< 2 Kings 19 >

1 And when King Hezekiah heard it, he rent his clothes and put on sackecloth, and came into the house of the Lord,
हे ऐकून राजा हिज्कीयाने त्याच्या अंगावरची वस्त्रे फाडली आणि गोणताट घालून तो परमेश्वराच्या मंदिरात गेला.
2 And sent Eliakim which was the stewarde of the house, and Shebnah the chanceller, and the Elders of the Priestes clothed in sackecloth to Isaiah the Prophet the sonne of Amoz.
त्याने आपला घरकारभारी एल्याकीम व चिटणीस शेबना आणि वडिलधारे याजक यांना गोणताट पांघरलेले असे आमोजचा मुलगा यशया या संदेष्ट्यांकडे पाठवले.
3 And they said vnto him, Thus saith Hezekiah, This day is a day of tribulation and of rebuke, and blasphemie: for the childre are come to the birth, and there is no strength to bring foorth.
ते यशयाला म्हणाले, “हिज्कीया म्हणतो, ‘हा संकटाचा मानहानीचा व धिक्काराचा दिवस आहे. मूल जन्माला येत आहे पण प्रसूतीची शक्ती नसावी तसे झाले आहे.
4 If so be the Lord thy God hath heard all the wordes of Rabshakeh, whome the King of Asshur his master hath sent to raile on the liuing God, and to reproch him with wordes which the Lord thy God hath heard, then lift thou vp thy prayer for the remnant that are left.
परमेश्वर तुझा देव कदाचित रब-शाकेचे सगळे शब्द ऐकेल, त्याचा स्वामी अश्शूराचा राजा याने त्यास जिवंत देवाची निंदा करायला पाठवले आहे. आणि जी वचने परमेश्वर तुझा देव याने ऐकली आहेत, त्यांचा कदाचित तो निषेध करील. म्हणून जे शेष राहिले आहेत त्याच्यासाठी प्रार्थना करा.”
5 So the seruants of King Hezekiah came to Isaiah.
तेव्हा हिज्कीया राजाचे सेवक यशयाकडे गेले.
6 And Isaiah said vnto them, So shall ye say to your master, Thus sayeth the Lord, Be not afraide of the words which thou hast heard, wherewith the seruants of the king of Asshur haue blasphemed me.
आणि यशया त्यांना म्हणाला, “तुझ्या स्वामीला हा निरोप द्या; की परमेश्वर असे म्हणतो ‘माझ्यासाठी जे अपमानकारक उद्गार अश्शूरच्या राजाच्या सेनापतींनी काढले त्याने घाबरुन जाऊ नका.’
7 Beholde, I will sende a blast vpon him, and he shall heare a noyse, and returne to his owne lande: and I will cause him to fall by the sworde in his owne lande.
पाहा, मी आता त्याच्यात एक आत्मा घालीन आणि तो वर्तमान ऐकून स्वदेशी परत जाईल आणि आपल्या देशातच त्यास तलवारीने मरण येईल असे मी करणार.”
8 So Rabshakeh returned, and founde the King of Asshur fighting against Libnah: for he had heard that he was departed from Lachish.
नंतर रबशाके परत गेला तेव्हा त्यास अश्शूराचा राजा लिब्नाविरुध्द लढाई करताना आढळला, कारण तो लाखीशाहून निघून गेला असल्याचे त्याने ऐकले.
9 He heard also men say of Tirhakah King of Ethiopia, Beholde, he is come out to fight against thee: he therefore departed and sent other messengers vnto Hezekiah, saying,
मग कूशाचा राजा तिऱ्हाका आपल्याशी लढायला येत आहे असे सन्हेरीब याने ऐकले. तेव्हा त्याने राजा हिज्कीयाकडे पुन्हा दूताकरवी निरोप पाठवून म्हटले,
10 Thus shall ye speake to Hezekiah King of Iudah, and say, Let not thy God deceiue thee in whome thou trustest, saying, Ierusalem shall not be deliuered into the hande of the King of Asshur.
