< मार्क 6 >

1 नंतर येशू तेथून नासोरी या त्याच्या नगरात आला आणि त्याचे शिष्य त्याच्यामागे आले.
यीशु कफरनहूमो ते निकल़ी की आपणे नगर नासरतो खे आए और तिना रे चेले बी तिना साथे आए।
2 शब्बाथ दिवशी तो सभास्थानात शिकवीत होता. पुष्कळ लोकांनी त्याची शिकवण ऐकली तेव्हा ते थक्क झाले. ते म्हणाले, “या मनुष्यास ही शिकवण कोठून मिळाली? त्यास देवाने कोणते ज्ञान दिले आहे आणि याच्या हातून हे केवढे चमत्कार होतात?
आरामो रे दिने सेयो प्रार्थना रे कअरो रे उपदेश देणे लगे, उपदेश सुणी की लोक हैरान ऊईगे और बोलणे लगे, “यो गल्ला एसखे किंयाँ ए पता? और ये कुण जा ज्ञान ए, जो एसखे देई राखेया? और एसरे आथो साथे यो सामर्थो रे काम किंयाँ ओए?
3 जो सुतार, मरीयेचा मुलगा आणि याकोब, योसे, यहूदा व शिमोन यांचा जो भाऊ तोच हा आहे ना?” आणि या आपल्याबरोबर आहेत त्या याच्या बहिणी नव्हेत काय? त्याचा स्वीकार करण्याविषयी त्यांना प्रश्न पडला.
आसे जाणूंए कि ये लकड़िया रा मिस्त्री ए, जो मरियमो रा पाऊ ए और याकूब, योसेस, यहूदा और शमौनो रा पाई ए और क्या एसरिया बईणी आसा बीचे ई नि रंदिया?” इजी बजअ ते तिने तेसखे अपनाणे ते न कित्ती।
4 मग येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्याचा सन्मान होत नाही असे नाही; मात्र त्याच्या नगरात, त्याच्या नातेवाईकात आणि त्याच्या कुटुंबात त्याचा सन्मान होत नसतो.”
यीशुए तिना खे बोलेया, “भविष्यबक्ता रा आपणे इलाके रे, आपणे टब्बर और आपणे कअरो खे छाडी की ओरथी सारी जगा आदर ओआ।”
5 थोड्याशाच रोग्यांवर हात ठेवून त्याने त्यास बरे केले, याशिवाय दुसरे कोणतेही महत्कृत्य त्यास तेथे करता आले नाही.
तेबे सेयो नासरत नगरो रे बऊत सामर्था रे काम नि करी सके, बस तिने कुछ बमारा पाँदे आथ राखी की सेयो ठीक कित्ते।
6 त्यांच्या अविश्वासामुळे त्यास आश्चर्य वाटले. नंतर येशू शिक्षण देत जवळपासच्या गावोगावी फिरला.
तेबे सेयो, तिना रा अविश्वास देखी की हैरान ऊईगे, और तेबे सेयो गांव रे चऊँ कनारे कूमदे ऊए उपदेश देणे लगे।
7 नंतर येशूने बारा शिष्यांना आपणाकडे बोलावून घेतले व त्यांना जोडीजोडीने पाठवू लागला, त्याने त्यास अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार दिला.
तेबे यीशुए बारा चेले बुलाई की दो-दो करी की पेजे और तिना खे दुष्टात्मा खे निकयाल़ने रा अक्क दित्तेया।
8 आणि त्यास आज्ञा केली की, “काठीशिवाय प्रवासासाठी दुसरे काही घेऊ नका. भाकरी, झोळी किंवा कमरकशात पैसे घेऊ नका.
तेबे यीशुए तिना खे आज्ञा दित्ती, “बाटा खे आपू साथे डण्डा छाडी की ओर कुछ नि लणा; ना रोटी, ना चोल़ी और ना बटुए रे पैसे।
9 तरी चपला घालून चाला; दोन अंगरखे घालू नका.”
