< 1 Timoteju 5 >

1 Starca ne karaj, nego mu govori kao ocu; momèadma kao braæi;
वडील मनुष्यास कठोरपणे बोलू नको, उलट पित्याप्रमाणे त्यास बोध कर.
2 Staricama kao materama; mladima kao sestrama, sa svakom èistotom.
तरुणांना भावासारखे, वृद्ध स्त्रियांना आईसारखे, तरुण स्त्रियांना बहिणीसारखे पूर्ण शुद्ध भावाने वागव.
3 Udovice poštuj, koje su prave udovice.
ज्या विधवा खरोखरीच्या गरजवंत आहेत त्यांचा सन्मान कर.
4 Ako li koja udovica ima djecu ili unuèad, da se uèe najprije svoj dom poštovati, i zajam vraæati roditeljima; jer je ovo ugodno pred Bogom.
पण जर एखाद्या विधवेला मुले किंवा नातवंडे असतील तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांशी धार्मिकतेने वागायला व आपल्या वडिलांचे उपकार फेडायला शिकावे कारण हे देवाच्या दृष्टीने चांगले आहे.
5 A prava udovica i usamljena uzda se u Boga, i živi u molitvama i u moljenju dan i noæ.
तर जी खरोखरी विधवा आहे व तिची काळजी घेण्यासाठी कोणी नाही तिने देवावर आपली आशा ठेवली आहे व ती रात्रंदिवस देवाकडे प्रार्थना व विनंत्या करीत राहते.
6 A koja živi u sladostima, živa je umrla.
पण जी विधवा चैनीत राहते, ती जिवंत असता मरण पावलेली आहे.
7 I ovo zapovijedaj, da budu bez mane.
त्यांनी निर्दोष व्हावे म्हणून त्यांना या गोष्टी आज्ञारूपाने लोकांस सांग
8 Ako li ko za svoje a osobito za domaæe ne promišlja, odrekao se vjere, i gori je od neznabošca.
पण जर कोणी त्याच्या स्वतःच्या नातेवाईकासाठी आणि विशेषतः त्याच्या कुटुंबातील जवळच्यांसाठी तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारलेला आहे व तो अविश्वासू मनुष्यापेक्षा वाईट आहे.
9 A udovica da se ne prima mlaða od šezdeset godina, i koja je bila jednome mužu žena;
जी विधवा साठ वर्षाच्या आत असून एकाच पतीची स्त्री झाली असेल.
10 I koja ima svjedoèanstvo u dobrijem djelima, ako je djecu odgajila, ako je gostoljubiva bila, ako je svetima noge prala, ako je nevoljnima pomagala, ako je išla za svakijem dobrijem djelom.
१०जी चांगल्या कृत्यांसाठी नावाजलेली असेल म्हणजे जिने मुलाबाळांना वाढवले असेल, जिने अनोळखी लोकांचे स्वागत केले असेल, पवित्रजनांचे पाय धुतले असतील, त्रासात असलेल्यांना मदत केली असेल व सर्व चांगले काम करण्यात स्वतःला वाहून घेतले असेल, अश्या विधवांचा यादीत समावेश करावा.
11 A mladijeh udovica proði se; jer kad pobjesne protiv Hrista, hoæe da se udaju,
११पण तरुण विधवांची यादीत नोंद करण्याचे टाळावे कारण जेव्हा त्या ख्रिस्ताला सोडून अविचारी होतात, तेव्हा त्यांना पुन्हा लग्न करावेसे वाटते.
12 I imaju grijeh što prvu vjeru odbaciše.
१२आणि त्या दोषी धरल्या जातील, कारण त्यांनी त्यांचा पहिला विश्वास टाकून दिला.
13 A k tome i besposlene uèe se skitati po kuæama, ne samo pak besposlene, nego i jeziène i sveznale, pa govore što ne treba.
१३आणखी त्या घरोघरी फिरून आळशी बनतात व एवढेच नाही तर वटवट्या व लुडबुड्या होऊन ज्या गोष्टी बोलू नयेत, त्या गोष्टी बोलतात.
