g166)
Luke 20:34 (लूक २०:३४)
(parallel missing)
तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “या युगातले लोक लग्न करून घेतात व लग्न करून देतात. (aiōn g165)
Luke 20:35 (लूक २०:३५)
(parallel missing)
परंतु जे लोक त्या येणाऱ्या युगामध्ये व मृतांच्या पुनरुत्थानामध्ये भाग घेण्यासाठी पात्र ठरतील, ते लग्न करून घेणार नाहीत आणि लग्न करून देणार नाहीत (aiōn g165)
that everyone who believes in Him should not die, but have eternal life. (aiōnios g166)
यासाठी की, जो कोणी विश्वास ठेवतो त्यास त्याच्याठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. (aiōnios g166)
For God so sincerely loved the world that He gave His only born Son, that whoever believes in Him should not perish, but have everlasting life. (aiōnios g166)
कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्यास सार्वकालिक जीवन मिळावे. (aiōnios g166)
Whoever believes in the Son has eternal life, but whoever rejects the Son won’t see life, for God’s wrath remains on that person.” (aiōnios g166)
जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.” (aiōnios g166)
but whoever drinks the water that I will give will never, ever get thirsty. The water that I will give will become in that person a fountain of water springing up into everlasting life.” (aiōn g165, aiōnios g166)
परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्यास कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्यास देईन ते त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल.” (aiōn g165, aiōnios g166)
He who harvests is already receiving wages, and is gathering fruit for eternal life, so that he who plants and he who harvests may rejoice together. (aiōnios g166)
कापणारा मजुरी मिळवतो व सार्वकालिक जीवनासाठी पीक गोळा करतो; यासाठी की पेरणाऱ्याने व कापणी करणाऱ्यानेही एकत्र आनंद करावा. (aiōnios g166)
“Most assuredly, I tell you, the person who hears my words and believes in Him who sent me has everlasting life, and won’t come into judgment, but has passed from death into life. (aiōnios g166)
मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही; तो मरणातून जीवनात पार गेला आहे. (aiōnios g166)
You search the Scriptures, for in them you think you have eternal life, and these testify about me. (aiōnios g166)
तुम्ही शास्त्रलेख शोधता, कारण तुम्ही असे मानता की, त्याद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल आणि तेच शास्त्रलेख माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत. (aiōnios g166)
Don’t labor for perishable food, but for the food which endures to everlasting life, which the Son of Man will give you, because God the Father has set His seal on Him.” (aiōnios g166)
नष्ट होणार्‍या अन्नासाठी श्रम करू नका, पण सार्वकालिक जीवनाकरता, टिकणार्‍या अन्नासाठी श्रम करा. मनुष्याचा पुत्र ते तुम्हास देईल, कारण त्याच्यावर देवपित्याने शिक्का मारला आहे.” (aiōnios g166)
This is also the will of Him who sent me, that everyone who sees the Son and believes in Him may have everlasting life; and I will raise them up at the last day.” (aiōnios g166)
माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की, जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे; त्यास मीच शेवटच्या दिवशी उठवीन.” (aiōnios g166)
Most assuredly, I tell you, everyone who believes in me has everlasting life. (aiōnios g166)
मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. (aiōnios g166)
I am the living bread that came down from Heaven. Whoever eats of this bread will live forever. The bread that I will give for the life of the world is my flesh.” (aiōn g165)
स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.” (aiōn g165)
Whoever eats my flesh and drinks my blood has eternal life, and I will raise that person up at the last day, (aiōnios g166)
जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्यास शेवटल्या दिवशी पुन्हा उठवीन. (aiōnios g166)
This is the bread which came down from Heaven, not like the manna your forefathers ate, and died. A person who eats this bread will live forever.” (aiōn g165)
स्वर्गातून उतरलेली भाकर हीच आहे. तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मरण पावले. हे तसे नाही. ही भाकर जो खातो तो सर्वकाळ जगेल.” (aiōn g165)
Simon Peter answered Him, “Lord, who will we go to? You have words of eternal life. (aiōnios g166)
तेव्हा शिमोन पेत्राने त्यास उत्तर दिले, “प्रभू, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने तर आपणाकडे आहेत. (aiōnios g166)
A slave doesn’t remain in the house forever, but a son does belong forever. (aiōn g165)
