< यशया 9 >

1 जी फार त्रासात होती ती त्यावरील विपत्ती घालवून देण्यात येईल. मागील काळी त्याने जबुलून व नफताली प्रांताची, अप्रतिष्ठा केली, पण पुढील काळी समुद्राकडील भाग, यार्देनेच्या पलीकडचा भाग राष्ट्रांचा गालील यांची तो प्रतिष्ठा करील.
כִּ֣י לֹ֣א מוּעָף֮ לַאֲשֶׁ֣ר מוּצָ֣ק לָהּ֒ כָּעֵ֣ת הָרִאשׁ֗וֹן הֵקַ֞ל אַ֤רְצָה זְבֻלוּן֙ וְאַ֣רְצָה נַפְתָּלִ֔י וְהָאַחֲר֖וֹן הִכְבִּ֑יד דֶּ֤רֶךְ הַיָּם֙ עֵ֣בֶר הַיַּרְדֵּ֔ן גְּלִ֖יל הַגּוֹיִֽם׃
2 जे अंधकारात चालत होते अशा लोकांनी मोठा प्रकाश पाहीला आहे; जे कोणी मृत्युच्छायेच्या प्रदेशात राहत होते अशावर प्रकाश पडला आहे.
הָעָם֙ הַהֹלְכִ֣ים בַּחֹ֔שֶׁךְ רָא֖וּ א֣וֹר גָּד֑וֹל יֹשְׁבֵי֙ בְּאֶ֣רֶץ צַלְמָ֔וֶת א֖וֹר נָגַ֥הּ עֲלֵיהֶֽם׃
3 तू राष्ट्राची वृद्धी केली आहे तू त्यांचा आनंद वाढवला आहे, हंगामाच्या वेळी जसा आनंद होतो, लूट वाटून घेतांना जसा आनंद होतो तसा ते तुझ्यासमोर आनंद करीत आहेत.
הִרְבִּ֣יתָ הַגּ֔וֹי לא הִגְדַּ֣לְתָּ הַשִּׂמְחָ֑ה שָׂמְח֤וּ לְפָנֶ֙יךָ֙ כְּשִׂמְחַ֣ת בַּקָּצִ֔יר כַּאֲשֶׁ֥ר יָגִ֖ילוּ בְּחַלְּקָ֥ם שָׁלָֽל׃
4 कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे, त्यांच्या भाराचे जू, त्यांच्या खांद्यावरचा दंडा, त्याजवर जुलूम करणाऱ्याच्या काठीचा तू चुराडा केला आहे.
כִּ֣י ׀ אֶת־עֹ֣ל סֻבֳּל֗וֹ וְאֵת֙ מַטֵּ֣ה שִׁכְמ֔וֹ שֵׁ֖בֶט הַנֹּגֵ֣שׂ בּ֑וֹ הַחִתֹּ֖תָ כְּי֥וֹם מִדְיָֽן׃
5 कारण युद्धाच्या गोंधळात फिरलेले प्रत्येक जोडे व रक्ताने माखलेली वस्त्रे जाळण्यात येतील ती अग्नीला भक्ष होतील.
כִּ֤י כָל־סְאוֹן֙ סֹאֵ֣ן בְּרַ֔עַשׁ וְשִׂמְלָ֖ה מְגוֹלָלָ֣ה בְדָמִ֑ים וְהָיְתָ֥ה לִשְׂרֵפָ֖ה מַאֲכֹ֥לֶת אֵֽשׁ׃
6 कारण आम्हासाठी बाळ जन्मले आहे, आम्हांला पुत्र दिला आहे; आणि त्याच्या खाद्यांवर सत्ता राहिल; आणि त्यास अद्भूत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा राजा असे म्हणतील.
כִּי־יֶ֣לֶד יֻלַּד־לָ֗נוּ בֵּ֚ן נִתַּן־לָ֔נוּ וַתְּהִ֥י הַמִּשְׂרָ֖ה עַל־שִׁכְמ֑וֹ וַיִּקְרָ֨א שְׁמ֜וֹ פֶּ֠לֶא יוֹעֵץ֙ אֵ֣ל גִּבּ֔וֹר אֲבִיעַ֖ד שַׂר־שָׁלֽוֹם׃
7 त्याच्या शासनाच्या वृद्धीला व शांतीला अंत राहणार नाही, दावीदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य न्यायाने व धार्मिकतेने स्थापित व स्थिर करण्यासाठी तो या वेळे पासून सदासर्वकाळ चालवील, सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.
