< स्तोत्रसंहिता 127 >

1 परमेश्वर जर घर बांधीत नाही, तर तो जे बांधतो ते काम व्यर्थ आहे. जर परमेश्वर नगर रक्षित नाही, तर पहारेकरी उभे राहून रक्षण करतात ते व्यर्थ आहे.
שִׁ֥יר הַֽמַּֽעֲל֗וֹת לִשְׁלֹ֫מֹ֥ה אִם־יְהוָ֤ה ׀ לֹא־יִבְנֶ֬ה בַ֗יִת שָׁ֤וְא ׀ עָמְל֣וּ בוֹנָ֣יו בּ֑וֹ אִם־יְהוָ֥ה לֹֽא־יִשְׁמָר־עִ֝֗יר שָׁ֤וְא ׀ שָׁקַ֬ד שׁוֹמֵֽר׃
2 तुम्ही पहाटे लवकर उठता, रात्री उशीराने घरी येता, किंवा कठोर परिश्रम करून भाकर खाता हे सर्व व्यर्थ आहे कारण परमेश्वर आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो.
שָׁ֤וְא לָכֶ֨ם ׀ מַשְׁכִּ֪ימֵי ק֡וּם מְאַֽחֲרֵי־שֶׁ֗בֶת אֹ֭כְלֵי לֶ֣חֶם הָעֲצָבִ֑ים כֵּ֤ן יִתֵּ֖ן לִֽידִיד֣וֹ שֵׁנָֽא׃
3 पाहा, मुले ही परमेश्वरापासून मिळालेले वतन आहे, आणि पोटचे फळ त्याच्यापासून मिळालेली देणगी आहे.
הִנֵּ֤ה נַחֲלַ֣ת יְהוָ֣ה בָּנִ֑ים שָׂ֝כָ֗ר פְּרִ֣י הַבָּֽטֶן׃
4 तरुणपणाची मुले हे वीराच्या हातातील बाणांसारखी आहेत.
כְּחִצִּ֥ים בְּיַד־גִּבּ֑וֹר כֵּ֝֗ן בְּנֵ֣י הַנְּעוּרִֽים׃
5 ज्या मनुष्याचा भाता अशांनी भरला आहे, तो धन्य! तो वेशीवर शत्रूंशी त्याची बोलाचाली होत असता, ते फजीत होणार नाहीत.
אַשְׁרֵ֤י הַגֶּ֗בֶר אֲשֶׁ֤ר מִלֵּ֥א אֶת־אַשְׁפָּת֗וֹ מֵ֫הֶ֥ם לֹֽא־יֵבֹ֑שׁוּ כִּֽי־יְדַבְּר֖וּ אֶת־אוֹיְבִ֣ים בַּשָּֽׁעַר׃

< स्तोत्रसंहिता 127 >