< स्तोत्रसंहिता 110 >

1 दाविदाचे स्तोत्र माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो “तुझ्या शत्रूंना तुझे पादासन करीपर्यंत माझ्या उजव्या बाजूला बस.”
De David. Psaume. L’Éternel a dit à mon Seigneur: Assieds-toi à ma droite, jusqu’à ce que je mette tes ennemis pour le marchepied de tes pieds.
2 परमेश्वर म्हणतो, तुझ्या सामर्थ्याची काठी सियोनेपासून पुढे चालवील; तू आपल्या शत्रूंवर राज्य करशील.
L’Éternel enverra de Sion la verge de ta force: Domine au milieu de tes ennemis!
3 तुझे वैभवशाली सामर्थ्य दाखवण्याच्या दिवशी पवित्र पर्वतावर तुझे लोक स्वसंतोषाने पुढे होतात, पहाटेच्या उदरातून आलेले दवासारखे तुझे तरुण तुला आहेत.
Ton peuple sera [un peuple] de franche volonté, au jour de ta puissance, en sainte magnificence. Du sein de l’aurore te [viendra] la rosée de ta jeunesse.
4 परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि तो बदलणार नाही, “तू मलकीसदेकाच्या प्रकाराप्रमाणे तू सर्वकाळ याजक आहेस.”
L’Éternel a juré, et il ne se repentira point: Tu es sacrificateur pour toujours, selon l’ordre de Melchisédec.
5 प्रभू तुझ्या उजव्या हाताला आहे. तो आपल्या क्रोधाच्या दिवशी राजांचा वध करील.
Le Seigneur, à ta droite, brisera les rois au jour de sa colère.
6 तो राष्ट्रांचा न्यायनिवाडा करील; तो प्रेतांनी दऱ्या भरील; तो अनेक राष्ट्रात नेत्यांना मारील.
Il jugera parmi les nations, il remplira [tout] de corps morts, il brisera le chef d’un grand pays.
7 तो मार्गाने चालत असता झऱ्यातले पाणी पिईल, आणि मग तो विजयानंतर आपले डोके वर उचलेल.
Il boira du torrent dans le chemin, c’est pourquoi il lèvera haut la tête.

< स्तोत्रसंहिता 110 >