< Jobs 30 >

1 Men no er eg til spott for deim som yngre er av år enn eg; eg deira feder ikkje fann verdige plass hjå gjætarhunden.
“परंतु आता माझ्यापेक्षा लहान माणसे देखील माझी थट्ट करत आहेत, आणि त्याचे वाडवडील ज्यांना मी माझ्या मेंढ्यांची राखण करणाऱ्या कुत्र्यांमध्ये देखील ठेवले नसते.
2 Magtlause er og deira hender, og deira saft og kraft er burte;
त्या तरुणांचे वडील मला मदत करण्याच्या दृष्टीने अगदीच निकामी आहेत. ते म्हातारे झाले आहेत आणि दमले आहेत. आता त्यांचे स्नायू टणक आणि जोमदार राहिलेले नाहीत.
3 Dei magre er av naud og svolt, dei gneg i turre øydemarki som alt i går var reine audni,
ते मृतप्राय झाले आहेत. खायला नसल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे व म्हणून ते वाळवटांतील धूळ खात आहेत.
4 og plukkar melde millom kjørri og hev til føda einerot.
ते वाळवटांतील क्षार-झुडपे उपटून घेतात. रतम नावाच्या झाडाची मुळे खातात.
5 Frå folket vert dei jaga burt, fær tjuvemann slengt etter seg.
त्यांना दुसऱ्या मनुष्यांपासून दूर ठेवण्यात येते. ते चोर व दरोडेखोर असल्याप्रमाणे लोक त्यांच्यावर ओरडत असतात.
6 Dei gøymer seg i fæle gil, i holor uti jord og fjell;
त्यांना नदीच्या कोरड्या पात्रात, डोंगराळ भागातील गुहेत किंवा जमिनीतील विवरात रहावे लागते.
7 og millom buskor skrålar dei og samlast under netlerunnar;
ते झाडाझुडपात आक्रोश करतात. काटेरी झुडपात एकमेकांच्या आश्रयाने राहतात.
8 ei ætt av dårar og namnlause som ein helst piskar ut or landet.
ते काडी इतकेही मोल नसलेले लोक आहेत. काहीही नाव नसलेल्या या लोकांस त्यांच्या देशातून हाकलून दिले आहे.
9 No er eg slengjestev for deim, eit ordtak hev for deim eg vorte.
अशा लोकांची मुले माझी चेष्टा करणारी गाणी गातात. त्यांच्या दृष्टीने माझे नाव म्हणजे एक शिवी आहे.
10 Dei styggjest ved meg, held seg burte og sparer ei å sputta på meg.
१०ते तरुण माझा तिरस्कार करतात ते माझ्यापासून लांब उभे राहतात. ते माझ्यापेक्षा उच्च आहेत असे त्यांना वाटते. ते माझ्या तोंडावर थुंकतात सुध्दा.
11 Utan all blygd dei krenkjer meg, hiv av kvart band framfor mi åsyn.
११देवाने माझ्या धनुष्याची प्रत्यंचा काढून घेतली आणि मला दुबळा बनवले. ती तरुण माणसे स्वत: ला न थोपविता रागाने माझ्याविरुध्द वागतात.
12 Eit utjo reiser seg til høgre, dei spenner mine føter burt, og legg ulukke-vegar mot meg.
१२ते माझ्या उजव्या भागावर वार करतात. ते माझ्या पायावर वकरुन पाडतात. एखाद्या शहरावर सैन्याने चालून जावे तसे मला वाटते. माझ्यावर हल्ला करून माझा नाश करण्यासाठी माझ्या तटबंदीला मातीचे चढाव बांधतात.
13 Og stigen min den bryt dei upp og hjelper til med mi ulukka, dei som er hjelpelause sjølv.
१३मी पळून जाऊ नये म्हणून ते रस्त्यावर पहारा देतात. माझा नाश करण्यात त्यांना यश मिळते. कुणाच्या मदतीची त्यांना गरज नसते.
14 Som gjenom vide murbrot kjem dei, velter seg fram med bråk og brak.
१४ते भिंतीला भोक पाडतात. ते त्यातून आत घुसतात आणि माझ्यावर दरडी कोसळतात.
