< गीतरत्न 6 >

1 (यरूशलेमेतील स्त्री तरुणीशी बोलत आहे) स्त्रियांतील सर्वात सुंदरी! तुझा प्रियकर कोठे गेला आहे? तुझा प्रियकर कोणत्या दिशेने गेला आहे म्हणजे, तुझ्याबरोबर आम्ही त्यास शोधावयाला येऊ?
[Moças]: Para onde foi o teu amado, ó tu mais bela entre as mulheres? Para que direção se virou o teu amado, para o procurarmos contigo?
2 (ती तरुण स्त्री स्वतःशीच बोलते) माझा प्रियकर आपल्या बागेत सुगंधी झाडांच्या वाफ्यांकडे, बागेत आपला कळप चारायला आणि कमळे वेचण्यास गेला आहे.
[Ela]: Meu amado desceu ao seu jardim, aos canteiros de especiarias, para apascentar [seu rebanho] nos jardins, e para colher lírios.
3 मी आपल्या प्रियकराची आहे. तो प्रियकर माझा आहे. तो आपला कळप कमलपुष्पात चारत आहे.
Eu sou do meu amado, e meu amado é meu; ele apascenta entre os lírios.
4 (स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) माझ्या प्रिये, तू तिरसा नगरीप्रमाणे सुंदर आहेस. यरूशलेमेसारखी सुरूप आहेस. ध्वजा फडकिवणाऱ्या सेनेसारखी भयंकर आहेस.
[Ele]: Tu és bela, minha querida, como Tirza, agradável como Jerusalém; és formidável como bandeiras [de exércitos].
5 तू आपले डोळे माझ्यापासून फिरीव, त्यांनी मला घाबरे केले आहे. जो शेरडांचा कळप गिलाद पर्वताच्या बाजूवर बसला आहे त्यासारखे तुझे केस आहेत.
Afasta teus olhos de mim, pois eles me deixam desconcertado. Teu cabelo é como um rebanho de cabras, que descem de Gileade.
6 ज्या मेंढ्या धुतल्या जाऊन वरती आल्या आहेत, ज्यांतल्या प्रत्येकीला जुळे आहे, आणि ज्यांतली कोणी पिल्ले वेगळी झाली नाही, त्यांच्या कळपासारखे तुझे दात आहेत.
Teus dentes são como um rebanho de ovelhas, que sobem do lavatório; todas produzem gêmeos, e não há estéril entre elas.
7 तुझ्या बुरख्याच्या आत तुझी कानशिले डाळिंबाच्या फोडींसारखी आहेत.
Como um pedaço de romã, assim são as laterais de teu rosto abaixo de teu véu.
8 (स्त्रीचा प्रियकर स्वतःशीच बोलतो) साठ राण्या आणि ऐंशी उपपत्नी, आणि अगणित कुमारी असतील.
Sessenta são as rainhas, e oitenta as concubinas; e as donzelas são inúmeras;
9 पण माझे कबुतर, माझी सर्वोत्कृष्ट एकच आहे, ती तिच्या आईची एकुलती एक विशेष मुलगी आहे, आपल्या जननीची आवडती आहे. माझ्या नगरातील कन्यांनी तिला पाहिले आणि तिला आशीर्वादित म्हटले, राण्यांनी आणि उपपत्नींनीसुध्दा तिची स्तुती केली.
[Porém] uma é a minha pomba, minha perfeita, a única de sua mãe, a mais querida daquela que a gerou. As moças a viram, e a chamaram de bem-aventurada; as rainhas e as concubinas a elogiaram.
10 १० ती पहाटेप्रमाणे चमकते आहे, ती चंद्रासारखी सुंदर आहे. सूर्यासारखी तेजस्वी आहे; आणि आकाशातल्या सैन्याप्रमाणे भयंकर आहे. ती पूर्णपणे आकर्षित करून घेणारी कोण आहे?
Quem é esta, que aparece como o nascer do dia, bela como a lua, brilhante como o sol, formidável como bandeiras [de exércitos]?
11 ११ खोऱ्यातील हिरवीगार झाडेझुडपे बघायला, द्राक्षाच्या वेली फुलल्या आहेत की काय, डाळिंबांना फुले आले आहेत की काय, ते बघायला मी आक्रोडाच्या मळ्यातून गेले.
Desci ao jardim das nogueiras, para ver os frutos do vale; para ver se as videiras estavam floridas, [e se] as romãzeiras brotavam.
12 १२ मी खूप आनंदीत होते, जसे मला राजपुत्राच्या रथात बसवले होते.
Sem eu perceber, minha alma me pôs nas carruagens de meu nobre povo.
13 १३ (त्या स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) मागे फिर, परत ये, हे शुलेमकरिणी परिपूर्ण स्त्री, मागे फिर, मागे फिर म्हणजे आम्ही तुला बघू शकू, (ती तरुण स्त्री प्रियकराला म्हणते) त्या परिपूर्ण स्त्रीकडे तुम्ही टक लावून का पाहता? जसे मी दोन नृत्य करणाऱ्याच्या रांगेत नृत्य करत आहे काय?
[Moças]: Volta! Volta, Sulamita! Volta! Volta, e nós te veremos! [Ele]: Por que [quereis] ver a Sulamita, como a dança de duas companhias?

< गीतरत्न 6 >