לםרבה הַמִּשְׂרָ֜ה וּלְשָׁל֣וֹם אֵֽין־קֵ֗ץ עַל־כִּסֵּ֤א דָוִד֙ וְעַל־מַמְלַכְתּ֔וֹ לְהָכִ֤ין אֹתָהּ֙ וּֽלְסַעֲדָ֔הּ בְּמִשְׁפָּ֖ט וּבִצְדָקָ֑ה מֵעַתָּה֙ וְעַד־עוֹלָ֔ם קִנְאַ֛ת יְהוָ֥ה צְבָא֖וֹת תַּעֲשֶׂה־זֹּֽאת׃ ס
8 प्रभूने याकोबाच्या विरूद्ध संदेश पाठवीला; आणि तो इस्राएलाच्या ठायी प्राप्त झाला आहे.
דָּבָ֛ר שָׁלַ֥ח אֲדֹנָ֖י בְּיַעֲקֹ֑ב וְנָפַ֖ל בְּיִשְׂרָאֵֽל׃
9 सर्व लोकांस कळून येईल एफ्राईम व शोमरोनाच्या रहिवाशांस सुद्धा, जे गर्वाने व उद्धामपणाने म्हणतात,
וְיָדְעוּ֙ הָעָ֣ם כֻּלּ֔וֹ אֶפְרַ֖יִם וְיוֹשֵׁ֣ב שֹׁמְר֑וֹן בְּגַאֲוָ֛ה וּבְגֹ֥דֶל לֵבָ֖ב לֵאמֹֽר׃
10 १० “विटा पडल्या आहेत, पण आम्ही तासलेल्या दगडांनी पुनः बांधु; उंबराची झाडे तोडून टाकली आहेत, पण आम्ही त्यांच्या जागी गंधसरू लावू.”
לְבֵנִ֥ים נָפָ֖לוּ וְגָזִ֣ית נִבְנֶ֑ה שִׁקְמִ֣ים גֻּדָּ֔עוּ וַאֲרָזִ֖ים נַחֲלִֽיף׃
11 ११ म्हणून परमेश्वर त्याच्या विरूद्ध त्याचा शत्रू रसीन याला उठवील, आणि त्याच्या शत्रूंना चेतवील;
וַיְשַׂגֵּ֧ב יְהוָ֛ה אֶת־צָרֵ֥י רְצִ֖ין עָלָ֑יו וְאֶת־אֹיְבָ֖יו יְסַכְסֵֽךְ׃
12 १२ पूर्वेकडून अराम्यांस व पश्चिमेकडून पलिष्टांस उघड्या तोंडाने ते इस्राएलास फस्त करतील, कारण त्याच्या क्रोधामुळे परमेश्वर थांबणार नाही, परंतु मारण्यासाठी त्याचा हात अजूनही उगारलेला राहील.
אֲרָ֣ם מִקֶּ֗דֶם וּפְלִשְׁתִּים֙ מֵֽאָח֔וֹר וַיֹּאכְל֥וּ אֶת־יִשְׂרָאֵ֖ל בְּכָל־פֶּ֑ה בְּכָל־זֹאת֙ לֹא־שָׁ֣ב אַפּ֔וֹ וְע֖וֹד יָד֥וֹ נְטוּיָֽה׃
13 १३ तरीही लोक ज्याने त्यांना फटका दिला त्या देवाकडे वळणार नाहीत, किंवा सेनाधीश परमेश्वराचा शोध घेणार नाहीत.
וְהָעָ֥ם לֹא־שָׁ֖ב עַד־הַמַּכֵּ֑הוּ וְאֶת־יְהוָ֥ה צְבָא֖וֹת לֹ֥א דָרָֽשׁוּ׃ ס
14 १४ म्हणून परमेश्वर इस्राएलाचे शीर व शेपूट, तालवृक्षाची फांदी व लव्हाळा एका दिवसात छाटून टाकील.
וַיַּכְרֵ֨ת יְהוָ֜ה מִיִּשְׂרָאֵ֗ל רֹ֧אשׁ וְזָנָ֛ב כִּפָּ֥ה וְאַגְמ֖וֹן י֥וֹם אֶחָֽד׃
15 १५ नेता आणि वडील हे डोके होत; व जो संदेष्टा लबाड्या शिकवतो तो शेपूट होय.
זָקֵ֥ן וּנְשׂוּא־פָנִ֖ים ה֣וּא הָרֹ֑אשׁ וְנָבִ֥יא מֽוֹרֶה־שֶּׁ֖קֶר ה֥וּא הַזָּנָֽב׃
16 १६ जे या लोकांस मार्गदर्शन करीतात ते त्यांना चूकीचा मार्ग दाखवतात, आणि जे त्यांच्या मागे जातात त्यांना गिळून टाकतात.
