< ईयोब 18 >

1 नंतर शूहीच्या बिल्ददने उत्तर दिले आणि म्हणाला,
וַ֭יַּעַן בִּלְדַּ֥ד הַשֻּׁחִ֗י וַיֹּאמַֽר׃
2 तू तुझे बोलणे बंद कर! शांत राहा आणि लक्ष दे. आम्हास काही बोलू दे.
עַד־אָ֤נָה ׀ תְּשִׂימ֣וּן קִנְצֵ֣י לְמִלִּ֑ין תָּ֝בִ֗ינוּ וְאַחַ֥ר נְדַבֵּֽר׃
3 आम्ही पशूसारखे आहोत असे तू का समजतोस, आम्ही का तुझ्या दृष्टीने अशुद्ध झालोत?
מַ֭דּוּעַ נֶחְשַׁ֣בְנוּ כַבְּהֵמָ֑ה נִ֝טְמִ֗ינוּ בְּעֵינֵיכֶֽם׃
4 रागाने स्वत: स फाडून टाकणाऱ्या, तुझ्यामुळे पृथ्वी ओस पडेल काय, किंवा खडक त्याची जागा सोडेल का?
טֹֽרֵ֥ף נַפְשׁ֗וֹ בְּאַ֫פּ֥וֹ הַ֭לְמַעַנְךָ תֵּעָ֣זַב אָ֑רֶץ וְיֶעְתַּק־צ֝֗וּר מִמְּקֹמֽוֹ׃
5 खरोखर, “दुष्ट मनुष्याचा प्रकाश नाहीसा होईल. त्याचा अग्नी पेटणे बंद होईल.
גַּ֤ם א֣וֹר רְשָׁעִ֣ים יִדְעָ֑ךְ וְלֹֽא־יִ֝גַּ֗הּ שְׁבִ֣יב אִשּֽׁוֹ׃
6 त्यांच्या घरातला प्रकाश अंधकारमय होईल. त्यांच्या जवळचा दिवा विझेल.
א֭וֹר חָשַׁ֣ךְ בְּאָהֳל֑וֹ וְ֝נֵר֗וֹ עָלָ֥יו יִדְעָֽךְ׃
7 त्याची पाऊले पुन्हा दमदारपणे व भरभर पडणार नाहीत. तो हळुहळु चालेल आणि अशक्त बनेल. त्याच्या दुष्ट मसलती त्याचा अध: पात करतील.
יֵֽ֭צְרוּ צַעֲדֵ֣י אוֹנ֑וֹ וְֽתַשְׁלִיכֵ֥הוּ עֲצָתֽוֹ׃
8 त्याचेच पाय त्यास सापळ्यात अडकवतील. तो खडकाळ मार्गाने चालला आहे.
כִּֽי־שֻׁלַּ֣ח בְּרֶ֣שֶׁת בְּרַגְלָ֑יו וְעַל־שְׂ֝בָכָ֗ה יִתְהַלָּֽךְ׃
9 सापळा त्याची टाच पकडेल. त्यास घटृ पकडून ठेवेल.
יֹאחֵ֣ז בְּעָקֵ֣ב פָּ֑ח יַחֲזֵ֖ק עָלָ֣יו צַמִּֽים׃
10 १० जमिनीवरची दोरी त्यास जाळ्यात अडकवेल. सापळा त्याची त्याच्या मार्गातच वाट बघत असेल.
טָמ֣וּן בָּאָ֣רֶץ חַבְל֑וֹ וּ֝מַלְכֻּדְתּ֗וֹ עֲלֵ֣י נָתִֽיב׃
11 ११ दहशत चोहोबाजूंनी त्याची वाट पाहत आहे. भीती त्याच्या प्रत्येक पावलावर पाठलाग करीत आहे.
