< Mudre Izreke 23 >

1 Kad sjedneš blagovati s moćnikom. dobro pazi što je pred tobom;
जेव्हा तू अधिपतीबरोबर जेवायला बसतोस, तेव्हा काळजीपूर्वक तुझ्यापुढे कोण आहे याचे निरीक्षण कर,
2 stavljaš nož sebi pod grlo ako si proždrljivac;
आणि जर तू खादाड असलास तर आपल्या गळ्याला सुरी लाव.
3 ne poželi slastica njegovih jer su jelo prijevarno.
त्याच्या मिष्टान्नांची हाव धरू नको, कारण ती लबाडाची खाद्ये आहेत.
4 Ne trudi se stjecati bogatstvo; okani se takve misli;
श्रीमंत होण्यासाठी खूप कष्ट करू नको; तुम्ही आपल्या ज्ञानाने कोठे थांबावे समजून घे.
5 usmjeriš li oči prema njemu, njega već nema jer načini sebi krila kao orao i odleti u nebo.
जेव्हा तू जो जाणारा पैसा आहे त्यावर आपली नजर लावशील, आणि अचानक ते पंख धारण करतील, आणि ते गरुडासारखे आकाशाकडे उडून जातील.
6 Ne jedi jela zavidnikova, ne čezni za slasticama njegovim,
जो कोणी तुझ्या अन्नाकडे खूप वेळ पाहतो त्या दुष्ट मनुष्याचे अन्न खाऊ नको, आणि त्याच्या मिष्टान्नाची इच्छा धरू नको,
7 jer on je onakav kako u sebi misli: “Jedi i pij”, veli ti, ali mu srce nije s tobom.
तो अशाप्रकारचा मनुष्य आहे जो अन्नाची किंमत मोजतो. तो तुला खा व पी! म्हणतो, परंतु त्याचे मन तुझ्यावर नाही.
8 Zalogaj koji si pojeo izbljuvat ćeš, uzalud ćeš prosut' svoje ljupke riječi.
जे थोडेसे अन्न तू खाल्ले ते ओकून टाकशील, आणि तुमच्या शुभेच्छा व्यर्थ जातील.
9 Pred bezumnikom nemoj govoriti jer prezire tvoje umne riječi.
मूर्खाच्या कानात काही सांगू नको, कारण तो तुमच्या शहाणपणाच्या शब्दांचा तिरस्कार करील.
10 Ne pomiči prastare međe i ne prodiri u polje siročadi,
१०जुन्या सीमेचा दगड काढू नको; किंवा अनाथाची शेती बळकावू नको.
11 jer je moćan njihov osvetnik: branit će njihovo pravo protiv tebe.
११कारण त्यांचा तारणारा समर्थ आहे; आणि तो त्यांचा कैवार घेऊन तुमच्याविरुध्द होईल.
12 Obrati pouci srce svoje i uho svoje riječima mudrim.
१२तू आपले मन शिक्षणाकडे आणि आपले कान ज्ञानाच्या वचनाकडे लाव.
13 Ne uskraćuj djetetu opomene, jer, udariš li ga šibom, neće umrijeti:
१३मुलाला शिक्षा करण्यास अवमान करू नको; कारण जर तू त्यास छडीने मारले तर तो मरणार नाही.
14 biješ ga šibom, ali mu dušu iz Podzemlja izbavljaš. (Sheol h7585)
१४जर तुम्ही त्यास छडीने मारले, तर तुम्ही त्याचा जीव अधोलाकापासून वाचवाल. (Sheol h7585)
15 Sine moj, kad ti je mudro srce, i ja se od srca veselim;
१५माझ्या मुला, तू जर शहाणा असलास तर मग, माझ्या मनालाही आनंद होईल.
16 i kliče sva nutrina moja kad ti usne govore što je pravo.
१६तुझे ओठ योग्य ते बोलत असता, माझे अंतर्याम आनंदित होईल.
17 Neka ti srce ne zavidi grešnicima, nego neka ti uvijek bude u strahu Gospodnjem,
१७तुझ्या हृदयाने पातक्यांचा हेवा करू नये, पण सारा दिवस तू सतत परमेश्वराचे भय धरीत जा.
18 jer imat ćeš budućnost i tvoja nada neće propasti.
१८कारण त्यामध्ये खचित भविष्य आहे; आणि तुझी आशा तोडण्यात येणार नाही.
