< حزقیال 45 >

«و چون زمین را به جهت ملکیت به قرعه تقسیم نمایید، حصه مقدس را که طولش بیست و پنج هزار (نی ) و عرضش ده هزار(نی ) باشد هدیه‌ای برای خداوند بگذرانید و این به تمامی حدودش از هر طرف مقدس خواهدبود. ۱ 1
जेव्हा तुम्ही वतनासाठी चिठ्ठ्या टाकून देशाची वाटणी कराल तेव्हा परमेश्वरास अर्पायचा प्रदेश, देशाचा पवित्र विभाग, तुम्ही अर्पण कराल, त्याची लांबी पंचवीस हजार हात व रुंदी वीस हजार हात असावी. त्याच्या सभोवतालचा सर्व प्रदेश पवित्र होईल.
و از این پانصد در پانصد (نی ) از هر طرف مربع برای قدس خواهد بود و نواحی آن از هرطرفش پنجاه ذراع. ۲ 2
यापैकी पांचशे हात लांब व पांचशे हात रुंद एवढी चौरस जागा पवित्रस्थानासाठी ठेवून तिच्याभोवती पन्नास हात खुली जागा राखून ठेवावी, ती सभोवती चौरस असावी.
و از این پیمایش طول بیست و پنج هزار و عرض ده هزار (نی ) خواهی پیمود تا در آن جای مقدس قدس‌الاقداس باشد. ۳ 3
त्या मोजलेल्या जमिनीतून तू पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद जागा मोजून काढ.
و این برای کاهنانی که خادمان مقدس باشند و به جهت خدمت خداوند نزدیک می‌آیند، حصه مقدس از زمین خواهد بود تا جای خانه‌ها به جهت ایشان و جای مقدس به جهت قدس باشد. ۴ 4
जे याजक पवित्रस्थानाचे सेवा करावयास परमेश्वराजवळ येतील त्यांना हा भूमीचा पवित्र प्रदेश होईल. तो त्यांना त्यांच्या घरासाठी जागा आणि पवित्रस्थानासाठी पवित्र जागा होईल.
و طول بیست و پنج هزار و عرض ده هزار (نی )به جهت لاویانی که خادمان خانه باشند خواهدبود تا ملک ایشان برای بیست خانه باشد. ۵ 5
म्हणून ती पंचवीस हजार हात लांब व दहा हजार हात रुंद, एवढी जागा जे कोणी लेवी मंदिरात सेवा करतात त्यांची व्हावी. वस्तीसाठी हे त्यांचे वतन होय.
و ملک شهر را که عرضش پنجهزار و طولش بیست وپنجهزار (نی ) باشد موازی آن هدیه مقدس قرار خواهید داد و این از آن تمامی خاندان اسرائیل خواهد بود. ۶ 6
अर्पिलेला पवित्र प्रदेशसुद्धा तुम्ही पाच हजार हात रुंद व पंचवीस हजार हात लांब प्रदेश नगराचा विभाग म्हणून नेमून द्याल; तो इस्राएलाच्या सर्व घराण्याला होईल.
و از اینطرف و از آنطرف هدیه مقدس و ملک شهر مقابل هدیه مقدس و مقابل ملک شهر از جانب غربی به سمت مغرب و ازجانب شرقی به سمت مشرق حصه رئیس خواهدبود و طولش موازی یکی از قسمت‌ها از حدمغرب تا حد مشرق خواهد بود. ۷ 7
“अर्पिलेल्या पवित्र प्रदेशाच्या व नगराच्या विभागाच्या एकाबाजूस व दुसऱ्याबाजूस अर्पिलेल्या पवित्र प्रदेशासमोर आणि नगराच्या विभागासमोर पश्चिम सीमेपासून पश्चिमेकडे, आणि पूर्व सीमेपासून पूर्वेकडे अधिपतीस विभाग होईल.
