< Izlazak 8 >

1 I reèe Gospod Mojsiju: idi k Faraonu, i reci mu: ovako veli Gospod: pusti narod moj, da mi posluži.
मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “जा आणि फारोला सांग, परमेश्वर असे म्हणतो की, ‘माझ्या लोकांस माझी उपासना करण्याकरता जाऊ दे.
2 Ako li neæeš pustiti, evo æu moriti svu zemlju žabama.
जर तू त्यांना जाऊ दिले नाहीस तर मी तुझा सारा देश बेडकांनी पीडीन.
3 I rijeka æe se napuniti žaba, i one æe izaæi i skakati tebi po kuæi i po klijeti gdje spavaš i po postelji tvojoj i po kuæama sluga tvojih i naroda tvojega i po peæima tvojim i po naævama tvojim;
नदीत बेडकांचा सुळसुळाट होईल. बेडूक नदीतून तुझ्या वाड्यात झोपण्याच्या खोलीत, अंथरुणात तसेच तुझ्या सेवकांच्या व अधिकाऱ्यांच्या घरात, तुझ्या भट्ट्यात आणि काथवटीत येतील.
4 I na tebe i na narod tvoj i na sve sluge tvoje skakaæe žabe.
तुझ्या, तुझ्या सेवकांच्या व लोकांच्या अंगावर बेडूक चढतील.”
5 I reèe Gospod Mojsiju: kaži Aronu: pruži ruku svoju sa štapom svojim na rijeke i na potoke i na jezera, i uèini nek izaðu žabe na zemlju Misirsku.
मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाला त्याच्या हातातील काठी नद्या, नाले तलाव यांच्या जलावर लांब कर म्हणजे मग बेडूक मिसर देशावर चढून येतील.”
6 I pruži Aron ruku svoju na vode Misirske, i izaðoše žabe i pokriše zemlju Misirsku.
मग अहरोनाने आपला हात मिसराच्या जलाशयावर लांब केला तेव्हा बेडूक बाहेर आले आणि त्यांनी अवघा मिसर देश व्यापून टाकला.
7 Ali i vraèari Misirski uèiniše tako svojim vraèanjem, uèiniše te izaðoše žabe na zemlju Misirsku.
तेव्हा जादूगारांनी मंत्रतंत्राच्या योगे तसेच केले आणि मिसर देशावर आणखी बेडूक आणले.
8 A Faraon dozva Mojsija i Arona i reèe: molite Gospoda da ukloni žabe od mene i od naroda mojega, pak æu pustiti narod da prinesu žrtvu Gospodu.
मग फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले. फारो त्यांना म्हणाला, “हे बेडूक माझ्यापासून, व माझ्या लोकांपासून दूर करण्याकरिता तुमच्या परमेश्वरास विनंती करा. मग तुमच्या परमेश्वराची उपासना करण्याकरिता मी तुम्हा लोकांस जाऊ देईन.”
9 A Mojsije reèe Faraonu: èast da ti je nada mnom! dokle da mu se molim za te i za sluge tvoje i za narod tvoj da odbije žabe od tebe i iz kuæa tvojih, i samo u rijeci da ostanu?
मोशे फारोला म्हणाला, “मग बेडूक तुम्हापासून व तुमच्या घरातून दूर होतील आणि फक्त नदीत राहतील. मी तुमच्यासाठी, तुमच्या लोकांसाठी व तुमच्या सेवकांसाठी कोणत्या वेळी प्रार्थना करावी हे सांगण्याचा मान माझ्याऐवजी तुला असो.”
10 A on reèe: do sjutra. A Mojsije reèe: biæe kako si kazao, da poznaš da niko nije kao Gospod Bog naš.
१०फारोने उत्तर दिले, “उद्या.” तेव्हा मोशे म्हणाला, “तुमच्या म्हणण्याप्रमाणे होईल अशा प्रकारे तुम्हास समजेल की आमच्या परमेश्वरासारखा कोणीच देव नाही.
11 Otiæi æe žabe od tebe i iz kuæa tvojih i od sluga tvojih i od naroda tvojega; samo æe u rijeci ostati.
११बेडूक तुम्हापासून, तुमच्या घरातून, तुमचे सेवक व तुमचे लोक यांच्यापासून निघून जातील; ते फक्त नदीत राहतील.”
