< پیدایش 22 >

و واقع شد بعد از این وقایع، که خداابراهیم را امتحان کرده، بدو گفت: «ای ابراهیم!» عرض کرد: «لبیک.» ۱ 1
या गोष्टी झाल्यानंतर देवाने अब्राहामाची परीक्षा घेतली. तो अब्राहामाला म्हणाला, “अब्राहामा!” अब्राहाम म्हणाला, “हा मी येथे आहे.”
گفت: «اکنون پسرخود را، که یگانه توست و او را دوست می‌داری، یعنی اسحاق را بردار و به زمین موریا برو، و او رادر آنجا، بر یکی از کوههایی که به تو نشان می‌دهم، برای قربانی سوختنی بگذران.» ۲ 2
नंतर देव म्हणाला, “तुझा एकुलता एक प्रिय पुत्र, ज्याच्यावर तू प्रीती करतोस त्या इसहाकाला घेऊन तू मोरिया देशात जा आणि तेथे मी तुला सांगेन त्या डोंगरावर माझ्यासाठी त्याचे होमार्पण कर.”
بامدادان، ابراهیم برخاسته، الاغ خود رابیاراست، و دو نفر از نوکران خود را، با پسرخویش اسحاق، برداشته و هیزم برای قربانی سوختنی، شکسته، روانه شد، و به سوی آن مکانی که خدا او را فرموده بود، رفت. ۳ 3
तेव्हा अब्राहाम पहाटेस लवकर उठला, त्याने खोगीर घालून आपले गाढव तयार केले, आपला मुलगा इसहाक व त्याच्यासोबत दोन तरुण सेवकांना आपल्याबरोबर घेतले. त्याने होमार्पणाकरिता लाकडे फोडून घेतली आणि मग ते सर्व देवाने सांगितलेल्या ठिकाणी प्रवासास निघाले.
و در روزسوم، ابراهیم چشمان خود را بلند کرده، آن مکان را از دور دید. ۴ 4
तिसऱ्या दिवशी अब्राहामाने वर पाहिले आणि दूर अंतरावर ती जागा पाहिली.
آنگاه ابراهیم، به خادمان خودگفت: «شما در اینجا نزد الاغ بمانید، تا من با پسربدانجا رویم، و عبادت کرده، نزد شما بازآییم.» ۵ 5
मग अब्राहाम आपल्या तरुण सेवकांना म्हणाला, “तुम्ही येथे गाढवाजवळ थांबा, आणि मी व मुलगा तिकडे जातो. आम्ही देवाची आराधना करू आणि तुम्हाकडे परत येऊ.”
پس ابراهیم، هیزم قربانی سوختنی را گرفته، بر پسر خود اسحاق نهاد، و آتش و کارد را به‌دست خود گرفت؛ و هر دو با هم می‌رفتند. ۶ 6
अब्राहामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन इसहाकाच्या खांद्यावर ठेवली; त्याने स्वतःच्या हातात अग्नी व एक सुरा घेतला. आणि ते दोघे बरोबर निघाले.
واسحاق پدر خود، ابراهیم را خطاب کرده، گفت: «ای پدر من!» گفت: «ای پسر من لبیک؟» گفت: «اینک آتش و هیزم، لکن بره قربانی کجاست؟» ۷ 7
इसहाक आपल्या पित्याला म्हणाला, “माझ्या बाबा.” अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे, माझ्या मुला.” इसहाक म्हणाला, “मला लाकडे व अग्नी दिसतात, परंतु होमार्पणासाठी कोकरू कोठे आहे?”
ابراهیم گفت: «ای پسر من، خدا بره قربانی رابرای خود مهیا خواهد ساخت.» و هر دو با هم رفتند. ۸ 8
अब्राहाम म्हणाला, “माझ्या मुला, होमार्पणासाठी कोकरू देव स्वतः आपल्याला पुरवेल.” तेव्हा अब्राहाम व त्याचा मुलगा बरोबर निघाले.
چون بدان مکانی که خدا بدو فرموده بود، رسیدند، ابراهیم در آنجا مذبح را بنا نمود، و هیزم را بر هم نهاد، و پسر خود، اسحاق را بسته، بالای هیزم، بر مذبح گذاشت. ۹ 9
देवाने सांगितलेल्या ठिकाणी जेव्हा ते जाऊन पोहचले, तेथे अब्राहामाने एक वेदी बांधली, त्याने वेदीवर लाकडे रचली. नंतर त्याने आपला पुत्र इसहाक याला बांधले, आणि वेदीवरील लाकडावर ठेवले.
و ابراهیم، دست خودرا دراز کرده، کارد را گرفت، تا پسر خویش را ذبح نماید. ۱۰ 10
१०मग अब्राहामाने आपला हात पुढे करून आपल्या मुलाला मारण्यासाठी सुरा हातात घेतला.
در حال، فرشته خداوند از آسمان وی را ندا درداد و گفت: «ای ابراهیم! ای ابراهیم!» عرض کرد: «لبیک.» ۱۱ 11
११परंतु तेवढ्यात, परमेश्वराच्या दूताने स्वर्गातून हाक मारून त्यास म्हटले, “अब्राहामा, अब्राहामा!” अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे.”