दास सर्वकाळ घरात राहत नाही; पुत्र सर्वकाळ घरात राहत. (aiōn g165)
Most assuredly, I tell you, anyone who keeps my word will never see death.” (aiōn g165)
मी तुम्हास खरे खरे सांगतो, जर कोणी माझे वचने पाळील तर त्यास मरणाचा अनुभव कधीही येणार नाही.” (aiōn g165)
Then the Jews answered Him, “Now we know that You have a demon! Abraham is dead, and the prophets, and You say, ‘Anyone who keeps my word will never taste death.’ (aiōn g165)
यहूदी लोक त्यास म्हणाले, “आता आम्हास कळले की, तुम्हास भूत लागले आहे. अब्राहाम मरण पावला आणि संदेष्टेही मरण पावले; आणि तुम्ही म्हणता की, कोणी माझे वचन पाळील तर तो कधी मरण अनुभवणार नाही. (aiōn g165)
Since the beginning of time it has never been heard of that anyone opened the eyes of a person born blind. (aiōn g165)
आंधळा जन्मलेल्या कोणाचे डोळे उघडल्याचे युगाच्या आरंभापासून कधी कोणाच्या ऐकण्यात आले नव्हते. (aiōn g165)
I give them eternal life, and they will never perish. No one is able to snatch them out of my hand. (aiōn g165, aiōnios g166)
मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो; त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि कोणी त्यांना माझ्या हातातून हिसकावून घेणार नाही. (aiōn g165, aiōnios g166)
and everyone who lives and believes in me will never die. Do you believe this?” (aiōn g165)
आणि जिवंत असलेला प्रत्येकजण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही, यावर तू विश्वास ठेवतेस काय?” (aiōn g165)
Anyone who loves their life will lose it, and anyone who hates their life in this world will keep it for eternal life. (aiōnios g166)
जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्यास मुकेल आणि जो या जगांत आपल्या जीवाचा द्वेष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील. (aiōnios g166)
Therefore the crowd answered Him, “We have heard from the Law that the Christ is to remain forever, so how can You say, ‘The Son of Man must be lifted up’? Who is this Son of Man?” (aiōn g165)
लोकांनी त्यास विचारले, ख्रिस्त सर्वकाळ राहील असे आम्ही नियमशास्त्रांतून ऐकले आहे, तर “मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे” असे आपण कसे म्हणता? हा मनुष्याचा पुत्र आहे तरी कोण? (aiōn g165)
I know that His commandment is eternal life, so the things I speak, I speak just as the Father has told me.” (aiōnios g166)
त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे. हे मला ठाऊक आहे. म्हणून जे काही मी बोलतो ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो.” (aiōnios g166)
Peter told Him, “You will never wash my feet!” Jesus answered, “If I don’t wash you, you have no part with me.” (aiōn g165)
पेत्र त्यास म्हणाला, “तुम्हास माझे पाय कधीही धुवावयाचे नाहीत.” येशूने त्यास उत्तर दिले, “मी तुला धुतले नाही, तर तुला माझ्याबरोबर वाटा नाही.” (aiōn g165)
I will then ask the Father, and He will give you another Counselor, that He may be with you forever — (aiōn g165)
मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हास दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. अशासाठी की, त्याने तुम्हाबरोबर सर्वकाळ रहावे. (aiōn g165)
as You have given Him authority over all flesh, that He should give eternal life to as many as You have given Him. (aiōnios g166)
जे तू त्यास दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे, म्हणून तू त्यास सर्व मनुष्यांमात्रावर अधिकार दिला आहेस. (aiōnios g166)
This is eternal life, that they may know You, the only true God, and Jesus Christ who You have sent. (aiōnios g166)
सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच, खरा देव त्या तुला आणि ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे. (aiōnios g166)
Acts 2:27 (प्रेषि. २:२७)
(parallel missing)
कारण तू माझा जीव मृतलोकात राहू देणार नाहीस, व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. (Hadēs g86)
Acts 2:31 (प्रेषि. २:३१)
(parallel missing)
ह्याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या: पुनरुत्थानाविषयी असे बोलला की, त्यास मृतलोकात सोडून दिले नाही, व त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही. (Hadēs g86)
Acts 3:21 (प्रेषि. ३:२१)
(parallel missing)
सर्व गोष्टींची सुस्थिती पुनःस्थापित होण्याच्या काळांपर्यंत स्वर्गात त्यास राहणे अवश्य आहे, त्या काळाविषयी युगाच्या आरंभापासून देवाने आपल्या पवित्र संदेष्ट्याच्या तोंडून सांगितले आहे. (aiōn g165)
Acts 13:46 (प्रेषि. १३:४६)
(parallel missing)
पण पौल व बर्णबा फार धैर्याने बोलले, ते म्हणाले, “देवाचे वचन तुम्हा यहूद्यांना प्रथम आम्हास सांगितलेच पाहिजे, पण तुम्ही ऐकण्यास नकार देत आहात, तुम्ही तुमचे स्वतःचेच नुकसान करून घेत आहात व अनंतकाळचे जीवन प्राप्त करून घेण्यासाठी अपात्र ठरत आहात! म्हणून आम्ही आता दुसऱ्या देशांतील परराष्ट्रीय लोकांकडे जाऊ. (aiōnios g166)
