< ایّوب 3 >

و بعد از آن ایوب دهان خود را باز کرده، روز خود را نفرین کرد. ۱ 1
यानंतर, ईयोबाने आपले तोंड उघडले आणि आपल्या जन्मदिवसास शाप दिला.
و ایوب متکلم شده، گفت: ۲ 2
तो (ईयोब) म्हणाला,
«روزی که در آن متولد شدم، هلاک شود و شبی که گفتند مردی در رحم قرار گرفت، ۳ 3
“मी ज्या दिवशी जन्मलो तो दिवस नष्ट होवो, मुलाची गर्भधारणा झाली अशी जी रात्र म्हणाली ती भस्म होवो.
آن روز تاریکی شود. و خدا از بالا بر آن اعتنانکند و روشنایی بر او نتابد. ۴ 4
तो दिवस अंधकारमय होवो, देवाला त्याचे विस्मरण होवो, त्यावर सुर्यप्रकाश पडला नसता तर फार बरे झाले असते.
تاریکی و سایه موت، آن را به تصرف آورند. ابر بر آن ساکن شود. کسوفات روز آن را بترساند. ۵ 5
मृत्यूची सावली आणि अंधार त्यास आपल्या स्वतःचा समजो, ढग सदैव त्यावर राहो, जी प्रत्येक गोष्ट दिवसाचा अंधार करते ती त्यास खरेच भयभीत करो,
و آن شب را ظلمت غلیظ فرو‌گیرد و در میان روزهای سال شادی نکند، و به شماره ماهها داخل نشود. ۶ 6
ती रात्र काळोख घट्ट पकडून ठेवो, वर्षाच्या दिवसांमध्ये ती आनंद न पावो. महिन्याच्या तिथीत तिची गणती न होवो.
اینک آن شب نازاد باشد. و آواز شادمانی در آن شنیده نشود. ۷ 7
पाहा, ती रात्र फलीत न होवो, तिच्यातून आनंदाचा ध्वनी न येवो.
لعنت کنندگان روز، آن را نفرین نمایند، که در برانگیزانیدن لویاتان ماهر می‌باشند. ۸ 8
जे लिव्याथानाला जागविण्यात निपुण आहेत ते त्या दिवसास शाप देवो.
ستارگان شفق آن، تاریک گردد و انتظار نوربکشد و نباشد، و مژگان سحر را نبیند، ۹ 9
त्या दिवसाच्या पहाटेचे तारे काळे होत. तो दिवस प्रकाशाची वाट पाहो पण तो कधी न मिळो, त्याच्या पापण्यास उषःकालाचे दर्शन न घडो.
چونکه درهای رحم مادرم را نبست، و مشقت را ازچشمانم مستور نساخت. ۱۰ 10
१०कारण तिने माझ्या जननीचे ऊदरद्वार बंद केले नाही, आणखी हे दुःख माझ्या डोळ्यापासून लपवीले नाही.
«چرا از رحم مادرم نمردم؟ و چون از شکم بیرون آمدم چرا جان ندادم؟ ۱۱ 11
११उदरातुन बाहेर आलो तेव्हाच मी का मरण पावलो नाही? माझ्या आईने मला जन्म देताच मी का प्राण त्यागला नाही?
چرا زانوها مراقبول کردند، و پستانها تا مکیدم؟ ۱۲ 12
१२तिच्या मांडयानी माझा स्विकार का केला? किंवा मी जगावे म्हणून तिच्या स्तनांनी माझा स्विकार का केला?
زیرا تا بحال می‌خوابیدم و آرام می‌شدم. در خواب می‌بودم واستراحت می‌یافتم. ۱۳ 13
१३तर मी आता निश्चिंत खाली पडून राहीलो असतो, मी झोपलो असतो आणि विश्रांती पावलो असतो.
با پادشاهان و مشیران جهان، که خرابه‌ها برای خویشتن بنا نمودند، ۱۴ 14
१४पृथ्वीवरील राजे आणि सल्लागार, ज्यांनी आपल्यासाठी कबरा बांधल्या त्या आता उध्वस्त झाल्या आहेत.
یابا سروران که طلا داشتند، و خانه های خود را ازنقره پر ساختند. ۱۵ 15
१५किंवा ज्या राजकुमारांनी आपली घरे सोन्या रुप्यांनी भरली त्यांच्या बरोबरच मलाही मरण आले असते तर बरे झाले असते.
یا مثل سقط پنهان شده نیست می‌بودم، مثل بچه هایی که روشنایی را ندیدند. ۱۶ 16
१६कदाचित मी जन्मापासूनच मृत मूल का झालो नाही, किंवा प्रकाश न पाहिलेले अर्भक मी असतो तर बरे झाले असते.
در آنجا شریران از شورش باز می‌ایستند، و درآنجا خستگان می‌آرامند، ۱۷ 17
१७तेथे गेल्यानंतरच दुष्ट त्रास देण्याचे थांबवितात. तेथे दमलेल्यांना आराम मिळतो.
در آنجا اسیران دراطمینان با هم ساکنند، و آواز کارگذاران رانمی شنوند. ۱۸ 18
१८तेथे कैदीही सहज एकत्र राहतात, तेथे त्यांना गुलाम बनविणाऱ्यांचे ओरडणे ऐकू येत नाही.
کوچک و بزرگ در آنجا یک‌اند. وغلام از آقایش آزاد است. ۱۹ 19
१९लहान आणि थोर तेथे आहेत, तेथे गुलाम त्यांच्या मालकापासून मुक्त आहेत.
چرا روشنی به مستمند داده شود؟ و زندگی به تلخ جانان؟ ۲۰ 20
२०दुर्दशेतील लोकांस प्रकाश का दिल्या जातो, जे मनाचे कटू आहेत अशांना जीवन का दिले जाते,
که انتظار موت را می‌کشند و یافت نمی شود، و برای آن حفره می‌زنند بیشتر از گنجها. ۲۱ 21
२१ज्याला मरण पाहीजे त्यास मरण येत नाही, दु: खी मनुष्य गुप्त खजिन्यापेक्षा मृत्यूच्या अधिक शोधात असतो?
که شادی وابتهاج می‌نمایند و مسرور می‌شوند چون قبر رامی یابند؟ ۲۲ 22
२२त्यास थडगे प्राप्त झाले म्हणजे ते हर्षीत होतात, त्यास अति आनंद होतो?
چرا نور داده می‌شود به کسی‌که راهش مستور است، که خدا اطرافش را مستورساخته است؟ ۲۳ 23
२३ज्या पुरूषाचा मार्ग लपलेला आहे, देवाने ज्या पुरुषाला कुपंणात ठेवले आहे अशाला प्रकाश का मिळतो?
زیرا که ناله من، پیش از خوراکم می‌آید و نعره من، مثل آب ریخته می‌شود، ۲۴ 24
२४मला जेवणाऐवजी उसासे मिळत आहेत! माझे कण्हने, पाण्यासारखे बाहेर ओतले जात आहे.
زیرا ترسی که از آن می‌ترسیدم، بر من واقع شد. و آنچه از آن بیم داشتم بر من رسید. ۲۵ 25
२५ज्या गोष्टींना मी घाबरतो त्याच गोष्टी माझ्यावर येतात. मी ज्याला भ्यालो तेच माझ्यावर आले.
مطمئن و آرام نبودم و راحت نداشتم وپریشانی بر من آمد.» ۲۶ 26
२६मी निश्चिंत नाही, मी स्वस्थ नाही, आणि मला विसावा नाही. तरी आणखी पीडा येत आहे.”

< ایّوب 3 >