पर जोड़े पईनो, और आपू साथे दो जोड़ी टाल्ले नि राखो।”
10 १० आणखी तो त्यास म्हणाला, “ज्या कुठल्याही घरात तुम्ही जाल तेथे तुम्ही ते शहर सोडीपर्यंत राहा.
तेबे तिने तिना खे बोलेया, “जेबे तुसे केसी नगरो रे जाओ और कोई तुसा खे आपणे कअरे बुलाओ, तो जदुओ तक तुसे तेस इलाके ते चली नि जाओ, तदुओ तक तेस ई कअरो रे रओ।
11 ११ आणि ज्याठिकाणी तुमचे स्वागत होणार नाही किंवा तुमचे ऐकणार नाहीत तेथून निघताना, त्यांना साक्ष व्हावी म्हणून आपल्या तळ पायाची धूळ तेथेच झाडून टाका.”
जेते जगा रे लोक तुसा खे नि मानो और तुसा री नि सुणो, तो तेथा ते चलदे बणो और आपणे पैरा री तूड़ तेथी चाड़ी देओ, ताकि तिना रे खलाफ सबूत ओ।”
12 १२ मग शिष्य तेथून निघाले आणि लोकांनी पश्चात्ताप करावा म्हणून त्यांनी घोषणा केली.
तेबे चेलेया जाई की प्रचार कित्तेया, “मन फिराओ।”
13 १३ त्यांनी पुष्कळ भूते काढली आणि अनेक रोग्यांना तैलाभ्यंग करून त्यांना बरे केले.
तिने बऊत दुष्टात्मा निकयाल़िया और बऊत बमार तेल मल़ी की ठीक कित्ते।
14 १४ हेरोद राजाने येशूविषयी ऐकले कारण येशूचे नाव सगळीकडे गाजले होते. काही लोक म्हणत होते, “बाप्तिस्मा करणारा योहान मरण पावलेल्यातून उठला आहे, म्हणून त्याच्याठायी चमत्कार करण्याचे सामर्थ्य आहे.”
तेबे हेरोदेस राजे यीशुए रे बारे रे सुणेया, कऊँकि तिना रा नाओं बऊत फैली गा था। तेबे कुछ लोक ईंयां बोलो थे, “यूहन्ना बपतिस्मा देणे वाल़ा मरे रेया बीचा ते जिऊँदा उई गा रा, तेबेई तो तेसते यो सामर्था रे काम ओए।”
15 १५ इतर लोक म्हणत, “येशू एलीया आहे.” तर काहीजण म्हणत, “हा संदेष्टा फार पूर्वीच्या संदेष्ट्यापैकी एक आहे.”
तेबे कुछ जणे बोलेया, “ये तो एलिय्याह ए”, कुछ जणे बोलेया, “भविष्यबक्तेया बीचा ते कोई एक ए।”
16 १६ परंतु हेरोदाने जेव्हा ऐकले तेव्हा तो म्हणाला, “ज्या योहानाचा मी शिरच्छेद केला तोच उठला आहे.”
हेरोदेसे राजे ये सुणी की बोलेया, “जेस यूहन्ने रा सिर मैं बडवाया था, ये सेई जिऊँदा ऊईगा रा।”
17 १७ हेरोदाने स्वतः योहानाला पकडून तुरूंगात टाकण्याची आज्ञा दिली होती कारण त्याचा भाऊ फिलिप्प याची पत्नी हेरोदीया हिच्याबरोबर हेरोदाने लग्न केले होते.
कऊँकि हेरोदेसे आपणे पाई फिलिप्पुसो री लाड़ी हेरोदियासा री बजअ ते, जेसा साथे तिने ब्या कित्तेया था, लोका खे पेजी की यूहन्ना पकड़वाया और जेला रे पाईता था।
18 १८ व योहान हेरोदाला सांगत असे की, “तू आपल्या भावाची पत्नी ठेवावीस हे शास्त्रानुसार नाही.”