Acts 13:48 (प्रेषि. १३:४८)
(parallel missing)
जेव्हा यहूदी नसलेल्यांनी पौलाला असे बोलताना ऐकले तेव्हा ते फार आनंदित झाले, परमेश्वराच्या वचनाला त्यांनी गौरव दिले आणि त्या लोकांपैकी पुष्कळांनी वचनावर विश्वास ठेवला, कारण ते अनंतकाळच्या जीवनासाठी निवडले गेले होते. (aiōnios g166)
Acts 15:18 (प्रेषि. १५:१८)
(parallel missing)
हे जे त्यास युगादीपासून माहीत आहे ते करणारा प्रभू असे म्हणतो. (aiōn g165)
Romans 1:20 (रोम. १:२०)
(parallel missing)
कारण जगाच्या उत्पत्तीपासून करण्यात आलेल्या गोष्टींवरून त्याचे सर्वकाळचे सामर्थ्य व देवपण या त्याच्या अदृश्य गोष्टी समजत असल्याने स्पष्ट दिसतात, म्हणून त्यांना काही सबब नाही. (aïdios g126)
Romans 1:25 (रोम. १:२५)
(parallel missing)
त्यांनी देवाच्या सत्याच्या ऐवजी असत्य घेतले आणि निर्माणकर्त्याच्या जागी निर्मितीची उपासना व सेवा केली. तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित देव आहे. आमेन. (aiōn g165)
Romans 2:7 (रोम. २:७)
(parallel missing)
म्हणजे जे धीराने सत्कर्मे करीत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवू पाहतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच; (aiōnios g166)
Romans 5:21 (रोम. ५:२१)
(parallel missing)
म्हणजे, जसे पापाने मरणाच्या योगे राज्य चालविले तसे कृपेने नीतिमत्त्वाच्या योगे प्राप्त होणार्‍या सार्वकालिक जीवनासाठी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे राज्य चालवावे. (aiōnios g166)
Romans 6:22 (रोम. ६:२२)
(parallel missing)
पण आता तुम्ही पापापासून मुक्त केले जाऊन देवाचे दास झाला असल्यामुळे, आता तुम्हास पवित्रीकरण हे फळ आहे आणि शेवटी सार्वकालिक जीवन आहे. (aiōnios g166)
Romans 6:23 (रोम. ६:२३)
(parallel missing)
कारण पापाचे वेतन मरण आहे, पण आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे सार्वकालिक जीवन हे देवाचे कृपादान आहे. (aiōnios g166)
Romans 9:5 (रोम. ९:५)
(parallel missing)
पूर्वज त्यांचे आहेत; त्यांच्यापासून दैहिक दृष्ट्या ख्रिस्त आला; तो सर्वांवर असलेला देव युगानुयुग धन्यवादित असो; आमेन. (aiōn g165)
Romans 10:7 (रोम. १०:७)
(parallel missing)
किंवा मृतलोकात कोण उतरेल? (म्हणजे ख्रिस्ताला मरण पावलेल्यांमधून वर आणण्यास) (Abyssos g12)
Romans 11:32 (रोम. ११:३२)
(parallel missing)
कारण देवाने सर्वांवर दया करावी म्हणून सर्वांना आज्ञाभंगात एकत्र कोंडले आहे. (eleēsē g1653)
Romans 11:36 (रोम. ११:३६)
(parallel missing)
कारण सर्व गोष्टी त्याच्याकडून, त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी आहेत; त्यास युगानुयुग गौरव असो. आमेन. (aiōn g165)
Romans 12:2 (रोम. १२:२)
(parallel missing)
आणि या जगाशी समरूप होऊ नका पण तुमच्या मनाच्या नवीनीकरणाने तुमचे रूपांतर होऊ द्या; म्हणजे देवाची उत्तम व त्यास संतोष देणारी परिपूर्ण इच्छा काय आहे ती तुम्ही ओळखावी. (aiōn g165)
Romans 16:25 (रोम. १६:२५)
(parallel missing)
आता माझ्या सुवार्तेप्रमाणे व येशू ख्रिस्ताच्या घोषणेप्रमाणे जे रहस्य मागील युगात गुप्त ठेवण्यात आले, (aiōnios g166)
Romans 16:26 (रोम. १६:२६)
(parallel missing)
पण आता प्रकट करण्यात आले आहे व संदेष्ट्यांच्या शास्त्रलेखावरून सनातन देवाच्या आज्ञेप्रमाणे विश्वासाच्या आज्ञापालनासाठी सर्व राष्ट्रांना कळवले आहे त्या रहस्याच्या प्रकटीकरणानुसार जो तुम्हास स्थिर करण्यास समर्थ आहे, (aiōnios g166)
Romans 16:27 (रोम. १६:२७)
(parallel missing)
त्या अनन्य ज्ञानी देवाला येशू ख्रिस्ताद्वारे युगानुयुग गौरव असो. आमेन. (aiōn g165)
1 Corinthians 1:20 (१ करि. १:२०)
(parallel missing)
ज्ञानी मनुष्य कोठे आहे? विद्वान कोठे आहे? या जगातील वाद घालणारा कोठे आहे? देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरवले नाही का? (aiōn g165)
1 Corinthians 2:6 (१ करि. २:६)
(parallel missing)
तरीपण, जे आत्मिक परीपक्व आहेत त्यांना आम्ही ज्ञान सांगतो परंतु ते ज्ञान या जगाचे नाही आणि या युगाचे नाहीसे होणारे जे अधिकारी त्यांचेही नाही. (aiōn g165)
1 Corinthians 2:7 (१ करि. २:७)
(parallel missing)
तर देवाचे रहस्यमय ज्ञान आम्ही सांगतो ते गुप्त ठेवलेले होते, ते देवाने युगाच्या पूर्वी तुमच्याआमच्या गौरवासाठी नेमले होते. (aiōn g165)
1 Corinthians 2:8 (१ करि. २:८)
(parallel missing)
हे ज्ञान या युगाच्या कोणाही अधिकाऱ्याला माहीत नव्हते कारण जर त्यांना कळले असते, तर त्यांनी गौरवी प्रभूला वधस्तंभावर खिळले नसते. (aiōn g165)
1 Corinthians 3:18 (१ करि. ३:१८)
(parallel missing)
कोणीही स्वतःला फसवू नये, जर कोणी स्वतःला या जगाच्या दृष्टीने ज्ञानी समजत असेल तर त्याने खरोखर ज्ञानी होण्यासाठी “मूर्ख” व्हावे. (aiōn g165)
1 Corinthians 8:13 (१ करि. ८:१३)
(parallel missing)
म्हणून, जर माझ्या बंधूला अन्नाने अडखळण होत असेल तर माझ्या बंधूंना अडथळा होण्यास मी कारणीभूत होऊ नये म्हणून मी कधीही मांस खाणार नाही. (aiōn g165)
1 Corinthians 10:11 (१ करि. १०:११)
(parallel missing)
