< गीतरत्न 8 >

1 (तरुण स्त्री आपल्या प्रियकराबरोबर बोलते) माझ्या आईचे स्तनपान केलेल्या माझ्या बंधूसारखा तू असतास तर किती बरे होते. तू मला बाहेर भेटल्यास मी तुझे चुंबन घेतले असते आणि मग माझा कोणीही अपमान केला नसता.
מִ֤י יִתֶּנְךָ֙ כְּאָ֣ח לִ֔י יֹונֵ֖ק שְׁדֵ֣י אִמִּ֑י אֶֽמְצָאֲךָ֤ בַחוּץ֙ אֶשָּׁ֣קְךָ֔ גַּ֖ם לֹא־יָב֥וּזוּ לִֽי׃
2 मी तुला माझ्याबरोबर चालवून आईच्या घरात आणले असते. तू मला शिकवले असते. मी तुला मसाला घातलेला द्राक्षरस आणि माझ्या डाळिंबाचा रस प्यायला दिला असता.
אֶנְהָֽגֲךָ֗ אֲבִֽיאֲךָ֛ אֶל־בֵּ֥ית אִמִּ֖י תְּלַמְּדֵ֑נִי אַשְׁקְךָ֙ מִיַּ֣יִן הָרֶ֔קַח מֵעֲסִ֖יס רִמֹּנִֽי׃
3 त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली असता आणि त्याचा उजवा हात मला आलिंगन देत असता.
שְׂמֹאלֹו֙ תַּ֣חַת רֹאשִׁ֔י וִֽימִינֹ֖ו תְּחַבְּקֵֽנִי׃
4 (ती स्त्री दुसऱ्या स्त्रीशी बोलते) यरूशलेमेच्या कन्यांनो, मी तुम्हास शपथ घालते. माझ्या प्रेमानंदात व्यत्यय आणू नका. समाधान होईपर्यंत राहू द्या.
הִשְׁבַּ֥עְתִּי אֶתְכֶ֖ם בְּנֹ֣ות יְרוּשָׁלָ֑͏ִם מַה־תָּעִ֧ירוּ ׀ וּֽמַה־תְּעֹֽרְר֛וּ אֶת־הָאַהֲבָ֖ה עַ֥ד שֶׁתֶּחְפָּֽץ׃ ס
5 (यरूशलेमेतील स्त्री बोलते) आपल्या प्रियकरावर टेकत रानातून येणारी ही स्त्री कोण आहे? (ती तरूण स्त्री आपल्या प्रियकराशी बोलते) मी तुला सफरचंदाच्या झाडाखाली उठवले, तेथे तुझ्या आईने तुझे गर्भधारण केले, तेथे तिने तुला जन्म दिला, ती तुला प्रसवली.
מִ֣י זֹ֗את עֹלָה֙ מִן־הַמִּדְבָּ֔ר מִתְרַפֶּ֖קֶת עַל־דֹּודָ֑הּ תַּ֤חַת הַתַּפּ֙וּחַ֙ עֹֽורַרְתִּ֔יךָ שָׁ֚מָּה חִבְּלַ֣תְךָ אִמֶּ֔ךָ שָׁ֖מָּה חִבְּלָ֥ה יְלָדַֽתְךָ׃
6 तू आपल्या हृदयावर शिक्क्याप्रमाणे, आपल्या बाहूवर शिक्क्यासारखी मला ठेव. कारण प्रेम मृत्यूसारखेच शक्तीशाली आहे. प्रेमसंशय मृतलोकासारखा कठोर आहे. त्याची ज्वाला, अग्नीज्वालेसारखी, किंबहुना प्रदीप्त केलेला तो अग्नीच आहे. (Sheol h7585)
שִׂימֵ֨נִי כַֽחֹותָ֜ם עַל־לִבֶּ֗ךָ כַּֽחֹותָם֙ עַל־זְרֹועֶ֔ךָ כִּֽי־עַזָּ֤ה כַמָּ֙וֶת֙ אַהֲבָ֔ה קָשָׁ֥ה כִשְׁאֹ֖ול קִנְאָ֑ה רְשָׁפֶ֕יהָ רִשְׁפֵּ֕י אֵ֖שׁ שַׁלְהֶ֥בֶתְיָֽה׃ (Sheol h7585)
7 असले प्रेम महाजलांच्यानेही विझवणार नाही. महापुरांनी तिला बुडवून टाकिता येणार नाही. जरी मनुष्याने प्रेमासाठी आपल्या घरची सगळी संपत्ती दिली तरी, ती त्यापुढे अगदी तुच्छ होय.
