< Mark 14 >

1 Now the passover and the [feast of] unleavened bread was after two days. And the chief priests and the scribes were seeking how they might seize him by subtlety and kill him.
वल्हांडण व बेखमीर भाकरीच्या सणाच्या दोन दिवस अगोदर मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राचे शिक्षक कपटाने त्यास धरून जिवे मारण्याचा मार्ग शोधीत होते.
2 For they said, Not in the feast, lest perhaps there be a tumult of the people.
कारण ते म्हणत होते “आपण ते सणात करू नये नाही तर लोक दंगा करतील.”
3 And when he was in Bethany, in the house of Simon the leper, as he lay at table, there came a woman having an alabaster flask of ointment of pure nard, very costly; and having broken the alabaster flask, she poured it out upon his head.
येशू बेथानी येथे शिमोन कुष्ठरोगी याच्या घरी मेजावर जेवायला बसला असता कोणीएक स्त्री वनस्पतीपासून बनवलेल्या शुद्ध सुगंधी तेलाची फार मौल्यवान अलाबास्त्र कुपी घेऊन आली. तिने अलाबास्त्र कुपी फोडली आणि सुगंधी तेल येशूच्या डोक्यावर ओतले.
4 And there were some indignant in themselves, and saying, Why has this waste been made of the ointment?
तेथे असलेले काही लोक रागावले, ते एकमेकांना म्हणाले, “सुगंधी तेलाचा असा नाश व्हावा हे बरे नाही.
5 for this ointment could have been sold for more than three hundred denarii and given to the poor. And they spoke very angrily at her.
कारण हे सुगंधी तेल तीनशे सोन्याच्या नाण्यापेक्षा अधिक किंमतीला विकता आले असते आणि ते पैसे गरीबांना देता आले असते.” असे म्हणून त्यांनी तिच्याविरुद्ध कुरकुर केली.
6 But Jesus said, Let her alone; why do ye trouble her? she has wrought a good work as to me;
पण येशू म्हणाला, “तिला एकटे सोडा. तिला का त्रास देता? तिने माझ्यासाठी एक सुंदर कृत्य केले आहे.
7 for ye have the poor always with you, and whenever ye would ye can do them good; but me ye have not always.
गरीब तर नेहमी तुमच्याजवळ असतील आणि पाहिजे तेव्हा त्यांना मदत करणे तुम्हास शक्य आहे. परंतु मी नेहमीच तुमच्याबरोबर असेन असे नाही.
8 What she could she has done. She has beforehand anointed my body for the burial.
तिला शक्य झाले ते तिने केले. तिने दफनविधीच्या तयारीच्या काळाअगोदरच माझ्या शरीरावर सुगंधी तेल ओतले आहे.
9 And verily I say unto you, Wheresoever these glad tidings may be preached in the whole world, what this [woman] has done shall be also spoken of for a memorial of her.
मी तुम्हास खरे सांगतो, सर्व जगात जेथे कोठे सुवार्तेची घोषणा केली जाईल तेथे तिची आठवण म्हणून तिने जे केले ते नेहमीच सांगितले जाईल.”
10 And Judas Iscariote, one of the twelve, went away to the chief priests that he might deliver him up to them;
१०नंतर बारा शिष्यांपैकी एक, यहूदा इस्कर्योत येशूला विश्वासघाताने धरून देण्यासाठी मुख्य याजकांकडे गेला.
11 and they, when they heard it, rejoiced, and promised him to give money. And he sought how he could opportunely deliver him up.
११जेव्हा याजकांनी हे ऐकले तेव्हा त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी त्यास पैसे देण्याचे वचन दिले. मग यहूदा येशूला धरून त्यांच्या हातात देण्याची संधी पाहू लागला.
12 And the first day of unleavened bread, when they slew the passover, his disciples say to him, Where wilt thou that we go and prepare, that thou mayest eat the passover?
१२बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी जेव्हा वल्हांडण सणाचा कोकरा बळी करत असत तेव्हा येशूचे शिष्य त्यास म्हणाले, “आम्ही जातो आणि वल्हांडण सणाच्या भोजनाची तयारी करतो. आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे?”
13 And he sends two of his disciples, and says to them, Go into the city, and a man shall meet you carrying a pitcher of water; follow him.