या गोष्टी त्यांच्याबाबतीत उदाहरणार्थ होत्या म्हणून घडल्या व त्या गोष्टी लिहिल्या गेल्या यासाठी की आम्ही ज्यांच्यावर युगाचा शेवट आला आहे अशा आपणासाठी त्या इशारा अशा व्हाव्यात (aiōn g165)
1 Corinthians 15:55 (१ करि. १५:५५)
(parallel missing)
“अरे मरणा तुझा विजय कोठे आहे? मरणा, तुझी नांगी कोठे आहे?” (Hadēs g86)
2 Corinthians 4:4 (२ करि. ४:४)
(parallel missing)
जो ख्रिस्त देवाचे प्रतिरूप आहे त्याच्या गौरवाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांना प्रकाशमान होऊ नये म्हणून, असे जे विश्वास ठेवत नाहीत, त्यांची मने या युगाच्या दुष्ट दैवताने आंधळी केलीली आहेत. (aiōn g165)
2 Corinthians 4:17 (२ करि. ४:१७)
(parallel missing)
कारण हे जे हलके दुःख केवळ तात्कालिक आहे ते आमच्यासाठी फार अधिक मोठ्या अशा सार्वकालिक गौरवाचा भार तयार करते. (aiōnios g166)
2 Corinthians 4:18 (२ करि. ४:१८)
(parallel missing)
आता आम्ही दिसणार्‍या गोष्टींकडे पाहत नाही पण न दिसणार्‍या गोष्टींकडे पाहतो कारण दिसणार्‍या गोष्टी क्षणिक आहेत पण न दिसणार्‍या गोष्टी सार्वकालिक आहेत. (aiōnios g166)
2 Corinthians 5:1 (२ करि. ५:१)
(parallel missing)
कारण आम्ही हे जाणतो की, आमचे हे जगिक घर ज्यामध्ये आम्ही राहतो, नष्ट झाले तर आम्हास देवापासून मिळालेले सर्वकाळचे घर स्वर्गात आहे. (aiōnios g166)
2 Corinthians 9:9 (२ करि. ९:९)
(parallel missing)
असे पवित्र शास्त्रात लिहिले आहे; “तो गरीबांना उदारहस्ते देतो, त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ राहते.” (aiōn g165)
2 Corinthians 11:31 (२ करि. ११:३१)
(parallel missing)
देव आणि प्रभू येशूचा पिता, ज्याची अनंतकाळपर्यंत स्तुती केली पाहिजे, तो हे जाणतो की मी खोटे बोलत नाही. (aiōn g165)
Galatians 1:4 (गलती १:४)
(parallel missing)
आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे, या आताच्या दुष्ट युगातून आपल्याला सोडवण्यास, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पापांबद्दल, स्वतःला दिले. (aiōn g165)
Galatians 1:5 (गलती १:५)
(parallel missing)
देवपित्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. (aiōn g165)
Galatians 6:8 (गलती ६:८)
(parallel missing)
कारण जो आपल्या देहाकरता पेरतो त्यास देहाकडून नाशाचे पीक मिळेल, पण जो देवाच्या आत्म्याकरता पेरतो त्यास आत्म्याकडून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल. (aiōnios g166)
Ephesians 1:21 (इफि. १:२१)
(parallel missing)
त्याने त्यास सर्व अधिपती, अधिकारी, सामर्थ्य, प्रभूत्व आणि प्रत्येक सामर्थ्याचे नाव जे याकाळी नव्हे तर येणाऱ्या काळीही दिले जाईल त्या सर्वांपेक्षा फार उंच केले. (aiōn g165)
Ephesians 2:2 (इफि. २:२)
(parallel missing)
ज्यामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, हे तुमचे कृत्य जगाच्या चालीरीतीप्रमाणे अंतरीक्षाचा राज्याधिपती जो सैतान, म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या दुष्ट आत्म्याचा अधिपती, ह्याच्या वहीवाटीप्रमाणे असे होते. (aiōn g165)
Ephesians 2:7 (इफि. २:७)
(parallel missing)
यासाठी की, येशू ख्रिस्तामध्ये त्याची आम्हांवरील प्रीतीच्याद्वारे येणाऱ्या युगात त्याची महान कृपा दाखविता यावी. (aiōn g165)
Ephesians 3:9 (इफि. ३:९)
(parallel missing)
आणि ज्याने सर्व निर्माण केले त्या देवाने युगादीकाळापासून जे रहस्य गुप्त ठेवले होते त्याची व्यवस्था काय आहे हे सर्व लोकांस मी प्रकट करावे. (aiōn g165)
Ephesians 3:11 (इफि. ३:११)
(parallel missing)
देवाच्या सर्वकाळच्या हेतुला अनुसरून जे त्याने आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्यामध्ये पूर्ण केले आहे. (aiōn g165)
Ephesians 3:21 (इफि. ३:२१)
(parallel missing)
त्यास मंडळी आणि ख्रिस्त येशूमध्ये सर्व पिढ्यानपिढ्या सदासर्वकाळ गौरव असो. आमेन. (aiōn g165)
Ephesians 6:12 (इफि. ६:१२)
(parallel missing)
कारण आपले झगडणे रक्त आणि मांसाबरोबर नाही, तर सत्ताधीशांविरुद्ध, अधिकाऱ्याविरुद्ध, या अंधकारातील जगाच्या अधिपतीबरोबर आणि आकाशातील दुष्ट आत्म्याविरुद्ध आहे. (aiōn g165)
Philippians 4:20 (फिलि. ४:२०)
(parallel missing)
आपला देवपिता ह्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. (aiōn g165)
Colossians 1:26 (कलो. १:२६)
(parallel missing)
जे रहस्य युगानुयुग व पिढ्यानपिढ्या गुप्त ठेवलेले होते परंतु आता, त्याच्या पवित्रजनांना प्रकट झाले आहे, ते हे वचन आहे. (aiōn g165)
2 Thessalonians 1:9 (२ थेस्स. १:९)
(parallel missing)
तेव्हा त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यांत येऊन सर्वकाळचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल. (aiōnios g166)
2 Thessalonians 2:16 (२ थेस्स. २:१६)
(parallel missing)
आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून सर्वकाळचे सांत्वन व चांगली आशा कृपेने दिली तो देव आपला पिता, (aiōnios g166)
1 Timothy 1:16 (१ तीम. १:१६)
(parallel missing)
परंतु केवळ याच हेतूने माझ्यावर दया दाखविण्यात आली की माझ्यासारख्या अत्यंत वाईट पाप्यावर ख्रिस्त येशूने सहनशीलता दाखवली त्या उदाहरणावरून, पुढील काळात जे त्याजवर विश्वास ठेवतील त्यांना सर्वकाळचे जीवन मिळावे. (aiōnios g166)