१०यहूदाचा राजा हिज्कीयाला तुम्ही सांगा, “तुम्ही ज्या परमेश्वरावर विसंबून आहात तो, ‘अश्शूरचा राजाच्या हाती यरूशलेम दिले जाणार नाही, असे बोलून तुला न फसवो.’
11 Beholde, thou hast heard what the Kings of Asshur haue done to all landes, how they haue destroyed them: and shalt thou be deliuered?
११अश्शूरच्या राजाने इतर देशांचे काय केले ते तुम्ही ऐकलेच आहे. आम्ही ते पूर्ण धुळीला मिळवले. तेव्हा तुम्हीच तेवढे वाचणार का? नाही.
12 Haue the gods of the heathen deliuered them which my fathers haue destroyed? as Gozan, and Haran, and Rezeph, and the children of Eden, which were in Thelasar?
१२त्या राष्ट्राच्या देवतांनी त्यांचे रक्षण केले नाही. माझ्या पुर्वजांनी त्यांची धूळधाण केली. गोजान, हारान, रेसफ आणि तलस्सरातील एदेन हे त्यांनी नष्ट केले.
13 Where is the King of Hamath, and the King of Arpad, and the King of the citie of Shepharuaim, Hena and Iuah?
१३हमाथ, अर्पद, सफरवाईम, हेना आणि इव्वा यांचे राजे कुठे आहेत? त्यांचा पार धुरळा उडाला आहे.”
14 So Hezekiah receiued the letter of the hande of the messengers, and read it: and Hezekiah went vp into the house of the Lord, and Hezekiah spread it before the Lord.
१४हिज्कीयाने जासूदांच्या हातून पत्र घेऊन ते वाचले. मग परमेश्वराच्या मंदिरात जाऊन परमेश्वरापुढे ते उघडून ठेवले.
15 And Hezekiah prayed before the Lord, and saide, O Lord God of Israel, which dwellest betweene the Cherubims, thou art very God alone ouer all the kingdomes of the earth: thou hast made the heauen and the earth.
१५परमेश्वराची प्रार्थना करून हिज्कीया म्हणाला. “परमेश्वर देवा, करुबांच्यावर राजासनी बसणारा तूच इस्राएलचा देव आहेस. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राज्यांचा तू आणि एकमेव तूच नियंता आहेस. आकाश आणि पृथ्वीचा तू निर्माता आहेस,
16 Lord, bow downe thine eare, and heare: Lord open thine eyes and behold, and heare the wordes of Saneherib, who hath sent to blaspheme the liuing God.
१६परमेश्वरा, माझे म्हणणे ऐक आपले डोळे उघड आणि हे पत्र पाहा. सन्हेरीबची जिवंत परमेश्वराचा अवमान करणारी वचने पाहा.
17 Trueth it is, Lord, that the Kings of Asshur haue destroyed the nations and their landes,
१७खरोखरच परमेश्वराचा अवमान करणारी वचने पाहा. खरोखरच परमेश्वरा असे घडले आहे. अश्शूरच्या राजाने ही सर्व राष्ट्रे नामशेष केली आहेत.
18 And haue set fire on their gods: for they were no gods, but the worke of mans hands, euen wood and stone: therefore they destroyed them.
१८तिथले दैवत त्याने आगीच्या भक्ष्यस्थानी टाकले. पण ते काही खरे देव नव्हते. मनुष्याने केलेल्या लाकडाच्या आणि दगडाच्या मूर्ती होत्या. म्हणून तर अश्शूरच्या राजाला त्या नष्ट करता आल्या.
19 Nowe therefore, O Lord our God, I beseech thee, saue thou vs out of his hande, that all the kingdomes of the earth may knowe, that thou, O Lord, art onely God.
१९तेव्हा परमेश्वर देवा आता आम्हास या राजापासून वाचव. म्हणजे तूच खरा परमेश्वर आहेस हे जगातील सर्व राजांना कळेल.”
20 Then Isaiah the sonne of Amoz sent to Hezekiah, saying, Thus saith the Lord God of Israel, I haue heard that which thou hast prayed me, concerning Saneherib King of Asshur.
