< होशेय 10 >

1 इस्राएल एक जोमाने वाढणारा द्राक्षीचा वेल आहे. त्यास विपुल फळे येतात. जसजसे त्याची फळे वाढली तसतशी त्याने वेद्या बांधल्या. त्याची भूमी सुपीक झाली, तो त्याने सुंदर स्तंभ उभारले.
גֶּ֤פֶן בּוֹקֵק֙ יִשְׂרָאֵ֔ל פְּרִ֖י יְשַׁוֶּה־לּ֑וֹ כְּרֹ֣ב לְפִרְי֗וֹ הִרְבָּה֙ לַֽמִּזְבְּח֔וֹת כְּט֣וֹב לְאַרְצ֔וֹ הֵיטִ֖יבוּ מַצֵּבֽוֹת׃
2 त्यांचे हृदय कपटी आहे, त्यांना त्यांची शिक्षा होईल परमेश्वर त्यांच्या वेद्या मोडून टाकेल त्याच्या पवित्र स्तंभाचा नाश करेल.
חָלַ֥ק לִבָּ֖ם עַתָּ֣ה יֶאְשָׁ֑מוּ ה֚וּא יַעֲרֹ֣ף מִזְבְּחוֹתָ֔ם יְשֹׁדֵ֖ד מַצֵּבוֹתָֽם׃
3 आता ते म्हणतील, “आम्हास राजा नाही, कारण आम्ही परमेश्वराचे भय मानले नाही आणि राजा आमच्यासाठी काय करणार?”
כִּ֤י עַתָּה֙ יֹֽאמְר֔וּ אֵ֥ין מֶ֖לֶךְ לָ֑נוּ כִּ֣י לֹ֤א יָרֵ֙אנוּ֙ אֶת־יְהֹוָ֔ה וְהַמֶּ֖לֶךְ מַה־יַּֽעֲשֶׂה־לָּֽנוּ ׃
4 ते पोकळ शब्द बोलतात खोट्या शपथा वाहून करार करतात, म्हणून जसे शेताच्या तासात विषारी रानटी झुडूप उगवतात तसा त्यांच्यावर न्याय येईल.
דִּבְּר֣וּ דְבָרִ֔ים אָל֥וֹת שָׁ֖וְא כָּרֹ֣ת בְּרִ֑ית וּפָרַ֤ח כָּרֹאשׁ֙ מִשְׁפָּ֔ט עַ֖ל תַּלְמֵ֥י שָׂדָֽי׃
5 शोमरोनाचे रहिवासी बेथआवेनच्या वासरांसाठी घाबरे होतील त्यांचे लोक त्यांच्यासाठी विलाप करतील, सोबतच त्यांचे मुर्तीपुजक पुजारी जे त्याच्या वैभवावर आनंद करत होते आता ते त्यांच्याबरोबर नाहीत.
לְעֶגְלוֹת֙ בֵּ֣ית אָ֔וֶן יָג֖וּרוּ שְׁכַ֣ן שֹֽׁמְר֑וֹן כִּי־אָבַ֨ל עָלָ֜יו עַמּ֗וֹ וּכְמָרָיו֙ עָלָ֣יו יָגִ֔ילוּ עַל־כְּבוֹד֖וֹ כִּֽי־גָלָ֥ה מִמֶּֽנּוּ׃
6 ते अश्शूरास त्यांच्या महान राजासाठी भेट म्हणून नेण्यात येतील. एफ्राईम लज्जीत होईल, आणि मुर्तीच्या सल्ल्याने वागल्यामुळे इस्राएल लज्जीत होईल.
גַּם־אוֹתוֹ֙ לְאַשּׁ֣וּר יוּבָ֔ל מִנְחָ֖ה לְמֶ֣לֶךְ יָרֵ֑ב בָּשְׁנָה֙ אֶפְרַ֣יִם יִקָּ֔ח וְיֵב֥וֹשׁ יִשְׂרָאֵ֖ל מֵעֲצָתֽוֹ׃
7 शोमरोनाचा राजा पाण्यावर तरंगणाऱ्या ढलण्यासारखा नाश पावेल.
נִדְמֶ֥ה שֹׁמְר֖וֹן מַלְכָּ֑הּ כְּקֶ֖צֶף עַל־פְּנֵי־מָֽיִם׃
8 दुष्टतेची श्रध्दास्थानाने आणि इस्राएलाची पापे नाश पावतील त्यांच्या वेदींवर काटे व काटेरी झुडपे उगवतील. लोक पर्वतास म्हणतील, “आम्हास झाका” आणि टेकडयास म्हणतील, “आमच्यावर पडा”
וְנִשְׁמְד֞וּ בָּמ֣וֹת אָ֗וֶן חַטַּאת֙ יִשְׂרָאֵ֔ל ק֣וֹץ וְדַרְדַּ֔ר יַעֲלֶ֖ה עַל־מִזְבְּחוֹתָ֑ם וְאָמְר֤וּ לֶֽהָרִים֙ כַּסּ֔וּנוּ וְלַגְּבָע֖וֹת נִפְל֥וּ עָלֵֽינוּ׃ ס
9 इस्राएला, गिबाच्या दिवसापासून तू पाप करत आहेस; तू तिथेच राहिला आहेस गिबाच्या दुष्टांसोबत झालेल्या लढाईत ते सापडले नाहीत?