1 Timothy 1:17 (१ तीम. १:१७)
(parallel missing)
आता सर्वकाळचा राजा जो अविनाशी व अदृश्य आहे अशा एकाच देवाला सन्मान आणि गौरव सदासर्वकाळासाठी असो. आमेन. (aiōn g165)
1 Timothy 6:12 (१ तीम. ६:१२)
(parallel missing)
विश्वासासंबंधी चांगले युद्ध कर, ज्यासाठी तुला बोलावले होते. त्या सार्वकालिक जीवनाला धरून ठेव. तू अनेक साक्षीदारांसमोर चांगली साक्ष दिलीस, (aiōnios g166)
1 Timothy 6:16 (१ तीम. ६:१६)
(parallel missing)
ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो ज्याला कोणा मनुष्याने पाहिले नाही आणि कोणाच्याने पाहवत नाही, तो ते त्याचे प्रकट होणे यथाकाली दाखवील, त्यास सन्मान व सार्वकालिक सामर्थ्य आहे. आमेन. (aiōnios g166)
1 Timothy 6:17 (१ तीम. ६:१७)
(parallel missing)
या युगातील श्रीमंतास आज्ञा कर की, गर्विष्ठ होऊ नका. पैसा जो चंचल आहे त्यावर त्यांनी आशा ठेवू नये, परंतु देव जो विपुलपणे उपभोगासाठी सर्व पुरवतो त्यावर आशा ठेवावी. (aiōn g165)
2 Timothy 1:9 (२ तीम. १:९)
(parallel missing)
त्याने आम्हास तारले आणि पवित्र पाचारण केले. आम्ही काही सत्कृत्ये केली म्हणून नाही तर त्याच्या स्वतःच्या हेतूने व कृपेने केले. ही कृपा युगाच्या सुरुवातीलाच देवाने ख्रिस्त येशूमध्ये आम्हास दिली होती. (aiōnios g166)
2 Timothy 2:10 (२ तीम. २:१०)
(parallel missing)
ह्यामुळे देवाच्या निवडलेल्यांसाठी मी सर्वकाही धीराने सोशीत आहे, म्हणजे त्यांनाही ख्रिस्त येशूद्वारे मिळणारे तारण व सर्वकाळचे गौरव प्राप्त व्हावे. (aiōnios g166)
2 Timothy 4:10 (२ तीम. ४:१०)
(parallel missing)
कारण देमास मला सोडून थेस्सलनीका शहरास गेला आहे कारण त्यास जगाचे सुख प्रिय आहे. क्रेस्केस गलतीया प्रांतास गेला आहे व तीत दालमतीया प्रांतास गेला आहे. (aiōn g165)
2 Timothy 4:18 (२ तीम. ४:१८)
(parallel missing)
प्रभू मला प्रत्येक वाईट कामापासून सोडवील व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील. त्यास सदासर्वकाळपर्यंत गौरव असो. आमेन. (aiōn g165)
Titus 1:2 (तीत. १:२)
(parallel missing)
जे सर्वकाळचे जीवन ज्याला असत्य बोलवत नाही त्या देवाने युगाच्या काळापूर्वी देऊ केले, (aiōnios g166)
Titus 2:12 (तीत. २:१२)
(parallel missing)
ती आपल्याला असे शिकवते की, अभक्तीचा व जगीक वासनांचा त्याग करून, आपण या आताच्या युगात संयमाने, नीतिने व सुभक्तीने वागले पाहिजे. (aiōn g165)
Titus 3:7 (तीत. ३:७)
(parallel missing)
म्हणजे आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून सार्वकालिक जीवनाच्या आशेप्रमाणे वारीस व्हावे. (aiōnios g166)
Philemon 1:15 (फिले. १:१५)
(parallel missing)
कदाचित तो तुझ्यापासून ह्यामुळेच काही वेळ वेगळा झाला असेल की, त्याने सर्वकाळासाठी तुझे व्हावे. (aiōnios g166)
Hebrews 1:2 (इब्री १:२)
(parallel missing)
परंतु या शेवटच्या दिवसात तो आपल्याशी त्याच्या पुत्राद्वारे बोलला आहे, त्याने पुत्राला सर्व गोष्टींचा वारस म्हणून नेमले. देवाने पुत्राकरवीच विश्व निर्माण केले. (aiōn g165)
Hebrews 1:8 (इब्री १:८)
(parallel missing)
पुत्राविषयी तर तो असे म्हणतोः हे देवा, तुझे राजासन सदासर्वकाळासाठी आहे, आणि तुझे राज्य युगानुयुगीचे आहे आणि “तुझा राजदंड न्यायीपणाचा राजदंड आहे. (aiōn g165)
Hebrews 5:6 (इब्री ५:६)
(parallel missing)
दुसऱ्या शास्त्रभागात तो असे म्हणतो, “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस.” (aiōn g165)
Hebrews 5:9 (इब्री ५:९)
(parallel missing)
आणि नंतर त्यास परिपूर्ण केल्यावर. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासाठी सार्वकालिक तारणाकर्ता तो झाला (aiōnios g166)
Hebrews 6:2 (इब्री ६:२)
(parallel missing)
बाप्तिस्म्यांचे, डोक्यावर हात ठेवण्याचे, मृतांचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक न्यायनिवाडा शिकवण, या मूलभूत गोष्टींचा पाया आपण पुन्हा घालू नये. (aiōnios g166)
Hebrews 6:5 (इब्री ६:५)
(parallel missing)
आणि ज्यांनी देवाच्या वचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची अनुभवली आहे, (aiōn g165)
Hebrews 6:20 (इब्री ६:२०)
(parallel missing)
तेथे आमच्यापुढे धावत येशू आमच्यासाठी आत गेलेला आहे. तो मलकीसदेकाप्रमाणे युगानुयुगासाठी महायाजक झाला आहे. (aiōn g165)
Hebrews 7:17 (इब्री ७:१७)
(parallel missing)
कारण अशाप्रकारे त्याच्याविषयी शास्त्रवचन साक्ष देते “तू मलकीसदेकासारखा युगानुयुगासाठी याजक आहेस.” (aiōn g165)
Hebrews 7:21 (इब्री ७:२१)
(parallel missing)
जेव्हा इतरांना याजक करण्यात आले तेव्हा ते शपथेवाचून याजक झाले आहेत पण येशू जेव्हा याजक बनला, तेव्हा तो शपथेने बनला. ज्याने त्यास सांगितले की, ‘प्रभूने शपथ वाहिली आहे आणि तो आपले मन बदलणार नाही, तू युगानुयुगाचा याजक आहेस.’ (aiōn g165)
Hebrews 7:24 (इब्री ७:२४)
(parallel missing)
त्याचे याजकपद कायमचे आहे, कारण तो ‘युगानुयुग’ राहतो. (aiōn g165)
Hebrews 7:28 (इब्री ७:२८)
(parallel missing)
