< ईयोब 33 >

1 “ईयोब, मी तुला विनंती करतो, माझे बोलने ऐक. माझे सर्व शब्दांकडे लक्ष दे.
וְֽאוּלָ֗ם שְׁמַֽע־נָ֣א אִיּ֣וֹב מִלָּ֑י וְֽכָל־דְּבָרַ֥י הַאֲזִֽינָה׃
2 पाहा, मी आता बोलायला माझे मुख उघडले आहे, माझी जीभ माझ्या तोंडात हालू लागली आहे.
הִנֵּה־נָ֭א פָּתַ֣חְתִּי פִ֑י דִּבְּרָ֖ה לְשׁוֹנִ֣י בְחִכִּֽי׃
3 माझे शब्दच माझ्या अंत: करणाचे प्रामाणिकपण सांगतील, माझ्या ओठांना जे माहीती आहे, तेच ते प्रामाणिकपणे बोलतील.
יֹֽשֶׁר־לִבִּ֥י אֲמָרָ֑י וְדַ֥עַת שְׂ֝פָתַ֗י בָּר֥וּר מִלֵּֽלוּ׃
4 देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले आहे, मला सर्वशक्तिमान देवाच्या श्वासाद्ववारे जीवन मिळाले आहे.
רֽוּחַ־אֵ֥ל עָשָׂ֑תְנִי וְנִשְׁמַ֖ת שַׁדַּ֣י תְּחַיֵּֽנִי׃
5 तुला शक्य झाले तर मला उत्तर दे, माझ्याशी वाद घालण्याकरता तुझी उत्तरे तयार ठेव.
אִם־תּוּכַ֥ל הֲשִׁיבֵ֑נִי עֶרְכָ֥ה לְ֝פָנַ֗י הִתְיַצָּֽבָה׃
6 पाहा, देवासमोर मी आणि तू सारखेच आहोत, मलाही माती पासून उत्पन्न केले आहे.
הֵן־אֲנִ֣י כְפִ֣יךָ לָאֵ֑ל מֵ֝חֹ֗מֶר קֹרַ֥צְתִּי גַם־אָֽנִי׃
7 पाहा, माझी दरारा तुला घाबरवणार नाही, माझा दाब तुला जड होणार नाही.
הִנֵּ֣ה אֵ֭מָתִי לֹ֣א תְבַעֲתֶ֑ךָּ וְ֝אַכְפִּ֗י עָלֶ֥יךָ לֹא־יִכְבָּֽד׃
8 तू जे बोललास ते मी निश्चित ऐकले, मी तुझ्या शब्दांचा आवाज असे म्हणतांना ऐकला,
אַ֭ךְ אָמַ֣רְתָּ בְאָזְנָ֑י וְק֖וֹל מִלִּ֣ין אֶשְׁמָֽע׃
9 ‘मी शुध्द आहे, मी निरपराध आहे, मी काहीही चूक केली नाही मी निर्दोष आहे, आणि माझ्यामध्ये पाप नाही.
זַ֥ךְ אֲנִ֗י בְּֽלִ֫י פָ֥שַׁע חַ֥ף אָנֹכִ֑י וְלֹ֖א עָוֺ֣ן לִֽי׃
10 १० पाहा, देव माझ्यावर हल्ला करण्याची संधी पाहतो देवाने मला शत्रूप्रमाणे वागवले आहे.
הֵ֣ן תְּ֭נוּאוֹת עָלַ֣י יִמְצָ֑א יַחְשְׁבֵ֖נִי לְאוֹיֵ֣ב לֽוֹ׃
11 ११ देवाने माझ्या पायला साखळदंड बांधले देव माझी प्रत्येक हालचाल बघतो.’
יָשֵׂ֣ם בַּסַּ֣ד רַגְלָ֑י יִ֝שְׁמֹ֗ר כָּל־אָרְחֹתָֽי׃
12 १२ पाहा, मी तुला उत्तर देईल तू या बाबतीत चुकतो आहेस, देव कोणत्याही मनुष्यापेक्षा महान आहे.
הֶן־זֹ֣את לֹא־צָדַ֣קְתָּ אֶעֱנֶ֑ךָּ כִּֽי־יִרְבֶּ֥ה אֱ֝ל֗וֹהַ מֵאֱנֽוֹשׁ׃
13 १३ तू त्याच्याशी का वाद घालत आहेस? तो आपल्या कोणत्याही करणीचे कारण सांगत नाही.
