< لاویان 27 >

و خداوند موسی را خطاب کرده، گفت: ۱ 1
परमेश्वर मोशेला म्हणाला,
«بنی‌اسرائیل را خطاب کرده، به ایشان بگو: چون کسی نذر مخصوصی نماید، نفوس برحسب برآورد تو، از آن خداوند باشند. ۲ 2
इस्राएल लोकांस सांग: एखाद्या मनुष्याने परमेश्वरास मानवाचा विशेष नवस केला तर त्या मनुष्याचे मोल याजकाने याप्रमाणे ठरवावे.
و اگر برآورد تو بجهت ذکور، از بیست ساله تاشصت ساله باشد، برآورد تو پنجاه مثقال نقره برحسب مثقال قدس خواهد بود. ۳ 3
वीस ते साठ वर्षे वयाच्या आतील पुरुषाचे मोल पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे पन्नास शेकेल रुपे असावे,
و اگر اناث باشد برآورد تو سی مثقال خواهد بود. ۴ 4
आणि त्याच वयाच्या स्त्रीचे मोल तीस शेकेल रुपे असावे.
و اگر ازپنج ساله تا بیست ساله باشد، برآورد تو بجهت ذکور، بیست مثقال و بجهت اناث ده مثقال خواهدبود. ۵ 5
मुलगा पाच वर्षे ते वीस वर्षांच्या आतील वयाचा असेल तर त्याचे मोल वीस शेकेल रुपे व मुलीचे दहा शेकेल रुपे असावे.
و اگر از یک ماهه تا پنج ساله باشد، برآوردتو بجهت ذکور پنج مثقال نقره، و بجهت اناث، برآورد تو سه مثقال نقره خواهد بود. ۶ 6
मुलगा एक महिन्याहून मोठा व पाचवर्षाहून लहान असला तर त्याचे मोल पाच शेकेल रुपे व मुलीचे तीन शेकेल रुपे असावे.
و اگر ازشصت ساله و بالاتر باشد، اگر ذکور باشد، آنگاه برآورد تو پانزده مثقال، و برای اناث ده مثقال خواهد بود. ۷ 7
साठ वर्षे वा साठ वर्षाहून अधिक वर्षे वयाच्या पुरुषाचे मोल पंधरा शेकेल रुपे व स्त्रीचे दहा शेकेल रुपे असावे.
و اگر از برآورد تو فقیرتر باشد، پس او را به حضور کاهن حاضر کنند، و کاهن برایش برآورد کند و کاهن به مقدار قوه آن که نذر کرده، برای وی برآورد نماید. ۸ 8
परंतु तू ठरविलेले मोल न देण्याइतका कोणी गरीब असेल तर त्यास याजकापुढे आणावे; आणि याजकाने नवस करणाऱ्याच्या ऐपतीप्रमाणे नवसाच्या मानवाचे मोल ठरवावे.
و اگر بهیمه‌ای باشد ازآنهایی که برای خداوند قربانی می‌گذرانند، هرآنچه را که کسی از آنها به خداوند بدهد، مقدس خواهد بود. ۹ 9
काही पशू परमेश्वरास अर्पण करता येतात त्यापैकी कोणी एखाद्या पशूचा नवस केला तर परमेश्वरास अर्पावयाचा असा प्रत्येक प्राणी पवित्र समजावा.
آن را مبادله ننماید و خوب را به بد یا بد را به خوب عوض نکند. و اگر بهیمه‌ای رابه بهیمه‌ای مبادله کند، هم آن و آنچه به عوض آن داده شود، هر دو مقدس خواهد بود. ۱۰ 10
१०त्याने तो बदलू नये किंवा त्याच्या ऐवजी दुसरे काही देण्याचा प्रयत्न करु नये. त्याने वाईट पशू ऐवजी चांगला किंवा चांगल्याबद्दल वाईट असा बदल करू नये त्याने जर तसा बदल करण्याचा प्रयत्न केला तर मग ते दोन्ही पवित्र होतील व दोन्ही परमेश्वराच्या मालकीचे होतील.
و اگر هرقسم بهیمه نجس باشد که از آن قربانی برای خداوند نمی گذرانند، آن بهیمه را پیش کاهن حاضر کند. ۱۱ 11
११काही पशू परमेश्वरास अर्पण करावयास योग्य नसतात ते अशुद्ध असतात कोणी अशुद्ध पशूपैकी एखादा परमेश्वरास अर्पण करावयास आणला तर त्याने तो याजकाकडे आणावा.
و کاهن آن را چه خوب و چه بد، قیمت کند و برحسب برآورد تو‌ای کاهن، چنین باشد. ۱۲ 12
१२तो पशू चांगला असो किंवा वाईट असो याजकाने त्याचे मोल ठरवावे; याजक ठरवील ते त्याचे मोल समजावे.
