< Salmenes 90 >

1 Ei bøn av gudsmannen Moses. Herre, du hev vore ei livd for oss frå ætt til ætt.
मोशेचे स्तोत्र हे प्रभू, तू सर्व पिढ्यानपिढ्या आमचे निवासस्थान आहेस.
2 Fyrr fjelli vart til, og du skapte jordi og heimen, ja frå æva og til æva er du Gud.
पर्वत अस्तित्वात येण्यापूर्वी किंवा पृथ्वी व जग निर्माण होण्याआधीच, अनादिकाळापासून ते अनंतकाळापर्यंत तूच देव आहेस.
3 Du let menneskja venda um til dust og segjer: «Vend um att, de menneskjeborn!»
तू मनुष्यास पुन्हा मातीस मिळवतोस, आणि तू म्हणतोस, “अहो मनुष्याच्या वंशजांनो परत या.”
4 For tusund år er i dine augo som dagen i går når han lid, som ei vakt um natti.
कारण हजारो वर्षे तुझ्या दृष्टीने, कालच्या गेलेल्या दिवसासारखी, रात्रीच्या प्रहरासारखी आहेत.
5 Du riv deim burt som i flaum, dei vert som ein svevn, um morgonen er dei som groande graset;
पुराप्रमाणे तू त्यांना झाडून दूर नेतोस आणि ते निद्रेप्रमाणे क्षणिक आहेत, सकाळी उगवणाऱ्या गवतासारखे ते आहेत.
6 um morgonen blømer det og gror, um kvelden visnar det burt og turkast upp.
सकाळी ते उगवते आणि वाढते; संध्याकाळी ते निस्तेज होते व वाळून जाते.
7 For me hev forgjengest ved din vreide, og ved din harm er me burtskræmde.
खरोखर, आम्ही तुझ्या रागाने नष्ट होतो, आणि तुझ्या कोपाने आम्ही घाबरून जातो.
8 Du hev sett våre misgjerder for augo dine, vår løynde synd i ljoset frå di åsyn.
तू आमचे अपराध आपल्यापुढे ठेवले आहेत. आमचे गुप्त पाप तुझ्या प्रकाशाच्या समक्ष ठेवले आहे.
9 For alle våre dagar er framfarne i din vreide, me hev livt våre år til ende som ein sukk.
तुझ्या क्रोधाखालून आमचे आयुष्य निघून जाते; आमची वर्षे उसाशाप्रमाणे त्वरेने संपून जातात.
10 Vår livstid, ho varer sytti år, og når der er mykje kraft, åtteti år, og jamvel det stoltaste er møda og fåfengd, for snart er det framfare, og me flaug burt.
१०आमचे आयुष्य सत्तर वर्षे आहे; किंवा जर आम्ही निरोगी असलो तर ऐंशी वर्षे आहे; पण तरी आमच्या आयुष्यातील उत्तम वर्षे समस्या आणि दु: ख यांच्या निशाणीने भरलेले आहे. होय, ते लवकर सरते आणि आम्ही दूर उडून जातो.
11 Kven kjenner styrken i din vreide og din harm, soleis som ein bør ottast deg?
११तुझ्या क्रोधाची तीव्रता कोणाला माहित आहे; तुझी भिती बाळगण्याइतका तुझा क्रोध कोण जाणतो?
12 Å telja våre dagar, det lære du oss, at me kann få visdom i hjarta.
१२म्हणून आम्हास आमचे आयुष्य असे मोजण्यास शिकव की आम्ही ज्ञानाने जगण्यास शिकू.
13 Vend um, Herre! Kor lenge? Og lat det gjera deg vondt for tenarane dine!
१३हे परमेश्वरा, परत फीर, किती वेळ तू उशीर करशील? तुझ्या सेवकावर दया कर.
14 Metta oss med di miskunn når morgonen renn, so vil me fegnast og gleda oss alle våre dagar!
१४तू आपल्या दयेने आम्हास सकाळी तृप्त कर म्हणजे आम्ही आपले सर्व दिवस हर्षाने आणि आनंदाने घालवू.
15 Gled oss etter dei dagar du hev bøygt oss, etter dei år me hev set ulukka!
१५जितके दिवस तू आम्हास पीडले त्या दिवसाच्या मानाने आणि जितकी वर्षे आम्ही समस्येचा अनुभव घेतला त्या वर्षाच्या मानाने आम्हांला आनंदित कर.
16 Lat di gjerning syna seg for tenarane dine og din herlegdom yver deira born!
१६तुझी कृती तुझ्या सेवकांना, तुझे वैभव त्यांच्या मुलांना बघू दे.
17 Og Herren, vår Guds ynde vere yver oss, og det våre hender gjer, gjeve du framgang for oss, ja, det våre hender gjer, det gjeve du framgang!
१७प्रभू, आमचा देव याची कृपा आम्हांवर असो. आमच्या हातच्या कामाला उन्नती दे; खरोखर, आमच्या हातच्या कामाला उन्नती दे.

< Salmenes 90 >