מַ֭דּוּעַ אֵלָ֣יו רִיב֑וֹתָ כִּ֥י כָל־דְּ֝בָרָ֗יו לֹ֣א־יַעֲנֶֽה׃
14 १४ देव एकदा बोलतो, होय दोनदा बोलतो, तरी मनुष्य त्याकडे लक्ष देत नाही.
כִּֽי־בְאַחַ֥ת יְדַבֶּר־אֵ֑ל וּ֝בִשְׁתַּ֗יִם לֹ֣א יְשׁוּרֶֽנָּה׃
15 १५ देव लोकांशी रात्री ते गाढ झोपेत असताना स्वप्नात किंवा दृष्टांतात बोलत असेल, जेव्हा मनुष्य गाढ झोपेत असतो.
בַּחֲל֤וֹם ׀ חֶזְי֬וֹן לַ֗יְלָה בִּנְפֹ֣ל תַּ֭רְדֵּמָה עַל־אֲנָשִׁ֑ים בִּ֝תְנוּמ֗וֹת עֲלֵ֣י מִשְׁכָּֽב׃
16 १६ नंतर देव मनुष्याची कानउघडणी करतो, आणि त्याच्या धमकीने घाबरवितो.
אָ֣ז יִ֭גְלֶה אֹ֣זֶן אֲנָשִׁ֑ים וּבְמֹ֖סָרָ֣ם יַחְתֹּֽם׃
17 १७ मनुष्यास त्यांना पापाच्या हेतूपासून मागे ओढण्यासाठी, आणि गर्व न करण्याचेही सांगतो.
לְ֭הָסִיר אָדָ֣ם מַעֲשֶׂ֑ה וְגֵוָ֖ה מִגֶּ֣בֶר יְכַסֶּֽה׃
18 १८ देव गर्तेतून मनुष्याचे जीवन वाचवितो, त्याच्या जीवनाला मरणापासून वाचवितो.
יַחְשֹׂ֣ךְ נַ֭פְשׁוֹ מִנִּי־שָׁ֑חַת וְ֝חַיָּת֗וֹ מֵעֲבֹ֥ר בַּשָּֽׁלַח׃
19 १९ मनुष्याला केलेल्या शिक्षेमुळे अंथरुणात पडून दु: ख भोगत असेल वेदनेने त्याची सगळी हाडे तळमळतात.
וְהוּכַ֣ח בְּ֭מַכְאוֹב עַל־מִשְׁכָּב֑וֹ וריב עֲצָמָ֣יו אֵתָֽן׃
20 २० नंतर तो मनुष्य खाऊ शकत नाही चांगल्या अन्नाचासुध्दा त्यास तिरस्कार वाटतो.
וְזִֽהֲמַ֣תּוּ חַיָּת֣וֹ לָ֑חֶם וְ֝נַפְשׁ֗וֹ מַאֲכַ֥ל תַּאֲוָֽה׃
21 २१ त्याचे शरीर इतके क्षीण होते की तो जवळ जवळ दिसेनासा होतो. त्याची सगळी हाडे जी कधी दिसली नाही ती आता दिसतात.
יִ֣כֶל בְּשָׂר֣וֹ מֵרֹ֑אִי ושפי עַ֝צְמוֹתָ֗יו לֹ֣א רֻאּֽוּ׃
22 २२ खरोखर, तो मृत्यूलोकाजवळ येऊन ठेपतो आणि त्याचे जीवन मरणपंथाला लागलेले असते.
וַתִּקְרַ֣ב לַשַּׁ֣חַת נַפְשׁ֑וֹ וְ֝חַיָּת֗וֹ לַֽמְמִתִֽים׃
23 २३ परंतू एखादा देवदूत जर त्याचा मध्यस्थ झाला, मध्यस्थ, हजारो देवदुतापैकी एक, त्यास चांगला मार्ग दाखवणारा.
אִם־יֵ֤שׁ עָלָ֨יו ׀ מַלְאָ֗ךְ מֵלִ֗יץ אֶחָ֥ד מִנִּי־אָ֑לֶף לְהַגִּ֖יד לְאָדָ֣ם יָשְׁרֽוֹ׃
24 २४ आणि देवदूत त्याच्याशी दयेने वागेल, आणि देवाला सांगेल. ‘या मनुष्यास मृत्युलोकात जाण्यापासून वाचव त्याच्या पापाची किंमत मोजण्याचा दुसरा एक मार्ग मला सापडला आहे.’