14 Hoæu dakle da se mlade udovice udaju, djecu raðaju, kuæu kuæe, a nikakva uzroka da ne daju protivniku za huljenje.
१४यासाठी माझी अशी इच्छा आहे की, तरुण विधवा स्त्रियांनी लग्न करावे. मुलांचे संगोपन करावे व आपले घर चालवावे. आपल्या विरोधकाला आपली निंदा करण्यास वाव मिळू देऊ नये.
15 Jer se evo neke okrenuše za sotonom.
१५मी तर असे म्हणतो कारण काही विधवा सैतानामागे जाण्यासाठी वळल्यादेखील आहेत.
16 Ako koji vjerni ili vjerna ima udovice, neka se stara za njih, i da ne dosaðuju crkvi da one koje su prave udovice može zadovoljiti.
१६जर एखाद्या विश्वास ठेवणाऱ्या स्त्रीच्या घरात विधवा असतील तर तिने त्यांची काळजी घ्यावी व मंडळीवर भार टाकू नये. यासाठी की ज्या विधवा खरोखरच गरजवंत आहेत त्यांना ते मदत करू शकतील.
17 A sveštenicima koji se dobro staraju da se daje dvoguba èast, a osobito onima koji se trude u rijeèi i u nauci.
१७जे उपदेश करण्याचे व शिकविण्याचे काम करतात त्यांना व वडील मंडळीची चांगली सेवा करतात त्यांना दुप्पट मान देण्याच्या विशेष योग्यतेचे समजावे.
18 Jer pismo govori: volu koji vrše ne zavezuj usta, i: radin je dostojan svoje plate.
१८कारण शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे, “धान्याची मळणी करताना बैलाला मुसक्या बांधू नको” आणि “मजुराचा त्याच्या मजुरीवर हक्क आहे.”
19 Na sveštenika ne primaj tužbe, osim kad imaju dva ili tri svjedoka.
१९दोन किंवा तीन साक्षीदारांनी पाठिंबा दिल्याशिवाय सेवकावरील आरोप दाखल करू नकोस.
20 A koji griješe pokaraj ih pred svima, da i drugi imaju strah.
२०जे पाप करीत राहतात त्यांचा जाहीरपणे निषेध कर. यासाठी की, इतरांनाही भय वाटावे.
21 Zaklinjem te pred Bogom i Gospodom Isusom Hristom i izbranima njegovijem anðelima da ovo držiš bez licemjerja, ne èineæi ništa po hateru.
२१देव, येशू ख्रिस्त व निवडलेले देवदूत यांच्यासमोर मी निक्षून आज्ञा करतो की, तू कोणताही पूर्वग्रह न ठेवता या गोष्टी पाळ व पक्षपाताने काहीही करू नको.
22 Ruku odmah ne meæi ni na koga, niti pristaj u tuðe grijehe. Drži sebe èista.
२२घाईने कोणावर हात ठेऊ नको आणि इतरांच्या पापांत वाटेकरी होऊ नको. नेहमी स्वतःला शुद्ध राख.
23 Više ne pij vode, nego pij po malo vina, želuca radi svojega i èestijeh svojijeh bolesti.
२३ह्यापुढे पाणीच पीत राहू नको, तर आपल्या पोटासाठी, म्हणजे आपल्या वारंवार होणाऱ्या आजारामुळे, थोडासा द्राक्षरस घेत जा.
24 A nekijeh su ljudi grijesi poznati koji naprijed vode na sud, a nekijeh idu za njima.
२४कित्येक मनुष्यांची पापे उघड असून ती अगोदर न्यायनिवाड्याकरता जातात आणि कित्येकांची मागून जातात.
25 Tako su i dobra djela poznata, i koja su drukèija ne mogu se sakriti.
२५त्याचप्रमाणे, चांगली कामेही स्पष्ट आहेत ती सुद्धा कायमची लपवता येत नाहीत.

< 1 Timoteju 5 >