< Sudije 5 >

1 I u taj dan pjeva Devora i Varak sin Avinejemov govoreæi:
त्यादिवशी दबोरा आणि अबीनवामाचा पुत्र बाराक ह्यानी गाइलेले गीत:
2 Blagosiljajte Gospoda što uèini osvetu u Izrailju i što narod dragovoljno prista.
“इस्राएलाचे नेते पुढे चालले, लोक स्वसंतोषाने पुढे आले, म्हणून परमेश्वराचा धन्यवाद करा.
3 Èujte carevi, slušajte knezovi; ja, ja æu Gospodu pjevati, popijevaæu Gospodu Bogu Izrailjevu.
राजानो, ऐका; अधिपतींनो लक्ष द्या, मी स्वतः परमेश्वरास गाईन; इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याची स्तोत्रे गाईन.
4 Gospode! kad si slazio sa Sira, kad si išao iz polja Edomskoga, zemlja se tresijaše, i nebesa kapahu, oblaci kapahu vodom.
हे परमेश्वरा, तू सेईराहून निघालास, अदोमाच्या प्रदेशातून कूच केलीस, तेव्हा पृथ्वी कंपायमान झाली; तसेच आकाशाने जलबिंदू गाळले; मेघांनीही जलबिंदू गाळले;
5 Brda se rastapahu pred Gospodom; taj Sinaj pred Gospodom Bogom Izrailjevijem.
परमेश्वरासमोर डोंगर थरथरा कापले, इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर हा सीनाय देखील थरारला.
6 Za vremena Samegara sina Anatova, za vremena Jailjina nesta putova, i koji iðahu stazama, iðahu krivijem putovima.
अनाथाचा मुलगा शमगार ह्याच्या काळी, याएलेच्या काळी राजमार्ग सुने पडले; वाटसरू आडमार्गांनी प्रवास करीत.
7 Nesta sela u Izrailju, nesta ih, dokle ne nastah ja, Devora, dokle ne nastah majka Izrailju.
मी दबोरा पुढे येईपर्यंत, इस्राएलात माता म्हणून मी प्रसिद्ध होईपर्यंत, इस्राएलात कोणी पुढारी उरले नव्हते;
8 On izabra nove bogove, tada rat bijaše na vratima; viðaše li se štit ili koplje meðu èetrdeset tisuæa u Izrailju?
लोकांनी नवे देव निवडले तेव्हा वेशीवेशीतून संग्राम झाला; इस्राएलातील चाळीस हजारांमध्ये एकाजवळ तरी ढाल किंवा भाला दृष्टीस पडला काय?
9 Srce se moje privilo k upraviteljima Izrailjevijem, koji dragovoljno pristaše izmeðu naroda. Blagosiljajte Gospoda.
माझे मन इस्राएलाच्या अधिपतींकडे लागले आहे ते लोकांबरोबर स्वसंतोषाने पुढे आले; तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा.
10 Koji jašete na bijelijem magaricama, koji sjedite u sudu i koji hodite po putovima, pripovijedajte.
१०पांढऱ्या गाढवावर स्वारी करणाऱ्यांनो, अमूल्य गालिच्यावर बसणाऱ्यांनो, वाटेने चालणाऱ्यांनो, त्याचे गुणगान करा.
11 Prestala je praska streljaèka na mjestima gdje se voda crpe; ondje neka pripovijedaju pravdu Gospodnju, pravdu k selima njegovijem u Izrailju; tada æe narod Gospodnji slaziti na vrata.
११पाणवठ्यावर पाणक्यांच्या स्वराने परमेश्वराच्या न्यायकृत्यांचे, इस्राएलावरील सत्तेसंबंधाने त्याच्या न्यायकृत्यांचे लोक वर्णन करतात त्या वेळी परमेश्वराचे प्रजाजन वेशीवर चालून गेले.
12 Ustani, ustani, Devoro; ustani, ustani, zapjevaj pjesmu; ustani, Varaèe, vodi u ropstvo roblje svoje, sine Avinejemov.
१२जागी हो, जागी हो दबोरे; जागी हो, जागी हो, गीत गा; बाराका ऊठ; अबीनवामाच्या पुत्रा, तू आपल्या बंदिवानांना घेऊन जा.
13 Sada æe potlaèeni obladati silnima iz naroda; Gospod mi dade da vladam silnima.
१३तेव्हा उरलेले सरदार खाली उतरले; परमेश्वराचे लोक माझ्याकरिता वीरांविरुद्ध सामना करावयास उतरले.
14 Iz Jefrema izide korijen njihov na Amalike; za tobom bješe Venijamin s narodom tvojim; od Mahira izidoše koji postavljaju zakone, a od Zavulona pisari.
१४अमालेकात ज्यांची पाळेमुळे पसरली आहेत ते एफ्राइमामधून आले; तुझ्यामागून बन्यामीन तुझ्या सैन्यात दाखल झाला; माखीराहून अधिपती व जबुलूनाहून दंडधारी अंमलदार उतरून आले.
15 I knezovi Isaharovi biše s Devorom, Isahar kao i Varak bi poslan u dolinu s ljudima koje voðaše. U dijelu Ruvimovu bijahu ljudi visokih misli.
१५इस्साखाराचे सरदार दबोरेबरोबर होते; इस्साखार बाराकाशी एकनिष्ठ होता; त्याच्या पाठोपाठ ते खोऱ्यात धावले, रऊबेनाच्या पक्षामध्ये मोठी चर्चा झाली.
16 Što si sjedio meðu torovima slušajuæi kako bleje stada? U dijelu Ruvimovu bijahu ljudi visokih misli.
