< स्तोत्रसंहिता 106 >

1 परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वर चांगला आहे म्हणून त्यास धन्यवाद द्या. कारण त्याची कराराची विश्वसनीयता सर्वकाळ टिकून राहते.
Hvalite Gospoda, jer je dobar, jer je dovijeka milost njegova.
2 परमेश्वराच्या पराक्रमाची कृत्ये कोण कथन करू शकेल? किंवा त्याची सर्व स्तुत्य कृत्ये कोण पूर्ण जाहीर करील?
Ko æe iskazati silu Gospodnju? isprièati svu slavu njegovu?
3 जे काही योग्य आहे ते करतात आणि ज्याची कृत्ये न्याय्य आहेत ते आशीर्वादित आहेत.
Blago onima koji drže istinu i tvore pravo svagda!
4 हे परमेश्वरा, तू जेव्हा आपल्या लोकांवर कृपा दाखवतोस तेव्हा माझी आठवण कर; तू त्यांना जेव्हा तारशील मला मदत कर.
Opomeni me se, Gospode, po svojoj milosti k narodu svojemu; pohodi me pomoæu svojom,
5 मग मी तुझ्या निवडलेल्यांचा उत्कर्ष पाहिन, परमेश्वरा, तुझ्या राष्ट्रांच्या आनंदाने मी हर्ष करीन, आणि तुझ्या वतनाबरोबर उत्सव करीन.
Da bih vidio u dobru izbrane tvoje, veselio se u veselju naroda tvojega, hvalio se zajedno s našljedstvom tvojim.
6 आम्ही आमच्या पूर्वजांसारखेच पाप केले; आम्ही चूक केली आणि आम्ही दुष्कृत्ये केली.
Zgriješismo s ocima svojim, postasmo krivci, bezakonici.
7 आमच्या वडिलांनी मिसर देशात तुझ्या आश्चर्यकारक कृत्याचे महत्व ओळखले नाही; त्यांनी तुझ्या कराराच्या विश्वसनीयतेच्या कृत्यांकडे दुर्लक्ष केले; तर समुद्राजवळ, लाल समुद्राजवळ त्यांनी बंडखोरी केली.
Oci naši u Misiru ne razumješe èudesa tvojih, ne opominjaše se velikih milosti tvojih, i vikaše kraj mora, kraj Crvenoga Mora.
8 तरीसुद्धा, आपल्या नावाकरिता त्याने त्यांचे तारण केले, यासाठी की, त्याने आपले सामर्थ्य उघड करावे.
Ali im on pomože imena svojega radi, da bi pokazao silu svoju.
9 त्याने लाल समुद्राला धमकावले आणि तो कोरडा झाला. मग त्याने त्यांना मैदानातून चालावे तसे खोल पाण्याच्या जागेतून नेले.
Zaprijeti Crvenom Moru, i presahnu; i prevede ih preko bezdane kao preko pustinje;
10 १० त्यांचा द्वेष करणाऱ्याच्या हातातून त्याने त्यास वाचवले, आणि त्यांना त्यांच्या शत्रूंच्या शक्तीपासून सोडवले.
I saèuva ih od ruke nenavidnikove, i izbavi ih iz ruke neprijateljeve.
11 ११ परंतु त्यांच्या शत्रूंना पाण्याने झाकून टाकले. त्यापैकी एकही जण वाचला नाही.
Pokri voda neprijatelje njihove, nijedan od njih ne osta.
12 १२ नंतर त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला आणि त्यांनी त्याची स्तुती गाइली.
Tada vjerovaše rijeèima njegovijem, i pjevaše mu hvalu.
13 १३ परंतु ते लवकरच त्याने जे केले ते विसरले; त्यांनी त्याच्या सूचनेची वाट पाहिली नाही.
Ali brzo zaboraviše djela njegova, i ne poèekaše volje njegove.
14 १४ रानात त्यांची अतृप्त हाव अनावर झाली, आणि त्यांनी देवाला आव्हान दिले.
Polakomiše se u pustinji, i stadoše kušati Boga u zemlji gdje se ne živi.
15 १५ त्याने त्यांना त्यांच्या विनंतीप्रमाणे दिले, पण त्याने रोग पाठवला तो त्यांचे शरीर नष्ट करू लागला.
On ispuni molbu njihovu, ali posla pogibao na dušu njihovu.