१३येशूने आपल्या दोघा शिष्यांना पाठवले आणि त्यांना सांगितले, “शहरात जा आणि पाण्याचे भांडे घेऊन जाणारा मनुष्य तुम्हास भेटेल, त्याच्यामागे जा.
14 And wheresoever he enters, say to the master of the house, The Teacher says, Where is my guest-chamber where I may eat the passover with my disciples?
१४आणि जेथे तो आत जाईल त्या घराच्या मालकास सांगा, ‘गुरुजी म्हणतात, जेथे मला माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडण सणाचे भोजन करणे शक्य होईल अशी खोली कोठे आहे?’
15 and he will shew you a large upper room furnished ready. There make ready for us.
१५आणि तो तुम्हास माडीवरची एक मोठी नीटनेटकी केलेली खोली दाखवील, तेथे आपल्यासाठी तयारी करा.”
16 And his disciples went away and came into the city, and found as he had said to them; and they made ready the passover.
१६शिष्य निघाले आणि ते शहरात गेले आणि येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांना सर्व आढळले. मग त्यांनी वल्हांडण सणाच्या भोजनाची तयारी केली.
17 And when evening was come, he comes with the twelve.
१७संध्याकाळ झाली तेव्हा येशू बारा शिष्यांसह आला.
18 And as they lay at table and were eating, Jesus said, Verily I say to you, One of you shall deliver me up; he who is eating with me.
१८मेजावर बसून ते जेवीत असता येशू म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, तुमच्यापैकी जो एकजण मला शत्रूच्या स्वाधीन करून देईल, तो माझ्याबरोबर येथे जेवण करीत आहे.”
19 And they began to be grieved, and to say to him, one by one, Is it I? [and another, Is it I?]
१९शिष्य अतिशय खिन्न झाले व प्रत्येकजण त्यास म्हणू लागला, “तो मी आहे का?”
20 But he answered and said to them, One of the twelve, he who dips with me in the dish.
२०तो त्यांना म्हणाला, “बारा जणांपैकी एक जो माझ्याबरोबर ताटात भाकर बुडवत आहे तोच.
21 The Son of man goes indeed as it is written concerning him, but woe to that man by whom the Son of man is delivered up; [it were] good for that man if he had not been born.
२१त्याच्याविषयी पवित्र शास्त्रात जसे लिहिले आहे, तसा मनुष्याचा पुत्र जाईल, परंतु ज्याच्याकडून मनुष्याचा पुत्र धरून दिला जाईल, त्याची केवढी दुर्दशा होणार. तो जन्मला नसता तर ते त्याच्यासाठी बरे झाले असते.”
22 And as they were eating, Jesus, having taken bread, when he had blessed, broke [it], and gave [it] to them, and said, Take [this]: this is my body.
२२ते भोजन करीत असता येशूने भाकर घेतली, उपकारस्तुती केली, ती मोडली आणि त्यांना दिली. तो म्हणाला, “घ्या, हे माझे शरीर आहे.”
23 And having taken [the] cup, when he had given thanks, he gave [it] to them, and they all drank out of it.
२३नंतर येशूने प्याला घेतला, उपकारस्तुती केली. तो प्याला त्यांना दिला आणि सर्व त्यातून प्याले.
24 And he said to them, This is my blood, that of the [new] covenant, that shed for many.
२४मग येशू म्हणाला, “हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. पुष्कळांसाठी ते ओतले जात आहे.
25 Verily I say to you, I will no more drink at all of the fruit of the vine, until that day when I drink it new in the kingdom of God.
२५मी तुम्हास खरे सांगतो की, देवाच्या राज्यात मी नवा द्राक्षरस पिईन त्या दिवसापर्यंत मी यापुढे द्राक्षाचा उपजपिणार नाही.”
26 And having sung a hymn, they went out to the mount of Olives.
२६नंतर त्यांनी उपकारस्तुतीचे गीत गाईले व ते जैतुनाच्या डोंगराकडे निघून गेले.
27 And Jesus says to them, All ye shall be offended, for it is written, I will smite the shepherd, and the sheep shall be scattered abroad.
२७येशू शिष्यांना म्हणाला, “तुम्ही सर्व अडखळून पडाल कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘मी मेंढपाळास मारीन आणि मेंढरांची दाणादाण होईल.’
