< स्तोत्रसंहिता 85 >

1 कोरहाच्या मुलांची स्तोत्रे हे परमेश्वरा, तू आपल्या देशावर अनुग्रह दाखवला आहेस; तू याकोबाला बंदिवासातून परत आणले आहेस.
Al Vencedor: A los hijos de Coré. Salmo. Fuiste propicio a tu tierra, oh SEÑOR; volviste la cautividad de Jacob.
2 तू आपल्या लोकांच्या पापांची क्षमा केली आहेस. तू त्यांची सर्व पापे झाकून टाकली आहेत.
Perdonaste la iniquidad de tu pueblo; cubriste todos los pecados de ellos. (Selah)
3 तू आपला सर्व क्रोध काढून घेतला आहे; आणि आमच्यावरील भयंकर क्रोधापासून मागे फिरला आहेस.
Quitaste toda tu saña; te volviste de la ira de tu furor.
4 हे आमच्या तारणाऱ्या देवा, आम्हास परत आण, आणि आमच्यावरचा तुझा असंतोष दूर कर.
Vuélvenos, oh Dios, salud nuestra, y haz cesar tu ira de sobre nosotros.
5 सर्वकाळपर्यंत तू आमच्यावर रागावलेला राहशील का? पिढ्यानपिढ्या तू रागावलेला राहशील काय?
¿Estarás enojado contra nosotros para siempre? ¿Extenderás tu ira de generación en generación?
6 तुझ्या लोकांनी तुझ्याठायी आनंद करावा, म्हणून तू आम्हास परत जिवंत करणार नाहीस का?
¿No volverás tú a darnos vida, y tu pueblo se alegrará en ti?
7 हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा अनुभव आम्हास येऊ दे; तू कबूल केलेले तारण आम्हास दे.
Muéstranos, oh SEÑOR, tu misericordia, y danos tu salud.
8 परमेश्वर देव काय म्हणेल ते मी ऐकून घेईन. कारण तो आपल्या लोकांशी व विश्वासू अनुयायींशी शांती करेल, तरी मात्र त्यांनी मूर्खाच्या मार्गाकडे पुन्हा वळू नये.
Escucharé lo que hablará Dios el SEÑOR; porque hablará paz a su pueblo y a sus santos, para que no se conviertan otra vez a la locura.
9 खचित जे त्यास भितात त्यांच्याजवळ त्याचे तारण आहे; यासाठी आमच्या देशात वैभव रहावे.
Ciertamente cercana está su salud a los que le temen; para que habite la gloria en nuestra tierra.
10 १० दया व सत्य एकत्र मिळाली आहेत; निती आणि शांती यांनी एकमेकांचे चुंबन घेतले आहे.
La misericordia y la verdad se encontraron; la justicia y la paz se besaron.
11 ११ पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे, आणि स्वर्गातून नितिमत्व खाली पाहत आहे.
La verdad reverdecerá de la tierra; y la justicia mirará desde los cielos.
12 १२ जे उत्तम ते परमेश्वर देईल, आणि आमची भूमी आपले पिक देईल.
El SEÑOR dará también el bien; y nuestra tierra dará su fruto.
13 १३ त्याच्यासमोर नितीमत्व चालेल, आणि त्याच्या पावलांसाठी मार्ग तयार करील.
La justicia irá delante de él; y pondrá sus pasos en camino.

< स्तोत्रसंहिता 85 >