२०आमोजचा मुलगा यशया याने हिज्कीयाला निरोप पाठवला की, “इस्राएलचा परमेश्वर देव असे म्हणतो, ‘अश्शूरचा राजा सन्हेरीब याच्या विषयी तू केलेले गाऱ्हाणे मी ऐकले आहे.”
21 This is the worde that the Lord hath spoken against him, O Virgine, daughter of Zion, he hath despised thee, and laughed thee to scorne: O daughter of Ierusalem, he hath shaken his head at thee.
२१“सन्हेरीबबद्दल परमेश्वराचा असा निरोप आहे. सीयोनच्या (म्हणजेच यरूशलेमच्या) कुमारी कन्येने तुला तुच्छ लेखून तुझा अपमान केला आहे. यरूशलेम कन्या तुझी पाठ वळली की तुझा उपहास करते.”
22 Whome hast thou railed on? and whome hast thou blasphemed? and against whome hast thou exalted thy voyce, and lifted vp thine eyes on hie? euen against the Holie one of Israel.
२२पण तू कोणाचा अपमान केलास? कोणाला दुर्भाषण केलेस? तू हे कोणाविरुध्द बोललास? इस्राएलच्या पवित्र परमेश्वराविरुध्द तू गेलास. त्याच्यापेक्षा वरचढ असल्याच्या आवेशात तू असा वागलास.
23 By thy messengers thou hast rayled on the Lord, and said, By the multitude of my charets I am come vp to the toppe of the mountaines, by the sides of Lebanon, and will cut downe the hie cedars thereof, and the faire firre trees thereof, and I will goe into the lodging of his borders, and into the forest of his Carmel.
२३परमेश्वराचा अवमान करायला तू दूत पाठवलेस. तू म्हणालास, “माझे बहुसंख्य रथ घेऊन मी या उंच पर्वतावर, लबानोनाच्या अंतर्भागात आलो आहे. त्यांचे उंच गंधसरु आणि उत्तम देवदारु मी तोडीन. लबानोन मध्ये सर्वात उंचावर असलेल्या घनदाट अरण्यात मी पोचलो आहे.
24 I haue digged, and drunke the waters of others, and with the plant of my feete haue I dried all the floods closed in.
२४मी विहिरी खणल्या आणि नव्या नव्या ठिकाणांचे पाणी प्यालो. मिसरमधील नद्या सुकवून तो प्रदेश मी पादाक्रांत केला.”
25 Hast thou not heard, howe I haue of olde time made it, and haue formed it long ago? and should I nowe bring it, that it should be destroyed, and laid on ruinous heapes, as cities defensed?
२५तू असे म्हणालास खरा, पण परमेश्वर काय म्हणाला ते तू ऐकले नाहीस काय? “पूर्वी, फार पूर्वीच मी हे सर्व योजले होते आणि आता त्याप्रमाणेच घडत आहे. मजबूत नगर उद्ध्वस्त होऊन तिथे नुसती दगडांची रास उरली आहे, हे तुझ्याहातून घडले ते माझ्यामुळेच.
26 Whose inhabitants haue small power, and are afraid, and confounded: they are like the grasse of the field, and greene herbe, or grasse on ye house toppes, or as corne blasted before it be growen.
२६तेथील लोक समर्थ नव्हते. ते घाबरलेले आणि गोंधळलेले होते. शेतातले गवत आणि पीक सरसकट कापले जावे तसे ते होते. घराच्या धाब्यावरच गवत पूर्ण वाढण्याआधीच करपून जावे तशी त्यांची स्थिती होती.
27 I knowe thy dwelling, yea, thy going out, and thy comming in, and thy furie against me.
२७तू कधी स्वस्थ बसतोस, कधी लढाईवर जातोस आणि कधी घरी परततोस, तसेच माझ्याविरुध्द कधी उठतोस ते मला माहित आहे.
28 And because thou ragest against me, and thy tumult is come vp to mine eares, I will put mine hooke in thy nostrels, and my bridle in thy lippes, and will bring thee backe againe the same way thou camest.
