< Luka 16 >

1 Yeecu yi nobbwankecebo tak, “nii cuwekako kangeni ki ni toman'nye, Lacin kwa kiyan nye ki nii toman nyewo kang cineut cuwekacokob.
येशूने त्याच्या शिष्यांना एक दाखला सांगितला, “कोणीएक श्रीमंत मनुष्य असून, त्याचा एक कारभारी होता. हा कारभारी तुमचे पैसे उधळतो, अशी तक्रार त्या श्रीमंत मनुष्याकडे करण्यात आली.
2 La nii cuweka wuco yico, “fulan yer minuwa dor mwere? bowki kiyeka tomange mweke, wori mari mwa yila nii tomange mititak.
म्हणून त्या श्रीमंत मनुष्याने कारभाऱ्याला आत बोलावून म्हटले, तुझ्याविषयी मी हे काय ऐकत आहे? तर आता तुझ्या कारभाराचा हिशोब दे, कारण यापुढे तुला कारभार पाहावयचा नाही.
3 Lamitomange toki neren, ma mangi, nilomi anyam tomanyewo kangmik? Wo, mimanki bikwantonet lami cwa kwenduwe meka cekoti.
तेव्हा कारभारी स्वतःशी म्हणाला, माझे मालक माझे कारभाऱ्याचे काम काढून घेत आहेत तर मी आता काय करू? शेतात कष्ट करण्याएवढे बळ माझ्या अंगात नाही व भीक मागण्याची मला लाज वाटते.
4 Minnyumwom dike ma matiyeu noci cukumye mor tomanye nindi, nubo ayoye lonici.
मला कारभाऱ्याच्या कामावरून ते काढून टाकतील तरीही लोकांनी मला त्यांच्या घरात घ्यावे यासाठी मी काय करावे हे मला माहिती आहे.
5 Dila nitomannye cwuningangum nubo teluwece bwanteng centiyeu, yi nii kaba, Nyi nii lomi bwangmwenten tiye?
मग कारभाऱ्याने त्याच्या मालकाच्या प्रत्येक कर्जदाराला बोलावले. पहिल्याला तो म्हणाला, तू माझ्या मालकाकडून किती कर्ज घेतले आहे जे तुला फेडायचे आहे.
6 yiki, 'nuwannye kwini kwob' Isryico, Bifumer mwerowo, canakowo yikenyiye, mulangum kwini nung.
तो म्हणाला, तीन हजार लिटर तेल. त्याने त्यास म्हटले, ही तुझी हिशोबाची वही घे आणि लवकर बसून यावर दीड हजार मांड
7 Yilan yikannye, ciki bwangmwentuniyi? Yiki, cwayi bikate kwini kwob, 'bifumerwo mulangum kwini narub'.
नंतर दुसऱ्याला म्हटले, तुला किती देणे आहे? तो म्हणाला, वीस हजार किलो गहू तो त्यास म्हणाला, ही तुझी हिशोबाची वही घे व सोळा हजार मांड.
8 Dila niwo caklang nii bwini bilengewo ki yulancero. Bibeyo kaleweu nyimem maka nyinong nubo ko kaleweu la bibei filange yulang. (aiōn g165)
अन्यायी कारभाऱ्याने शहाणपण केले. यावरुन धन्याने त्याची वाहवा केली; कारण या युगाचे लोक आपल्यासारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात. (aiōn g165)
9 Miyi komti komma bifarak kannge cuweraka kannge buni bilinke, cawo cin dimri, naci yokom lonici wuro manki diks. (aiōnios g166)
मी तुम्हास सांगतो, तुमच्यासाठी, तुमच्या अनीतीच्या धनाने मित्र मिळवा. यासाठी की, जेव्हा हे धन संपेल तेव्हा त्यांनी तुम्हास सार्वकालिक वस्तीत घ्यावे (aiōnios g166)
10 Wo madikerti dongdong dor dikero biduwareri, cin nii dongdonge dor dikero dur, wo kebo nii bilinke don dikero bidurure, kebo ni bilinke dor dikero dur.