סָ֭בִיב בִּֽעֲתֻ֣הוּ בַלָּה֑וֹת וֶהֱפִיצֻ֥הוּ לְרַגְלָֽיו׃
12 १२ वाईट संकटे त्याच्यासाठी भुकेली आहेत. विध्वंस आणि अरिष्ट तो पडण्याचीच वाट पाहत आहेत.
יְהִי־רָעֵ֥ב אֹנ֑וֹ וְ֝אֵ֗יד נָכ֥וֹן לְצַלְעֽוֹ׃
13 १३ भयानक रोग त्याचे अवयव तोडून खाईल. खरोखर, मृत्यूचा जेष्ठ पुत्र त्याचा नाश करील.
יֹ֭אכַל בַּדֵּ֣י עוֹר֑וֹ יֹאכַ֥ל בַּ֝דָּ֗יו בְּכ֣וֹר מָֽוֶת׃
14 १४ त्याच्या घराच्या सुरक्षिततेपासून दूर नेला जाईल. त्यास भयाच्या राजापुढे हजर करण्यासाठी दूर नेले जाईल.
יִנָּתֵ֣ק מֵ֭אָהֳלוֹ מִבְטַח֑וֹ וְ֝תַצְעִדֵ֗הוּ לְמֶ֣לֶךְ בַּלָּהֽוֹת׃
15 १५ जे त्याचे नव्हते ते त्याच्या डेऱ्यात वास करतील त्याच्या घरात सर्वत्र जळते गंधक विखरतील.
תִּשְׁכּ֣וֹן בְּ֭אָהֳלוֹ מִבְּלִי־ל֑וֹ יְזֹרֶ֖ה עַל־נָוֵ֣הוּ גָפְרִֽית׃
16 १६ त्याची खालची मुळे सुकून जातील आणि वरच्या फांद्या मरतील.
מִ֭תַּחַת שָֽׁרָשָׁ֣יו יִבָ֑שׁוּ וּ֝מִמַּ֗עַל יִמַּ֥ל קְצִירֽוֹ׃
17 १७ पृथ्वीवरील लोकांस त्याची आठवण राहणार नाही. आता त्याचे नाव रसत्यावर पण कोणी घेत नाही.
זִֽכְרוֹ־אָ֭בַד מִנִּי־אָ֑רֶץ וְלֹא־שֵׁ֥ם ל֝֗וֹ עַל־פְּנֵי־חֽוּץ ׃
18 १८ लोक त्यास प्रकाशापासून दूर अंधारात ढकलतील. आणि त्याना या जगातून पळवून लावतील.
יֶ֭הְדְּפֻהוּ מֵא֣וֹר אֶל־חֹ֑שֶׁךְ וּֽמִתֵּבֵ֥ל יְנִדֻּֽהוּ׃
19 १९ त्यास मुले आणि नातवंडे असणार नाहीत. तो जेथे राहतो तिथे कोणी उरणार नाही.
לֹ֘א נִ֤ין ל֣וֹ וְלֹא־נֶ֣כֶד בְּעַמּ֑וֹ וְאֵ֥ין שָׂ֝רִ֗יד בִּמְגוּרָֽיו׃
20 २० पश्चिमेकडचे लोक जेव्हा या दुष्ट मनुष्याचे काय झाले ते ऐकतील तेव्हा त्यांना धक्का बसेल. आणि पूर्वेकडचे लोक भयाने कंपित होतील.
עַל־י֭וֹמוֹ נָשַׁ֣מּוּ אַחֲרֹנִ֑ים וְ֝קַדְמֹנִ֗ים אָ֣חֲזוּ שָֽׂעַר׃
21 २१ दुष्ट मनुष्याच्या घराचे खरोखरच असे होईल. जो देवाला ओळखत नाही त्याच्याबाबतीत असेच घडेल.”
אַךְ־אֵ֭לֶּה מִשְׁכְּנ֣וֹת עַוָּ֑ל וְ֝זֶ֗ה מְק֣וֹם לֹא־יָדַֽע־אֵֽל׃ ס

< ईयोब 18 >