< Psalmi 46 >

1 Bog nam je utoèište i (sila) pomoænik, koji se u nevoljama brzo nalazi.
मुख्य गायकासाठी; कोरहाच्या मुलांचे आलामोथ सुरावर बसवलेले गाणे. देव आमचा आश्रय आणि सामर्थ्य आहे, जो संकटात मदत करण्यास सिध्द असतो.
2 Zato se neæemo bojati, da bi se zemlja pomjestila, i gore se prevalile u srce morima.
म्हणून जरी पृथ्वी बदलली, जरी पर्वत डगमगून समुद्राच्या हृदयात गेले, तरी आम्ही भिणार नाही.
3 Neka buèi i kipi voda njihova, nek se planine tresu od vala njihovijeh;
जरी त्यांच्या लाटा गर्जल्या आणि खळबळल्या, आणि त्यांच्या उचंबळण्याने पर्वत थरथरले तरी आम्ही भिणार नाही.
4 Potoci vesele grad Božji, sveti stan višnjega.
तेथे एक नदी आहे, तिचे प्रवाह परात्पराच्या पवित्रस्थानाला निवासमंडपाला देवाच्या नगराला आनंदित करतात.
5 Bog je usred njega, neæe se pomjestiti, Bog mu pomaže od zore.
देव तिच्यामध्ये आहे; ती हलणारच नाही; देव तिला मदत करील आणि तो हे खूप लवकरच करील.
6 Uzbuèaše narodi, zadrmaše se carstva; ali on pusti glas svoj i zemlja se rastapaše.
राष्ट्रे खळबळतील आणि राज्ये डगमगतील; तो आपला आवाज उंच करील आणि पृथ्वी वितळून जाईल.
7 Gospod nad vojskama s nama je, braniè je naš Bog Jakovljev.
सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रयस्थान आहे.
8 Hodite i vidite djela Gospoda, koji uèini èudesa na zemlji,
या, परमेश्वराची कृत्ये पाहा, त्याने पृथ्वीचा नाश कसा केला आहे.
9 Prekide ratove do kraja zemlje, luk prebi, koplje slomi, i kola sažeže ognjem.
तो पृथ्वीच्या सीमेपर्यंत लढाया थांबवतो; तो धनुष्य तोडतो आणि भाल्याचे तुकडे-तुकडे करतो; तो रथ जाळून टाकतो.
10 Utolite i poznajte da sam ja Bog; ja sam uzvišen po narodima, uzvišen na zemlji.
१०शांत व्हा आणि लक्षात ठेवा मीच देव आहे; राष्ट्रात मी उंचावला जाईन; मी पृथ्वीवर उंचावला जाईन.
11 Gospod nad vojskama s nama je, braniè je naš bog Jakovljev.
११सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे; याकोबाचा देव आमचा आश्रय आहे.

< Psalmi 46 >