१०एखाद्यावर थोडासा विश्वास टाकणे शक्य असेल तर त्याच्यावर जास्त विश्वास टाकणे शक्य आहे व जो कोणी थोड्या गोष्टींविषयी अन्यायी आहे तो जास्त गोष्टींविषयी अन्यायी राहील.
11 Tano kommabo dike dongdonge di cuwekako kebo wucakeri, we aciya kumenti kicuweka wabilinkece?
११म्हणून जर तुम्ही अनीतिकारक धनाविषयी विश्वासू नाही, तर मग खऱ्या धनाविषयी तुमच्यावर कोण विश्वास ठेवील?
12 No komma dike dongdonge ki kemer niidir we anekom kemer kumer tiye?
१२जे दुसऱ्याचे आहे त्याविषयी तुम्ही विश्वासू नसाल तर जे तुमचे आहे ते तुम्हास कोण देईल?
13 Kange mami wo a wob nii luweti yobe, catin kowini, ci cui win kakka ci ciya winening, ci cuwe kangum wineu. mani ka wab kwaamatiri kom wab cuwekati.
१३कोणत्याही नोकराला दोन मालकांची सेवा करता येत नाही. एकाचा तो राग करील व दुसऱ्यावर तो प्रीती करील किंवा एकाला तो धरून राहील व दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्ही एकाच वेळी देवाची व पैशाची सेवा करू शकत नाही.”
14 Kambo faricawabo wuro cui cuwekatiyeu nuwa dikero biombori, cin macinen cuwelangka.
१४मग ते परूशी धनाचे लोभी होते त्यांनी हे सर्व ऐकले व त्यांनी येशूचा तिरस्कार केला.
15 Inyici, “Kom ko tiki dor kumero kabum nubem, dila kwaama nyumuom nerkumero. Dikero nubo nedurketiye nyeu diker yeika fiye kwaama wiye.
१५येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही स्वतःला लोकांसमोर नीतिमान म्हणून मिरवता, पण देव तुमची अंतःकरणे ओळखतो. जे लोकांस त्यांच्या दृष्टीत महान वाटते ते देवाच्या नजरेमध्ये अमंगळ आहे.
16 Biwerer bifumer nob tomangebo inwi yakenciko Yahaya nin. Kwama wuro cin bwanten ker liyar kwaaranarotiye, kwarub kutannyi kwamacuo ci bwangten ker liyar kwaamarotiye, kwanrub ci ma bwi dokka dorekti morece.
१६योहानापर्यंत नियमशास्त्र व संदेष्टे हे होते आणि तेव्हापासून देवाच्या राज्याची सुवार्ता गाजवली जात आहे व प्रत्येकजण त्यामध्ये शिरण्याचा जोराने प्रयत्न करीत आहे.
17 Gwamm kangero, atin yilam bwaibo diko kange bitineu nabecum, na diker win nabi weretro na dim.
१७नियमशास्त्राचा एकही काना किंवा मात्रा नाहीसा होण्यापेक्षा आकाश व पृथ्वीचे नाहीसे होणे सोपे आहे.
18 Niwo nyankan wucenin naukangeri inma buroka, ken niwo nau nawiyewo cinyam kanngeri inma buroka.
१८जो कोणी आपल्या पत्नीला सोडून देतो व दुसरीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो आणि जो कोणी, पतीने सोडून दिलेल्या स्त्री सोबत लग्न करतो तो व्यभिचार करतो.
19 Nii cuwakakko kanngenwi, wo dukulen kemero yoryoreu nuwa luma kalecokoti.
१९कोणीएक श्रीमंत मनुष्य होता तो जांभळे आणि महागडे खादीचे कपडे घालीत असे. प्रत्येक दिवस तो ऐशोआरामात घालवीत असे.
20 Cin yoken nii kini kannge nyiloco, dencero Liazaru, wo bwiceu ka deti.
२०त्याच्या फाटकाजवळ लाजर नावाचा एक गरीब मनुष्य पडून होता आणि त्याच्या अंगावर फोड आलेले होते.
21 Ceu ci cuiti naci bwam fwercero ki fiti cari yarangum ti fiye caka carik nii cuweka nyo kibi cuwetincer bom biyablam bwiceti.