28 But after I am risen, I will go before you into Galilee.
२८परंतु माझे पुनरुत्थान झाल्यावर मी तुमच्यापुढे गालील प्रांतात जाईन.”
29 But Peter said to him, Even if all should be offended, yet not I.
२९पेत्र म्हणाला, जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही.
30 And Jesus says to him, Verily I say to thee, that thou to-day, in this night, before [the] cock shall crow twice, thou shalt thrice deny me.
३०मग येशू त्यास म्हणाला, “मी तुला खरे सांगतो, आज रात्री दोनदा कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील.”
31 But he said [so much] exceedingly the more, If I should have to die with thee, I will in no wise deny thee. And likewise said they all too.
३१तरीही पेत्र अधिक आवेशाने म्हणाला, “जरी मला आपणाबरोबर मरावे लागले तरीसुद्धा मी आपणाला नाकारणार नाही.” आणि इतर सर्वजण तसेच म्हणाले.
32 And they come to a place of which the name [is] Gethsemane, and he says to his disciples, Sit here while I shall pray.
३२नंतर ते गेथशेमाने म्हटलेल्या जागी आले, तेव्हा येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.”
33 And he takes with him Peter and James and John, and he began to be amazed and oppressed in spirit.
३३येशूने आपल्याबरोबर पेत्र, याकोब व योहान यांना घेतले. दुःख व वेदनांनी त्याचे मन भरून आले.
34 And he says to them, My soul is full of grief even unto death; abide here and watch.
३४तो त्यांना म्हणाला, “माझा जीव मरण्याइतका वेदना सोशीत आहे. येथे राहा व जागृत असा.”
35 And, going forward a little, he fell upon the earth; and he prayed that, if it were possible, the hour might pass away from him.
३५त्यांच्यापासून थोडे दूर अंतरावर जाऊन तो जमिनीवर पडला आणि त्याने प्रार्थना केली की, “शक्य असेल तर ही घटका मजपासून टळून जावो.”
36 And he said, Abba, Father, all things are possible to thee: take away this cup from me; but not what I will, but what thou [wilt].
३६तो म्हणाला, “अब्बा-पिता, तुला सर्वकाही शक्य आहे. हा प्याला मजपासून दूर कर तरी माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे कर.”
37 And he comes and finds them sleeping. And he says to Peter, Simon, dost thou sleep? Hast thou not been able to watch one hour?
३७नंतर येशू आला आणि त्यांना झोपलेले पाहिले. तो पेत्राला म्हणाला, “शिमोना, तू झोपी गेलास काय? तासभर तुझ्याच्याने जागे राहवत नाही काय?
38 Watch and pray, that ye enter not into temptation. The spirit indeed [is] willing, but the flesh weak.
३८जागृत राहा आणि प्रार्थना करा म्हणजे तुम्ही परीक्षेत पडणार नाही. आत्मा उत्सुक आहे पण देह अशक्त आहे.”
39 And going away, he prayed again, saying the same thing.
३९पुन्हा येशू दूर गेला आणि त्याच गोष्टी उच्चारून त्याने प्रार्थना केली.
40 And returning, he found them again sleeping, for their eyes were heavy; and they knew not what they should answer him.
४०नंतर तो परत आला व त्यास ते झोपलेले आढळले कारण त्यांचे डोळे जड झाले होते आणि त्यास काय उत्तर द्यावे हे त्यांना कळेना.
41 And he comes the third time and says to them, Sleep on now, and take your rest. It is enough; the hour is come; behold, the Son of man is delivered up into the hands of sinners.
४१तो पुन्हा तिसऱ्या वेळेस आला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही अजूनही झोपलेले आणि विश्रांती घेत आहात काय? पुरे झाले! आता वेळ आली आहे. मनुष्याचा पुत्र पाप्यांच्या हाती धरून दिला जात आहे.
42 Arise, let us go; behold, he that delivers me up has drawn nigh.
४२उठा, आपण जाऊ या. पाहा, मला धरून देणारा मनुष्य इकडे येत आहे.”
43 And immediately, while he was yet speaking, Judas comes up, [being] one of the twelve, and with him a great crowd, with swords and sticks, from the chief priests and the scribes and the elders.
