< उत्पत्ति 43 >

1 कनान देशात दुष्काळ फारच तीव्र पडला होता.
और काल मुल्क में और भी सख़्त हो गया।
2 असे झाले की, त्यांनी मिसर देशाहून आणलेले सगळे धान्य खाऊन संपल्यावर त्यांचा बाप त्यांना म्हणाला, “तुम्ही पुन्हा जाऊन आपल्याला खाण्यासाठी आणखी धान्य विकत आणा.”
और यूँ हुआ कि जब उस ग़ल्ले को जिसे मिस्र से लाए थे, खा चुके तो उनके बाप ने उनसे कहा कि जाकर हमारे लिए फिर कुछ अनाज मोल ले आओ।
3 परंतु यहूदा त्यास म्हणाला, “त्या देशाच्या अधिकाऱ्याने आम्हांला ताकीद दिली. तो म्हणाला, ‘तुम्ही जर तुमच्या धाकट्या भावाला तुमच्या बरोबर माझ्याकडे आणले नाही तर तुम्ही माझे तोंडदेखील पाहणार नाही.’
तब यहूदाह ने उसे कहा कि उस शख़्स ने हम को निहायत ताकीद से कह दिया था कि तुम मेरा मुँह न देखोगे, जब तक तुम्हारा भाई तुम्हारे साथ न हो।
4 तेव्हा तुम्ही भावाला आमच्याबरोबर पाठवत असाल तरच आम्ही खाली जाऊन धान्य विकत आणू.
इसलिए अगर तू हमारे भाई को हमारे साथ भेज दे, तो हम जाएँगे और तेरे लिए अनाज मोल लाएँगे।
5 पण तुम्ही त्यास पाठवणार नाही तर मग आम्ही धान्य आणावयास खाली जाणार नाही. तुमच्या धाकट्या भावाशिवाय तुम्ही माझे तोंड पाहणार नाही असे त्या आधिकाऱ्याने आम्हांला बजावून सांगितले आहे.”
और अगर तू उसे न भेजे तो हम नहीं जाएँगे; क्यूँकि उस शख़्स ने कह दिया है कि तुम मेरा मुँह न देखोगे जब तक तुम्हारा भाई तुम्हारे साथ न हो'।
6 इस्राएल म्हणाला, “पण तुम्हास आणखी एक भाऊ आहे असे त्या मनुष्यास सांगून तुम्ही माझे असे वाईट का केले?”
तब इस्राईल ने कहा कि तुम ने मुझ से क्यूँ यह बदसुलूकी की, कि उस शख़्स को बता दिया कि हमारा एक भाई और भी है?
7 ते म्हणाले, “त्या मनुष्याने आमच्याविषयी व आपल्या परिवाराविषयी बारकाईने विचारपूस केली. त्याने आम्हांला विचारले, ‘तुमचा बाप अजून जिवंत आहे का? तुमचा आणखी दुसरा भाऊ आहे का?’ आम्ही तर त्याच्या या प्रश्नाप्रमाणे त्यास उत्तरे दिली. ‘तुम्ही आपल्या भावाला घेऊन या’ असे सांगेल, हे आम्हांला कुठे माहीत होते?”
उन्होंने कहा, “उस शख़्स ने बजिद्द हो कर हमारा और हमारे ख़ान्दान का हाल पूछा कि 'क्या तुम्हारा बाप अब तक ज़िन्दा है? और क्या तुम्हारा कोई और भाई है?' तो हम ने इन सवालों के मुताबिक़ उसे बता दिया। हम क्या जानते थे कि वह कहेगा, 'अपने भाई को ले आओ'।”
8 मग यहूदा आपला बाप इस्राएल याला म्हणाला, “मुलाला माझ्याबरोबर पाठवा. म्हणजे आम्ही जाऊ. मग आपण म्हणजे आम्ही, तुम्ही व आपली मुलेबाळे जिवंत राहू, मरणार नाही.
तब यहूदाह ने अपने बाप इस्राईल से कहा कि उस लड़के को मेरे साथ कर दे तो हम चले जाएँगे; ताकि हम और तू और हमारे बाल बच्चे ज़िन्दा रहें और हलाक न हों।
9 मी त्याची हमी घेतो. त्याच्यासाठी मला जबाबदार धरा. जर मी त्यास परत माघारी तुमच्याकडे आणले नाही तर मी तुमचा कायमचा दोषी होईन.