گفت: «دست خود را برپسر دراز مکن، و بدو هیچ مکن، زیرا که الان دانستم که تو از خدا می‌ترسی، چونکه پسر یگانه خود را از من دریغ نداشتی.» ۱۲ 12
१२तो म्हणाला, “तू आपल्या मुलावर हात टाकू नकोस, किंवा त्यास कोणत्याही प्रकारची इजा करू नकोस, कारण आता मला खात्रीने समजले की, तू देवाचे भय बाळगतोस, कारण तू माझ्यासाठी आपल्या एकुलत्या एका पुत्राला ही राखून ठेवले नाही.”
آنگاه، ابراهیم، چشمان خود را بلند کرده، دید که اینک قوچی، در عقب وی، در بیشه‌ای، به شاخهایش گرفتارشده. پس ابراهیم رفت و قوچ را گرفته، آن را درعوض پسر خود، برای قربانی سوختنی گذرانید. ۱۳ 13
१३आणि मग अब्राहामाने वर पाहिले आणि पाहा, त्याच्यामागे एका झुडपात शिंगे अडकलेला असा एक एडका होता. मग त्याने जाऊन तो घेतला व आपल्या मुलाच्या ऐवजी त्या एडक्याचे होमार्पण म्हणून अर्पण केले.
و ابراهیم آن موضع را «یهوه یری» نامید، چنانکه تا امروز گفته می‌شود: «در کوه، یهوه، دیده خواهد شد.» ۱۴ 14
१४तेव्हा अब्राहामाने त्या जागेला, “परमेश्वर पुरवठा करेल,” असे नाव दिले, आणि आजवर देखील, “परमेश्वराच्या डोंगरावर तो पुरवठा केला जाईल,” असे बोलले जाते.
بار دیگر فرشته خداوند، به ابراهیم ازآسمان ندا در‌داد ۱۵ 15
१५नंतर स्वर्गातून परमेश्वराच्या दूताने अब्राहामास दुसऱ्यांदा हाक मारली
و گفت: «خداوند می‌گوید: به ذات خود قسم می‌خورم، چونکه این کار را کردی و پسر یگانه خود را دریغ نداشتی، ۱۶ 16
१६आणि म्हटले, हे परमेश्वराचे शब्द आहेत, “मी परमेश्वर आपलीच शपथ वाहून म्हणतो की, तू ही जी गोष्ट केली आहे, म्हणजे तू आपल्या एकुलत्या एका मुलाला राखून ठेवले नाही,
هرآینه تو را برکت دهم، و ذریت تو را کثیر سازم، مانند ستارگان آسمان، و مثل ریگهایی که بر کناره دریاست. و ذریت تو دروازه های دشمنان خود رامتصرف خواهند شد. ۱۷ 17
१७मी खरोखर तुला आशीर्वाद देईन व तुझे वंशज आकाशातल्या ताऱ्यांसारखे व समुद्र किनाऱ्यावरील वाळू इतके बहुतपट वाढवीनच वाढवीन; आणि तुझे वंशज आपल्या शत्रूच्या वेशीचा ताबा मिळवतील.
و از ذریت تو، جمیع امتهای زمین برکت خواهند یافت، چونکه قول مرا شنیدی.» ۱۸ 18
१८पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होतील, कारण तू माझा शब्द पाळला आहेस.”
پس ابراهیم نزد نوکران خودبرگشت، و ایشان برخاسته، به بئرشبع با هم آمدند، و ابراهیم در بئرشبع ساکن شد. ۱۹ 19
१९मग अब्राहाम आपल्या तरुण सेवकाकडे परत आला आणि अब्राहाम, इसहाक व त्याचे सेवक असे सर्व मिळून बैर-शेबाला गेले, आणि तो बैर-शेबा येथे राहिला.
و واقع شد بعد از این امور، که به ابراهیم خبر داده، گفتند: «اینک ملکه نیز برای برادرت ناحور، پسران زاییده است. ۲۰ 20
२०या सर्व गोष्टी घडल्यानंतर अब्राहामाला असा निरोप आला, “पाहा तुझा भाऊ नाहोर व त्याची पत्नी मिल्का यांनाही आता मुले झाली आहेत.”
یعنی نخست زاده او عوص، و برادرش بوز و قموئیل، پدر ارام، ۲۱ 21
२१त्याच्या पहिल्या मुलाचे नाव ऊस, त्याचा भाऊ बूज, अरामाचा बाप कमुवेल,
وکاسد و حزو و فلداش و یدلاف و بتوئیل.» ۲۲ 22
२२त्यानंतर केसेद, हजो, पिलदाश, यिदलाप आणि बथुवेल अशी त्यांची नावे आहेत.
وبتوئیل، رفقه را آورده است. این هشت را، ملکه برای ناحور، برادر ابراهیم زایید. ۲۳ 23
२३बथुवेल रिबकाचा बाप होता. अब्राहामाचा भाऊ नाहोर याजपासून मिल्केला हे आठ पुत्र झाले;
و کنیز او که رومه نام داشت، او نیز طابح و جاحم و تاحش ومعکه را زایید. ۲۴ 24
२४त्याची उपपत्नी रेऊमा हिलाही त्याच्यापासून तेबाह, गहाम, तहश व माका हे चार पुत्र झाले.

< پیدایش 22 >