कऊँकि यूहन्ने हेरोदेसो खे बोलेया था, “आपणे पाईए री लाड़ी राखणा ताखे खरी गल्ल निए।”
19 १९ याकरिता हेरोदीयेने योहानाविरूद्ध मनात अढी धरली. ती त्यास ठार मारण्याची संधी पाहत होती. परंतु ती त्यास मारू शकली नाही,
तेबेई तो हेरोदियास यूहन्ने साथे दुश्मणी राखो थी और ये चाओ थी कि एसखे कुल़वाई देऊँ, पर एड़ा नि ऊई सकेया।
20 २० कारण योहान नीतिमान आणि पवित्र मनुष्य आहे हे जाणून हेरोद त्याचे भय धरीत असे व त्याचे संरक्षण करी. हेरोद योहानाचे बोलणे ऐके तेव्हा, फार गोंधळून जाई, तरी तो त्याचे म्हणणे आनंदाने ऐकून घेत असे.
कऊँकि हेरोदेस यूहन्ने खे तर्मी और पवित्र मांणू मानो था और तेसते डरो था और तेसखे बचाए रे राखो था और तेसरी सुणी की बऊत कबराओ था, पर बऊत खुश ओ था।
21 २१ मग एके दिवशी अशी संधी आली की हेरोदिया काहीतरी करू शकेली. आपल्या वाढदिवशी हेरोदाने आपले महत्त्वाचे अधिकारी, सैन्यातील सरदार व गालील प्रांतातील प्रमुख लोकांस मेजवानी दिली.
तेबे ठीक मोके पाँदे, जेबे हेरोदेसो रा जन्मदिन था, तेबे तिने आपणे प्रदाना खे, सेनापतिया और गलीलो रे बड़े लोका खे पाट्टी राखी।
22 २२ हेरोदीयाच्या मुलीने स्वतः आत जाऊन नाच करून हेरोद व आलेल्या पाहुण्यांना आनंदित केले. तेव्हा हेरोद राजा मुलीला म्हणाला, “तुला जे पाहिजे ते माग म्हणजे मी ते तुला देईन.”
तेबे हेरोदियासा री मुन्नी पीतरे आई और नाचणे लगी, तेसा रा नाच देखी की हेरोदेस और तेस साथे बैठणे वाल़े खुश ऊईगे। तेबे हेरोदेस राजे तेसा खे बोलेया, “माँग, जो ताखे चाईयो, मां ताखे देणा”
23 २३ तो शपथ वाहून तिला म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू मागशील ते मी तुला देईन.”
और तिने कसम खाई, “आदे राज्य तक, जो तूँ मांगेगी, मां ताखे देणा।”
24 २४ ती बाहेर गेली आणि तिच्या आईला म्हणाली, “मी काय मागू?” आई म्हणाली, “बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर.”
तेसे बारे जाई की आपणी आम्मा ते पूछेया, “आऊँ क्या मांगू?” माए बोलेया, “यूहन्ना बपतिस्मा देणे वाल़ेया रा सिर चाईयो।”
25 २५ आणि ती मुलगी लगेच आत राजाकडे गेली आणि म्हणाली, “मला तुम्ही या क्षणी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर तबकात घालून द्यावे अशी माझी इच्छा आहे.”
तेबे मुन्नी फटाफट राजे गे पितरे आई और तेसते बिनती करी की बोलेया, “आऊँ चाऊँई कि तूँ एबु यूहन्ना बपतिस्मा देणे वाल़े रा सिर एक थाल़िया रे माखे मंगवाई दे।”
26 २६ राजाला फार वाईट वाटले, परंतु त्याच्या शपथेमुळे व भोजनास आलेल्या पाहुण्यांमुळे त्यास तिला नकार द्यावा असे वाटले नाही.
तेबे हेरोदेस राजा बऊत उदास ऊईगा, पर आपणी कसमा री बजअ ते और आपू साथे बैठे रे लोका री बजअ ते, से तेसा री गल्ल टाल़ी नि सकेया।
27 २७ तेव्हा राजाने लगेच वध करणाऱ्याला पाठवले व योहानाचे शीर घेऊन येण्याची आज्ञा केली. मग तो गेला व तुरूंगात जाऊन त्याने योहानाचे शीर कापले.