و اگر آن را فدیه دهد، پنج یک بر برآوردتو زیاده دهد. ۱۳ 13
१३पण नवस करणाऱ्याला तो पशू सोडवावयाचा असला तर त्या किंमतीत आणखी एकपंचमांश भर घालून त्याने तो सोडवावा.
و اگر کسی خانه خود را وقف نماید تا برای خداوند مقدس شود، کاهن آن راچه خوب و چه بد برآورد کند، و بطوری که کاهن آن را برآورد کرده باشد، همچنان بماند. ۱۴ 14
१४एखाद्याने आपले घर परमेश्वरास वाहिले तर ते चांगले असो किंवा वाईट असो याजकाने त्या घराचे मोल ठरवावे; याजक ठरवील ते त्याचे मोल समजावे.
و اگروقف کننده بخواهد خانه خود را فدیه دهد، پس پنج یک بر نقد برآورد تو زیاده کند و از آن اوخواهد بود. ۱۵ 15
१५परंतु घर वाहणाऱ्याला ते सोडवून परत घ्यावयाचे असेल तर त्याने, याजकाने ठरवलेल्या किंमतीत एकपंचमांश भर घालून ते सोडवावे; मग ते घर त्याचे होईल.
و اگر کسی قطعه‌ای از زمین ملک خود را برای خداوند وقف نماید، آنگاه برآوردتو موافق زراعت آن باشد، زراعت یک حومر جو به پنجاه مثقال نقره باشد. ۱۶ 16
१६एखाद्याने आपल्या शेतीचा काही भाग परमेश्वरास वाहिला तर त्यामध्ये किती बियाणे पेरले जाते त्यावरुन त्याचे मोल ठरेल; एक होमर, सुमारे सहा बुशेल जवासाठी पन्नास शेकेल रुपे अशी किंमत असावी.
و اگر زمین خود را ازسال یوبیل وقف نماید، موافق برآورد تو برقرارباشد. ۱۷ 17
१७योबेल वर्षापासून त्याने आपले शेत देवाला वाहिले तर याजक ठरविल त्याप्रमाणे त्याचे मोल होईल.
و اگر زمین خود را بعد از یوبیل وقف نماید، آنگاه کاهن نقد آن را موافق سالهایی که تاسال یوبیل باقی می‌باشد برای وی بشمارد، و ازبرآورد تو تخفیف شود. ۱۸ 18
१८परंतु योबेल वर्षानंतर जर एखाद्याने आपले शेत परमेश्वरास वाहिले तर पुढच्या योबेल वर्षापर्यंत जितकी वर्षे उरली असतील तितक्या वर्षाचा हिशोब करून याजकाने त्याचे नक्की मोल ठरवावे.
و اگر آنکه زمین راوقف کرد بخواهد آن را فدیه دهد، پس پنج یک از نقد برآورد تو را بر آن بیفزاید و برای وی برقرارشود. ۱۹ 19
१९शेत वाहणाऱ्याला, मोल देऊन आपले शेत सोडवून परत घ्यावयाचे असले तर त्याच्या ठरवलेल्या किंमतीत एकपंचमांश भर घालून त्याने ते सोडवावे. मग ते शेत परत त्याच्या मालकीचे होईल.
و اگر نخواهد زمین را فدیه دهد، یا اگرزمین را به دیگری فروخته باشد، بعد از آن فدیه داده نخواهد شد. ۲۰ 20
२०त्याने ते शेत सोडविले नसेल किंवा दुसऱ्या कोणाला ते विकले असेल तर त्या पहिल्या मालकाला ते सोडवून घेता येणार नाही;
و آن زمین چون در یوبیل رها شود مثل زمین وقف برای خداوند، مقدس خواهد بود؛ ملکیت آن برای کاهن است. ۲۱ 21
२१पण योबेल वर्षी ते शेत परत विकत घेतले नाही तेव्हा पूर्णपणे समर्पित केलेल्या शेताप्रमाणे परमेश्वराकरिता ते पवित्र ठरेल, अर्थात ते याजकाचे कायमचे वतन होईल.
و اگرزمینی را که خریده باشد که از زمین ملک او نبود، برای خداوند وقف نماید، ۲۲ 22
२२स्वत: च्या कुळाचे नसलेले म्हणजे एखाद्याने स्वत: खरेदी केलेले शेत त्यास परमेश्वराकरिता अर्पण करावयाचे असेल,
آنگاه کاهن مبلغ برآورد تو را تا سال یوبیل برای وی بشمارد، و درآن روز برآورد تو را مثل وقف خداوند به وی بدهد. ۲۳ 23
२३तर याजकाने योबेल वर्षापर्यंत त्याचा हिशोब करावा व जितके मोल ठरेल तितके परमेश्वराकरिता पवित्र समजून त्याने त्याच दिवशी ते देऊन टाकावे.