מִימֵי֙ הַגִּבְעָ֔ה חָטָ֖אתָ יִשְׂרָאֵ֑ל שָׁ֣ם עָמָ֔דוּ לֹֽא־תַשִּׂיגֵ֧ם בַּגִּבְעָ֛ה מִלְחָמָ֖ה עַל־בְּנֵ֥י עַֽלְוָֽה׃
10 १० मला वाटेल तेव्हा मी त्यास शिस्त लावीन, त्यांच्या विरोधात राष्ट्रे एकत्र येतील व त्यांच्या दोन्ही पापांसाठी त्यांना बेड्या टाकतील.
בְּאַוָּתִ֖י וְאֶסֳּרֵ֑ם וְאֻסְּפ֤וּ עֲלֵיהֶם֙ עַמִּ֔ים בְּאָסְרָ֖ם לִשְׁתֵּ֥י עינתם׃
11 ११ एफ्राईम ही प्रशिक्षित कालवड आहे तिला मळणी करायला आवडते म्हणून मी तिच्या गोऱ्या मानेवर जू ठेवीन. मी एफ्राईमावर जू ठेवीन, यहूदा नांगरील, याकोब ढेकळे फोडील.
וְאֶפְרַ֜יִם עֶגְלָ֤ה מְלֻמָּדָה֙ אֹהַ֣בְתִּי לָד֔וּשׁ וַאֲנִ֣י עָבַ֔רְתִּי עַל־ט֖וּב צַוָּארָ֑הּ אַרְכִּ֤יב אֶפְרַ֙יִם֙ יַחֲר֣וֹשׁ יְהוּדָ֔ה יְשַׂדֶּד־ל֖וֹ יַעֲקֹֽב׃
12 १२ तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा आणि कराराच्या विश्वासूपणाची फळे तोडा, तुमची पडीत भूमी नांगरुन काढा, कारण जोपर्यंत तो येऊन धार्मिकतेचा पाऊस पाडत नाही, तोपर्यंत परमेश्वरास शोधण्याचीच ही वेळ आहे.
זִרְע֨וּ לָכֶ֤ם לִצְדָקָה֙ קִצְר֣וּ לְפִי־חֶ֔סֶד נִ֥ירוּ לָכֶ֖ם נִ֑יר וְעֵת֙ לִדְר֣וֹשׁ אֶת־יְהוָ֔ה עַד־יָב֕וֹא וְיֹרֶ֥ה צֶ֖דֶק לָכֶֽם׃
13 १३ तुम्ही दुष्टतेची नांगरणी केली, तुम्ही अन्यायाची कापणी केली, तुम्ही फसवणूकीचे फळ खाल्ले कारण तू तुझ्या योजनांवर आणि तुझ्या पुष्कळ सैनिकांवर विश्वास ठेवला.
חֲרַשְׁתֶּם־רֶ֛שַׁע עַוְלָ֥תָה קְצַרְתֶּ֖ם אֲכַלְתֶּ֣ם פְּרִי־כָ֑חַשׁ כִּֽי־בָטַ֥חְתָּ בְדַרְכְּךָ֖ בְּרֹ֥ב גִּבּוֹרֶֽיךָ׃
14 १४ म्हणून तुझ्या लोकांमध्ये युध्दाचा गलबला होईल आणि तुझी सर्व तटबंदीची शहरे नष्ट होतील. हे असे घडेल जसे शल्मनाने बेथ-आर्बिलाच्या युध्दात नाश केला तेव्हा आईला मुलांसह आपटून मारले गेले.
וְקָ֣אם שָׁאוֹן֮ בְּעַמֶּךָ֒ וְכָל־מִבְצָרֶ֣יךָ יוּשַּׁ֔ד כְּשֹׁ֧ד שַֽׁלְמַ֛ן בֵּ֥ית אַֽרְבֵ֖אל בְּי֣וֹם מִלְחָמָ֑ה אֵ֥ם עַל־בָּנִ֖ים רֻטָּֽשָׁה׃
15 १५ तुझ्या अती दुष्टपणामुळे बेथेल तुझ्यासोबत असेच करील. प्रभातसमयी इस्राएलाचा राजा पूर्णपणे नाश पावील.
כָּ֗כָה עָשָׂ֤ה לָכֶם֙ בֵּֽית־אֵ֔ל מִפְּנֵ֖י רָעַ֣ת רָֽעַתְכֶ֑ם בַּשַּׁ֕חַר נִדְמֹ֥ה נִדְמָ֖ה מֶ֥לֶךְ יִשְׂרָאֵֽל׃

< होशेय 10 >