< Yuhana 15 >

1 “Menghari na kuca napau kidegene, Ucif ninghari unan bilisue.
“मीच खरा द्राक्षवेल आहे आणि माझा पिता माळी आहे.
2 Adin kaluzu kidowo nighe ko uyeme ulang ule na udin macu ba, adin kaulu vat nlang ule na udin macu unan kpina umacu.
माझ्यातील, फळ न देणारा, प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणार्‍या प्रत्येक फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो त्यास साफसूफ करतो.
3 Anung di lau uworsu bara ulirue na nna belin minu.
जे वचन मी तुम्हास सांगितले त्यामुळे, तुम्ही आता शुद्ध झालाच आहात.
4 Son nanya ning, meng so nanya mine. Nafo na ulang wasa usu kumat usamme ba se udofin kuce, nanere anung wang, se iso nanya ning.
तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्यावाचून त्यास आपल्याआपण फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हासही देता येणार नाही.
5 Menghari litinoe; anunghari tilanghe. Ule na adi nin mi ameng ninghe, ame uleli unite masu kumat gbardang, andi na nin mi ba iwasa isu imon ba.
मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहा; जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हास काही करीता येत नाही.
6 Andi na unit nso nin mi ba, ima fillinghe a koto nafo ulang; anit ma pitiru tilanghe iti nla, tima juju kidowo.
कोणी माझ्यामध्ये राहिला नाही, तर त्यास फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात.
7 Asa iso nan mi, tutung asa uliru nighe nso nanya mine, tirinon imon ile na idi nin sue, ima su minu ining.
तुम्ही माझ्यामध्ये राहीला आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हास पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हास मिळेल.
8 Nin nanere idin ti Ucif gongong, inan macca nono gbardang ikuru iso nono katwa.
तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते; आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल.
9 Nafo na Ucife dinin suninghe, Meng wang di nini sumine; Son nanya nsu ninghe.
जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशीच मीही तुम्हावर प्रीती केली आहे; तसेच तुम्हीही माझ्या प्रीतीत रहा.
10 Asa Idorto uduka nighe, ima so nanya nsuu nighe nafo na meng na dortu uduka Ncif nighe nmini naso nanya nsu me.
१०जसा मी माझ्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, तसेच तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर तुम्ही माझ्या प्रीतीत रहाल.
11 Nbelin minu ile imone liburi libo ning nan yita nan ghinu, lin min liburi libowe nan se ukulu.
११माझा आनंद तुम्हामध्ये असावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी हे तुम्हास या गोष्टी सांगितल्या आहेत.
12 Uduka nighari ulele, iti usuu nati nafo na meng nati usuu mine.
१२जशी मी तुम्हावर प्रीती केली तशीच तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे.
13 Na umong dinin suu ule na ukatin ulele ba, na ama ni ulai me bara adondong me.
१३आपल्या मित्रांसाठी आपला जीव द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही.
14 Anung adondong nighari adi idi su imon ile na nbellin minu.
१४मी तुम्हास जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात.
15 Na uma kuru nyiccila minu acin ba, bara na kucin asa yiro imon ile na Cikilari din su ba. Ncila minu adondong, vat nimon ile na nna lanza kitin Cifning, nna belin minu.
१५मी तुम्हास आतापासून दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो ते दासास कळत नाही; पण मी तुम्हास मित्र म्हणले आहे, कारण मी ज्या गोष्टी पित्याकडून ऐकून घेतल्या त्या सर्व मी तुम्हास कळवल्या आहेत.
16 Na anunghari na fere yiba, menghari nafere minu nmini na ni minu katwaa inan do idi macu nono, tutung nono mine so. Uso nane bara vat nimon ile na ima tirinu Ucif nanya lissaning, ama ni minu inin.
१६तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हास निवडले आणि नेमले आहे; यामध्ये हेतू हा आहे की, तुम्ही जाऊन, फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हास द्यावे.
17 Ilenge imone ndin bellu minu inan su usuu nati mine.
१७तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून मी तुम्हास या आज्ञा करतो.
18 Asa uyii nnari anung, yinnon nworu una cizin unari menku.
१८जग जर तुमचा द्वेष करते तर तुमचा द्वेष करण्याच्यापूर्वी त्याने माझाही केला आहे.
19 In dafo anung anan yieari, uye wa yitu nin suu mine nafo anit me; bara anung anan yiere ba tutung Meng na fere minu unuzu nanya yie, bara ile imone uyie ma nari anung.
१९जर तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रीती केली असती. पण तुम्ही जगाचे नाही, मी तुम्हास जगांतून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करते,
20 Lizinon ulirue na nna belin minu, 'Na kucin katin Cikilari me ba.' Andi ina ti meng ku uniu, anung wang ima ti minu uniu, andi ina lanza uliru nighe, ima lanzu umine wang.
२०‘दास धन्यापेक्षा मोठा नाही’ हे जे वचन मी तुम्हास सांगितले त्याची आठवण करा. ते माझ्या पाठीस लागले तर ते तुमच्याही पाठीस लागतील; त्यांनी माझे वचन पाळले तर ते तुमचेही पाळतील.
21 Ima su minu ile imone vat bara lissanighari, bara na iyiru ulenge na ana tuyi ba.
२१पण ते माझ्या नावाकरता हे सर्व तुम्हास करतील; कारण ज्याने मला पाठवले त्यास ते ओळखीत नाहीत.
22 Ndafo na nna dak nda su nani uliru ba, na iwa di nin nalapi; ama nene na idi nin surtu ba bara kulapi mine.
२२मी जर आलो नसतो आणि त्यांच्याशी बोललो नसतो तर त्यांच्याकडे पाप नसते, पण आता त्यांना आपल्या पापाविषयी निमित्त सांगता येत नाही.
23 Ulenge na a narii anari Ucif nighe wang.
२३जो माझा द्वेष करतो तो माझ्या पित्याचाही द्वेष करतो.
24 Ndafo nna su nitwa nanya mine nanga na umong nsa su ba, na iwa di nin kulapi ba, ama nene ina yene, ikuru inarii umunu Ucifnighe ku.
२४जी कामे दुसर्‍या कोणी केली नाहीत ती मी त्यांच्यामध्ये केली नसती तर त्यांच्याकडे पाप नसते. पण आता त्यांनी मला आणि माझ्या पित्यालाही पाहिले आहे व आमचा द्वेष केला आहे.
25 Ile imone din tizu nani bara uliru nan kulo na udi nanya niyerte nduka mine, 'Inari mengku sa finu.'
२५तथापि ‘त्यांनी विनाकारण माझा द्वेष केला’ हे जे वचन त्यांच्या शास्त्रात लिहिले आहे ते पूर्ण व्हावे म्हणून हे असे होते.
26 Asa unan bunue nda, ulenge na nma tu minu mum unuzu kiti Ncife, unnare, Uruhu kidegen, ulenge na una nuzu kitin Ncife, uma ti ushaida kitene nighe.
२६पण जो पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल.
27 Anung wang dinti nshaida bara idi ligowe nan mi unuzun cizunue.
२७आणि तुम्ही पहिल्यापासून माझ्याबरोबर आहात म्हणून तुम्हीही साक्ष द्याल.”

< Yuhana 15 >