कारण नियमशास्त्र मानवी दुर्बलता असलेल्या मनुष्याची मुख्य याजक म्हणून नेमणूक करते. पण नियमशास्त्रानंतर शपथेचे वचन “युगानुयुग” देण्यात आल्यामुळे देवाचा पुत्र हा अनंतकाळासाठी परिपूर्ण असा मुख्य याजक झाला. (aiōn g165)
Hebrews 9:12 (इब्री ९:१२)
(parallel missing)
बकरे किंवा वासरु यांचे रक्त घेऊन नव्हे, तर आपले स्वतःचेच रक्त घेऊन; व त्याने सार्वकालिक खंडणी मिळवून एकदाच परमपवित्रस्थानात गेला; (aiōnios g166)
Hebrews 9:14 (इब्री ९:१४)
(parallel missing)
तर ज्याने सार्वकालिक आत्म्याकडून निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पिले, त्या ख्रिस्ताचे रक्त तुमच्या विवेकभावांस जिवंत देवाची सेवा करण्यासाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेषेकरून शुद्ध करील? (aiōnios g166)
Hebrews 9:15 (इब्री ९:१५)
(parallel missing)
ख्रिस्त याकरिता नव्या कराराचा मध्यस्थ आहे की, पहिल्या करारासंबंधी जी उल्लंघने झाली त्यापासून खंडणी भरून मिळवलेली सुटका होण्यासाठी आपले मरण झाल्याने, जे बोलावलेले त्यांना सार्वकालिक वतनाचे वचन मिळावे. (aiōnios g166)
Hebrews 9:26 (इब्री ९:२६)
(parallel missing)
तसे असते तर ख्रिस्ताला जगाच्या स्थापनेपासून स्वतःचे अर्पण पुष्कळ वेळा करावे लागले असते. परंतु आता युगाच्या शेवटी आपल्या स्वतःला अर्पण करून पाप नाहीसे करण्यासाठी तो एकदाच प्रकट झाला आहे. (aiōn g165)
Hebrews 11:3 (इब्री ११:३)
(parallel missing)
विश्वासाने आपल्याला समजते की, देवाच्या शब्दाने विश्व निर्माण झाले; म्हणजे ज्या गोष्टी दिसतात त्या दृश्य गोष्टींपासून झाल्या नाहीत. (aiōn g165)
Hebrews 13:8 (इब्री १३:८)
(parallel missing)
येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. (aiōn g165)
Hebrews 13:20 (इब्री १३:२०)
(parallel missing)
ज्या शांतीच्या देवाने आपल्या मेंढरांचा मेंढपाळ, आपला प्रभू येशू ख्रिस्त याला रक्ताच्या सर्वकाळच्या नव्या कराराद्वारे उठवले. (aiōnios g166)
Hebrews 13:21 (इब्री १३:२१)
(parallel missing)
त्याची इच्छा पूर्ण करायला तुम्हास चांगल्या गोष्टींनी सिद्ध करो आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्यास संतोष देणारे काम आपल्यामध्ये करो. त्यास सदासर्वकाळ गौरव असो. आमेन. (aiōn g165)
James 3:6 (याको. ३:६)
(parallel missing)
आणि जीभ एक आग आहे, एक अनीतीचे भुवन आहे. जीभ ही सर्व अवयवात अशी आहे की, ती सर्व शरीराला अमंगळ करते, सृष्टीक्रमाला आग लावते; आणि नरकाने पेटलेली अशी आहे. (Geenna g1067)
1 Peter 1:23 (१पेत्र. १:२३)
(parallel missing)
कारण तुम्ही नाशवंत बीजाकडून नाही पण अविनाशी बीजाकडून, म्हणजे देवाच्या, जिवंत टिकणार्‍या वचनाच्याद्वारे तुमचा पुन्हा जन्म पावलेले आहात. (aiōn g165)
1 Peter 1:25 (१पेत्र. १:२५)
(parallel missing)
परंतु परमेश्वराचे वचन सर्वकाळ टिकते.” तुम्हास त्याच वचनाचे शुभवर्तमान तुम्हास सांगण्यात आले ते तेच आहे. (aiōn g165)
1 Peter 4:11 (१पेत्र. ४:११)
(parallel missing)
जो भाषण करतो त्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे व जो सेवा करतो त्याने आपण आपली सेवा देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहोत अशी करावी. म्हणजे, येशू ख्रिस्ताद्वारे, सर्व गोष्टींत देवाचे गौरव करावे, त्यास गौरव व पराक्रम ही युगानुयुग असोत. आमेन. (aiōn g165)
1 Peter 5:10 (१पेत्र. ५:१०)
(parallel missing)
पण तुम्हास ज्याने ख्रिस्ताद्वारे, आपल्या सनातन गौरवात बोलावले आहे तो सर्व कृपेचा देव, तुम्ही अल्पकाळ सोसल्यानंतर, स्वतः तुम्हास परिपूर्ण करील, स्थिर करील आणि दृढ करील. (aiōnios g166)
1 Peter 5:11 (१पेत्र. ५:११)
(parallel missing)
त्याचा पराक्रम युगानुयुग आहे. आमेन. (aiōn g165)
2 Peter 1:11 (२ पेत्र. १:११)
(parallel missing)
आणि तशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या सार्वकालिक राज्यात जयोत्सावाने तुमचा प्रवेश होईल. (aiōnios g166)
2 Peter 2:4 (२ पेत्र. २:४)
(parallel missing)
कारण जर देवाने पाप करणार्‍या देवदूतांनाही राखले नाही पण नरकात लोटून, गडद काळोखाच्या खाडयात न्यायासाठी अटकेत ठेवले; (Tartaroō g5020)
2 Peter 3:18 (२ पेत्र. ३:१८)
(parallel missing)
आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्यास आता आणि सर्वकाळपर्यंत गौरव असो. आमेन. (aiōn g165)
The life was revealed, and we have seen, and testify, and declare to you this eternal life which was with the Father and was revealed to us. (aiōnios g166)
ते जीवन आम्हास प्रकट झाले. आम्ही ते पाहिले आहे; त्याविषयी आम्ही साक्ष देतो आणि आम्ही त्या सार्वकालिक जीवनाविषयी तुम्हास घोषणा करीत आहोत. ते जीवन पित्याजवळ होते आणि ते आम्हास प्रकट केले गेले. (aiōnios g166)
The world and its lusts are passing away, but whoever does the will of God stays forever. (aiōn g165)
जग व जगातील वासना नाहीशा होत आहेत. पण जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो सर्वकाळपर्यंत जगेल. (aiōn g165)
This is the promise that He has promised to us - eternal life. (aiōnios g166)
आणि देवाने आम्हास जे देण्याचे अभिवचन दिले आहे ते म्हणजे सार्वकालिक जीवन होय. (aiōnios g166)