16 १६ त्यांनी छावणीत मोशे आणि परमेश्वराचा पवित्र याजक अहरोन यास चिडीस आणले.
Pozavidješe Mojsiju i Aronu, kojega bješe Gospod osvetio.
17 १७ जमीन दुभंगली आणि तिने दाथानाला गिळून टाकले, आणि अबीरामाच्या अनुयांना झाकून टाकले.
Rasjede se zemlja, i proždrije Datana i zatrpa èetu Avironovu.
18 १८ त्यांच्यात अग्नीने पेट घेतला; अग्नीने त्या दुष्टांना खाऊन टाकले.
I spali oganj èetu njihovu, i plamen sažeže bezbožnike.
19 १९ त्यांनी होरेबात सोन्याचे वासरू केले. आणि त्यांनी त्या ओतीव मूर्तीची पूजा केली.
Naèiniše tele kod Horiva, i klanjahu se kipu.
20 २० त्यांनी गवत खाणाऱ्या बैलाच्या मूर्तीसाठी आपल्या वैभवी देवाची अदलाबदल केली.
Mijenjahu slavu svoju na priliku vola, koji jede travu.
21 २१ ते आपल्या तारणाऱ्या देवाला विसरले, ज्याने मिसरात महान कृत्ये केली होती.
Zaboraviše Boga, spasitelja svojega, koji je uèinio velika djela u Misiru,
22 २२ त्याने हामाच्या देशात आश्चर्यकारक गोष्टी केल्या आणि लाल समुद्राजवळ पराक्रमी कृत्ये केली.
Divna u zemlji Hamovoj, strašna na Crvenom Moru.
23 २३ म्हणून तो म्हणाला, आपण त्यांचा नाश करू. जर त्याचा निवडलेला मोशे त्यास क्रोध त्यांचा नाश करण्यापासून मागे फिरायला, त्याच्यापुढे खिंडारात उभा राहिला नसता तर त्याने तसे केले असते.
I šæaše ih istrijebiti, da Mojsije izbranik njegov ne stade kao u rasjelini pred njim, i ne odvrati jarost njegovu da ih ne istrijebi.
24 २४ नंतर त्यानीं फलदायी देश तुच्छ मानला; त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला नाही,
Poslije ne mariše za zemlju željenu, ne vjerovaše rijeèi njegovoj.
25 २५ पण आपल्या तंबूत त्यांनी कुरकुर केली, आणि परमेश्वराचा शब्द मानिला नाही.
Pobuniše se u šatorima svojim, ne slušaše glasa Gospodnjega.
26 २६ म्हणून त्याने त्यांच्याविषयी शपथ वाहिली की, मी त्यांना रानात मरू देईन.
I on podiže ruku svoju na njih, da ih pobije u pustinji,
27 २७ त्यांचे वंशज राष्ट्रामध्ये विखरीन, आणि त्यांना परक्या राष्ट्रांमध्ये विखरवून टाकीन.
Da pobije pleme njihovo meðu narodima, i rasije ih po zemljama.
28 २८ त्यांनी बआल-पौराची पूजा केली, आणि मरण पावलेल्यांना अर्पण केलेले बली त्यांनी खाल्ले.
I pristaše za Velfegorom, i jedoše prineseno na žrtvu mrtvima.
29 २९ त्यांनी त्यांच्या कृतीने त्यास कोपविले, आणि त्यांच्यात मरी पसरली.
I rasrdiše Boga djelima svojim, i udari u njih pogibao.
30 ३० पण फिनहास मध्यस्थी उठला; आणि मरी बंद झाली.
I ustade Fines, i umilostivi, i prestade pogibao.
31 ३१ हे त्यास नितीमत्व असे सर्व पिढ्यानपिढ्या सर्वकाळ गणण्यात आले.
I to mu se primi u pravdu, od koljena do koljena dovijeka.
32 ३२ त्यांनी मरीबा येथील जलाजवळही त्यास संताप आणला, आणि त्यांमुळे मोशेला दुःख सोसावे लागले.
I razgnjeviše Boga na vodi Merivi, i Mojsije postrada njih radi;
33 ३३ त्यांनी त्याच्यात कडवटपणा आणला, आणि तो अविचाराने बोलला.
Jer dotužiše duhu njegovu, i pogriješi ustima svojima.