מַ֣יִם רַבִּ֗ים לֹ֤א יֽוּכְלוּ֙ לְכַבֹּ֣ות אֶת־הָֽאַהֲבָ֔ה וּנְהָרֹ֖ות לֹ֣א יִשְׁטְפ֑וּהָ אִם־יִתֵּ֨ן אִ֜ישׁ אֶת־כָּל־הֹ֤ון בֵּיתֹו֙ בָּאַהֲבָ֔ה בֹּ֖וז יָב֥וּזוּ לֹֽו׃ ס
8 (त्या तरुण स्त्रीचा बंधू त्यांच्या विषयी बोलतो) आम्हास एक लहान बहीण आहे, आणि तिच्या वक्षस्थळांची अजून पूर्ण वाढ झालेली नाही. आमच्या या बहिणीस लग्नाची मागणी होईल त्या दिवशी आम्ही काय करावे?
אָחֹ֥ות לָ֙נוּ֙ קְטַנָּ֔ה וְשָׁדַ֖יִם אֵ֣ין לָ֑הּ מַֽה־נַּעֲשֶׂה֙ לַאֲחֹתֵ֔נוּ בַּיֹּ֖ום שֶׁיְּדֻבַּר־בָּֽהּ׃
9 ती जर भिंत असती तर, आम्ही तिच्याभोवती चांदीचा मनोरा उभारला असता. ती जर दार असती तर, तिच्या भोवती आम्ही गंधसरूच्या फळ्यांनी झाकले असते.
אִם־חֹומָ֣ה הִ֔יא נִבְנֶ֥ה עָלֶ֖יהָ טִ֣ירַת כָּ֑סֶף וְאִם־דֶּ֣לֶת הִ֔יא נָצ֥וּר עָלֶ֖יהָ ל֥וּחַ אָֽרֶז׃
10 १० (ती तरुण स्त्री स्वतःशीच बोलते) मी भिंत आहे आणि माझी वक्षस्थळे बुरूजासारखे होते. म्हणून मी आपल्या प्रियकराच्या दृष्टीने पूर्ण समाधानी आहे.
אֲנִ֣י חֹומָ֔ה וְשָׁדַ֖י כַּמִּגְדָּלֹ֑ות אָ֛ז הָיִ֥יתִי בְעֵינָ֖יו כְּמֹוצְאֵ֥ת שָׁלֹֽום׃ פ
11 ११ (ती तरुणी स्वतःशी बोलते) बाल-हामोन येथे शलमोनाचा एक द्राक्षाचा मळा होता. त्याने तो मळा राखणाऱ्यांच्या स्वाधीन केला, त्याच्या फळांसाठी प्रत्येकाला एक हजार शेकेल द्यावे लागत.
כֶּ֣רֶם הָיָ֤ה לִשְׁלֹמֹה֙ בְּבַ֣עַל הָמֹ֔ון נָתַ֥ן אֶת־הַכֶּ֖רֶם לַנֹּטְרִ֑ים אִ֛ישׁ יָבִ֥א בְּפִרְיֹ֖ו אֶ֥לֶף כָּֽסֶף׃
12 १२ माझाही एक द्राक्षीचा मळा आहे. तो माझाच आहे तो माझ्यापुढे आहे. हे शलमोना, त्याचे हजार तुझे होतील, आणि दोनशे जो राखतात त्यांचे होतील.
כַּרְמִ֥י שֶׁלִּ֖י לְפָנָ֑י הָאֶ֤לֶף לְךָ֙ שְׁלֹמֹ֔ה וּמָאתַ֖יִם לְנֹטְרִ֥ים אֶת־פִּרְיֹֽו׃
13 १३ (स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे.) जी तू बागेत राहतेस. त्या तुझ्या मैत्रिणी तुझा आवाज ऐकत आहेत. मलाही तो ऐकू दे!
הַיֹּושֶׁ֣בֶת בַּגַּנִּ֗ים חֲבֵרִ֛ים מַקְשִׁיבִ֥ים לְקֹולֵ֖ךְ הַשְׁמִיעִֽינִי׃
14 १४ (ती तरुण स्त्री तिच्या प्रियकराशी बोलते) माझ्या प्रियकरा त्वरा कर. सुगंधी झाडांच्या पर्वतावर हरीणासारखा, तरुण हरीणीच्या पाडसासारखा तू हो.
בְּרַ֣ח ׀ דֹּודִ֗י וּֽדְמֵה־לְךָ֤ לִצְבִי֙ אֹ֚ו לְעֹ֣פֶר הָֽאַיָּלִ֔ים עַ֖ל הָרֵ֥י בְשָׂמִֽים׃

< गीतरत्न 8 >