< 箴言 11 >

1 诡诈的天平为耶和华所憎恶; 公平的法码为他所喜悦。
यथार्थ नसलेल्या तराजूचा परमेश्वरास वीट आहे, पण तंतोतंत वजनात त्यास आनंद आहे.
2 骄傲来,羞耻也来; 谦逊人却有智慧。
जेव्हा गर्व येतो नंतर अप्रतिष्ठा येते, पण विनम्रते बरोबर ज्ञान येते.
3 正直人的纯正必引导自己; 奸诈人的乖僻必毁灭自己。
सरळांचा सात्विकपणा त्यांना मार्गदर्शन करतो, पण विश्वासघातक्यांचा वाकडा मार्ग त्यांचा नाश करतो.
4 发怒的日子资财无益; 惟有公义能救人脱离死亡。
क्रोधाच्या दिवशी संपत्ती निरुपयोगी आहे, परंतु नीतिमत्ता तुम्हास मरणापासून वाचवते.
5 完全人的义必指引他的路; 但恶人必因自己的恶跌倒。
निर्दोष व्यक्तीची सात्विक वागणूक त्याचे मार्ग सरळ करते, परंतु दुर्जन आपल्या दुष्टतेने पतन पावतो.
6 正直人的义必拯救自己; 奸诈人必陷在自己的罪孽中。
जे देवाला प्रसन्न करतात त्यांचा सात्विकपणा त्यांना सुरक्षित ठेविल, पण फसवणारा आपल्या दुष्कृतीनेच सापळ्यात अडकतो.
7 恶人一死,他的指望必灭绝; 罪人的盼望也必灭没。
जेव्हा दुष्ट मनुष्य मरतो, त्याची आशा नष्ट होते; आणि त्याचा भरवसा त्याच्या शक्तीत होता तो निष्फळ होतो.
8 义人得脱离患难, 有恶人来代替他。
नीतिमान संकटापासून दूर राहतो; आणि त्याच्याऐवजी ती दुष्टांवर येतात.
9 不虔敬的人用口败坏邻舍; 义人却因知识得救。
अधर्मी आपल्या तोंडाने शेजाऱ्याचा नाश करतो, पण नीतिमान आपल्या ज्ञानाने सुरक्षित राहतो.
10 义人享福,合城喜乐; 恶人灭亡,人都欢呼。
१०जेव्हा नीतिमानाची उन्नती होते तेव्हा नगर आनंदित होते; जेव्हा दुष्टांचा नाश होतो तेव्हा तेथे आनंदाचा जयघोष होतो.
11 城因正直人祝福便高举, 却因邪恶人的口就倾覆。
११जो कोणी आपल्या चांगल्या दानांनी देवाला संतोषवितो, तेव्हा नगर मोठे होते; दुष्टांच्या तोंडामुळे नगर उद्ध्वस्त होते.
12 藐视邻舍的,毫无智慧; 明哲人却静默不言。
१२जो मनुष्य आपल्या मित्राला तुच्छ लेखतो तो बुद्धिहीन आहे, परंतु समजदार मनुष्य शांत राहतो.
13 往来传舌的,泄漏密事; 心中诚实的,遮隐事情。
१३जो कोणी निंदा करीत फिरतो तो गुप्त गोष्टी उघड करतो, परंतु जो विश्वासू व्यक्ती असतो तो त्यावर झाकण घालतो.
14 无智谋,民就败落; 谋士多,人便安居。
१४जेथे कोठे शहाण्याचे मार्गदर्शन नसते, राष्ट्र पडते, पण पुष्कळ सल्लागार असल्याने विजय मिळतो.
15 为外人作保的,必受亏损; 恨恶击掌的,却得安稳。
१५जो कोणी अपरिचिताला जामीन राहील, त्याची खात्रीने हानी होईल, परंतु जो कोणी त्याप्रकारची शपथ देण्याचे वचन देतो, तो त्याचा द्वेष करतो, तो सुरक्षित राहतो.
16 恩德的妇女得尊荣; 强暴的男子得资财。
१६कृपाळू स्त्रीस आदर मिळतो, परंतु निर्दयी लोक संपत्ती घट्ट पकडतात.