15 Imot meg vender rædslor seg, mi æra elter dei som stormen, mi velferd kvarv som lette sky.
१५भीतीने माझा थरकाप झाला आहे. वाऱ्याने सगळे काही उडून जावे त्याप्रमाणे त्यांनी माझी प्रतिष्ठा उडवून लावली आहे. माझी सुरक्षितता ढगांप्रमाणे नाहीशी झाली आहे.
16 No jamrar seg mi sjæl i meg; usæle dagar held meg fast.
१६माझे आयुष्य आता गेल्यातच जमा आहे आणि मी लवकरच मरणार आहे. दु: खानी भरलेल्या दिवसानी मला वेढून टाकले आहे.
17 Natti gneg mine knokar av meg, min verk, mi pina aldri søv.
१७माझी सगळी हाडे रात्री दुखतात. वेदना मला कुरतडणे थांबवत नाहीत.
18 Ved allmagt vert min klædnad vanstelt, heng tett som skjortekragen kring meg.
१८देवाने माझ्या कोटाची गळ्याप्रमाणे खेचून माझे कपडे आकारहीन केले आहेत.
19 Han kasta meg i skarnet ned; og eg ser ut som mold og oska.
१९देवाने मला चिखलात फेकून दिले आणि माझी राख व कचरा झाला.
20 Eg skrik til deg, du svarar ikkje, eg stend der, og du stirer på meg.
२०देवा, मी मदतीसाठी तुझी याचना करतो पण तू उत्तर देत नाहीस. मी उभा राहतो व तुझी प्रार्थना करतो पण तू माझ्याकडे लक्ष देत नाहीस.
21 Hard hev du vorte imot meg, du stri’r mot meg med veldug hand.
२१देवा, तू माझ्याशी फार नीचपणे वागतोस. तू तुझ्या बळाचा उपयोग मला दु: ख देण्यासाठी करतोस.
22 Du let meg fara burt i stormen, du let meg tynast i hans brus.
२२देवा, तू सोसाट्याच्या वाऱ्याने मला उडवून लावतोस. देवा तू मला वादळात फेकून देतोस.
23 Eg veit du fører meg til dauden, der alt som liver samlast lyt.
२३तू मला माझ्या मृत्यूकडे घेऊन जात आहेस हे मला माहीत आहे. प्रत्येक जिवंत मनुष्यास मरावे हे लागतेच.
24 Kven kavar ikkje når han søkk? Kven ropar ikkje ut i fåren?
२४परंतु जो आधीच दु: खाने पोळला आहे आणि मदतीची याचना करीत आहे त्यास कोणी अधिक दु: ख देणार नाही.
25 Gret eg’kje sjølv med den fortrykte, og syrgde yver fatigmann?
२५देवा, मी संकटात सापडलेल्यांसाठी मदतीची याचना केली होती हे तुला माहीत आहे. गरीबांसाठी माझे हृदय तीळ तीळ तुटत होते हे ही तुला माहीत आहे.
26 Eg vona godt, men det kom vondt, eg venta ljos, men myrker kom.
२६परंतु मी जेव्हा चांगल्याची अपेक्षा करीत होतो तेव्हा माझ्या वाट्याला वाईट गोष्टी आल्या. मला उजेड हवा होता तेव्हा अंधार मिळाला.
27 Det kokar allstødt i mitt indre, ulukkedagen møter meg.
२७मी आतून अगदी मोडून गेलो आहे. माझ्या वेदना कधीच थांबत नाहीत आणि वेदना आणखी येणारच आहेत.
28 Svart gjeng eg kring, men ikkje solbrend, eg ris i flokken, skrik um hjelp.
२८मी सदैव दु: खी असतो, पण मला स्वास्थ्य लाभत नाही. मी लोकांच्यात उभा राहून मदतीसाठी ओरडतो.
29 Bror åt sjakalar hev eg vorte, til strussar eg ein frende er.
२९कोल्ह्यांना मी भाऊ, आणि शहामृगांना सोबती असा झालो आहे.
30 Mi hud er svart og flaknar av; det brenn i mine bein av hite.
३०माझी कातडी काळी पडली आहे आणि शरीर तापाने फणफणले आहे.
31 Min cither hev eg bytt i sorg, og fløyta mi med gråtar-mål.
३१माझे वाद्य शोक गाण्यासाठीच लावले गेले आहे, माझ्या बासरीतून रडण्याचेच सूर उमटत आहेत.”

< Jobs 30 >