12 I otide Mojsije i Aron od Faraona; i zavapi Mojsije ka Gospodu za žabe koje bješe pustio na Faraona.
१२मग मोशे व अहरोन फारोपासून निघून गेले आणि फारोवर बेडूक आणले होते त्याविषयी मोशेने परमेश्वरास प्रार्थना केली.
13 A Gospod uèini po rijeèi Mojsijevoj; i pocrkaše žabe, i oprostiše ih se kuæe i sela i polja.
१३मग परमेश्वराने मोशेच्या विनंतीप्रमाणे केले. तेव्हा घरादारात, अंगणात व शेतात होते ते सर्व बेडूक मरून गेले.
14 I na gomile ih grtahu, da je smrdjela zemlja.
१४लोकांनी ते गोळा करून त्यांचे ढीग केले आणि त्यामुळे सर्व देशात घाण वास येऊ लागला.
15 A kad Faraon vidje gdje odahnu, otvrdnu mu srce, i ne posluša ih, kao što bješe kazao Gospod.
१५बेडकांची पीडा दूर झाली हे फारोने पाहिले आणि त्याचे मन पुन्हा कठीण झाले. त्याने त्यांचे ऐकले नाही. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच हे झाले.
16 A Gospod reèe Mojsiju: kaži Aronu: pruži štap svoj, i udari po prahu na zemlji, nek se pretvori u uši po svoj zemlji Misirskoj.
१६मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाला त्याची काठी जमिनीवरील धुळीवर मारण्यास सांग म्हणजे मग अवघ्या मिसर देशभर धुळीच्या उवा बनतील.”
17 I uèiniše tako: Aron pruži ruku svoju sa štapom svojim, i udari po prahu na zemlji, i postaše uši po ljudima i po stoci, sav prah na zemlji pretvori se u uši po cijeloj zemlji Misirskoj.
१७त्याने तसे केले. अहरोनाने आपल्या हातातली काठी जमिनीवरील धुळीवर मारली, आणि त्यामुळे सगळ्या मिसर देशात धुळीच्या उवाच उवा बनल्या; त्या पशूंवर व मनुष्यांवर चढल्या.
18 A gledaše i vraèari Misirski vraèanjem svojim da uèine da postanu uši, ali ne mogoše. I bijahu uši po ljudima i po stoci.
१८जादुगारांनी त्यांच्या मंत्रतत्रांच्या जोरावर उवा उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना धुळीतून उवा बनविता आल्या नाहीत; पशू व मनुष्य उवांनी भरून गेले.
19 I rekoše vraèari Faraonu: ovo je prst Božji. Ali opet otvrdnu srce Faraonu, te ih ne posluša, kao što bješe kazao Gospod.
१९तेव्हा जादूगारांनी फारोला सांगितले की, “यामध्ये देवाचा हात आहे.” परंतु फारोने मन कठीण केले व त्यांने त्यांचे ऐकायचे नाकारले. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच तसे झाले.
20 A Gospod reèe Mojsiju: ustani rano i izaði pred Faraona, evo, on æe izaæi k vodi, pa mu reci: ovako veli Gospod: pusti narod moj da mi posluži.
२०मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “सकाळी लवकर ऊठ आणि फारो नदीवर जाईल तेव्हा त्याच्यापुढे उभा राहा. त्यास असे सांग की परमेश्वर म्हणतो, माझी उपासना करण्यासाठी माझ्या लोकांस जाऊ दे.
21 Ako li ne pustiš naroda mojega, evo, pustiæu na tebe i na sluge tvoje i na narod tvoj i na kuæe tvoje svakojake bubine, i napuniæe se bubina kuæe Misirske i zemlja na kojoj su.
२१जर तू त्यांना जाऊ देणार नाहीस तर मग तुझ्या घरात, तुझ्यावर, तुझ्या सेवकांवर गोमाशा येतील. अवघ्या मिसर देशातील घरे गोमाशांच्या थव्यांनी भरून जातील. गोमाशांचे थवे अंगणात व जमिनीवरही येतील.
22 Ali æu u taj dan odvojiti zemlju Gesemsku, gdje živi moj narod, i ondje neæe biti bubina, da poznaš da sam ja Gospod na zemlji.
२२तर ज्या गोशेन प्रातांत माझे लोक राहतात, तो मी त्या दिवशी वेगळा करीन, तेथे गोमाश्यांचे थवे जाणार नाहीत. यावरुन पृथ्वीवर मीच परमेश्वर आहे हे तुला समजेल.
