< Izlazak 13 >

1 I reèe Gospod Mojsiju govoreæi:
मग परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला,
2 Posveti mi svakoga prvenca, što god otvora matericu u sinova Izrailjevijeh, i od ljudi i od stoke; jer je moje.
“इस्राएली लोकांमध्ये मनुष्याचा व पशूचा या दोहोंचे प्रत्येक प्रथम जन्मलेले सर्व नर माझ्यासाठी पवित्र कर. प्रथम जन्मलेले ते माझे आहेत.”
3 I Mojsije reèe narodu: pamtite ovaj dan, u koji izidoste iz Misira, iz doma ropskoga, jer vas rukom krjepkom izvede Gospod odande; neka se dakle ne jede ništa s kvascem.
मोशे लोकांस म्हणाला, “आजच्या दिवसाची आठवण ठेवा. तुम्ही मिसर देशात गुलाम म्हणून होता; परंतु या दिवशी परमेश्वराने आपल्या हाताच्या बळाने तुम्हास गुलामगिरीतून सोडवून बाहेर आणले म्हणून तुम्ही खमीर घातलेली भाकर खाऊ नये.
4 Danas izlazite, mjeseca Aviva;
आज अबीब महिन्यात तुम्ही मिसर सोडून निघत आहात.
5 Pa kad te Gospod uvede u zemlju Hananejsku i Hetejsku i Amorejsku i Jevejsku i Jevusejsku, za koju se zakleo ocima tvojim da æe ti je dati, zemlju u kojoj teèe mlijeko i med, tada da služiš službu ovu ovoga mjeseca;
परमेश्वराने तुमच्या पूर्वजांशी शपथपूर्वक करार केला होता की कनानी, हित्ती, अमोरी, हिव्वी व यबूसी ह्याच्या देशात, जेथे दुधामधाचे प्रवाह वाहतात त्या देशात आणल्यानंतर तुम्ही या महिन्यात ही सेवा करावी.
6 Sedam dana jedi hljebove prijesne, a sedmi dan neka je praznik Gospodnji.
या सात दिवसात तुम्ही बेखमीर भाकर खावी. सातव्या दिवशी परमेश्वरासाठी तुम्ही हा सण पाळावा;
7 Hljebovi prijesni da se jedu sedam dana, i da se ne vidi u tebe ništa s kvascem, niti da se vidi u tebe kvasac u cijelom kraju tvom.
या सात दिवसात तुम्ही बेखमीर भाकर खावी. तुमच्या देशाच्या हद्दीत कोठेही खमिराचे दर्शनसुध्दा होऊ नये.
8 I kazaæeš sinu svojemu u taj dan govoreæi: ovo je za ono što mi je uèinio Gospod kad sam izlazio iz Misira.
या दिवशी परमेश्वराने आम्हांला मिसर देशातून बाहेर आणले म्हणून आम्ही हा सण पाळीत आहोत असे तुम्ही आपल्या पुत्रपौत्रांना सांगावे.
9 I neka ti bude kao znak na ruci tvojoj i kao spomen pred oèima tvojima, da ti zakon Gospodnji bude u ustima; jer te je rukom krjepkom izveo Gospod iz Misira.
हे चिन्ह तुझ्या हातावर, तुझ्या दोन्ही डोळ्यांच्या मध्ये स्मारक असे असावे, परमेश्वराचा नियम तुझ्या मुखी असावा. कारण की परमेश्वराने बलवान भुजाने तुला मिसर देशामधून बाहेर आणले.
10 Zato vrši zakon ovaj na vrijeme, od godine do godine.
१०म्हणून तू वर्षानुवर्षे नेमलेल्या वेळी हा विधी पाळावा.
11 I kad te uvede Gospod u zemlju Hananejsku, kao što se zakleo tebi i tvojim ocima, i da ti je,
११परमेश्वराने तुमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे तो तुम्हास आता कनानी लोक राहत असलेल्या देशात घेऊन जाईल व तो देश तुझ्या हाती देईल.
12 Odvajaæeš Gospodu što god otvora matericu, i od stoke tvoje što god otvora matericu, što je muško, da bude Gospodu.
१२तेव्हा उदरातून निघालेला प्रथम पुरुष व जनावराच्या पोटचा प्रथम वत्स यांना परमेश्वरासाठी वेगळे करावे, सर्व नर परमेश्वराचे होत.
13 A svako magare prvenèe otkupi jagnjetom ili jaretom; ako li ga ne bi otkupio, slomi mu vrat. Ali svakoga prvenca èovjeèijega izmeðu sinova svojih otkupi.