و آن زمین در سال یوبیل به کسی‌که از اوخریده شده بود خواهد برگشت، یعنی به کسی‌که آن زمین ملک موروثی وی بود. ۲۴ 24
२४ज्याच्याकडून त्याने ते शेत पहिल्यांदा खरेदी केलेले असेल म्हणजे ज्याच्या वतनाचे ते असेल त्याच्या ताब्यात ते योबेल वर्षी परत जावे.
و هر برآورد توموافق مثقال قدس باشد که بیست جیره یک مثقال است. ۲۵ 25
२५मोल देताना ते पवित्रस्थानातील चलनाप्रमाणे ठरविलेले असावे. शेकेल म्हणजे वीस गेरा.
«لیکن نخست زاده‌ای از بهایم که برای خداوند نخست زاده شده باشد، هیچکس آن راوقف ننماید، خواه گاو خواه گوسفند، از آن خداوند است. ۲۶ 26
२६लोकांस गुरेढोरे, शेरडेमेढंरे विशेष देणग्या म्हणून अर्पण करता येतील परंतु त्यापैकी प्रथम जन्मलेला नर परमेश्वराचा ठरलेला आहेच; त्याला, ते विशेष भेट म्हणून वाहू शकणार नाहीत.
و اگر از بهایم نجس باشد، آنگاه آن را برحسب برآورد تو فدیه دهد، و پنج یک برآن بیفزاید، و اگر فدیه داده نشود پس موافق برآورد تو فروخته شود. ۲۷ 27
२७तो प्रथम जन्मलेला नर अशुद्ध पशूपैकी असला तर याजकाने ठरवलेल्या मोलात एकपंचमांश भर घालून अर्पण करणाऱ्याने तो सोडवावा; पण तो सोडवीत नसला तर याजकाने ठरवलेल्या किंमतीला तो विकून टाकावा.
اما هر چیزی که کسی برای خداوند وقف نماید، از کل مایملک خود، چه از انسان چه از بهایم چه از زمین ملک خود، نه فروخته شود و نه فدیه داده شود، زیرا هر‌چه وقف باشد برای خداوند قدس اقداس است. ۲۸ 28
२८लोक परमेश्वरास काही विशेष देणगी देतात, ती देणगी माणसे, पशू किंवा वतनांची शेते या प्रकारची असेल, ती देणगी परमेश्वराचीच आहे; ती सोडवून परत घेता येणार नाही किंवा विकता येणार नाही.
هر وقفی که از انسان وقف شده باشد، فدیه داده نشود. البته کشته شود. ۲۹ 29
२९ती वाहिलेली विशेष देणगी मानव प्राण्यांपैकी असेल तर त्या मानवाला सोडवून घेता येणार नाही; त्याचा अवश्य वध करावा.
و تمامی ده‌یک زمین چه از تخم زمین چه از میوه درخت از آن خداوند است، و برای خداوند مقدس می‌باشد. ۳۰ 30
३०भूमीच्या सर्व उत्पन्नाचा एक दशांश भाग म्हणजे, शेतातील सर्व उपज, आणि झाडे, वेली यांची फळे ह्यांचा एक दशांश भाग परमेश्वराकरिता पवित्र आहे.
و اگر کسی از ده‌یک خود چیزی فدیه دهدپنج یک آن را بر آن بیفزاید. ۳۱ 31
३१म्हणून एखाद्याला आपला एक दशांश भाग सोडवून घ्यावयाचा असला तर त्याच्या किंमतीत एक पंचमांशाची भर घालून त्याने तो सोडवावा.
و تمامی ده‌یک گاو و گوسفند یعنی هر‌چه زیر عصا بگذرد، دهم آن برای خداوند مقدس خواهد بود. ۳۲ 32
३२गुरेढोर किंवा शेरडेमेंढरे ह्यापैकी ज्यांची गणना काठीखालून चालवून होते अशा प्रत्येक दहांपैकी एक पशू याजक घेईल. प्रत्येक दहावे जनावर परमेश्वराचे वेगळे केलेले असेल.
در خوبی و بدی آن تفحص ننماید و آن را مبادله نکند، واگر آن را مبادله کند هم آن و هم بدل آن مقدس خواهد بود و فدیه داده نشود.» ۳۳ 33
३३निवडलेला पशू चांगला आहे किंवा वाईट आहे या विषयी त्याच्या धन्याने चिंता करु नये किंवा त्यास बदलू नये; त्याने बदल करावयाचे ठरविले तर मग तो पशू व त्याच्या बदलीचा पशू असे दोन्ही पशू परमेश्वराकरिता पवित्र होतील; किंमत देऊन ते सोडविता येणार नाहीत.
این است اوامری که خداوند به موسی برای بنی‌اسرائیل درکوه سینا امر فرمود. ۳۴ 34
३४परमेश्वराने इस्राएल लोकांकरिता सीनायपर्वतावर मोशेला दिलेल्या आज्ञा याच आहेत.

< لاویان 27 >