17 仁慈的人善待自己; 残忍的人扰害己身。
१७दयाळू मनुष्य आपले हित करतो, पण जो क्रूर असतो तो स्वत: ला इजा करून घेतो.
18 恶人经营,得虚浮的工价; 撒义种的,得实在的果效。
१८दुष्ट मनुष्य त्याचे वेतन मिळविण्यासाठी लबाड बोलतो, परंतु जो नीतीने पेरतो त्याचे वेतन सत्याची कापणी असते.
19 恒心为义的,必得生命; 追求邪恶的,必致死亡。
१९जो प्रामाणिक व्यक्ती नीतीने राहतो त्यास जीवन मिळेल, पण जो दुष्कर्मामागे लागतो तो आपणावर मृत्त्यू आणतो.
20 心中乖僻的,为耶和华所憎恶; 行事完全的,为他所喜悦。
२०जे मनाचे कुटिल असतात त्यांचा परमेश्वरास वीट आहे, पण ज्यांचे मार्ग निर्दोष आहेत त्यांच्याविषयी त्यास आनंद वाटतो.
21 恶人虽然连手,必不免受罚; 义人的后裔必得拯救。
२१दुष्टांना शासन झाल्यावाचून राहणार नाही याची खात्री बाळगा, परंतु नीतिमानांच्या वंशजांना सुरक्षित ठेवले जाईल.
22 妇女美貌而无见识, 如同金环带在猪鼻上。
२२डुकराच्या नाकात जशी सोन्याची नथ, तशी तारतम्य नसलेली सुंदर स्त्री समजावी.
23 义人的心愿尽得好处; 恶人的指望致干忿怒。
२३जे चांगले करतात त्यांच्या इच्छेचे परिणाम चांगलेच असतात; पण दुष्टांची आशा फक्त क्रोधच असते.
24 有施散的,却更增添; 有吝惜过度的,反致穷乏。
२४तेथे कोणी एकजन बी पेरतो तो अधिक गोळा करतो; दुसरा पेरीत नाही तो दरिद्री होईल.
25 好施舍的,必得丰裕; 滋润人的,必得滋润。
२५उदार मनाचा इसम समृद्ध होतो, आणि जो दुसऱ्याला पाणी पाजतो त्यास स्वतःला ते पाजण्यात येईल.
26 屯粮不卖的,民必咒诅他; 情愿出卖的,人必为他祝福。
२६जो मनुष्य त्याचे धान्य विकायला नकार देतो त्यास लोक शाप देतात, पण जो ते विकतो त्याच्या मस्तकी चांगल्या दानाचा मुकुट प्राप्त होईल.
27 恳切求善的,就求得恩惠; 惟独求恶的,恶必临到他身。
२७जो कोणी परिश्रमाने चांगल्याचा शोध घेतो तो अनुग्रहाचा शोध करतो, पण जो कोणी वाईटाचा शोध घेतो त्यास तेच प्राप्त होईल.
28 倚仗自己财物的,必跌倒; 义人必发旺,如青叶。
२८जो कोणी आपल्या श्रीमंतीवर विश्वास ठेवतो तो पडेल, परंतु नीतिमान पानाप्रमाणे झपाट्याने वाढेल.
29 扰害己家的,必承受清风; 愚昧人必作慧心人的仆人。
२९जो कोणी आपल्या स्वतःच्या घरावर संकटे आणतो त्याचे वतन वारा होईल, आणि मूर्ख मनुष्य शहाण्याच्या हृदयाचा सेवक होईल.
30 义人所结的果子就是生命树; 有智慧的,必能得人。
३०नीतिमानाचे जीवन वृक्षासारखे आहे, पण हिंसाचार जीवन दूर नेतो.
31 看哪,义人在世尚且受报, 何况恶人和罪人呢?
३१जर नीतिमानाला त्याच्या लायकीप्रमाणे फळ मिळते; तर दुर्जनाला व पाप्याला किती अधिक मिळेल!

< 箴言 11 >