< स्तोत्रसंहिता 88 >

1 कोरहाच्या मुलांची स्तोत्रे हे परमेश्वरा, माझ्या तारणाऱ्या देवा, मी रात्र व दिवस तुझ्यापुढे आरोळी करतो.
Oh Gospod Bog, rešitev moje duše, pred teboj sem klical dan in noč.
2 माझी प्रार्थना ऐक; माझ्या आरोळीकडे लक्ष दे.
Naj moja molitev pride predte, svoje uho nagni k mojemu klicu,
3 कारण माझा जीव क्लेशांनी भरला आहे, आणि माझे जीवन मृतलोकाजवळ आले आहे. (Sheol h7585)
kajti moja duša je polna stisk in moje življenje se bliža grobu. (Sheol h7585)
4 खाचेत खाली जातात त्यांच्यासारखे लोक माझ्याशी वागत आहेत; मी असहाय्य मनुष्यासारखा आहे.
Prištet sem s tistimi, ki gredo dol v jamo. Sem kakor človek, ki nima moči.
5 मला मृतामध्ये सोडून दिले आहे; अशा मृतासारखा जो कबरेत पडून राहतो, ज्याची तू आणखी दखल घेत नाहीस, ज्याला तुझ्या सामर्थ्यापासून कापून टाकले आहेत, त्यांच्यासारखा मी झालो आहे.
Svoboden med mrtvimi, kakor umorjeni, ki ležijo v grobu, ki se jih ne spominjaš več in so iztrebljeni iz tvoje roke.
6 तू मला त्या खड्‌यांतल्या खालच्या भागात, काळोखात व अगदी खोल जागी टाकले आहेस.
Položil si me v najglobljo jamo, v temo, v globine.
7 तुझ्या क्रोधाचे खूप ओझे माझ्यावर पडले आहे, आणि तुझ्या सर्व लाटा माझ्यावर जोराने आपटत आहेत.
Tvoj bes trdno leži na meni in prizadel si me z vsemi svojimi valovi. (Sela)
8 तुझ्यामुळे माझ्या ओळखीचे मला टाळतात. त्यांच्या दृष्टीने माझा त्यांना वीट येईल असे तू केले आहे; मी आत कोंडलेला आहे आणि मी निसटू शकत नाही.
Mojega znanca si postavil daleč od mene, njim si me naredil [za] ogabnost; zaprt sem in ne morem priti ven.
9 कष्टामुळे माझे डोळे थकून जात आहेत; हे परमेश्वरा, मी दिवसभर तुला आरोळी मारित आहे. मी आपले हात तुझ्यापुढे पसरत आहे.
Moje oko žaluje zaradi stiske; Gospod, vsak dan sem klical k tebi, svoje roke sem iztegoval k tebi.
10 १० तू मृतांसाठी चमत्कार करशील काय? जे मरण पावलेले आहेत ते उठून तुझी स्तुती करतील काय?
Hočeš mrtvim pokazati čudeže? Mar bodo mrtvi vstali in te hvalili? (Sela)
11 ११ तुझ्या दयेची व प्रामाणिकपणाची कबरेत किंवा मृतांच्या जागी घोषणा होईल का?
Bo tvoja ljubeča skrbnost oznanjena v grobu? Ali tvoja zvestoba v propadu?
12 १२ तुझ्या विस्मयकारक कृतीचे अंधारात किंवा विस्मरणलोकी तुझे नितीमत्व कळेल काय?
Bodo tvoji čudeži spoznani v temi? In tvoja pravičnost v deželi pozabljivosti?
13 १३ परंतु हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो; सकाळी माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर होते.
Toda jaz sem klical k tebi, oh Gospod in zjutraj te bo moja molitev prestregla.
14 १४ हे परमेश्वरा, तू माझा त्याग का केलास? तू आपले मुख माझ्यापासून का लपवतोस?
Gospod, zakaj zavračaš mojo dušo? Zakaj skrivaš svoj obraz pred menoj?
15 १५ मी नेहमीच पीडित असून माझ्या तरुणपणापासूनच मरणोन्मुख झालो आहे; मी तुझ्या दहशतीने व्यथित झालो आहे; मी काहीच करू शकत नाही.
Prizadet sem in od svoje mladosti pripravljen umreti; medtem ko trpim tvoje strahote, sem raztresen.
16 १६ तुझा संतप्त क्रोध माझ्यावरून चालला आहे, आणि तुझ्या घाबरून सोडणाऱ्या कृत्यांनी माझा संपूर्ण नाश केला आहे.
Tvoj kruti bes gre prek mene, tvoje strahote so me uničile.
17 १७ त्यांनी दिवसभर मला जलाप्रमाणे घेरले आहे; त्यांनी मला सर्वस्वी वेढून टाकले आहे.
Vsak dan so prišli okoli mene kakor voda, skupaj so me obkrožali.
18 १८ तू माझ्यापासून प्रत्येक मित्राला आणि परिचितांना दूर केले आहेस. माझा परिचयाचा केवळ काळोख आहे.
Ljubega in prijatelja si postavil daleč od mene in mojega znanca v temo.

< स्तोत्रसंहिता 88 >