< ईयोब 25 >

1 नंतर बिल्दद शूहीने उत्तर दिले व तो म्हणाला,
וַ֭יַּעַן בִּלְדַּ֥ד הַשֻּׁחִ֗י וַיֹּאמַֽר׃
2 “अधीकार चालवणे व भीती दाखवणे हे देवाकडेच आहे, तो स्वर्गाच्या उच्च स्थानामध्ये शांती राखतो.
הַמְשֵׁ֣ל וָפַ֣חַד עִמּ֑וֹ עֹשֶׂ֥ה שָׁ֝ל֗וֹם בִּמְרוֹמָֽיו׃
3 त्याच्या सैन्याची मोजणी करीता येईल काय? कोणावर त्याचा प्रकाश पडत नाही?
הֲיֵ֣שׁ מִ֭סְפָּר לִגְדוּדָ֑יו וְעַל־מִ֝֗י לֹא־יָק֥וּם אוֹרֵֽהוּ׃
4 मनुष्य देवापुढे नितीमान कसा ठरेल? स्त्रीपासुन जन्मलेला निर्मळ कसा ठरेल, व त्यास स्विकारले जाईल.
וּמַה־יִּצְדַּ֣ק אֱנ֣וֹשׁ עִם־אֵ֑ל וּמַה־יִּ֝זְכֶּ֗ה יְל֣וּד אִשָּֽׁה׃
5 पाहा, त्याच्या दृष्टीने चंद्र सुध्दा तेजोमय नाही. त्याच्या दृष्टीला तारे देखील पवित्र वाटत नाहीत.
הֵ֣ן עַד־יָ֭רֵחַ וְלֹ֣א יַאֲהִ֑יל וְ֝כוֹכָבִ֗ים לֹא־זַכּ֥וּ בְעֵינָֽיו׃
6 मग मनुष्य किती कमी आहे, एखाद्या अळीप्रमाणे आहे. तो जंतूप्रमाणे आहे.”
אַ֭ף כִּֽי־אֱנ֣וֹשׁ רִמָּ֑ה וּבֶן־אָ֝דָ֗ם תּוֹלֵעָֽה׃ פ

< ईयोब 25 >