और मैं उसका ज़िम्मेदार होता हूँ, तू उसको मेरे हाथ से वापस माँगना। अगर मैं उसे तेरे पास पहुँचा कर सामने खड़ा न कर दूँ, तो मैं हमेशा के लिए गुनहगार ठहरूंगा।
10 १० जर आम्ही उशीर केला नसता तर आतापर्यंत नक्कीच आमच्या धान्य आणण्याच्या दोन फेऱ्या झाल्या असत्या.”
अगर हम देर न लगाते तो अब तक दूसरी दफ़ा' लौट कर आ भी जाते।
11 ११ मग त्यांचा बाप इस्राएल म्हणाला, “जर असे आहे तर आता हे करा, त्या अधिकाऱ्याकरता आपल्या देशातले चांगले निवडक पदार्थ म्हणजे थोडा मध, मसाल्याचे पदार्थ व बोळ, पिस्ते, बदाम, डिंक, गंधरस वगैरे तुमच्या गोण्यांत घेऊन त्यास बक्षीस म्हणून घेऊन जा.”
तब उनके बाप इस्राईल ने उनसे कहा, “अगर यही बात है तो ऐसा करो कि अपने बर्तनों में इस मुल्क की मशहूर पैदावार में से कुछ उस शख़्स के लिए नज़राना लेते जाओ; जैसे थोड़ा सा रौग़ान — ए — बलसान, थोड़ा सा शहद, कुछ गर्म मसाले, और मुर्र और पिस्ता और बादाम,
12 १२ या वेळी दुप्पटीपेक्षा जास्त पैसा तुमच्या हाती घ्या. मागच्या वेळी तुम्ही दिलेला जो पैसा तुमच्या गोण्यामधून परत आला तोही परत घेऊन जा. कदाचित काही चूक झाली असेल.
और दूना दाम अपने हाथ में ले लो, और वह नक़दी जो फेर दी गई और तुम्हारे बोरों के मुँह में रख्खी मिली अपने साथ वापस ले जाओ; क्यूँकि शायद भूल हो गई होगी।
13 १३ तुमच्या भावालाही बरोबर घ्या. उठा आणि त्या मनुष्याकडे परत जा.
और अपने भाई को भी साथ लो, और उठ कर फिर उस शख़्स के पास जाओ।
14 १४ “त्या अधिकाऱ्यापुढे तुम्ही जाऊन उभे रहाल तेव्हा सर्वसमर्थ देव तुम्हास साहाय्य करो. यासाठी की, त्याने बन्यामिनाला व शिमोनाला सोडून द्यावे. आणि जर मी माझ्या मुलांना मुकलो, तर मुकलो.”
और ख़ुदा — ए — क़ादिर उस शख़्स को तुम पर मेहरबानी करे, ताकि वह तुम्हारे दूसरे भाई को और बिनयमीन को तुम्हारे साथ भेज दे। मैं अगर बे — औलाद हुआ तो हुआ।”
15 १५ अशा रीतीने त्या मनुष्यांनी भेटवस्तू घेतल्या. त्यांनी त्यांच्या हातात दुप्पट पैसा आणि बन्यामिनाला घेतले. ते उठले आणि खाली मिसरात गेले व योसेफापुढे उभे राहिले.
तब उन्होंने नज़राना लिया और दूना दाम भी हाथ में ले लिया, और बिनयमीन को लेकर चल पड़े; और मिस्र पहुँच कर यूसुफ़ के सामने जा खड़े हुए।
16 १६ त्या भावांच्याबरोबर योसेफाने बन्यामिनास पाहिले. तेव्हा तो आपल्या कारभाऱ्याला म्हणाला, “या लोकांस माझ्या घरी आण. पशू मारून भोजन तयार कर, कारण हे सर्वजण दुपारी माझ्याबरोबर भोजन करतील.”
जब यूसुफ़ ने बिनयमीन को उनके साथ देखा तो उसने अपने घर के मुन्तज़िम से कहा, “इन आदमियों को घर में ले जा, और कोई जानवर ज़बह करके खाना तैयार करवा; क्यूँकि यह आदमी दोपहर को मेरे साथ खाना खाएँगे।”
17 १७ तेव्हा त्या कारभाऱ्याने त्यास योसेफाने सांगितल्याप्रमाणे भोजनाची सर्व तयारी केली. नंतर त्याने त्या सर्व भावांना योसेफाच्या घरी नेले.