तेबे राजे तेबुई एक जलाद पेजेया और तेसखे आज्ञा दित्ती कि तेसरा सिर बाडी की ल्याओ।
28 २८ ते शीर तबकात घालून मुलीला दिले व मुलीने ते आईला दिले.
तेबे तिने जेला रे जाई की तेसरा सिर बाडेया और एक थाल़िया रे पाई की ल्याया और हेरोदियासा री मुन्निया खे दित्तेया, और मुन्निए आपणी आम्मा खे दित्तेया।
29 २९ हे ऐकल्यावर, योहानाचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शरीर उचलले आणि कबरेत नेऊन ठेवले.
ये बुरी खबर सुणी की यूहन्ना रे चेले आए और तेसरी लोथ चकी की कब्रा रे राखी।
30 ३० यानंतर प्रेषित येशूभोवती जमले आणि त्यांनी जे केले आणि शिकविले ते सर्व त्यास सांगितले.
जेबे बारा प्रेरित जो यीशुए दुष्टात्माओं खे निकाल़ने रा अक्क देई की दो-दो करी की पेजे थे वापस आए तो जो कुछ तिने कित्तेया और जो सिखाई राखेया था, सब तिना गे बताया।
31 ३१ नंतर तो त्यांना म्हणाला, “तुम्ही रानात एकांती चला आणि थोडा विसावा घ्या.” कारण तेथे पुष्कळ लोक जात येत होते व त्यांना जेवायलाही सवड मिळत नव्हती.
यीशुए चेलेया खे बोलेया, “तुसे आपू बी केथी जंगल़ो रे जाई की आराम करी लो।” तिने ये इजी खे बोलेया था, कऊँकि बऊत लोक आओ थे और तिना खे रोटी खाणे खे बी बखत नि मिलो था।
32 ३२ तेव्हा ते सर्वजण तारवात बसून रानात गेले.
तेबे यीशु और तिना रे चेले किस्तिया रे चढ़ी की, सुणसाण जगा रे चली गे।
33 ३३ परंतु पुष्कळ लोकांनी त्यांना जाताना पाहिले व ते कोण आहेत हे त्यांना कळाले तेव्हा सर्व गावांतील लोक पायीच धावत निघाले व त्याच्या येण्याअगोदरच ते तेथे पोहोचले.
तेबे बऊत जणेया यीशु और तिना रे चेले जांदे ऊए देखी ले और तेबे सब नगरो रे लोक कट्ठे ऊई की पैदल ई दौड़ी गे और तिना ते पइले तेती पऊँछी गे।
34 ३४ येशू किनाऱ्याला आल्यावर, त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला; ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते, म्हणून त्यास त्यांचा कळवळा आला; म्हणून तो त्यांना बऱ्याच गोष्टीविषयी शिक्षण देऊ लागला.
तेबे तिने किस्तिया ते उतरी की एक बड़ी पीड़ देखी और तिना खे तेसा पीड़ा पाँदे तरस आया, कऊँकि सेयो तिना पेडा जेड़े थे, जिना रा कोई रखवाल़ा नि ऊँदा। तेबे यीशु तिना खे बऊत गल्ला सिखाणे लगे।
35 ३५ दिवस बराच उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “ही अरण्यातली जागा आहे व आता दिवस फार उतरला आहे.
जेबे साँज ऊणे वाल़ी थी, तेबे तिना रे चेले तिना खे बोलणे लगे, “ये सुणसाण जगा ए और दिन बऊत चढ़ी गा रा।
36 ३६ लोकांस जाऊ द्या म्हणजे ते भोवतालच्या शेतात व खेड्यात जाऊन त्यांच्यासाठी काहीतरी खायला विकत आणतील.”
