< ईयोब 11 >

1 नंतर नामाथीच्या सोफरने उत्तर दिले आणि तो म्हणाला,
是においてナアマ人ゾパル答へて言けるは
2 “शब्दांच्या या भडीमाराला उत्तर द्यायलाच हवे? सगळ्या बोलण्यात हा मनुष्य बरोबर ठरतो का?
言語多からば豈答へざるを得んや 口おほき人あに義とせられんや
3 तुझा गर्वाच्या बडबडीने दुसरे चूप होतील का? जेव्हा तू आमच्या शिक्षणाची निंदा करशील, तुला कोणी फजीत करणार नाही काय?
汝も空しき言あに人をして口を閉しめんや 汝嘲らば人なんぢをして羞しめざらんや
4 तू देवाला म्हणतोस, माझे मानणे खरे आहे, आणि तुझ्या नजरेत मी निर्दोष आहे.
汝は言ふ 我敎は正し 我は汝の目の前に潔しと
5 अहो, परंतु, देवाने बोलावे आणि तुझ्या विरूद्ध त्याने ओठ उघडावे.
願くは神言を出し 汝にむかひて口を開き
6 तो (देव) तुला ज्ञानाचे रहस्य दाखवितो! चातुराईत तो (देव) महान आहे. तुझ्या अन्यायाच्या मानाने तुला जेवढी शिक्षा करायला हवी तेवढी तो करत नाही हे तू समजावे.
智慧の秘密をなんぢに示してその知識の相倍するを顯したまはんことを 汝しれ神はなんぢの罪よりも輕くなんぢを處置したまふなり
7 तू देवाला खरोखरीच समजू शकतोस असे तुला वाटते का? त्या सर्वशक्तिमान देवाला समजणे अशक्य आहे.
なんぢ神の深事を窮むるを得んや 全能者を全く窮むることを得んや
8 त्याचे शहाणपण आकाशाच्या उंचीइतके आहे, तू काय करु शकतोस? ते अधोलोकापेक्षा खोल आहे. तू काय जाणू शकतोस? (Sheol h7585)
その高きことは天のごとし 汝なにを爲し得んや 其深きことは陰府のごとし 汝なにを知えんや (Sheol h7585)
9 तो पृथ्वीपेक्षा मोठा आहे आणि सागरापेक्षा महान आहे.
その量は地よりも長く海よりも濶し
10 १० फिरत असता त्याने एखाद्यास पकडून अटकेत टाकले, जर त्याने एखाद्याचा न्याय करावयाचे ठरवले तर त्यास कोण अडवू शकेल?
彼もし行めぐりて人を執へて召集めたまふ時は誰か能くこれを阻まんや
11 ११ त्यास चुकीचे लोक माहीत आहेत, तो ज्या वाईट गोष्टी बघतो त्या त्यास समजत नाही काय?
彼は僞る人を善く知りたまふ 又惡事は顧みること無して見知たまふなり
12 १२ परंतु मूर्ख मनुष्यास शाहाणपण समजत नाही, त्यांना समजेल रानटी गाढव मनुष्यास जन्म देईल.
虚しき人は悟性なし その生るるよりして野驢馬の駒のごとし
13 १३ परंतु तू तुझ्या मनाची तयारी केली पाहिजेस आणि तू तुझे हात त्याची उपासना करण्यासाठी देवाच्या दिशेने उचलले पाहिजेस.
汝もし彼にむかひて汝の心を定め 汝の手を舒べ
14 १४ तुझ्या हाती असलेल्या अधर्माला तू दूर ठेवले पाहिजेस. तुझ्या डेऱ्यात वाईट गोष्टींना थारा देऊ नकोस.
手に罪のあらんには之を遠く去れ 惡をなんぢの幕屋に留むる勿れ
15 १५ तरच तू निश्चित त्याच्याकडे तोंड वर करून बघू शकशील. लज्जेच्या कोणत्याही चिन्हाविणा, खरोखर, तू खंबीर आणि भीती शिवाय उभा राहशील.
然すれば汝 面を擧て玷なかるべく堅く 立て懼るる事なかるべし
16 १६ तू तुझे दु: ख विसरशील, तुझे दु: ख निचरा झालेल्या पाण्यासारखे वाहून जाईल.
すなはち汝憂愁を忘れん 汝のこれを憶ゆることは流れ去し水のごとくならん
17 १७ भर दुपारच्या सूर्य प्रकाशापेक्षाही तुझे आयुष्य चमकदार होईल. आयुष्यातील अंधार सकाळच्या सूर्यप्रकाशाप्रमाणे चमकेल.
なんぢの生存らふる日は眞晝よりも輝かん 假令暗き事あるとも是は平旦のごとくならん
18 १८ तुला सुरक्षित वाटेल कारण तिथे आशा असेल. खरोखर, सभोवती सुरक्षा पाहून तू बेफिकार आराम करशील.
なんぢは望あるに因て安んじ 汝の周圍を見めぐりて安然に寐るにいたらん
19 १९ तू विश्रांती घेण्यासाठी आडवा होशील आणि तुला कोणीही त्रास देणार नाही. खरोखर, तुझ्याकडे पुष्कळ लोक मदतीसाठी येतील.
なんぢは何にも懼れさせらるること無して偃やまん 必ず衆多の者なんぢを悦こばせんと務むべし
20 २० वाईट लोकांचे डोळे थकतील. परंतु त्यांना संकटापासून सुटकेचा मार्ग नाही, त्यांची आशा त्यांना मृत्यूकडे नेईल.”
然ど惡き者は目曚み逃遁處を失なはん 其望は氣の斷ると等しかるべし

< ईयोब 11 >