४३आणि येशू बोलत आहे तोपर्यंत बारा जणांपैकी एक यहूदा तेथे आला. त्याच्याबरोबर मुख्य याजक लोक व नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडील यांनी पाठवलेले अनेक लोक तलवारी व सोटे घेऊन आले.
44 Now he that delivered him up had given them a sign between them, saying, Whomsoever I shall kiss, that is he; seize him, and lead [him] away safely.
४४घात करून देणाऱ्याने त्यांना अशी खूण दिली होती की, “मी ज्या कोणाचे चुंबन घेईन तोच तो आहे, त्यास धरा आणि सांभाळून न्या.”
45 And being come, straightway coming up to him, he says, Rabbi, Rabbi; and he covered him with kisses.
४५मग यहूदा आल्याबरोबर तो येशूकडे गेला आणि म्हणाला, “रब्बी!” आणि असे म्हणून यहूदाने येशूचे चुंबन घेतले.
46 And they laid their hands upon him and seized him.
४६नंतर त्यांनी त्याच्यावर हात टाकले आणि त्यास अटक केली.
47 But a certain one of those who stood by, having drawn his sword, struck the bondman of the high priest, and took off his ear.
४७तेथे जवळ उभे असलेल्यांपैकी एकाने आपली तलवार काढली आणि महायाजकाच्या नोकरावर वार करून त्याचा कान कापून टाकला.
48 And Jesus answering said to them, Are ye come out as against a robber, with swords and sticks to take me?
४८नंतर येशू त्यांना म्हणाला, “मी लुटारू असल्याप्रमाणे तुम्ही तलवारी आणि सोटे घेऊन मला पकडायला बाहेर पडलात काय?
49 I was daily with you teaching in the temple, and ye did not seize me; but [it is] that the scriptures may be fulfilled.
४९मी दररोज परमेश्वराच्या भवनात शिकवीत असता तुम्हाबरोबर होतो आणि तुम्ही मला अटक केली नाही. परंतु शास्त्रलेख पूर्ण झालाच पाहिजे.”
50 And all left him and fled.
५०सर्व शिष्य त्यास सोडून पळून गेले.
51 And a certain young man followed him with a linen cloth cast about his naked [body]; and [the young men] seize him;
५१एक तरूण मनुष्य अंगावर तागाचे वस्त्र पांघरून त्याच्यामागे चालत होता. त्यांनी त्यास धरले,
52 but he, leaving the linen cloth behind [him], fled from them naked.
५२परंतु तो तागाचे वस्त्र टाकून उघडाच पळून गेला.
53 And they led away Jesus to the high priest. And there come together to him all the chief priests and the elders and the scribes.
५३नंतर त्यांनी येशूला तेथून महायाजकाकडे नेले आणि सर्व मुख्य याजक लोक, वडील व नियमशास्त्राचे शिक्षक जमा झाले.
54 And Peter followed him at a distance, till [he was] within the court of the high priest's palace; and he was sitting with the officers and warming himself in the light [of the fire].
५४थोडे अंतर ठेवून पेत्र येशूच्या मागे सरळ महायाजकाच्या वाड्यात गेला. तेथे पेत्र कामदारांबरोबर विस्तवाजवळ शेकत बसला.
55 And the chief priests and the whole sanhedrim sought testimony against Jesus to cause him to be put to death, and did not find [any].
५५मुख्य याजक लोक आणि सर्व यहूदी सभा येशूला जिवे मारण्यासाठी पुरावा गोळा करण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु त्यांना काही मिळेना.
56 For many bore false witness against him, and their testimony did not agree.
५६पुष्कळांनी त्याच्याविरुध्द खोटी साक्ष दिली. परंतु त्यांची साक्ष सारखी नव्हती.
57 And certain persons rose up and bore false witness against him, saying,
५७नंतर काहीजण उभे राहीले आणि त्याच्याविरुध्द साक्ष देऊन म्हणाले, आम्ही त्यास असे म्हणताना ऐकले की,
58 We heard him saying, I will destroy this temple which is made with hands, and in the course of three days I will build another not made with hands.
५८“हाताने बांधलेले परमेश्वराचे भवन मी पाडून टाकीन आणि हातांनी न बांधलेले असे दुसरे भवन तीन दिवसात उभारीन.”
59 And neither thus did their testimony agree.
५९परंतु तरीही याबाबतीत त्यांच्या साक्षीत मेळ नव्हता.