१३गाढवाचा प्रथम वत्स एक कोकरू देऊन सोडवून घ्यावा; त्याचा मोबदला काही न दिल्यास त्याची मान मुरगाळावी. तुझ्या मुलातील प्रथम नर मोबदला देऊन सोडवून घ्यावा.
14 A kad te zapita sin tvoj unapredak govoreæi: šta je to? reci mu: rukom krjepkom izvede nas Gospod iz Misira, iz doma ropskoga.
१४पुढील काळी तुमची मुलेबाळे विचारतील की हे काय? तेव्हा त्यांना सांग, ‘मिसर देशातून गुलामगिरीतून परमेश्वराने आम्हांला आपल्या हाताच्या बलाने बाहेर काढले.
15 Jer kad otvrdnu Faraon, te nas ne htje pustiti, pobi Gospod sve prvence u zemlji Misirskoj od prvenca èovjeèijega do prvenca od stoke; zato prinosim Gospodu sve muško što otvora matericu, a svakoga prvenca sinova svojih otkupljujem.
१५आणि फारो आम्हांस मिसर सोडून जाऊ देईना, तेव्हा परमेश्वराने मिसर देशामधील मनुष्य व पशू यांचे सर्व प्रथम नर मारून टाकले; आणि म्हणूनच आम्ही उदरातून निघालेल्या सर्व प्रथम नरांचा मी परमेश्वरास बली अर्पितो. पण माझे सर्व ज्येष्ठ पुत्र देऊन सोडवून घेतो.
16 I to neka ti je kao znak na ruci i kao poèeonik meðu oèima tvojima, da nas je rukom krjepkom izveo Gospod iz Misira.
१६तुझ्या हातावर आणि तुझ्या दोहो डोळ्यांच्या मध्यभागी हे स्मारक चिन्ह व्हावे. कारण परमेश्वराने आपल्या हाताच्या बलाने आम्हांला मिसर देशातून बाहेर आणले.”
17 A kad Faraon pusti narod, ne odvede ih Bog putem k zemlji Filistejskoj, ako i bješe kraæi, jer Bog reèe: da se ne pokaje narod kad vidi rat, i ne vrati se u Misir.
१७फारोने लोकांस जाऊ दिले, परंतु परमेश्वराने लोकांस पलिष्टी लोकांच्या देशातून जवळची वाट असताना देखील त्यातून जाऊ दिले नाही “युध्द प्रसंग पाहून हे लोक माघार घेऊन मिसर देशाला परत जातील, असे देवाला वाटले.”
18 Nego Bog zavede narod putem preko pustinje na Crvenom Moru. A vojnièkim redom izidoše sinovi Izrailjevi iz zemlje Misirske.
१८म्हणून देवाने त्यांना दुसऱ्या मार्गाने तांबड्या समुद्राजवळील रानातून नेले. इस्राएल लोक मिसरामधून सशस्त्र बाहेर निघाले होते.
19 I Mojsije uze kosti Josifove sa sobom; jer bješe zakleo sinove Izrailjeve rekavši: zaista æe vas pohoditi Bog, a tada iznesite kosti moje odavde sa sobom.
१९मोशेने योसेफाच्या अस्थी आपल्याबरोबर घेतल्या. कारण मरण्यापूर्वी योसेफाने आपणाकरता इस्राएली पुत्रांकडून वचन घेतले होते. तो म्हणाला होता, “देव जेव्हा तुम्हास मिसरमधून सोडवील तेव्हा माझ्या अस्थी मिसरमधून घेऊन जाण्याची आठवण ठेवा.”
20 Tako otišavši iz Sohota stadoše u oko u Etamu, nakraj pustinje.
२०मग ते सुक्कोथ नगराहून रवाना झाले व रानाजवळील एथामात त्यांनी तळ दिला.
21 A Gospod iðaše pred njima danju u stupu od oblaka vodeæi ih putem, a noæu u stupu od ognja svijetleæi im, da bi putovali danju i noæu.
२१त्यांनी रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसा त्यांना मार्ग दाखविण्यासाठी मेघस्तंभाच्या ठायी आणि रात्री त्यांना प्रकाश देण्यासाठी अग्नीस्तंभाच्या ठायी त्यांच्यापुढे चालत असे.
22 I ne uklanjaše ispred naroda stupa od oblaka danju ni stupa od ognja noæu.
२२दिवसा मेघस्तंभ व रात्री अग्नीस्तंभ लोकांपुढून कधी दूर होत नसत.

< Izlazak 13 >