< Apokalipsa 8 >

1 I kad otvori sedmi peèat, posta tišina na nebu oko po sahata.
जेव्हा कोकऱ्याने सातवा शिक्का उघडला, तेव्हा सुमारे अर्ध्या तासापर्यंत स्वर्गात शांतता होती.
2 I vidjeh sedam anðela koji stajahu pred Bogom, i dade im se sedam truba.
नंतर देवासमोर सात देवदूत उभे राहिलेले मी पाहिले आणि त्यांना सात कर्णे देण्यात आले.
3 I drugi anðeo doðe, i stade pred oltarom, i imaše kadionicu zlatnu; i bijaše mu dano mnogo tamjana da da molitvama sviju svetijeh na oltar zlatni pred prijestolom.
दुसरा एक देवदूत येऊन, वेदीपुढे उभा राहिला. त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते; राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्रजनांच्या प्रार्थनांसह धुप ठेवण्याकरिता त्याच्याजवळ पुष्कळ धूप दिला होता.
4 I dim od kaðenja u molitvama svetijeh iziðe od ruke anðelove pred Boga.
देवदूताच्या हातातून धूपाचा धूर पवित्रजनांच्या प्रार्थनांसह देवासमोर वर चढला.
5 I uze anðeo kadionicu, i napuni je ognja s oltara, i baci je na zemlju, i postaše glasovi i gromovi i sijevanje munja i tresenje zemlje.
तेव्हा देवदूताने धुपाटणे घेऊन त्यामध्ये वेदीवरचा अग्नी भरून पृथ्वीवर टाकला आणि मेघांचा गडगडाट व गर्जना झाल्या, विजा चमकल्या व भूमिकंप झाला.
6 I sedam anðela koji imahu sedam truba, pripraviše se da zatrube.
ज्या सात देवदूतांजवळ सात कर्णे होते ते आपआपले कर्णे वाजवण्यास तयार झाले.
7 I prvi anðeo zatrubi, i posta grad i oganj, smiješani s krvlju, i padoše na zemlju; i treæina drva izgorje, i svaka trava zelena izgorje.
पहिल्या देवदूताने कर्णा वाजवताच रक्तमिश्रित गारा व अग्नी ही आली. ती पृथ्वीवर टाकण्यात आली यासाठी की, पृथ्वीचा तिसरा भाग व झाडांचा तिसरा भाग जळून गेला; आणि सर्व हिरवे गवत जळून गेले.
8 I drugi anðeo zatrubi; i kao velika gora ognjem zapaljena pade u more; i treæina mora posta krv.
दुसऱ्या देवदूताने कर्णा वाजवला आणि तेव्हा अग्नीने पेटलेल्या मोठ्या डोंगरासारखे काहीतरी समुद्रात टाकले गेले आणि समुद्राच्या तिसऱ्या भागाचे रक्त झाले.
9 I umrije treæina stvorenja koje živi u moru, i treæina laði propade.
समुद्रातील तिसरा भाग जिवंत प्राणी मरण पावले आणि तसेच तिसरा भाग जहाजांचा नाश झाला.
10 I treæi anðeo zatrubi, i pade s neba velika zvijezda, koja goraše kao svijeæa, i pade na treæinu rijeka i na izvore vodene.
१०तिसऱ्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा मशालीसारखा पेटलेला मोठा तारा आकाशातून खाली पडला. तो नद्यांच्या व झऱ्यांच्या तिसऱ्या भाग पाण्यावर पडला;
11 I ime zvijezdi bješe Pelen; i treæina voda posta pelen, i mnogi ljudi pomriješe od voda, jer bijahu grke.
११त्या ताऱ्याचे नाव कडूदवणा आणि पाण्याच्या तिसऱ्या भागाचा कडूदवणा झाला; आणि त्या पाण्याने मनुष्यांपैकी पुष्कळ माणसे मरण पावली; कारण ते पाणी कडू झाले होते.
12 I èetvrti anðeo zatrubi, i udarena bi treæina sunca, i treæina mjeseca, i treæina zvijezda, da pomrèa treæina njihova, i treæina dana da ne svijetli, tako i noæi.
१२चौथ्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा सूर्याचा तिसरा भाग, चंद्राचा तिसरा भाग व ताऱ्यांचा तिसरा हिस्सा मारला गेला; त्यांचा तिसरा भाग अंधकारमय झाला आणि दिवसाचा व रात्रीचाही तिसरा भाग प्रकाशित झाला नाही.
13 I vidjeh, i èuh jednoga anðela gdje leti posred neba i govori glasom velikijem: teško, teško, teško onima koji žive na zemlji od ostalijeh glasova trubnijeh trojice anðela, koji æe trubiti.
१३आणि मी पाहिले, तेव्हा एक गरूड आकाशाच्या मध्यभागी उडत होता; आणि मी त्यास मोठ्याने असे म्हणताना ऐकले की, जे तीन देवदूत कर्णे वाजवणार आहेत त्यांच्या कर्ण्याच्या होणाऱ्या आवाजाने पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर अनर्थ, अनर्थ, अनर्थ येणार‍!

< Apokalipsa 8 >