< स्तोत्रसंहिता 29 >

1 दाविदाचे स्तोत्र. स्वर्गदूतहो, परमेश्वरास गौरव आणि सामर्थ्य आहे असे कबूल करा.
Dajajte Gospodu, oh vi mogočni, dajajte Gospodu slavo in moč.
2 परमेश्वरास त्याच्या वैभवी नावाचे श्रेय द्या; पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा.
Dajajte Gospodu slavo, primerno njegovemu imenu, obožujte Gospoda v lepoti svetosti.
3 परमेश्वराचा आवाज जलांवरून ऐकण्यात आला, गौरवशाली देव गर्जत आहे, परमेश्वर पुष्कळ जलांवर गर्जत आहे.
Glas Gospodov je nad vodami. Bog slave grmi. Gospod je nad mnogimi vodami.
4 परमेश्वराचा आवाज सामर्थशाली आहे, परमेश्वराचा आवाज चमत्कारीक आहे.
Glas Gospodov je močan, glas Gospodov je poln veličanstva.
5 परमेश्वराची वाणी देवदार वृक्षाला तोडते, परमेश्वर लबानोनाच्या देवदार वृक्षाचे तुकडे करतो.
Glas Gospodov lomi cedre, da, Gospod lomi libanonske cedre.
6 तो लबानोनला वासराप्रमाणे आणि सिर्योनला तरुण बैलाप्रमाणे बागडायला लावतो.
Dela jih tudi, da poskakujejo kakor tele, Libanon in Sirjón kakor mlad samorog.
7 परमेश्वराची वाणी अग्नी ज्वालासह हल्ला करते.
Glas Gospodov razdeljuje plamene ognja.
8 परमेश्वराची वाणी वाळवंटाला कंपित करते कादेशचे वाळवंट परमेश्वराच्या वाणीने हादरते.
Glas Gospodov trese divjino, Gospod trese kadéško divjino.
9 परमेश्वराची वाणी हरणाला प्रसवयास लावते आणि अरण्य पर्णहीन करते. पण त्याच्या मंदिरात सर्व “महिमा!” गातात
Glas Gospodov dela košutam, da povržejo in odkriva gozdove. V njegovem templju vsakdo govori o njegovi slavi.
10 १० महापुरावर परमेश्वर राजा बसला आहे, आणि परमेश्वरच सर्वकाळचा राजा म्हणून बसला आहे.
Gospod sedi na potopu, da, Gospod sedi, Kralj na veke.
11 ११ परमेश्वर त्याच्या लोकांना सामर्थ्य देतो, परमेश्वर त्याच्या लोकांना शांतीने आशीर्वादित करतो.
Gospod bo dal svojemu ljudstvu moč, Gospod bo svoje ljudstvo blagoslovil z mirom.

< स्तोत्रसंहिता 29 >