< 2 Nyakati 13 >

1 Katika mwaka wa kumi na nane wa Mfalme Yeroboamu, Abiya akaanza kutawala juu ya Yuda.
इस्राएलचा राजा यराबामाच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी अबीया यहूदाचा राजा झाला.
2 Akatawala kwa miaka mitatu katika Yerusalemu; jina la mama yake aliitwa Maaka, binti wa Urieli wa Gibea. Kulikuwa na vita kati ya Abiya na Yeroboamu.
त्याने यरूशलेमेत तीन वर्षे राज्य केले. मीखाया ही अबीयाची आई गिबा नगरातील उरीएलची ती कन्या. अबीया आणि यराबाम यांच्यामध्ये लढाई झाली.
3 Abiya akaingia vitani na jeshi la askari, wenye nguvu, hodari, 400, 00 wanaume waliochaguliwa. Yeroboamu akapanga mistari ya vita dhidi yake yenye 800, 00 wanaume askari waliochaguliwa, wenye nguvu, hodari.
अबीयाच्या सैन्यात निवडक चार लाख बलवान व धाडसी योध्दे होते. अबीयाने लढाईत त्यांचे नेतृत्व केले. यराबामाकडे आठ लाख सैनिक होते. यराबाम अबीयाशी युध्द करायला सज्ज झाला.
4 Abiya akasimama juu ya mlima Semaraimu, uliopo katika kilima cha nchi ya Efraimu, na akasema, “Nisikilizeni, Yeroboamu na Israeli wote!
एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील समाराइम पर्वतावर उभे राहून अबीया म्हणाला, “यराबाम आणि समस्त इस्राएल लोकांनो, ऐका,
5 Hamjui kwamba Yahwe, Mungu wa Israeli, alitoa sheria juu ya Israeli kwa Daudi milele, kwake na kwa wanaye kwa agano rasimi?
दावीद आणि त्याचे पुत्र यांनी इस्राएलवर सर्वकाळ राज्य करावे असा इस्राएलाच्या परमेश्वर देवानेच त्यांना आधिकार दिला आहे हे ध्यानात घ्या,” देवाने दाविदाशी तसा मिठाचा करारच केला आहे.
6 Bado Yeroboamu mwana wa Nebati, mtumishi wa Selemani mwana wa Daudi, akainuka na kuasi dhidi ya bwana wake.
पण नबाटाचा पुत्र यराबामाने त्याचा स्वामी जो राजा त्याच्याविरुध्द बंड केले. नबाट हा दावीदाचा पुत्र शलमोनाच्या सेवकांपैकी एक होता.
7 Watu wabaya, washirika wa karibu, wakamkusanyikia, wakamjia kinyume Rehoboamu mwana wa Selemani, wakati Rehoboamu alipokuwa mdogo na asiye na uzoefu na hakuweza kuwamudu.
मग कुचकामी आणि वाईट मनुष्यांशी यराबामाशी दोस्ती झाली. यराबाम आणि ही वाईट माणसे शलमोनाचा पुत्र रहबाम जेव्हा याच्या विरूद्ध होती. रहबाम जेव्हा तरुण आणि अनुभवी होता. त्यास यराबाम आणि त्याचे अधम मित्र यांच्यावर वचक बसवता आला नाही.
8 Sasa mnasema kwamba mnaweza kuuzuia utawala wa Yahwe wenye nguvu katika mkono wa uzao wa Daudi. Ninyi ni jeshsi kubwa, na pamoja nanyi kuna ndama wa dhahabu ambao Yeroboamu alitengeneza kama miungu kwa ajili yenu.
आता तुम्ही लोकांनी परमेश्वराचे राज्य म्हणजे दाविदाच्या पुत्राची सत्ता असलेल्या राज्याचा पराभव करण्याचा निश्चय केला आहे. तुमची सेना मोठी आहे आणि यराबामाने तुमच्यासाठी देव म्हणून बनवलेली सोन्याची वासरे तुमच्याकडे आहेत.
9 Hamkuwafukuza nje makuhani wa Yahwe, uzao wa Haruni, na Walawi? Hamkujifanyia makuhani katika namna ya watu wa nchi zingine? Yeyote ajaye kujitakasa mwenyewe na ngo'mbe dume kijana, na madume ya kondoo anaweza kuwa kuhani wa kile ambacho siyo miungu.
परमेश्वराचे याजक आणि लेवी यांना तुम्ही हाकलून लावले नाही का? हे याजक अहरोनाचे व लेवीचे वंशज आहेत त्यांच्या जागी तुम्ही आपले याजक नेमले नाही का? अशा गोष्टी इतर देशातले लोक करतात. कोणीही उठून एक गोऱ्हा किंवा सात एडके आणून स्वत: वर संस्कार केला की तो जे खोटे देव आहेत त्यांचा याजक बनतो.
10 Lakini kwetu, Yahwe ni Mungu wetu, na hatujamsahau. Tuna makuhani, uzao wa Haruni, wakimtumikia Yahwe, na Walawi, ambao wako kataika kazi yao.
१०“पण आमच्यासाठी परमेश्वर हाच आमचा देव आहे. आम्ही त्याच्याकडे पाठ फिरवलेली नाही. त्याचा त्याग केलेला नाही. परमेश्वराची सेवा करणारे याजक अहरोनाचे वंशज आहेत लेवी त्यांना परमेश्वराच्या सेवेत मदत करतात.
