< स्तोत्रसंहिता 61 >

1 दाविदाचे स्तोत्र हे देवा, माझी आरोळी ऐक; माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे.
(다윗의 시. 영장으로 현악에 맞춘 노래) 하나님이여, 나의 부르짖음을 들으시며 내 기도에 유의하소서
2 जेव्हा माझे हृदय हतबल होते तेव्हा मी पृथ्वीच्या शेवटापासून तुला हाक मारीन; माझ्यापेक्षा उंच जो खडक त्याकडे मला ने.
내 마음이 눌릴 때에 땅 끝에서부터 주께 부르짖으오리니 나보다 높은 바위에 나를 인도하소서
3 कारण तू माझ्यासाठी आश्रय, माझ्या शत्रूपासून बळकट बुरूज आहेस.
주는 나의 피난처시요 원수를 피하는 견고한 망대심이니이다
4 मी तुझ्या मंडपात सर्वकाळ राहीन; मी तुझ्या पंखाच्या सावलीखाली आश्रय घेईन.
내가 영원히 주의 장막에 거하며 내가 주의 날개 밑에 피하리이다 (셀라)
5 कारण हे देवा, तू माझी नवसाची प्रार्थना ऐकली आहेस; जे तुझ्या नावाचा सन्मान करतात ते वतन तू मला दिले आहे.
하나님이여, 내 서원을 들으시고 주의 이름을 경외하는 자의 얻을 기업을 내게 주셨나이다
6 तू राजाचे आयुष्य वाढव; त्याच्या आयुष्याची वर्षे अनेक पिढ्यांच्या वर्षाइतकी होवोत.
주께서 왕으로 장수케 하사 그 나이 여러 대에 미치게 하시리이다
7 मी देवासमोर सर्वकाळ राहो; तुझी प्रीती आणि सत्य त्यांचे रक्षण करतील.
저가 영원히 하나님 앞에 거하리니 인자와 진리를 예비하사 저를 보호하소서
8 मी तुझ्या नावाची स्तवने सर्वकाळ गाईन, म्हणजे, मी प्रतीदिनी माझे नवस फेडीत राहीन.
그리하시면 내가 주의 이름을 영원히 찬양하며 매일 나의 서원을 이행하리이다

< स्तोत्रसंहिता 61 >