१६खिल्लारांसाठी वाजविलेला पावा ऐकत तू मेंढवाड्यात का बसलास? रऊबेनाच्या पक्षाविषयी फार विचारविनिमय झाला.
17 Galad osta s onu stranu Jordana; a Dan što se zabavi kod laða? Asir zašto sjede na brijegu morskom i u krševima svojim osta?
१७गिलाद यार्देनेपलीकडेच राहिला; दान हा आपल्या जहाजापाशीच का बसून राहिला? आशेर समुद्रकिनाऱ्यावर बसून राहिला, आपल्या धक्क्यावर बसून राहिला.
18 Zavulon je narod koji dade dušu svoju na smrt, tako i Neftalim, na visokom polju.
१८जबुलून व नफताली या लोकांनी आपल्या प्रांतांतील उंचवट्यांवर मृत्यूची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घातला.
19 Doðoše carevi, biše se; biše se carevi Hananski u Tanahu na vodi Megidskoj; ali ni mrve srebra ne dobiše.
१९राजे येऊन लढले, तेव्हा कनानाचे राजे मगिद्दोच्या जलप्रवाहापाशी तानख येथे लढले; त्यांना रुप्याची काहीच लूट मिळाली नाही.
20 S neba se vojeva, zvijezde s mjesta svojih vojevaše na Sisaru.
२०आकाशातून तारे लढले; त्यांनी आपआपल्या कक्षातून सीसराशी लढाई केली.
21 Potok Kison odnese ih, potok Kadimin, potok Kison; pogazila si, dušo moja, snažno.
२१किशोन नदीने, त्या पुरातन नदीने, त्या कीशोन नदीने त्यांना वाहून नेले. हे जीवा, हिंमत धरून पुढे चाल.
22 Tada izotpadaše konjma kopita od tjeranja junaka njihovijeh.
२२तेव्हा घोडे भरधाव उधळले ते मस्त घोडे टापा आपटू लागले, त्यांच्या टापांचा आवाज झाला.
23 Proklinjite Miroz, reèe anðeo Gospodnji, proklinjite stanovnike njegove; jer ne doðoše u pomoæ Gospodu, u pomoæ Gospodu s junacima.
२३परमेश्वराचा दूत म्हणतो, मेरोजला शाप द्या त्यातल्या रहिवाश्यांना मोठा शाप द्या; कारण परमेश्वरास साहाय्य करावयास वीरांविरुद्ध परमेश्वरास साहाय्य करावयास ते आले नाहीत.
24 Da je blagoslovena mimo žene Jailja žena Evera Kenejina; mimo žene u šatorima da je blagoslovena.
२४केनी हेबेर यांची स्त्री याएल ही सगळ्या स्त्रियांमध्ये धन्य! डेऱ्यात राहणाऱ्या सर्व स्त्रियांमध्ये ती धन्य!
25 Zaiska vode, mlijeka mu dade, u gospodskoj zdjeli donese mu povlaku.
२५त्याने पाणी मागितले तो तिने त्यास दूध दिले; श्रीमंताना साजेल अशा वाटीत तिने त्यास दही आणून दिले.
26 Lijevom rukom maši se za kolac a desnom za malj kovaèki, i udari Sisaru, razmrska mu glavu; probode i probi mu slijepe oèi.
२६तिने आपला एक हात मेखेला आणि उजवा हात कारागिराच्या हातोड्याला घातला; तिने हातोड्याने सीसराला मारले, त्याचे डोके फोडून टाकले, त्याचे कानशील मेख ठोकून आरपार विंधले.
27 Meðu noge njezine savi se, pade, leža; meðu noge njezine savi se, pade; gdje se savi, ondje pade mrtav.
२७तिच्या पायाखाली तो वाकला व पडला, निश्चल झाला; जेथे तो वाकला तेथेच तो मरून पडला.
28 S prozora gledaše majka Sisarina, i kroz rešetku vikaše: što se tako dugo ne vraæaju kola njegova? što se tako polako mièu toèkovi kola njegovijeh?
२८सीसराच्या आईने खिडकीतून बाहेर डोकावले, तिने जाळीतून हाक मारली, त्याचा रथ यावयाला एवढा उशीर का झाला? त्याच्या रथाच्या चाकांना कोणी खीळ घातली?
29 Najmudrije izmeðu dvorkinja njezinijeh odgovarahu joj, a i sama odgovaraše sebi:
२९तिच्या चतुर सख्यांनी तिला उत्तर दिले हो, स्वतः तिनेच आपणास उत्तर दिले;
30 Nijesu li našli? ne dijele li plijen? po jednu djevojku, po dvije djevojke na svakoga. Plijen šaren Sisari, plijen šaren, vezen; šaren, vezen s obje strane, oko vrata onima koji zaplijeniše.
३०‘त्यांना मिळालेल्या लुटीची ते वाटणी तर करून घेत नसतील ना? प्रत्येक वीराला एक एक किंवा दोन-दोन कुमारिका; सीसरासाठी रंगीबेरंगी वस्रे, भरजरी रंगीबेरंगी वस्रे लुटीत मिळालेल्या कुमारिकांच्या गळ्यांत भुषण म्हणून पांघरण्यासाठी रंगीबेरंगी वस्रे मिळाली नसतील ना?’
31 Tako da izginu svi neprijatelji tvoji, Gospode; a koji te ljube da budu kao sunce kad izlazi u sili svojoj. I zemlja bi mirna èetrdeset godina.
३१हे परमेश्वरा, तुझे सर्व शत्रू असेच नाश पावोत; पण त्याच्यावर प्रेम करणारे प्रतापाने उदय पावणाऱ्या सूर्यासमान होवोत.” मग देशाला चाळीस वर्षे विसावा मिळाला.

< Sudije 5 >