< James 4 >

1 Where do the fights and quarrels you're having come from? Aren't they due to the sensual passions that are in conflict within you?
तुमच्यामध्ये लढाया व भांडणे कोठून येतात? तुमच्या अवयवात ज्या वाईट वासना लढाई करतात त्यातून की नाही काय?
2 You burn with desire, but don't get what you want. You kill for what you lust after, but don't get what you're looking for. You argue and you fight, but you don't get anything, because you don't pray for it.
तुम्ही लोभ धरता पण तुम्हास मिळत नाही; तुम्ही घात व हेवा करता, पण तुम्हास मिळवता येत नाही. तुम्ही भांडता व लढाई करता तरी तुम्हास मिळत नाही, कारण तुम्ही मागत नाही.
3 You pray, but don't receive anything, because you ask with a wrong motive, wanting to spend what you'd receive on your selfish pleasures.
तुम्ही मागता आणि तुम्हास मिळत नाही; कारण तुम्ही वाईट वासना बाळगून मागता, म्हणजे आपण आपल्या चैनीसाठी खर्चावे म्हणून मागता.
4 You adulterous people! Don't you realize that friendship with the world is hatred towards God? Those who want to be friends of the world make themselves enemies of God.
हे देवाशी अप्रामाणिक पिढी! जगाशी मैत्री म्हणजे देवाशी वैर हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून जो कोणी जगाचा मित्र होऊ इच्छितो तो देवाचा वैरी आहे.
5 Do you think Scripture doesn't mean what it says: that the spirit that he put in us is very jealous?
किंवा ‘आपल्यात राहणारा पवित्र आत्मा ईर्षावान’, असे शास्त्रलेख व्यर्थ म्हणतो, असे तुम्हास वाटते काय?
6 But God gives us even more grace, as Scripture says: “God is against those who are arrogant, but gives grace to those who are humble.”
पण तो अधिक कृपा करतो, म्हणून शास्त्रलेख असे म्हणतो की, “देव गर्विष्ठांना विरोध करतो, पण लीनांवर कृपा करतो.”
7 So place yourself under God's direction. Confront the devil, and he will run away from you.
म्हणून देवाच्या अधीन रहा; आणि सैतानाला आडवा, म्हणजे तो तुमच्यापासून दूर पळून जाईल.
8 Come close to God and he will come close to you. Wash your hands, you sinners. Purify your way of thinking, you people with divided loyalties.
तुम्ही देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. अहो पाप्यांनो, तुम्ही हात शुद्ध करा; अहो द्विमनाच्या मनुष्यांनो, अंतःकरणे शुद्ध करा.
9 Show some remorse, cry and weep! Turn your laughter into mourning, and your joy to sadness.
दुःखी व्हा, शोक करा आणि रडा; तुमच्या हसण्याचा शोक होवो; तुमच्या आनंदाची खिन्नता होवो.
10 Be humble before the Lord and he will lift you up.
१०परमेश्वरासमोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हास उच्च करील.
11 Friends, don't speak badly of one another. Anyone who criticizes a fellow-believer and condemns them, criticizes and condemns the law. If you condemn the law you're not someone who keeps the law, because you're sitting in judgment of it.
११बंधूंनो, एकमेकांविषयी वाईट बोलू नका. जो बंधूविषयी वाईट बोलतो व आपल्या बंधूला दोष लावतो तो नियमशास्त्राविषयी वाईट बोलतो आणि नियमशास्त्राला दोष लावतो. पण तू जर नियमशास्त्राला दोष लावलास तर तू नियम पाळणारा नाहीस पण न्यायाधीश आहेस.
12 There's only one lawgiver and judge—the one who can either save or destroy you—so who are you to judge your neighbor?
१२जो तारण्यास व नष्ट करण्यास समर्थ आहे असा नियमशास्त्र देणारा व न्यायाधीश एकच आहे. मग शेजार्‍याला दोष लावणारा तू कोण?
13 Come on now!—you people who say, “Either today or tomorrow we'll go to such-and-such a city, spend a year in business there, and make a profit.”
१३अहो! तुम्ही जे म्हणता की, “आज किंवा उद्या आपण या गावाला जाऊ, तेथे वर्षभर राहू आणि व्यापार करून कमावू.”
14 You have no idea what will happen tomorrow! What's your life like? It's just a mist that appears for a little while, and then is gone.
१४पण उद्या काय होईल हे तुम्हास माहीत नसते. तुमचे आयुष्य काय आहे? तुम्ही केवळ वाफ आहा; ती थोडा वेळ दिसते आणि नंतर, दिसेनाशी होते.
15 What you should say is, “If it's the Lord's will, we'll live like this and plan to do that.”
१५त्याबद्दल तुम्ही असे म्हणा की, “परमेश्वराची इच्छा असल्यास आपण जिवंत असू आणि हे करू किंवा ते करू.”
16 But right now you're caught up in your vain ideas. All this boasting is evil.
१६आता, तुम्ही आपल्या योजनेचा अभिमान मिरवता. अशा प्रकारचा सर्व अभिमान व्यर्थ आहे.
17 For it is a sin if you know to do what's right but don't do it.
१७म्हणून चांगले करणे कळत असून, जो ते करीत नाही त्यास ते पाप आहे.

< James 4 >