و این در آن زمین در اسرائیل ملک او خواهد بود تا روسای من بر قوم من دیگر ستم ننمایند و ایشان زمین را به خاندان اسرائیل بر‌حسب اسباط ایشان خواهندداد. ۸ 8
ही जमीन इस्राएलात अधिपतीचे वतन व्हावी म्हणजे यापुढे माझ्या अधिपतींनी माझ्या लोकांवर जुलूम करू नये; तर त्याऐवजी इस्राएल घराण्याला त्यांच्या त्यांच्या वंशाप्रमाणे जमीन द्यावी.
«خداوند یهوه چنین می‌گوید: ای سروران اسرائیل باز ایستید و جور و ستم را دور کنید وانصاف و عدالت را بجا آورید و ظلم خود را ازقوم من رفع نمایید. قول خداوند یهوه این است: ۹ 9
प्रभू परमेश्वर असे म्हणतो, इस्राएलाच्या अधिपतींनो, हे तुमच्यासाठी पुरे होवो. जबरदस्ती आणि जुलूम दूर करा! न्याय व न्यायीपण आचरा, माझ्या लोकांची हकालपट्टी करण्याचे सोडा.” असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
میزان راست و ایفای راست و بت راست برای شما باشد ۱۰ 10
१०तुम्ही खरी तागडी, खरी एफा, खरी बथ वापरा.
و ایفا و بت یکمقدار باشد به نوعی که بت به عشر حومر و ایفا به عشر حومر مساوی باشد. مقدار آنها بر‌حسب حومر باشد. ۱۱ 11
११एफा व बथ सारख्याच मापाचे असावे. याकरिता बथ होमराचा दहावा भाग; तशीच एफाही होमराचा दहावा भाग; या होमराच्या मापाप्रमाणे असाव्या.
و مثقال بیست جیره باشد. و منای شما بیست مثقال وبیست و پنج مثقال و پانزده مثقال باشد. ۱۲ 12
१२शेकेल वीस गेराचा असावा. माने वीस शेकेलाचा, पंचवीस शेकेलाचा किंवा पंधरा शेकेलाचा असावा.
«و هدیه‌ای که بگذرانید این است: یک سدس ایفا از هر حومر گندم و یک سدس ایفا ازهر حومر جو بدهید. ۱۳ 13
१३तुमची जे अर्पणे अर्पावयाचे ती अशी असावीः तुम्ही होमभर गव्हातून एफाचा सहावा भाग गहू व होमरभर जवातून एफाचा सहावा भाग जव द्यावा.
و قسمت معین روغن برحسب بت روغن یک عشر بت از هر کر یا حومرده بت باشد زیرا که ده بت یک حومر می‌باشد. ۱۴ 14
१४तेलाचा नियम हाच, तुम्ही तेलाच्या बथाचा म्हणजे खोरभर तेलातून बथाचा दहावा भाग अर्पावा; दहा बथांचा खोर म्हणजे एक होमर, कारण दहा बथ एक होमर आहेत;
و یک گوسفند از دویست گوسفند از مرتع های سیراب اسرائیل برای هدیه آردی و قربانی سوختنی و ذبایح سلامتی بدهند تا برای ایشان کفاره بشود. قول خداوند یهوه این است. ۱۵ 15
१५आणि इस्राएल देशातील पाणथळाच्या कुरणातील दोनशे मेंढरांच्या कळपातून एक कोकरू, अन्नार्पण व होमार्पण व शांत्यर्पणे म्हणून त्यांच्यासाठी प्रायश्चित करायला अर्पावे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.
وتمامی قوم زمین این هدیه را برای رئیس دراسرائیل بدهند. ۱۶ 16
१६देशातील सर्व लोकांनी इस्राएलातल्या अधिपतीस ही अर्पणे दिली पाहिजेत.
و رئیس قربانی های سوختنی و هدایای آردی و هدایای ریختنی را در عیدها وهلال‌ها و سبت‌ها و همه مواسم خاندان اسرائیل بدهد واو قربانی گناه و هدیه آردی و قربانی سوختنی و ذبایح سلامتی را به جهت کفاره برای خاندان اسرائیل بگذراند.» ۱۷ 17
१७उत्सव, व चंद्रदर्शने, शब्बाथ आणि इस्राएलाच्या घराण्याचे सर्व सण यामध्ये अन्नार्पण, होमार्पण व पेयार्पण याची तरतूद करणे हे अधिपतींचे काम आहे. इस्राएल घराण्यासाठी प्रायश्चित करण्यासाठी त्याने अन्नार्पण, होमार्पण व शांत्यर्पणे ही सिद्ध करावी.