60 And the high priest, rising up before them all, asked Jesus, saying, Answerest thou nothing? What do these testify against thee?
६०नंतर महायाजक त्यांच्यापुढे उभा राहिले आणि त्याने येशूला विचारले, “तू उत्तर देणार नाहीस काय? हे लोक तुझ्याविरुद्ध आरोप करताहेत हे कसे?”
61 But he was silent, and answered nothing. Again the high priest asked him, and says to him, Thou art the Christ, the Son of the Blessed?
६१परंतु येशू गप्प राहिला. त्याने उत्तर दिले नाही. नंतर महायाजकाने पुन्हा विचारले, “धन्यवादिताचा पुत्र ख्रिस्त तो तू आहेस काय?”
62 And Jesus said, I am, and ye shall see the Son of man sitting at the right hand of power, and coming with the clouds of heaven.
६२येशू म्हणाला, “मी आहे, आणि तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसलेले व आकाशातील मेघांसह येताना पाहाल.”
63 And the high priest, having rent his clothes, says, What need have we any more of witnesses?
६३महायाजकाने आपले कपडे फाडले आणि म्हणाला, “आपणाला अधिक साक्षीदारांची काय गरज आहे?
64 Ye have heard the blasphemy; what think ye? And they all condemned him to be guilty of death.
६४तुम्ही निंदा ऐकली आहे. तुम्हास काय वाटते?” सर्वांनी त्यास मरणदंड योग्य आहे अशी शिक्षा फर्मावली.
65 And some began to spit upon him, and cover up his face, and buffet him, and say to him, Prophesy; and the officers struck him with the palms of their hands.
६५काहीजण त्याच्यावर थुंकू लागले. त्याचे तोंड झाकून बुक्क्या मारू लागले व त्यास म्हणू लागले, “ओळख बरे, तुला कोणी मारले?” कामदारांनी त्यास ताब्यात घेतले आणि मारले.
66 And Peter being below in the palace-court, there comes one of the maids of the high priest,
६६पेत्र अंगणात असतानाच महायाजकाच्या दासीपैकी एक तेथे आली.
67 and seeing Peter warming himself, having looked at him, says, And thou wast with the Nazarene, Jesus.
६७आणि तिने पेत्राला शेकताना पाहिले. तेव्हा तिने त्याच्याकडे निरखून पाहिले व म्हणाली, “तू सुद्धा नासरेथकर येशूबरोबर होतास ना?”
68 But he denied, saying, I know not nor understand what thou sayest. And he went out into the vestibule; and a cock crew.
६८परंतु पेत्राने ते नाकारले आणि म्हणाला, “तू काय म्हणतेस हे मला कळत नाही व समजतही नाही.” पेत्र अंगणाच्या दरवाजाच्या देवडीवर गेला आणि कोंबडा आरवला.
69 And the maid, seeing him, again began to say to those that stood by, This is [one] of them.
६९जेव्हा दासीने त्यास पाहिले तेव्हा जे लोक तेथे होते त्यांना ती म्हणू लागली की, “हा मनुष्य त्यांच्यापैकीच एक आहे.”
70 And he again denied. And again, after a little, those that stood by said to Peter, Truly thou art [one] of them, for also thou art a Galilean.
७०पेत्राने पुन्हा ते नाकारले. नंतर थोड्या वेळाने तेथे उभे असलेले लोक पेत्राला म्हणाले, “खात्रीने तू त्यांच्यापैकी एक आहेस, कारण तू सुद्धा गालीली आहेस.”
71 But he began to curse and to swear, I know not this man of whom ye speak.
७१पेत्र निर्भत्सना करीत व शपथ वाहून म्हणाला, “तुम्ही ज्या मनुष्याविषयी बोलत आहात त्यास मी ओळखत नाही!”
72 And the second time a cock crew. And Peter remembered the word that Jesus said to him, Before [the] cock crow twice, thou shalt deny me thrice; and when he thought thereon he wept.
७२आणि लगेच दुसऱ्यांदा कोंबडा आरवला, “दोन वेळा कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील,” असे येशू म्हणाला होता याची पेत्राला आठवण झाली व तो अतिशय दुःखी झाला व मोठ्याने रडला.

< Mark 14 >