उस शख़्स ने जैसा यूसुफ़ ने फ़रमाया था किया, और इन आदमियों को यूसुफ़ के घर में ले गया।
18 १८ योसेफाच्या घरी नेल्यावर ते भाऊ फार घाबरले. ते म्हणाले, “मागच्या वेळी आपल्या गोणीत आपण दिलेले पैसे परत ठेवण्यात आले म्हणून आपणांस येथे आणले आहे, त्यावरून आपणास दोषी ठरवण्याची संधी शोधत आहे. तो आपली गाढवे घेईल व आपल्याला गुलाम करील असे वाटते.”
जब इनको यूसुफ़ के घर में पहुँचा दिया तो डर के मारे कहने लगे, “वह नक़दी जो पहली दफ़ा' हमारे बोरों में रख कर वापस कर दी गई थी, उसी की वजह से हम को अन्दर करवा दिया है; ताकि उसे हमारे ख़िलाफ़ बहाना मिल जाए और वह हम पर हमला करके हम को ग़ुलाम बना ले और हमारे गधों को छीन ले।”
19 १९ म्हणून मग ते भाऊ योसेफाच्या कारभाऱ्याकडे गेले आणि घराच्या दरवाजाजवळ ते त्याच्याशी बोलू लागले.
और वह यूसुफ़ के घर के मुन्तज़िम के पास गए और दरवाज़े पर खड़े होकर उससे कहने लगे,
20 २० ते म्हणाले, “धनी, मागच्या वेळी आम्ही धान्य खरेदी करण्यासाठीच आलो होतो.
“जनाब, हम पहले भी यहाँ अनाज मोल लेने आए थे;
21 २१ आम्ही घरी परत जाताना एका मुक्कामाच्या ठिकाणी आमची पोती उघडली तेव्हा पाहा, प्रत्येक मनुष्याचा पैसा ज्याच्या गोणीत पूर्ण वजनासह जसाच्या तसाच होता. आमच्या पोत्यात पैसे कसे आले हे आम्हांला माहीत नाही. परंतु ते सगळे पैसे तुम्हास परत देण्यासाठी आम्ही आमच्यासोबत आणले आहेत.
और यूँ हुआ कि जब हम ने मंज़िल पर उतर कर अपने बोरों को खोला, तो अपनी अपनी पूरी तौली हुई नक़दी अपने अपने बोरे के मुँह में रख्खी देखी, इसलिए हम उसे अपने साथ वापस लेते आए हैं।
22 २२ आणि आता या वेळी आणखी धान्य विकत घेण्यासाठी अधिक पैसे आणले आहेत, आमच्या गोणीत पैसे कोणी ठेवले हे आम्हांला ठाऊक नाही.”
और हम अनाज मोल लेने को और भी नक़दी साथ लाए हैं, ये हम नहीं जानते के हमारी नक़दी किसने हमारे बोरों में रख दी।”
23 २३ परंतु कारभाऱ्याने उत्तर दिले, “तुम्हास शांती असो, भिऊ नका. तुमच्या व तुमच्या पित्याच्या देवाने तुमच्या गोणीत ते पैसे ठेवले असतील. मला तुमचे पैसे मिळाले आहेत.” नंतर त्या कारभाऱ्याने शिमोनाला तुरुंगातून सोडवून घरी आणले.
उसने कहा कि तुम्हारी सलामती हो, मत डरो! तुम्हारे ख़ुदा और तुम्हारे बाप के ख़ुदा ने तुम्हारे बोरों में तुम को ख़ज़ाना दिया होगा, मुझे तो तुम्हारी नक़दी मिल चुकी। फिर वह शमौन को निकाल कर उनके पास ले आया।
24 २४ मग त्या कारभाऱ्याने त्या भावांना योसेफाच्या घरी आणले. त्याने त्यांना पाय धुण्यासाठी पाणी दिले व त्यांनी पाय धुतले. मग त्याने त्यांच्या गाढवांना वैरण दिली.
और उस शख़्स ने उनको यूसुफ़ के घर में लाकर पानी दिया, और उन्होंने अपने पाँव धोए; और उनके गधों को चारा दिया।
25 २५ आपण योसेफासोबत भोजन करणार आहोत हे त्या भावांनी ऐकले होते. तेव्हा त्यांनी दुपारपर्यंत तयारी करून त्यास देण्याच्या भेटी तयार केल्या.
