< स्तोत्रसंहिता 130 >

1 हे परमेश्वरा, मी तुला शोकसागरातून आरोळी मारीत आहे.
(성전에 올라가는 노래) 여호와여, 내가 깊은 데서 주께 부르짖었나이다
2 हे प्रभू, माझी वाणी ऐक; माझ्या विनवणीच्या वाणीकडे तुझे कान लक्षपूर्वक लागलेले असोत.
주여, 내 소리를 들으시며 나의 간구하는 소리에 귀를 기울이소서
3 हे परमेश्वरा, तू जर अन्याय लक्षात ठेवशील तर, हे प्रभू, तुझ्यासमोर कोण उभा राहू शकेल?
여호와여, 주께서 죄악을 감찰하실진대 주여, 누가 서리이까
4 पण त्यांनी तुझे भय धरावे, म्हणून तुझ्याजवळ क्षमा आहे.
그러나 사유하심이 주께 있음은 주를 경외케 하심이니이다
5 मी परमेश्वराची वाट पाहतो, माझा आत्मा वाट पाहतो, आणि त्याच्या वचनावर मी आशा ठेवतो.
나 곧 내 영혼이 여호와를 기다리며 내가 그 말씀을 바라는도다
6 पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यापेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो.
파숫군이 아침을 기다림보다 내 영혼이 주를 더 기다리나니 참으로 파숫군의 아침을 기다림보다 더하도다
7 हे इस्राएला, परमेश्वरावर आशा ठेव. कारण परमेश्वर दयाळू आहे, आणि त्याच्याजवळ विपुल उद्धार आहे.
이스라엘아 여호와를 바랄지어다! 여호와께는 인자하심과 풍성한 구속이 있음이라
8 तोच इस्राएलास त्यांच्या सर्व पापांपासून मुक्त करीन.
저가 이스라엘을 그 모든 죄악에서 구속하시리로다

< स्तोत्रसंहिता 130 >