וַיִּֽהְי֛וּ מְאַשְּׁרֵ֥י הָֽעָם־הַזֶּ֖ה מַתְעִ֑ים וּמְאֻשָּׁרָ֖יו מְבֻלָּעִֽים׃
17 १७ म्हणून त्यांच्या तरुण मनुष्यांमुळे प्रभूला संतोष होणार नाही किंवा त्यांच्या अनाथ व विधवांचा कळवळा त्यास येणार नाही, कारण प्रत्येक जन देवाला न मानणारा व वाईट करणारा आहे, आणि प्रत्येक मुख मुर्खतेच्या गोष्टी बोलते. या सर्वामुळे त्याचा क्रोध कमी होत नाही परंतु त्याचा हात फटका देण्यासाठी उगारलेला राहील.
עַל־כֵּ֨ן עַל־בַּחוּרָ֜יו לֹֽא־יִשְׂמַ֣ח ׀ אֲדֹנָ֗י וְאֶת־יְתֹמָ֤יו וְאֶת־אַלְמְנֹתָיו֙ לֹ֣א יְרַחֵ֔ם כִּ֤י כֻלּוֹ֙ חָנֵ֣ף וּמֵרַ֔ע וְכָל־פֶּ֖ה דֹּבֵ֣ר נְבָלָ֑ה בְּכָל־זֹאת֙ לֹא־שָׁ֣ב אַפּ֔וֹ וְע֖וֹד יָד֥וֹ נְטוּיָֽה׃
18 १८ दुष्टता अग्नी सारखी जळत राहते, ती काटेकुटे व काटेझुडपे खाऊन टाकीते; वनातील दाट झाडीतही ती पेट घेते, जिच्या धुराने लोक वर चढतात.
כִּֽי־בָעֲרָ֤ה כָאֵשׁ֙ רִשְׁעָ֔ה שָׁמִ֥יר וָשַׁ֖יִת תֹּאכֵ֑ל וַתִּצַּת֙ בְּסִֽבְכֵ֣י הַיַּ֔עַר וַיִּֽתְאַבְּכ֖וּ גֵּא֥וּת עָשָֽׁן׃
19 १९ सेनाधीश परमेश्वराच्या कडेवरुन वाहणाऱ्या क्रोधामुळे भूमी दूर पळून गेली आहे, लोक आगीला तेलाप्रमाणे आले आहेत, आपल्या भावाचीही कोणी मनुष्य गय करीत नाही.
בְּעֶבְרַ֛ת יְהוָ֥ה צְבָא֖וֹת נֶעְתַּ֣ם אָ֑רֶץ וַיְהִ֤י הָעָם֙ כְּמַאֲכֹ֣לֶת אֵ֔שׁ אִ֥ישׁ אֶל־אָחִ֖יו לֹ֥א יַחְמֹֽלוּ׃
20 २० ते उजव्या हाताचे मांस कापून खातील आणि तरीही भूकेलेच राहतील; ते डाव्याहाताचे मांस खातील पण तृप्त होणार नाहीत. प्रत्येक जन स्वतःच्या बाहूंचे मांस खातील.
וַיִּגְזֹ֤ר עַל־יָמִין֙ וְרָעֵ֔ב וַיֹּ֥אכַל עַל־שְׂמֹ֖אול וְלֹ֣א שָׂבֵ֑עוּ אִ֥ישׁ בְּשַׂר־זְרֹע֖וֹ יֹאכֵֽלוּ׃
21 २१ मनश्शे एफ्राईम फस्त करील, आणि एफ्राईम मनश्शेला; आणि दोघे मिळून यहूदावर चढाई करतील. कारण हे सर्व होऊनही परमेश्वराचा क्रोध कमी होणार नाही, परंतु मारण्यासाठी अजूनही त्याच्या हात उगारलेला राहील.
מְנַשֶּׁ֣ה אֶת־אֶפְרַ֗יִם וְאֶפְרַ֙יִם֙ אֶת־מְנַשֶּׁ֔ה יַחְדָּ֥ו הֵ֖מָּה עַל־יְהוּדָ֑ה בְּכָל־זֹאת֙ לֹא־שָׁ֣ב אַפּ֔וֹ וְע֖וֹד יָד֥וֹ נְטוּיָֽה׃ ס

< यशया 9 >