< اشعیا 20 >

در سالی که ترتان به اشدود آمد هنگامی که سرجون پادشاه آشور او رافرستاد، پس با اشدود جنگ کرده، آن را گرفت. ۱ 1
ज्या वर्षी सेनापती तर्तान अश्दोदास आला, म्हणजे जेव्हा अश्शूराचा राजा सर्गोन याने त्यास पाठवले, त्याने अश्दोदाविरूद्ध लढाई करून ते घेतले.
در آن وقت خداوند به واسطه اشعیا ابن آموص تکلم نموده، گفت: «برو و پلاس را از کمر خودبگشا و نعلین را از پای خود بیرون کن.» و او چنین کرده، عریان و پا برهنه راه می‌رفت. ۲ 2
त्या वेळेला आमोजाचा मुलगा यशयाशी परमेश्वर बोलला आणि म्हणाला, “जा व तुझ्या कंबरे पासूनचे गोणपाटाचे वस्त्र काढून टाक व तुझ्या पायातील जोडे काढ.” त्याने तसे केले, तो नग्न व अनवाणी चालला.
و خداوند گفت: «چنانکه بنده من اشعیا سه سال عریان و پا برهنه راه رفته است تا آیتی وعلامتی درباره مصر و کوش باشد، ۳ 3
परमेश्वर म्हणाला, “माझा सेवक यशया ज्याप्रमाणे मिसराविषयी आणि कूशाविषयी चिन्ह व शकुन असा तीन वर्षे नग्न व अनवाणी चालला आहे,
بهمان طورپادشاه آشور اسیران مصر و جلاء وطنان کوش رااز جوانان وپیران عریان و پابرهنه و مکشوف سرین خواهد برد تا رسوایی مصر باشد. ۴ 4
त्याप्रमाणे मिसऱ्यांना लाज वाटावी म्हणून अश्शूरचा राजा मिसरच्या कैद्यांना व कूशाच्या तडीपार केलेल्या तरुणांना व वृद्धांना, नग्न आणि अनवाणी आणि त्यांचे कुल्ले उघडे करून नेईल.
و ایشان به‌سبب کوش که ملجای ایشان است و مصر که فخر ایشان باشد مضطرب و خجل خواهند شد. ۵ 5
जो कूश त्यांची आशा आणि जो मिसर देशाचे वैभव त्यामुळे ते हताश व लज्जित होतील.”
و ساکنان این ساحل در آن روز خواهند گفت: اینک ملجای ما که برای اعانت به آن فرار کردیم تااز دست پادشاه آشور نجات یابیم چنین شده است، پس ما چگونه نجات خواهیم یافت؟» ۶ 6
त्या दिवशी या समुद्रकिनाऱ्यावरील राहणारे लोक म्हणतील, “खरोखर, हा आमच्या आशेचा स्त्रोत, ज्याच्याकडे साहाय्यासाठी व अश्शूराच्या राजापासून रक्षण करण्यासाठी आम्ही पळालो तो असा आहे, तर आम्ही कसे सुटून जाऊ?”

< اشعیا 20 >