२८माझ्याविरुध्द तू उठलास, तुझे उन्मत्त बोलणे मी ऐकले. तेव्हा, मी आता तुझ्या नाकात वेसण घालतो आणि तोंडात लगाम अडकवतो. मग तुला माघारे वळवून ज्या रस्त्याने आलास त्याच वाटेने तुला परत फिरवतो.”
29 And this shalbe a signe vnto thee, O Hezekiah, Thou shalt eate this yeere such things as growe of them selues, and the next yeere such as growe without sowing, and the third yeere sowe ye and reape, and plant vineyardes, and eate the fruites thereof.
२९“मी तुझ्या साहाय्यासाठी येणार आहे याची खात्री पटावी म्हणून हे चिन्ह देतो. या वर्षी आपोआप धान्य उगवेल ते तुम्ही खाल. दुसऱ्या वर्षी त्याच्या बियाणातून उगवेल ते खाल. पण तिसऱ्या वर्षी मात्र तुम्ही स्वत: पेरणी कराल त्यातून धान्य काढा. द्राक्षाची लागवड करा आणि द्राक्षे खा.”
30 And the remnant that is escaped of the house of Iudah, shall againe take roote downewarde, and beare fruite vpwarde.
३०यहूदाच्या घराण्यातील उरल्यासुरल्या लोकांचा वंश वाढेल.
31 For out of Ierusalem shall goe a remnant, and some that shall escape out of mount Zion: the zeale of the Lord of hostes shall doe this.
३१कारण काहीजण बचावतील. ते यरूशलेमेतून बाहेर पडतील. सीयोन डोंगरातून काहीजण येतील. परमेश्वराच्या तीव्र आवेशामुळे असे घडेल.
32 Wherefore thus saith the Lord, concerning the King of Asshur, He shall not enter into this citie, nor shoote an arrowe there, nor come before it with shield, nor cast a mount against it:
३२“अश्शूरच्या राजाबद्दल परमेश्वर असे म्हणतो, तो या शहरात पाऊल टाकणार नाही या नगरावर तो बाण सोडणार नाही आपल्या ढाली तो येथे आणणार नाही. या शहरच्या तटबंदीवर हल्ला करण्यासाठी तो कचऱ्याचे ढीग रचणार नाही.
33 But he shall returne the way he came, and shall not come into this citie, saith the Lord.
३३तो आल्या वाटेने परत जाईल. या शहरात तो येणार नाही असे परमेश्वर म्हणतो.
34 For I will defende this citie to saue it for mine owne sake, and for Dauid my seruants sake.
३४या नगराचे रक्षण करून त्यास मी वाचवीन. माझ्यासाठी आणि माझा सेवक दावीद याच्यासाठी मी हे करीन.”
35 And the same night the Angell of the Lord went out and smote in the campe of Asshur an hundreth foure score and fiue thousande: so when they rose earely in the morning, behold, they were all dead corpses.
३५त्या रात्री परमेश्वराचा दूत बाहेर पडला आणि त्यांने अश्शूरांच्या छावणीतली एक लक्ष पंच्याऐंशी हजार माणसे मारली. सकाळी लोक उठून पाहतात तर सर्वत्र प्रेतांचा खच पडलेला.
36 So Saneherib King of Asshur departed, and went his way, and returned, and dwelt in Nineueh.
३६तेव्हा अश्शूरचा राजा सन्हेरीब निनवे येथे, जिथे तो अगोदर होता तिथे निघून गेला.
37 And as he was in the Temple worshipping Nisroch his god, Adramelech and Sharezer his sonnes slewe him with the sworde: and they escaped into the land of Ararat, and Esarhaddon his sonne reigned in his steade.
३७एक दिवस सन्हेरीब आपले दैवत निस्रोख याच्या देवळात पूजा करत होता. तेव्हा त्याचीच मुले अद्रम्मेलेक आणि शरेसर यांनी त्यास तलवारीने मारले. मग ते अरारात देशात निघून गेले. सन्हेरीबच्या जागी त्याचा मुलगा एसरहद्दोन राज्य करु लागला.

< 2 Kings 19 >