וַיְחֻנֶּ֗נּוּ וַיֹּ֗אמֶר פְּ֭דָעֵהוּ מֵרֶ֥דֶת שָׁ֗חַת מָצָ֥אתִי כֹֽפֶר׃
25 २५ मग त्याचे शरीर पुन: बालकासारखे जोमदार बनेल. तो तरुणपणी जसा मजबूत होता तसाच पुन्हा होईल.
רֻֽטֲפַ֣שׁ בְּשָׂר֣וֹ מִנֹּ֑עַר יָ֝שׁ֗וּב לִימֵ֥י עֲלוּמָֽיו׃
26 २६ तो देवाची प्रार्थना करेल आणि देव त्यास दया देईल. म्हणजे तो देवाचे मुख आनंदाने पाहील. नंतर तो मनुष्य पुन्हा चांगले जीवन जगायला लागेल.
יֶעְתַּ֤ר אֶל־אֱל֨וֹהַּ ׀ וַיִּרְצֵ֗הוּ וַיַּ֣רְא פָּ֭נָיו בִּתְרוּעָ֑ה וַיָּ֥שֶׁב לֶ֝אֱנ֗וֹשׁ צִדְקָתֽוֹ׃
27 २७ नंतर तो लोकांस कबुली देईल. तो म्हणेल, ‘मी पापकर्म केले. मी पाप केले चांगल्याचे वाईट केले. पंरतू माझ्या पापाला शिक्षा झाली नाही.
יָשֹׁ֤ר ׀ עַל־אֲנָשִׁ֗ים וַיֹּ֗אמֶר חָ֭טָאתִי וְיָשָׁ֥ר הֶעֱוֵ֗יתִי וְלֹא־שָׁ֥וָה לִֽי׃
28 २८ त्याने माझ्या आत्म्याला मृत्युलोकात जाण्यापासून वाचवेल. माझ्या जीव नियमीत त्याचा प्रकाश पाहील.
פָּדָ֣ה נפשי מֵעֲבֹ֣ר בַּשָּׁ֑חַת וחיתי בָּא֥וֹר תִּרְאֶֽה׃
29 २९ पाहा, देव या गोष्टी मनुष्यासाठी करतो, दोनदा, होय तीनदा,
הֶן־כָּל־אֵ֭לֶּה יִפְעַל־אֵ֑ל פַּעֲמַ֖יִם שָׁל֣וֹשׁ עִם־גָּֽבֶר׃
30 ३० त्याच्या जीवाला मृत्युलोकात जाण्यापासून वाचवण्यासाठी असे करतो म्हणजे त्याचे जीवन प्रकाशाने प्रकाशीत होते.
לְהָשִׁ֣יב נַ֭פְשׁוֹ מִנִּי־שָׁ֑חַת לֵ֝א֗וֹר בְּא֣וֹר הַֽחַיִּים׃
31 ३१ ईयोबा, मी काय म्हणतो त्याकडे लक्ष दे. माझे ऐक! तू गप्प रहा आणि मला बोलू दे.
הַקְשֵׁ֖ב אִיּ֥וֹב שְֽׁמַֽע־לִ֑י הַ֝חֲרֵ֗שׁ וְאָנֹכִ֥י אֲדַבֵּֽר׃
32 ३२ पण ईयोबा, जर तुला माझे बोलणे पटत नसेल तर तू खुशाल बोल. मला तुझे मुद्दे सांग. कारण मला तुझे बोलणे सुधारायचे आहे.
אִם־יֵשׁ־מִלִּ֥ין הֲשִׁיבֵ֑נִי דַּ֝בֵּ֗ר כִּֽי־חָפַ֥צְתִּי צַדְּקֶֽךָּ׃
33 ३३ परंतु ईयोबा, तुइयाजवळ बोलण्यासारखे काही नसेल तर माझे ऐक. तू गप्प रहा आणि मी तुला शहाणपण शिकवेन.”
אִם־אַ֭יִן אַתָּ֥ה שְֽׁמַֽע־לִ֑י הַ֝חֲרֵ֗שׁ וַאֲאַלֶּפְךָ֥ חָכְמָֽה׃ ס

< ईयोब 33 >