11 Kila asubuhi na jioni humtolea Yahwe sadaka za kuteketezwa na uvumba mtamu. Pia hupanga mkate wa uwepo juu ya meza takatifu; pia huweka kinara cha dhahabu pamoaja na taa zake, ili watoe sadaka kila jioni. sisi huzishika sheria za Yahwe, Mungu wetu, Lakini ninyi mmemsahau.
११परमेश्वरास ते होमार्पणे करतात, तसेच दररोज सकाळ संध्याकाळ सुवासिक धूप जाळतात. मंदिरातील शुद्ध मानलेल्या मेजावर समर्पित भाकर मांडतात रोज संध्याकाळी ते सोन्याच्या दीपवृक्षावरील दिवे लावतात. आम्ही आपल्या परमेश्वर देवाची काळजीपूर्वक सेवा करतो. पण तुम्ही परमेश्वरास सोडले आहे.
12 Ona, Mungu yuko pamoja nasi katika vichwa vyetu, na makuhani wake wako hapa na tarumbeta kwa ajili ya kutoa sauti dhidi yenu. Watu wa Israeli, msipigane na Yahwe, Mungu wa babu zenu, kwa maana hamtafanikiwa.”
१२पाहा खुद्द परमेश्वर आमच्या बाजूचा आहे. तोच आमचा शास्ता असून त्याचे याजक आमच्या बाजूला आहेत. तुम्ही जागे व्हावे व परमेश्वराकडे यावे म्हणून देवाचे याजक कर्णे वाजवत आहेत. इस्राएल लोकांनो, आपल्या पूर्वजांचा परमेश्वर ह्याच्या विरुध्द लढू नका, कारण त्यामध्ये तुम्हास यश येणार नाही.”
13 Lakini Yeroboamu akaandaa mavamizi nyuma yao; jeshi lake lilikuwa mbele ya Yuda, na wavamizi nyuma yao.
१३पण यराबामाने सैन्याच्या एका तुकडीला अबीयाच्या सैन्यामागे दबा धरुन राहायला सांगितले. ह्याप्रकारे ते यहूदाच्या आघाडीस होते व त्यांनी अबीयाच्या सैन्याला पाठीमागून वेढा घातला.
14 Yuda walipoanagalia nyuma, tanzama, mapigano yalikuwa pote mbele na nyuma yao. Wakamlilia Yahwe kwa sauti, na makuhani wakayapuliza matarumbeta.
१४यहूदातील या सैन्याने जेव्हा आपल्या भोवताली पाहिले तेव्हा यराबामाच्या सैन्याने आपल्याला मागून पुढून वेढल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा यहूदा लोकांनी परमेश्वराचा धावा सुरु केला आणि याजकांनी कर्णे वाजवले.
15 Kisha wanaume wa Yuda wakapiga kelele; walipopiga kele, ikawa kwamba Mungu akampiga Yeroboamu na Israeli wote mbele ya Abiya na Yuda.
१५मग अबीयाच्या सैन्यातील लोकांनी जयघोष केला त्याचवेळेस देवाने यराबामाच्या सैन्याचा पराभव केला. अबीयाच्या यहूदा सैन्याने यराबामाच्या इस्राएली सैन्याचा पाडाव केला.
16 Watu wa Israeli wakakimbia mbele ya Yuda, na akawatia kwenye mkono wa Yuda.
१६इस्राएल लोकांनी यहूदासमोरुन पळ काढला देवाने यहूदाच्या हातून इस्राएल लोकांचा पराभव केला.
17 Abiya na jeshi lake wakawaua kwa mauji makuu; 500, 000 watu wanaume waliochaguliwa wa Israeli wakaanguka wamekufa.
१७अबीयाने केलेल्या या दारुण पराभवात इस्राएलचे पाच लाख योध्दे मारले गेले.
18 Katika namna hii hii, watu wa Israeli wakatiishwa chini wakati huo, watu wa Yuda wakashinda kwa sababu walimtegemea Yahwe, Mungu wa babu zao.
१८अशाप्रकारे त्यावेळी इस्राएल लोक हरले आणि यहूदा जिंकले. आपल्या पूर्वजांच्या परमेश्वर देवावर विसंबून राहिल्यामुळेच यहूदा सैन्याने विजय मिळवला.
19 Abiya akamshawishi Yeroboamu; akachukua miji kutoka kwake; Betheli pamoja na vijiji vyake, Yeshana pamoja na vijiji vyake, na Efroni pamoaaja na vijij vyake.
१९अबीयाच्या सैन्याने यराबामाच्या सैन्याचा पाठलाग केला. बेथेल, यशाना आणि एफ्रोन ही नगरे आणि त्यांच्या आसपासची खेडी एवढा प्रदेश यराबामाकडून अबीयाच्या सैन्याने जिंकला.
20 Yeroboamu hakupata naguvu tena katika siku za Abiya; Yahwe akampiga, na akafa.
२०अबीयाच्या हयातीत पुन्हा यराबाम डोके वर काढू शकला नाही. परमेश्वराने यराबामावर प्रहार केला आणि तो मेला.
21 Lakini Abiya akawa na nguvu sana; akachukua wanawake kumi na nne kwa ajili yake na akawa baba wa wana ishirini na mbili na mabinti kumi na sita.
२१अबीयाचे सामर्थ्य मात्र वाढले. त्याने चौदा पत्नी केल्या. त्यास बावीस पुत्र आणि सोळा कन्या झाल्या.
22 Matendo ya Abiya yaliyosalia, tabia yake na maneno yake yameeandikwa katika kamusi ya nabii Ido.
२२इद्दो या भविष्याद्याच्या नोंद वह्यांमध्ये अबीयाने केलेल्या इतर सर्व गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत.

< 2 Nyakati 13 >