२१त्या श्रीमंत मनुष्याच्या जेवणाच्या टेबलावरून जे काही खाली पडेल ते तरी आपल्याला खायला मिळेल अशी तो अपेक्षा करत असे याशिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असत.
22 Laniwo bwiyamri, nobtomangeb kwaamabo tu co yakenciko Ibrayim nin. Ni cuweks buyam, cin fwerumco,
२२मग असे झाले की, तो गरीब मनुष्य मरण पावला व देवदूतांनी त्यास अब्राहामाच्या ऊराशी नेऊन ठेवले. नंतर श्रीमंत मनुष्यही मरण पावला व त्यास पुरले गेले.
23 ci mor Adece ci nuwa dotange ti, la cin kun doro cinto Ibrayim kutan, kan'nge Liazaru cantangcek. (Hadēs g86)
२३श्रीमंत मनुष्य मृतलोकात यातना भोगीत होता, तेथून त्याने वर पाहीले व दूरवर असलेल्या अब्राहामाला आणि लाजराला त्याच्या बाजूला पाहिले, (Hadēs g86)
24 Lacin cobicoro ciki, Tee Ibrayim, ci bwinni mito, twomun Liazaru adokti biwurece mwem abelti menti biyenmin, wori indotange minuwati mor kirewe.
२४तो ओरडून म्हणाला, हे पित्या अब्राहामा, माझ्यावर दया कर आणि लाजराला पाठव यासाठी की तो बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करील, कारण या आगीमध्ये मी भयंकर दुखः सहन करीत आहे.
25 Dila Ibrayim yico, Bwe, kwabi ki kwamawo mu kalemweu munuwa luma cuweka mwekobi, munyo kulentinimbo ken, La Liazaru nuwati ka dotange. Dila naweu luma cinecotide, mwe munuwa dotangeti.
२५परंतु अब्राहाम म्हणाला, माझ्या मुला, ध्यानात घे की तुझ्या जीवनात जशा तुला चांगल्या गोष्टी मिळाल्या, तशा लाजराला वाईट गोष्टी मिळाल्या. पण आता त्यास आराम मिळत आहे व तू दुःखात आहेस.
26 Nobo nyori dila buwako cuwa cuwau inwi, wori birombi coi yabkati kumeneu nadolde, tak kannge na yabuurefo nyinnen.
२६आणि या सगळ्याशिवाय, तुमच्या व आमच्यामध्ये एक मोठी दरी ठेवलेली आहे, यासाठी की, येथून तुमच्याकडे कोणाला जाता येणार नाही व तुमच्याकडून कोणालाही आमच्याकडे येता येणार नाही.
27 Lamicuweks yiki, Lami kennenti Tee Ibrayim, twornco lo Tee ni-
२७तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, मग तुला मी विनंती करतो की, पित्या, लाजराला माझ्या वडिलांच्या घरी पाठव,
28 wori minweki keb mib bi beibayilobe nyo nung, amincinen biweret kayilo cibuo fiye dotangewo.
२८लाजराला माझ्या पाच भावांकडे जाऊन त्यांना सावध करू दे म्हणजे ते तरी या दुःखाच्या ठिकाणी येणार नाहीत.
29 Dila Ibrayim yiki, cin wiki Musa kannge kannge nob toman'ngebi nyori ciya nuwaci,
२९पण अब्राहाम म्हणाला, तुझ्या भावांजवळ मोशे आणि संदेष्टये आहेत त्यांचे त्यांनी ऐकावे.
30 Dilla nii cuweka ciyaki, 'O, on, Tee Ibrayim, cano kan'nge mor birombo biyam biya yacinendi, ciyam yiloten.
३०तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, नाही, हे पित्या अब्राहामा, मरण पावलेल्यामधून कोणी माझ्या भावांकडे गेला तर ते पश्चात्ताप करतील.
31 Dilla Ibrayim yico, cono ci Musa kan'ge nobtoman'gebo ri, cabunano kan'nge fulou duwendi maciya nuwacoti”
३१अब्राहाम त्यास म्हणाला, जर ते मोशेचे आणि संदेष्टयांचे ऐकत नाहीत तर मरण पावलेल्यातून जर कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही.”

< Luka 16 >