23 I postaviæu razliku izmeðu naroda svojega i naroda tvojega. Sjutra æe biti znak taj.
२३तेव्हा उद्या माझ्या लोकांशी वागताना आणि तुमच्या लोकांशी वागताना मी भेद करीन. उद्या हा चमत्कार होईल.”
24 I uèini Gospod tako, i doðoše silne bubine u kuæu Faraonovu i u kuæe sluga njegovijeh i u svu zemlju Misirsku, da se sve u zemlji pokvari od bubina.
२४अशा रीतीने परमेश्वराने केले. मिसर देशात गोमाशांचे थवेच्या थवे आले. ते फारोच्या घरात व त्याच्या सेवकांच्या घरात व सगळ्या मिसर देशात गोमाशाचे थवेच्या थवे आले. गोमाश्यांच्या या थव्यांनी मिसर देशाची नासाडी केली.
25 I Faraon dozva Mojsija i Arona, i reèe im: idite, prinesite žrtvu Bogu svojemu ovdje u zemlji.
२५म्हणून मग फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले व त्यांना सांगितले, “तुम्ही तुमच्या देवाला आमच्या येथेच म्हणजे आमच्या देशातच यज्ञ करा.”
26 A Mojsije reèe: ne valja tako; jer bismo prinijeli na žrtvu Gospodu Bogu svojemu što je neèisto Misircima; a kad bismo prinijeli na žrtvu što je neèisto Misircima na oèi njihove, ne bi li nas pobili kamenjem?
२६परंतु मोशे म्हणाला, “तसे करणे योग्य होणार नाही, कारण आमचा देव परमेश्वर ह्याला आम्ही जो यज्ञ करणार आहो तो यज्ञ तुम्हा मिसरी लोकांच्या दृष्टीने किळसवाणा असेल, त्यामुळे आम्ही तो मिसरी लोकांसमोर केला तर ते आम्हांवर दगडफेक करायचे नाहीत काय?
27 Tri dana hoda treba da idemo u pustinju da prinesemo žrtvu Gospodu Bogu svojemu, kao što nam je kazao.
२७तर आम्हांला रानात तीन दिवसाच्या वाटेवर जाऊ द्या. आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हांला सांगेल त्याप्रमाणे त्यास यज्ञ करू.”
28 A Faraon reèe: pustiæu vas da prinesete žrtvu Gospodu Bogu svojemu u pustinji; ali da ne idete dalje; pa se molite za me.
२८तेव्हा फारो म्हणाला, “मी तुम्हास तुमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करण्याकरिता रानात जाऊ देण्याची परवानगी देतो. पण तुम्ही फार दूर जाऊ नका. माझ्यासाठी प्रार्थना करा.”
29 A Mojsije reèe: evo ja idem od tebe, i moliæu se Gospodu da otidu bubine od Faraona i od sluga njegovijeh i od naroda njegova sjutra; ali nemoj opet da prevariš, i da ne pustiš naroda da prinese žrtvu Gospodu.
२९मोशे म्हणाला, “पाहा, मी तुमच्यापासून जातो आणि फारो व त्याचे सेवक या सर्वांपासून उद्या गोमाशांचे थवे दूर करण्याकरिता परमेश्वरास विनंती करतो. परंतु परमेश्वरासाठी यज्ञ करण्यास जाणाऱ्या आमच्या लोकांस तुम्ही पुन्हा फसवू नये.”
30 I otide Mojsije od Faraona, i pomoli se Gospodu.
३०तेव्हा मोशे फारोपासून निघून गेला आणि त्याने परमेश्वराची प्रार्थना केली.
31 I uèini Gospod po rijeèi Mojsijevoj, te otidoše bubine od Faraona i od sluga njegovijeh i od naroda njegova; ne osta ni jedna.
३१या प्रकारे परमेश्वराने मोशेची विनंती मान्य केली व त्याने फारो, त्याचे सेवक व त्याचे लोक यांच्यापासून सर्व गोमाशाचे थवे दूर केले. तेथे एकही गोमाशी राहिली नाही.
32 Ali opet otvrdnu srce Faraonovo, i ne pusti naroda.
३२परंतु फारोने पुन्हा आपले मन कठोर केले आणि त्याने इस्राएली लोकांस जाऊ दिले नाही.

< Izlazak 8 >