< Jobs 40 >

1 Og Herren svara Job og sagde:
परमेश्वर ईयोबाला नियमीत बोलत राहीला, तो म्हणाला,
2 «Vil klandraren med Allvald trætta? Lat han som lastar Gud då svara!»
“तू सर्वशक्तिमान देवाशी वाद घातलास. तू मला चूक केल्याबद्दल दोषी ठरवलेस. आता तू चुकलास हे तू कबूल करशील का? तू मला उत्तर देशील का?
3 Då svara Job Herren og sagde:
मग ईयोबने परमेश्वरास उत्तर देऊन म्हटले,
4 «For ring eg er; kva skal eg svara? Eg handi legg på munnen min.
मी अगदी नगण्यआहे. मी काय बोलू? मी तुला उत्तर देऊ शकत नाही. मी माझा हात माझ्या तोंडावर ठेवतो.
5 Ein gong eg tala, no eg tegjer, tvo gong’ - eg gjer det ikkje meir.»
पाहा, मी एकदा बोललो होतो पण आता अधिक बोलणार नाही. मी दोनदा बोललो पण मी आता अधिक बोलणार नाही.
6 Og Herren svara Job or stormen og sagde:
नंतर परमेश्वर वादळातून पुन्हा ईयोबशी बोलला तो म्हणाला:
7 «Spenn som mann ditt beltet på, gjev meg på mine spursmål svar:
तू आता कंबर कसून उभा राहा आणि मी जे प्रश्र विचारतो त्याची उत्तरे द्यायला सिध्द हो.
8 Vil du forspille meg min rett, fordøma meg, so du fær rett?
मी न्यायी नाही असे तुला वाटते का? मी काही चूक केल्याचा आरोप करून तू स्वत: चे निरपराधित्व सिध्द करु पाहत आहेस.
9 Hev du vel slik ein arm som Gud? Kann du som han med røysti dundra?
तुझे बाहू देवाच्या बाहूइतके शक्तीशाली आहेत का? देवाच्या आवाजासारखा तुझा आवाज गडगडाटी आहे का?
10 Pryd deg med høgd og herredom, klæd deg i glans og herlegdom,
१०तू स्वत: ला महीमा व प्रताप यांचे भुषण कर, तेज व वैभव हे धारण कर.
11 Lat so din vreide strøyma fram, sjå kvar ein stolt og audmyk han!
११तुझ्या रागाला भरती येवू दे, आणि प्रत्येक गर्वीष्ठास तू खाली आण आणि गर्विष्ठ लोकांस शिक्षा करु शकतोस. गर्विष्ठांना मान खाली घालायला लावू शकतोस.
12 Så kvar ein stolt og bøyg han ned, og slå til jord dei gudlause!
१२होय त्या गर्विष्ठांकडे बघ आणि त्यांना नम्र कर वाईट लोकांस जागच्या जागी चिरडून टाक.
13 Og gøym deim alle under jordi, bitt deira andlit fast i løynd!
१३त्यांना चिखलात पुरुन टाक त्यांचे तोंडे काळोखात राहतील असे त्यांना बांधून टाक.
14 So skal eg og lovprisa deg, som siger med di høgre vann.
१४मग मी तुझी सत्यता जाणेल, मग तुझाच उजवा हात तुझा बचाव करील.
15 Sjå elvhesten! Eg hev skapt han liksom deg; som ein ukse et han gras.
१५तू बेहेमोथ कडे बघ. मी तुला आणि बेहेमोथला एकाच वेळी निर्माण केले. तो बैलासारखे गवत खातो.
16 Sjå då krafti i hans lender, i bukmusklarne hans styrke!
१६त्याच्या अंगात बरीच शक्ती आहे. त्याच्या पोटातले स्नायू खूप बळकट आहेत.
17 Halen gjer han stiv som ceder, fast bogsenarne er tvinna.
१७त्याची शेपटी गंधसरूच्या झाडासारखी उभी राहते. त्याच्या पायातले स्नायूही बळकट आहेत.
18 Knokarne er koparrøyrer, beini som jarnstenger er.
१८त्याची हाडे पितळेसारखी बळकट आहेत. त्यांचे पाय म्हणजे जणू लोखंडाच्या कांबी.
19 Av Guds verk er han det fyrste, av sin skapar fekk han sverd.
१९बेहेमोथ हा अतिशय आश्चर्यकारक प्राणी मी निर्माण केला आहे. परंतु मी त्याचा पराभव करु शकतो.
20 Bergi ber åt honom for, alle villdyr leikar der.
२०डोंगरावर जिथे जंगली श्वापदे खेळतात तिथले गवत खातो.
21 Under lotusbusk han kviler, løyner seg i røyr og sev.
२१तो कमळाच्या झाडाखाली झोपतो. दलदलीतल्या लव्हाळ्यात लपतो.
22 Lotusbusk gjev honom skugge, piletre umkransar honom.
२२कमळाचे झाड त्यास आपल्या सावलीत लपवते तो नदीजवळ उगवणाऱ्या एका वृक्षाखाली (विलोवृक्ष) राहतो.
23 Strid gjeng elvi, ei han ottast; trygg er han um so sjølve Jordan fossar imot hans gap.
२३नदीला पूर आला तर बेहेमोथ पळून जात नाही यार्देन नदीचा प्रवाह त्याच्या तोंडावर आदळला तरी तो घाबरत नाही विश्वासात स्थिर राहतो.
24 Kann ein tak han so han ser det, draga snara gjenom snuten?
२४त्यास कोणी गळ टाकून धरू शकेल. किंवा त्यास सापळ्यात अडकवू शकेल.”

< Jobs 40 >