< स्तोत्रसंहिता 149 >

1 परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वरास नवे गीत गा; विश्वासणाऱ्याच्या मंडळीत त्याचे गीत गा.
הללו-יה שירו ליהוה שיר חדש תהלתו בקהל חסידים
2 इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव करो. सियोनेचे लोक आपल्या राजाच्या ठायी आनंद करोत.
ישמח ישראל בעשיו בני-ציון יגילו במלכם
3 ते त्याच्या नावाची स्तुती नाचून करोत; ते त्याच्या स्तुतीचे गीत डफाने आणि वीणेने करो.
יהללו שמו במחול בתף וכנור יזמרו-לו
4 कारण परमेश्वर आपल्या लोकात आनंद घेत आहे; तो दीनांना तारणाने गौरवितो.
כי-רוצה יהוה בעמו יפאר ענוים בישועה
5 भक्त विजयाने हर्षभरित होवोत; ते आपल्या अंथरुणावरुन विजयासाठी गाणे गावो.
יעלזו חסידים בכבוד ירננו על-משכבותם
6 देवाची स्तुती त्यांच्या मुखात असो, आणि दुधारी तलवार त्यांच्या हातात असो.
רוממות אל בגרונם וחרב פיפיות בידם
7 यासाठी की त्यांनी राष्ट्रावर सूड उगवावा आणि लोकांस शिक्षा करावी.
לעשות נקמה בגוים תוכחות בלאמים
8 ते त्यांच्या राजांना साखळंदडाने आणि त्यांच्या सरदारांना लोखंडी बेड्यांनी बांधतील.
לאסר מלכיהם בזקים ונכבדיהם בכבלי ברזל
9 ते लिहून ठेवलेला जो न्याय आहे तो अंमलात आणतील. हा त्याच्या सर्व विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आदर आहे. परमेश्वराची स्तुती करा.
לעשות בהם משפט כתוב-- הדר הוא לכל-חסידיו הללו-יה

< स्तोत्रसंहिता 149 >