19 Slušaj, sine moj, i mudar budi i ravnim putem vodi srce svoje.
१९माझ्या मुला माझे ऐक, आणि सुज्ञ हो आणि आपले मन सरळ मार्गात राख.
20 Ne druži se s vinopijama ni sa žderačima mesa,
२०मद्यप्यांबरोबर किंवा खादाडपणाने मांस खाणाऱ्याबरोबर मैत्री करू नकोस.
21 jer pijanica i izjelica osiromaše i pospanac se oblači u krpe.
२१कारण मद्य पिणारे आणि खादाड गरीब होतात, झोपेत वेळ घालवणारा चिंध्यांचे वस्त्र घालील.
22 Slušaj svoga oca, svoga roditelja, i ne prezri majku kad ostari.
२२तू आपल्या जन्मदात्या पित्याचे ऐक, तुझी आई म्हातारी झाली म्हणून तिचा तिरस्कार करू नको.
23 Pribavi istinu i ne prodaji je, steci mudrost, pouku i razbor.
२३सत्य विकत घे, पण ते विकू नको; शहाणपण, शिक्षण आणि समजूतदारपणा ही विकत घे.
24 Radovat će se otac pravednikov, i roditelj će se mudroga veseliti.
२४नीतिमानाचा पिता फार उल्लासेल, आणि सुज्ञ मुलास जन्म देणारा त्याच्याविषयी आनंदित होईल.
25 Neka se veseli otac tvoj i majka tvoja, i neka se raduje roditeljka tvoja.
२५तुमच्या आई आणि वडिलांना तुमच्याबरोबर आनंदी होऊ द्या. जिने तुला जन्म दिला तिला आनंद घेऊ दे.
26 Daj mi, sine moj, srce svoje, i neka oči tvoje raduju putovi moji.
२६माझ्या मुला, तू आपले हृदय मला दे, आणि तुझे डोळे माझ्या मार्गाचे निरीक्षण करोत.
27 Jer bludnica je jama duboka i tuđinka tijesan zdenac.
२७कारण वेश्या ही खोल खड्डा आहे आणि दुसऱ्या मनुष्याची पत्नी ही अरुंद खड्डा आहे.
28 Ona i vreba u zasjedi kao lupež i uvećava broj bezbožnika među ljudima.
२८ती चोरासारखी वाट बघत असते, आणि ती मनुष्यजातीत विश्वासघातक्यांची संख्या वाढवते.
29 Komu: ah? komu: jao? komu: svađe? komu: uzdasi? komu: rane nizašto? komu: zamućene oči?
२९कोणाला हाय? कोणाला दुःख? कोणाला लढाई? कोणाला गाऱ्हाणी? कोणाला विनाकारण जखमा? कोणाला आरक्त डोळे आहे?
30 Onima što kasno sjede kod vina, koji su došli kušati vino začinjeno.
३०जे मद्य पीत रेंगाळतात, जे मिश्र मद्याचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करतात.
31 Ne gledaj na vino kad rujno iskri, kad se u čaši svjetlucavo prelijeva: pije se tako glatko,
३१जेव्हा मद्य लाल आहे, जेव्हा तो प्याल्यात चमकतो, आणि खाली कसा सहज उतरतो तू त्याकडे पाहू नको.
32 a na kraju ujeda kao zmija i žaca kao guja ljutica.
३२पण शेवटी तो सापासारखा चावतो, आणि फुरशाप्रमाणे झोंबतो.
33 Oči će ti gledati tlapnje i srce govoriti ludosti.
३३तुझे डोळे विलक्षण गोष्टी पाहतील; आणि तुझे मन विकृत गोष्टी उच्चारील.
34 I bit će ti kao da ležiš na pučini morskoj ili kao da ležiš navrh jarbola.
३४जो समुद्रामध्ये आडवा पडला त्याच्यासारखा, अथवा डोलकाठीच्या माथ्यावर जो झोपला त्याच्यासारखा तू होशील.
35 “Izbiše me, ali me ne zabolje; istukoše me, ali ne osjetih; kad se otrijeznim, još ću tražiti.”
३५तुम्ही म्हणाल, “त्यांनी मला तडाखा दिला! पण मला काही लागले नाही. त्यांनी मला पिटले पण मला ते जाणवले नाही. मी केव्हा जागा होईल? मी पुन्हा त्याचे सेवन करीन.”

< Mudre Izreke 23 >