خداوند یهوه چنین می‌گوید: «در غره ماه اول، گاوی جوان بی‌عیب گرفته، مقدس را طاهرخواهی نمود. ۱۸ 18
१८प्रभू परमेश्वर असे म्हणतो, “पहिल्या महिन्यात, महिन्याच्या पहिल्या दिवशी, तू निर्दोष तरुण गोऱ्हा घेऊन पवित्रस्थानाची शुद्धी कर.
و کاهن قدری از خون قربانی گناه گرفته، آن را بر چهار چوب خانه و بر چهارگوشه خروج مذبح و بر چهار چوب دروازه صحن اندرونی خواهد پاشید. ۱۹ 19
१९तेव्हा याजकाने पापार्पणाच्या पशूचे रक्त घेऊन ते मंदिराच्या दरवाजाच्या चौकटीला, वेदीच्या बैठकीच्या चाऱ्ही कोपऱ्यांवर व आंतील अंगणाच्या दरवाजाच्या चौकटीला लावावे.”
و همچنین درروز هفتم ماه برای هر‌که سهو یا غفلت خطا ورزدخواهی کرد و شما برای خانه کفاره خواهیدنمود. ۲۰ 20
२०पहिल्या महिन्याच्या सातव्या दिवशी, प्रत्येक चुकलेल्या किंवा भोळ्या मनुष्याकरता तू तसेच करशील आणि तुम्ही याप्रकारे मंदिरासाठी प्रायश्चित करावे.
و در روز چهاردهم ماه اول برای شماهفت روز عید فصح خواهد بود که در آنها نان فطیر خورده شود. ۲۱ 21
२१पहिल्या महिन्यात, महिन्याच्या चौदाव्या दिवशी तुम्हास सात दिवसाचा वल्हांडण सण होईल, त्यामध्ये बेखमीर भाकर खावी.
و در آن روز رئیس، گاوقربانی گناه را برای خود و برای تمامی اهل زمین بگذراند. ۲۲ 22
२२त्यादिवशी अधिपती आपणासाठी आणि देशातील सर्व लोकांसाठी पापार्पणासाठी एक गोऱ्हा सिद्ध करील.
و در هفت روز عید، یعنی در هر روزاز آن هفت روز، هفت گاو و هفت قوچ بی‌عیب به جهت قربانی سوختنی برای خداوند و هر روزیک بز نر به جهت قربانی گناه بگذارند. ۲۳ 23
२३परमेश्वरास होमार्पण करण्यासाठी सणाचे सात दिवस त्याने सात निर्दोष गोऱ्हे व सात मेंढे सिद्ध करावे आणि पापर्पणासाठी रोज एक बोकड सिद्ध करावा.
و هدیه آردیش را یک ایفا برای هر گاو و یک ایفا برای هرقوچ و یک هین روغن برای هر ایفا بگذراند. ۲۴ 24
२४मग अधिपती एका गोऱ्ह्यासाठी एफाभर व एका मेंढ्यासाठी एफाभर अन्नार्पण आणि एफासाठी हीनभर तेल सिद्ध करील, पापार्पण म्हणून बैल देईल.
واز روز پانزدهم ماه هفتم، در وقت عید موافق اینهایعنی موافق قربانی گناه و قربانی سوختنی و هدیه آردی و روغن تا هفت روز خواهد گذرانید.» ۲۵ 25
२५सातव्या महिन्यात, महिन्याच्या पंधराव्या दिवशी, सणात, सात दिवसपर्यंत तो पापबली, होमबली, अन्नबली आणि तेल ही याप्रमाणेच सिद्ध करील.

< حزقیال 45 >