< یونس 3 >

پس کلام خداوند بار دوم بر یونس نازل شده، گفت: ۱ 1
परमेश्वराचे वचन दुसऱ्यांदा योनाकडे आले,
«برخیز و به نینوا شهر بزرگ برو و آن وعظ را که من به تو خواهم گفت به ایشان ندا کن.» ۲ 2
“ऊठ, त्या मोठ्या निनवे शहरास जा, आणि जो संदेश मी तुला सांगेन त्याची घोषणा कर.”
آنگاه یونس برخاسته، برحسب فرمان خداوند به نینوا رفت و نینوا شهر بزرگ بود که مسافت سه روز داشت. ۳ 3
मग परमेश्वराच्या वचनाप्रमाणे योना उठून निनवेस गेला. निनवे हे फार मोठे शहर होते. ते सर्व चालत फिरण्यास तीन दिवस लागत होते.
و یونس به مسافت یک روز داخل شهر شده، به ندا کردن شروع نمود وگفت بعد از چهل روز نینوا سرنگون خواهد شد. ۴ 4
योना शहरातून एक दिवसाची वाट चालत असता त्याने घोषणा करून म्हटले, “अजून चाळीस दिवस आहेत, मग निनवेचा नाश होईल.”
و مردمان نینوا به خدا ایمان آوردند و روزه راندا کرده، از بزرگ تا کوچک پلاس پوشیدند. ۵ 5
तेव्हा निनवेतल्या लोकांनी देवावर विश्वास ठेवला, उपास जाहीर केला, आणि मोठ्यापासून लहानापर्यंत सर्वांनी गोणताट नेसले.
و چون پادشاه نینوا از این امر اطلاع یافت، ازکرسی خود برخاسته، ردای خود را از برکند وپلاس پوشیده، بر خاکستر نشست. ۶ 6
निनवेच्या राजाला ही बातमी समजली, तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपला झगा आपल्या अंगातून काढून तो गोणताट नेसून राखेत बसला.
و پادشاه واکابرش فرمان دادند تا در نینوا ندا در‌دادند وامرفرموده، گفتند که «مردمان و بهایم و گاوان وگوسفندان چیزی نخورند و نچرند و آب ننوشند. ۷ 7
राजाने आणि त्याच्या सरदारांच्या ठरावाने निनवेत घोषणा करून ठराव प्रसिध्द केला. त्याने सांगितले, “कोणत्याही मनुष्यांने अथवा पशूंने, गुराढोरांनी अथवा शेरडामेंढरांनी काही चाखू नये; खाऊ नये व पाणी पिऊ नये.
و مردمان و بهایم به پلاس پوشیده شوند و نزدخدا بشدت استغاثه نمایند و هرکس از راه بدخود و از ظلمی که در دست او است بازگشت نماید. ۸ 8
परंतु मनुष्य आणि पशू यांनी गोणताट नेसावेत; देवाचा मनापासून धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून व आपल्या हाताच्या दुष्कर्मापासून मागे फिरावे.
کیست بداند که شاید خدا برگشته، پشیمان شود و از حدت خشم خود رجوع نمایدتا هلاک نشویم.» ۹ 9
न जाणो, कदाचित देव वळेल, अनुताप पावेल व आपल्या संतप्त क्रोधापासून फिरेल, म्हणजे आपला नाश होणार नाही.”
پس چون خدا اعمال ایشان را دید که از راه زشت خود بازگشت نمودند، آنگاه خدا از بلایی که گفته بود که به ایشان برساند پشیمان گردید وآن را بعمل نیاورد. ۱۰ 10
१०तर ते आपल्या कुमार्गापासून फिरले आहेत, अशी त्यांची कृत्ये देवाने पाहिली आणि ज्या संकटाविषयी देव बोलला होता की, “मी त्यांच्यावर ते आणीन,” त्याविषयी त्याने आपले मन बदलले व त्याने तसे केले नाही.

< یونس 3 >