Whoever hates his brother or sister is a murderer, and you know that no murderer has eternal life living in him. (aiōnios g166)
जो कोणी आपल्या भावाचा द्वेष करतो, तो खुनी आहे आणि तुम्हास माहीत आहे की, खुनी मनुष्याच्या ठायी सार्वकालिक जीवन राहत नाही. (aiōnios g166)
This is the witness, that God has given us eternal life, and this life is in His Son. (aiōnios g166)
आणि देवाची जी साक्ष आहे तीही आहे की, देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे. (aiōnios g166)
I have written these things to you who believe in the name of God’s Son, so that you may know that you have eternal life. (aiōnios g166)
जे देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांना मी या गोष्टी लिहीत आहे, यासाठी की, तुम्हास सार्वकालिक जीवन लाभले आहे, याविषयी तुम्हास कळावे. (aiōnios g166)
We know that God’s Son has come, and has given us understanding, so that we might know Him who is true. We are in Him who is true, in His Son Jesus Christ. This is the true God and eternal life. (aiōnios g166)
पण आम्हास माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे व त्याने आम्हास समजबुद्धी दिलेली आहे, यासाठी की, जो खरा आहे त्यास आम्ही ओळखावे आणि जो खरा आहे त्याच्याठायी म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याठायी, आपण आहोत. हाच खरा देव आहे आणि तो सार्वकालिक जीवन आहे. (aiōnios g166)
because of the truth which lives in us and will be with us forever: (aiōn g165)
या सत्यामुळे जे आमच्यामध्ये असते, ते आमच्यामध्ये सर्वकाळ राहील. (aiōn g165)
Jude 1:6 (यहू. १:६)
(parallel missing)
आणि ज्या देवदूतांनी आपले अधिकारपद न सांभाळता आपले स्वतःचे योग्य वस्तीस्थान सोडले त्यांना त्याने सर्वकाळच्या बंधनामध्ये निबीड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरिता राखून ठेवले आहे; (aïdios g126)
Jude 1:7 (यहू. १:७)
(parallel missing)
सदोम व गमोरा आणि त्यांच्या आसपासची इतर नगरे, ह्यांनी त्यांच्याप्रमाणेच जारकर्मे केली व परदेहाच्या मागे लागली आणि ती उदाहरण म्हणून, सर्वकाळच्या अग्नीची शिक्षा भोगीत ठेवली आहेत. (aiōnios g166)
Jude 1:13 (यहू. १:१३)
(parallel missing)
ते समुद्रावरच्या विक्राळ लाटांसारखे स्वतःची लाज फेसाप्रमाणे वर आणतात. ज्यांच्याकरता, सर्वकाळसाठी निबीड अंधार राखून ठेवलेला आहे असे भटके तारे ते आहेत. (aiōn g165)
Jude 1:21 (यहू. १:२१)
(parallel missing)
तुम्ही सर्वकाळच्या जीवनासाठी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या दयेची प्रतीक्षा करीत स्वतःला देवाच्या प्रीतीत राखा. (aiōnios g166)
Jude 1:25 (यहू. १:२५)
(parallel missing)
असा जो एकच देव आपला तारणारा त्यास येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्याद्वारे गौरव, महिमा, पराक्रम आणि अधिकारही युगांच्या आधीपासून, आता आणि युगानुयुग आहेत. आमेन. (aiōn g165)
Revelation 1:6 (प्रक. १:६)
(parallel missing)
ज्याने आम्हास त्याच्या देवपित्यासाठी एक राज्य आणि याजक बनविले त्यास गौरव व सामर्थ्य युगानुयुग असोत, आमेन. (aiōn g165)
Revelation 1:18 (प्रक. १:१८)
(parallel missing)
आणि जो जिवंत तो मी आहे; मी मरण पावलो होतो, पण तरी पाहा, मी युगानुयुग जिवंत आहे! आणि माझ्याजवळ मरणाच्या व मृतलोकाच्या किल्ल्या आहेत. (aiōn g165, Hadēs g86)
Revelation 4:9 (प्रक. ४:९)
(parallel missing)
जो राजासनावर बसलेला आहे तो अनंतकाळपर्यंत जिवंत राहणार आहे त्याचे जेव्हा जेव्हा ते चार जिवंत प्राणी गौरव, सन्मान व उपकारस्तुती करीत होते, (aiōn g165)
Revelation 4:10 (प्रक. ४:१०)
(parallel missing)
तेव्हा तेव्हा ते चोवीस वडील जो राजासनावर बसला आहे त्याच्यापुढे पालथे पडतात आणि जो युगानुयुग जिवंत आहे त्यास नमन करतात आणि आपले मुकुट राजासनासमोर ठेवून म्हणतात (aiōn g165)
Revelation 5:13 (प्रक. ५:१३)
(parallel missing)
प्रत्येक निर्माण केलेली वस्तू आकाशात व पृथ्वीवर, पृथ्वीखाली व समुद्रातील अवघ्याना मी असे गाताना ऐकले की, “जो राजासनावर बसतो त्यास व कोकऱ्याला स्तुती, सन्मान, गौरव आणि सामर्थ्य युगानुयुगापर्यंत असो!” (aiōn g165)
Revelation 6:8 (प्रक. ६:८)
(parallel missing)
नंतर मी फिकट रंगाचा घोडा पाहिला. त्यावर जो बसलेला होता त्याचे नाव मरण होते; आणि मृतलोक त्याच्या पाठीमागून त्याच्याबरोबर चालला होता. त्यांना तलवारीने, दुष्काळाने, रोगाने व पृथ्वीवरील श्वापदांकडून मनुष्यांना जिवे मारण्याचा अधिकार पृथ्वीच्या चौथ्या भागावर देण्यात आला होता. (Hadēs g86)
Revelation 7:12 (प्रक. ७:१२)
(parallel missing)
म्हणाले, आमेन; स्तुती, गौरव, ज्ञान, उपकारस्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुयुग आमच्या देवाची आहेत; आमेन. (aiōn g165)
Revelation 9:1 (प्रक. ९:१)
(parallel missing)
मग पाचव्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला मला दिसला; त्या ताऱ्याला अगाधकूपाची किल्ली दिली होती. (Abyssos g12)
Revelation 9:2 (प्रक. ९:२)
(parallel missing)