एबे इना खे बिदा करी देयो, ताकि यो गांव, और बस्तिया रे जाई की आपू खे खाणे खे कुछ खरीदी सको।”
37 ३७ परंतु त्याने त्यास उत्तर दिले, “तुम्हीच त्यांना काहीतरी खावयास द्या.” ते त्यास म्हणाले, “आम्ही जाऊन त्यांना खाण्यासाठी दोनशे चांदीच्या नाण्याच्या भाकरी विकत आणाव्या काय?”
यीशुए तिना खे बोलेया, “तुसेई इना खे खाणे खे देयो।” चेलेया बोलेया, “क्या आसे इना खे दो सौ चाँदिए रे सिक्केया रे मोलो रे बराबर (मतलब दो सौ दिनो री मजदूरिया रे बराबर ए) रोटिया खरीदी लईये और इना खे खुल़ाईए?”
38 ३८ तो त्यांना म्हणाला, “जा आणि पाहा की तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” पाहिल्यावर ते म्हणाले, “आमच्याजवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.”
यीशुए तिना खे बोलेया, “जाओ और देखो तुसा गे कितणिया रोटिया ए?” तिने पता करी की बोलेया, “पाँज रोटिया और दो मछलिया ए।”
39 ३९ येशूने सर्व लोकांस आज्ञा केली की गटागटाने हिरवळीवर बसावे.
तेबे यीशुए चेलेया खे आज्ञा दित्ती कि सबी खे अरे काओ पाँदे बांईठी रे बठयाल़ी देओ।
40 ४० तेव्हा ते शंभर शंभर व पन्नास पन्नास असे पंक्तीपंक्तीने बसले.
सेयो सौ-सौ और पंजा-पंजा, बांईठी रे बैठीगे।
41 ४१ येशूने पाच भाकरी आणि दोन मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून, आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडल्या व त्या लोकांस वाढण्यासाठी आपल्या शिष्यांजवळ दिल्या आणि दोन मासेसुद्धा वाटून दिले.
तेबे यीशुए सेयो दो मछलिया और पाँज रोटिया लईया और स्वर्गो खे देखी की धन्यवाद कित्तेया और रोटिया तोड़ी-तोड़ी की आपणे चेलेया खे दित्तिया कि लोका खे बांडी देओ और सेयो मछलिया बी बांडिया।
42 ४२ मग ते सर्व जेवन करून तृप्त झाले.
तेबे सब खाई की रजी गे।
43 ४३ आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या आणि माशांचेही तुकडे नेले.
और तेबे तिने बचे रे टुकड़ेया रिया बारा टोकरिया परी की चकिया और कुछ मछलिया बी थिया।
44 ४४ भाकरी खाणारे पाच हजार पुरूष होते.
जिने रोटिया खाईया, तिना बीचे जादातर पाँज ह्जार तो मर्द थे।
45 ४५ नंतर मी लोकसमुदायाला निरोप देतो आणि तुम्ही तारवात बसून पलीकडे बेथसैदा येथे जा, असे सांगून येशूने लगेचच शिष्यांना त्याच्यापुढे जाण्यास सांगितले.
तेबे यीशुए तेबुई आपणे चेले किस्तिया रे चढ़ाए, ताकि सेयो तिना ते पईले, पार बैतसैदा नगरो खे चली जाओ, जदुओ तक की सेयो लोका खे बिदा करोए।
46 ४६ लोकांस निरोप देऊन तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला.
तेबे से पीड़ा खे बिदा करी की पाह्ड़ो पाँदे प्रार्थना करने खे गए।
47 ४७ संध्याकाळ झाली तेव्हा तारू सरोवराच्या मध्यभागी होता आणि येशू एकटाच जमिनीवर होता.
जेबे साँज ऊई, तेबे चेलेया री किस्ती समुद्रो रे थी और यीशु कल्ले जमीना पाँदे थे।
48 ४८ मग त्यांना वल्ही मारणे अवघड जात आहे असे त्यास दिसले, कारण वारा त्यांच्या विरुद्धचा होता. नंतर पहाटे तीन ते सहाच्या दरम्यान येशू सरोवरावरून चालत त्यांच्याकडे आला, त्यांच्याजवळून पुढे जाण्याचा त्याचा बेत होता.
