< Revelation 6 >

1 And I saw that the Lamb had opened one of the seven seals. And I heard one of the four living creatures saying, in a voice like thunder: “Draw near and see.”
मग कोकऱ्याने सात शिक्क्यांपैकी एक शिक्का फोडला ते मी पाहिले आणि त्या चार प्राण्यातील एकाने मेघगर्जनेसारख्या वाणीने ये असे म्हणताना ऐकले.
2 And I saw, and behold, a white horse. And he who was sitting upon it was holding a bow, and a crown was given to him, and he went forth conquering, so that he might prevail.
मी एक पांढरा घोडा पाहिला, त्यावर जो बसला होता त्याच्याजवळ धनुष्य होते आणि त्यास मुकुट देण्यात आला. तो जिंकीत विजयावर विजय मिळविण्यास निघाला.
3 And when he had opened the second seal, I heard the second living creature saying: “Draw near and see.”
जेव्हा कोकऱ्याने दुसरा शिक्का उघडला, तेव्हा दुसऱ्या जिवंत प्राण्याला ये असे म्हणताना ऐकले.
4 And another horse went forth, which was red. And it was granted to him who was sitting upon it that he would take peace from the earth, and that they would kill one another. And a great sword was given to him.
नंतर दुसरा घोडा निघाला, तो अग्निज्वालेप्रमाणे लाल होता. त्यावर जो बसलेला होता त्यास पृथ्वीवरील शांती नाहीशी करण्याचा अधिकार दिला होता. यासाठी की, लोकांनी एकमेकास वधावे. त्यास मोठी तलवार देण्यात आली होती.
5 And when he had opened the third seal, I heard the third living creature saying: “Draw near and see.” And behold, a black horse. And he who was sitting upon it was holding a balance in his hand.
जेव्हा कोकऱ्याने तिसरा शिक्का उघडला, तिसऱ्या जिवंत प्राण्याला “ये” असे म्हणतांना ऐकले तेव्हा मी काळा घोडा पाहिला आणि त्यावर जो बसलेला होता त्याच्या हातात तराजू होते.
6 And I heard something like a voice in the midst of the four living creatures saying, “A double measure of wheat for a denarius, and three double measures of barley for a denarius, but do no harm to wine and oil.”
मी चार प्राण्यांच्यामधून निघालेली वाणी ऐकली, ती म्हणत होती, एका चांदीच्या नाण्याला शेरभर गहू आणि एका चांदीच्या नाण्याला तीन शेर जव. परंतु तेल व द्राक्षरस यांची हानी करू नकोस.
7 And when he had opened the fourth seal, I heard the voice of the fourth living creature saying: “Draw near and see.”
कोकऱ्याने जेव्हा चौथा शिक्का उघडला, तेव्हा मी चौथ्या जिवंत प्राण्याची वाणी “ये” म्हणताना ऐकली.
8 And behold, a pale horse. And he who was sitting upon it, his name was Death, and Hell was following him. And authority was given to him over the four parts of the earth, to destroy by the sword, by famine, and by death, and by the creatures of the earth. (Hadēs g86)
नंतर मी फिकट रंगाचा घोडा पाहिला. त्यावर जो बसलेला होता त्याचे नाव मरण होते; आणि मृतलोक त्याच्या पाठीमागून त्याच्याबरोबर चालला होता. त्यांना तलवारीने, दुष्काळाने, रोगाने व पृथ्वीवरील श्वापदांकडून मनुष्यांना जिवे मारण्याचा अधिकार पृथ्वीच्या चौथ्या भागावर देण्यात आला होता. (Hadēs g86)
9 And when he had opened the fifth seal, I saw, under the altar, the souls of those who had been slain because of the Word of God and because of the testimony that they held.
जेव्हा कोकऱ्याने पाचवा शिक्का उघडला तेव्हा मी, वेदीखाली आत्मे पाहिले, ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जिवे मारलेल्या लोकांचे आत्मे होते.
10 And they were crying out with a loud voice, saying: “How long, O Holy and True Lord, will you not judge and not vindicate our blood against those who dwell upon the earth?”
१०ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे “स्वामी तू पवित्र व सत्य आहेस तू कोठपर्यंत न्यायनिवाडा करणार नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांपासून आमच्या रक्ताचा सूड घेणार नाहीस?”
11 And white robes were given to each of them. And they were told that they should rest for a brief time, until their fellow servants and their brothers, who were to be slain even as they were slain, would be completed.
११तेव्हा त्या प्रत्येकास एकएक शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यास असे सांगण्यात आले की, तुमच्या सोबतीचे दास व तुमचे बंधू तुम्हासारखे जिवे मारले जाणार, त्यांची संख्यापूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ विसावा घ्या.
12 And when he had opened the sixth seal, I saw, and behold, a great earthquake occurred. And the sun became black, like a haircloth sack, and the entire moon became like blood.
१२त्याने सहावा शिक्का फोडला, ते मी पाहिले; तेव्हा मोठा भूमिकंप झाला, सूर्य केसांच्या बनवलेल्या तरटासारखा काळा झाला; व सगळा चंद्र रक्तासारखा झाला;
13 And the stars from heaven fell upon the earth, just as when a fig tree, shaken by a great wind, drops its immature figs.
१३अंजिराचे झाड मोठ्या वाऱ्याने हालले म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात तसे आकाशातील तारे पृथ्वीवर पडले
14 And heaven receded, like a scroll being rolled up. And every mountain, and the islands, were moved from their places.
१४एखाद्या गुंडाळीसारखे आकाश गुंडाळले जाऊन निघून गेले आणि सर्व डोंगर व बेटे आपआपल्या ठिकाणांवरून ढळून गेली.
15 And the kings of the earth, and the rulers, and the military leaders, and the wealthy, and the strong, and everyone, servant and free, hid themselves in caves and among the rocks of the mountains.
१५पृथ्वीवरील राजे व मोठे अधिकारी, सरदार, श्रीमंत व बलवान लोक, सर्व दास व स्वतंत्र माणसे, गुहात व डोगरांतील खडकातून लपली;
16 And they said to the mountains and the rocks: “Fall over us and hide us from the face of the One sitting upon the throne, and from the wrath of the Lamb.
१६आणि ते डोंगरास व खडकास म्हणाले, आम्हावर पडून राजासनावर जो बसलेला आहे, त्याच्या नजरेपासून व कोकऱ्याच्या क्रोधापासून आम्हास लपवा,
17 For the great day of their wrath has arrived. And who will be able to stand?”
१७कारण त्यांच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे, आणि त्याच्यापुढे कोण टिकेल?

< Revelation 6 >