त्याने अगाधकूप उघडला, तेव्हा मोठ्या भट्टीच्या धुरासारखा धूर कूपातून निघून वर चढला; आणि कूपाच्या धुराने सूर्य आणि अंतराळ ही अंधकारमय झाली. (Abyssos g12)
Revelation 9:11 (प्रक. ९:११)
(parallel missing)
अगाधकूपाचा दूत तो त्यांच्यावर राजा आहे; त्याचे नाव इब्री भाषेत अबद्दोन आहे आणि ग्रीक भाषेत त्याचे नाव अपल्लूओन आहे. (Abyssos g12)
Revelation 10:6 (प्रक. १०:६)
(parallel missing)
आणि जो युगानुयुग जिवंत आहे, ज्याने आकाश व त्यामध्ये जे आहेत, पृथ्वी व तिच्यावर जे आहे ते आणि समुद्र व त्यामध्ये जे आहे ते निर्माण केले, त्याची शपथ वाहून म्हटलेः आणखी उशीर होणार नाही; (aiōn g165)
Revelation 11:7 (प्रक. ११:७)
(parallel missing)
त्यांची साक्ष पुरी झाल्यावर अगाधकूपातून जो पशू वर येईल तो त्यांच्याबरोबर लढाई करील, त्यांच्यावर विजय मिळवील आणि त्यांना ठार मारील. (Abyssos g12)
Revelation 11:15 (प्रक. ११:१५)
(parallel missing)
मग सातव्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा स्वर्गात मोठ्याने आवाज झाला, त्यांचे शब्द असे होतेः जगाचे राज्य हे आमच्या प्रभूचे आणि त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे; तो युगानुयुग राज्य करील. (aiōn g165)
Revelation 14:6 (प्रक. १४:६)
(parallel missing)
यानंतर मला आणखी एक देवदूत आकाशाच्या मध्यभागी उडताना दिसला. त्याच्याजवळ, पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा बोलणाऱ्यांना व प्रत्येक समाजाला सुवार्ता सांगायला, सार्वकालिक सुवार्ता होती. (aiōnios g166)
Revelation 14:11 (प्रक. १४:११)
(parallel missing)
त्यांच्या पीडेचा धूर युगानुयुग वर चढत राहतो; त्या पशूला आणि त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्यांना आणि त्याच्या नावाचे चिन्ह करून घेणाऱ्या कोणालाही रात्रंदिवस विसावा मिळणार नाही. (aiōn g165)
Revelation 15:7 (प्रक. १५:७)
(parallel missing)
तेव्हा त्या चार प्राण्यांतील एकाने त्या सात देवदूतांना, जो युगानुयुग जिवंत आहे त्या देवाच्या रागाने भरलेल्या, सात सोन्याच्या वाट्या दिल्या. (aiōn g165)
Revelation 17:8 (प्रक. १७:८)
(parallel missing)
आणि तू जो पशू बघितलास, जो होता आणि नाही, जो अगाधकूपात येईल आणि नाशात जाईल आणि जगाच्या स्थापनेपासून ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे त्या पशूला पाहतील तेव्हा आश्चर्य करतील कारण तो होता, नाही आणि येणार आहे. (Abyssos g12)
Revelation 19:3 (प्रक. १९:३)
(parallel missing)
आणि ते दुसऱ्यांदा म्हणाले, हालेलूया तिचा धूर युगानुयुग वर चढत आहे. (aiōn g165)
Revelation 19:20 (प्रक. १९:२०)
(parallel missing)
मग त्या पशूला व त्याच्याबरोबर त्या खोट्या संदेष्ट्याला धरण्यात आले; त्याने त्याच्यासमोर चिन्हे करून, त्या पशूने शिक्का घेणाऱ्यांस व त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्यांस फसवले होते. या दोघांनाही गंधकाने जळणाऱ्या अग्नीच्या सरोवरात जिवंत टाकण्यात आले; (Limnē Pyr g3041 g4442)
Revelation 20:1 (प्रक. २०:१)
(parallel missing)
आणि मी बघितले की, एक देवदूत आकाशामधून खाली आला; त्याच्या हातात अगाधकूपाची किल्ली व एक मोठी साखळी होती. (Abyssos g12)
Revelation 20:3 (प्रक. २०:३)
(parallel missing)
आणि अगाधकूपात टाकले; आणि त्यामध्ये बंद करून वर शिक्का लावला; म्हणजे ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत त्याने राष्ट्रांना आणखी फसवू नये. त्यानंतर त्यास पुन्हा थोडा वेळ सोडणे जरूर होते. (Abyssos g12)
Revelation 20:10 (प्रक. २०:१०)
(parallel missing)
आणि त्यांना फसविणाऱ्या सैतानाला अग्नीच्या व गंघकाच्या सरोवरात टाकण्यात आले; तो पशू व तो खोटा संदेष्टा हे; तेथेच असून ते रात्रंदिवस सदासर्वकाळ पीडा भोगतील. (aiōn g165, Limnē Pyr g3041 g4442)
Revelation 20:13 (प्रक. २०:१३)
(parallel missing)
समुद्राने आपल्यामधील मरण पावलेले होते ते दिले आणि मृत्यू व मृतलोक ह्यांनीही आपल्यामधील मरण पावलेले होते ते दिले; आणि त्यांच्या कामांप्रमाणे त्यांचा प्रत्येकाचा न्याय करण्यात आला. (Hadēs g86)
Revelation 20:14 (प्रक. २०:१४)
(parallel missing)
आणि मरण व मृतलोक अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. हे दुसरे मरण होय. हे अग्नीचे तळे म्हणजे दुसरे मरण. (Hadēs g86, Limnē Pyr g3041 g4442)
Revelation 20:15 (प्रक. २०:१५)
(parallel missing)
आणि ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले आढळले नाही त्यास अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आले. (Limnē Pyr g3041 g4442)
Revelation 21:8 (प्रक. २१:८)
(parallel missing)
पण भेकड, अविश्वासू, अमंगळ, खुनी, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपुजक आणि सगळे लबाड ह्यांना अग्नीने आणि गंधकाने जळणाऱ्या सरोवरात वाटा मिळेल; हे दुसरे मरण होय.” (Limnē Pyr g3041 g4442)
Revelation 22:5 (प्रक. २२:५)
(parallel missing)
त्या नगरात यापुढे कधीही रात्र होणार नाही. लोकांस प्रकाश मिळविण्यासठी ह्यापुढे कुठल्याही दिव्याची अथवा सूर्याची गरज पडणार नाही; कारण प्रभू देव आपला प्रकाश त्यांच्यावर पाडील; आणि ते युगानुयुग राज्य करतील. (aiōn g165)

EGL > Aionian Verses: 35
MAR > Aionian Verses: 264