यीशुए देखेया कि तिना रे चेले बड़ी मुश्किला साथे चप्पू चलांदे-चलांदे ऊए कबराणे लगी रे, कऊँकि अवा तिना रे खलाफ थी, तेबे सेयो राथियो रे चौथे पइरो रे नेड़े, समुद्रो रे पाणिए पाँदे चली की तिना गे आए और सेयो तिना ते आगे निकल़ना चाओ थे।
49 ४९ पण त्यास सरोवरातील पाण्यावरून चालतांना पाहिले, तेव्हा त्यांना ते भूत आहे असे वाटले व ते ओरडले.
पर जिंयाँ ई चेलेया यीशुए खे समुद्रो रे पाणिए पाँदे चलदे ऊए देखी की सोचेया कि ये तो पूत ए और सब डरो रे मारे चींगणे लगे।
50 ५० कारण त्या सर्वांनी त्यास पाहिले व ते घाबरून गेले. तो लगेच त्यांना म्हणाला, “धीर धरा, भिऊ नका, मी आहे.”
कऊँकि सब तिना खे देखी की कबराई गे थे, पर यीशुए फटाफट तिना साथे गल्ल कित्ती और बोलेया, “याओ राखो। आऊँ ए। डरो नि।”
51 ५१ नंतर तो त्यांच्याकडे तारवात गेला तेव्हा वारा शांत झाला. ते अतिशय आश्चर्यचकित झाले.
तेबे सेयो तिना साथे किस्तिया रे आए और अवा रूकी गी, तिना रे चेले ये देखी की हैरान ऊईगे।
52 ५२ कारण त्यांना भाकरीची गोष्ट समजली नव्हती आणि त्यांची मने कठीण झाली होती.
कऊँकि सेयो एथो तक तिना रोटिया रे बारे रे नि समजे थे। और तिना रे मन कठोर ऊईगे थे।
53 ५३ त्यांनी सरोवर ओलांडल्यावर ते गनेसरेतला आले व तारु बांधून टाकले.
तेबे यीशु और तिना रे चेले गलीली समुद्रो ते उतरी की गन्नेसरत नगरो री जगा रे पऊँछे और किस्ती कनारे पाँदे लगाईती।
54 ५४ ते तारवातून उतरताच लोकांनी येशूला ओळखले.
जेबे सेयो किस्तिया ते उतरे, तेबे लोक तिना खे पछयाणने लगे
55 ५५ आणि ते आसपासच्या सर्व भागात चोहोकडे धावपळ करीत फिरले व जेथे कोठे तो आहे म्हणून त्यांच्या कानी आले, तेथे तेथे लोक दुखणेकऱ्यांना बाजेवर घालून नेऊ लागले.
और ओरे-पोरे सारे-देशो रे दौड़े और बमारा खे माँजे पाँदे लटयाल़ी की, जेती-जेती सुणेया कि यीशु तेती ए,
56 ५६ तो गावात किंवा शेतमळ्यात कोठेही जावो, तेथे लोक दुखणेकऱ्यांना भर बाजारात आणून ठेवत आणि आपल्या वस्त्राच्या गोंड्याला तरी स्पर्श करू द्या अशी त्यास विनंती करीत आणि जितक्यांनी त्यास स्पर्श केला तितके बरे झाले.
सेयो तेथी-तेथी पऊँछी गे। और जेती केथी सेयो, गांव, नगर और बस्तिया रे जाओ थे, तेबे लोक बमारा खे बजारो रे छाडी की तिना ते बिनती करो थे कि बमारा खे बस आपणे टाले रा पल्ला ई छूणे दे। और जितणे तिना खे छूँओ थे, सेयो ठीक ऊई जाओ थे।

< मार्क 6 >