34 ३४ परमेश्वराने त्यांना आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी राष्ट्रांचा नाश केला नाही.
Ne istrijebiše naroda, za koje im je Gospod rekao;
35 ३५ पण ते अन्यजाती लोकांच्या राष्ट्रात मिसळले, व त्यांचे मार्ग शिकले.
Nego se pomiješaše s neznabošcima, i nauèiše djela njihova.
36 ३६ आणि त्यांच्या मूर्तींची पूजा केली, ते त्यांच्यासाठी सापळा बनले.
Stadoše služiti idolima njihovijem, i oni im biše zamka.
37 ३७ त्यांनी आपली मुले आणि मुली यांचा भुतांना यज्ञ केला.
Sinove svoje i kæeri svoje prinosiše na žrtvu ðavolima.
38 ३८ त्यांनी निरपराध्यांचे रक्त पाडले, त्यांनी आपली मुले आणि मुली, ज्यांचा यज्ञ त्यांनी कनानाच्या मूर्तीस केला, त्यांचे रक्त पाडले आणि भूमी रक्ताने विटाळली गेली.
Prolivaše krv pravu, krv sinova svojih i kæeri svojih, koje prinošahu na žrtvu idolima Hananskim, i oskvrni se zemlja krvnijem djelima.
39 ३९ ते आपल्या कृत्यांनी अशुद्ध झाले, आणि आपल्या कृतींत अनाचारी बनले.
Oskvrniše sebe djelima svojim, i èiniše preljubu postupanjem svojim.
40 ४० त्यामुळे परमेश्वर त्याच्या लोकांवर रागावला, त्यास आपल्या स्वतःच्या वतनाचा वीट आला.
I planu gnjev Gospodnji na narod njegov, i omrznu mu dio njegov.
41 ४१ त्याने त्यांना राष्ट्रांच्या हाती दिले, आणि ज्यांनी त्यांचा द्वेष केला त्यांनी त्यांच्यावर राज्य केले.
I predade ih u ruke neznabožaèke, i nenavidnici njihovi stadoše gospodariti nad njima.
42 ४२ त्यांच्या शत्रूंनी त्यांना पीडीले, आणि ते त्यांच्या अधिकाराखाली ते अधीन झाले.
Dosaðivaše im neprijatelji njihovi, i oni biše pokoreni pod vlast njihovu.
43 ४३ अनेक वेळा तो त्यांना मदत करण्यास आला, पण ते त्याच्याविरुध्द बंड करीत राहीले, आणि ते आपल्या पापाने नीच करण्यात आले.
Mnogo ih je puta izbavljao, ali ga oni srdiše namjerama svojim, i biše poništeni za bezakonje svoje.
44 ४४ तथापि त्याने त्यांची मदतीसाठीची आरोळी ऐकली, तेव्हा त्याने त्यांच्या क्लेशाकडे लक्ष दिले.
Ali on pogleda na nevolju njihovu, èuvši tužnjavu njihovu,
45 ४५ त्यांच्यासाठी त्याने आपल्या कराराची आठवण केली, आणि आपल्या अपार दयेने सौम्यता धारण केली.
I opomenu se zavjeta svojega s njima, i pokaja se po velikoj milosti svojoj;
46 ४६ त्याने त्यांचा पाडाव करणाऱ्या सर्वांच्या मनात त्यांच्यावर दया येईल असे केले.
I uèini, te ih stadoše žaliti svi koji ih bjehu zarobili.
47 ४७ हे परमेश्वरा, आमच्या देवा, आम्हास तार. आम्हास राष्ट्रातून काढून एकत्र गोळा कर; म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नावाचे आभार मानू आणि तुझे गुणगान करू.
Spasi nas, Gospode Bože naš, i pokupi nas iz neznabožaca, da slavimo sveto ime tvoje, da se hvalimo tvojom slavom!
48 ४८ इस्राएलाचा देव, माझा परमेश्वर, ह्याचा अनादिकालापासून अनंतकालापर्यंत धन्यवाद होवो. सर्व लोकांनी म्हणावे, “आमेन.” परमेश्वराची स्तुती करा.
Blagosloven Gospod Bog Izrailjev od vijeka i do vijeka! I sav narod neka kaže: amin! Aliluja!

< स्तोत्रसंहिता 106 >