फिर उन्होंने यूसुफ़ के इन्तिज़ार में कि वह दोपहर को आएगा, नज़राना तैयार करके रख्खा; क्यूँकि उन्होंने सुना था कि उनको वहीं रोटी खानी है।
26 २६ योसेफ घरी आला तेव्हा त्या भावांनी त्याच्यासाठी आपल्यासोबत आणलेली भेट त्याच्या हातात दिली व त्यांनी त्यास भूमीपर्यंत खाली वाकून नमन केले.
जब यूसुफ़ घर आया, तो वह उस नज़राने को जो उनके पास था उसके सामने ले गए, और ज़मीन पर झुक कर उसके सामने आदाब बजा लाए।
27 २७ मग योसेफाने ते सर्व बरे आहेत ना, याची विचारपूस केली. तो म्हणाला, “तुमचा बाप, ज्यांच्याबद्दल तुम्ही मागे मला सांगितले होते, तो बरा आहे का? तो अजून जिवंत आहेत का?”
उसने उनसे ख़ैर — ओ — 'आफियत पूछी और कहा कि तुम्हारा बूढ़ा बाप जिसका तुम ने ज़िक्र किया था अच्छा तो है? क्या वह अब तक ज़िन्दा है?
28 २८ त्यांनी उत्तर दिले, “तुमचा दास, आमचा बाप, सुखरूप आहे. तो अजून जिवंत आहे.” त्यांनी खाली वाकून नमन केले.
उन्होंने जवाब दिया, “तेरा ख़ादिम हमारा बाप ख़ैरियत से है; और अब तक ज़िन्दा है।” फिर वह सिर झुका — झुका कर उसके सामने आदाब बजा लाए।
29 २९ मग त्याने नजर वर करून आपल्या आईचा मुलगा आपला भाऊ बन्यामीन याला पाहिले. तो म्हणाला, “तुम्ही मला ज्याच्याविषयी सांगितले तो हाच का तुमचा धाकटा भाऊ?” नंतर तो म्हणाला, “माझ्या मुला, देव तुझ्यावर कृपा करो.”
फिर उसने आँख उठा कर अपने भाई बिनयमीन को जो उसकी माँ का बेटा था, देखा और कहा कि तुम्हारा सबसे छोटा भाई जिसका ज़िक्र तुम ने मुझ से किया था यही है? फिर कहा कि ऐ मेरे बेटे! ख़ुदा तुझ पर मेहरबान रहे।
30 ३० मग योसेफ घाईघाईने खोलीबाहेर निघून गेला. आपला भाऊ बन्यामीन याच्यासाठी त्याची आतडी तुटू लागली आणि कोठे तरी जाऊन रडावे असे त्यास वाटले. तो आपल्या खोलीत गेला व तेथे रडला.
तब यूसुफ़ ने जल्दी की क्यूँकि भाई को देख कर उसका जी भर आया, और वह चाहता था कि कहीं जाकर रोए। तब वह अपनी कोठरी में जा कर वहाँ रोने लगा।
31 ३१ मग तोंड धुऊन तो परत आला. मग स्वतःला सावरून तो म्हणाला, “जेवण वाढा.”
फिर वह अपना मुँह धोकर बाहर निकला और अपने को बर्दाश्त करके हुक्म दिया कि खाना लगाओ।
32 ३२ योसेफाला त्यांनी वेगळे व त्याच्या भावांना वेगळे वाढले. मिसरी लोक त्याच्यासोबत तेथे वेगळे असे जेवले, कारण इब्री लोकांबरोबर मिसरी लोक जेवण जेवत नसत, कारण मिसऱ्यांना ते तिरस्कारणीय वाटत असे.
और उन्होंने उसके लिए अलग और उनके लिए जुदा, और मिस्रियों के लिए, जो उसके साथ खाते थे, जुदा खाना लगाया; क्यूँकि मिस्र के लोग इब्रानियों के साथ खाना नहीं खा सकते थे, क्यूँकि मिस्रियों को इससे कराहियत है।
33 ३३ त्याच्या भावांना त्याच्यासमोर बसवले, तेव्हा त्यांच्या ज्येष्ठतेच्या क्रमानुसार थोरल्या भावाला प्रथम बसवले, आणि इतरांस त्यांच्या वयांप्रमाणे बसवल्यामुळे ते चकित होऊन एकमेकांकडे पाहू लागले.
और यूसुफ़ के भाई उसके सामने तरतीबवार अपनी उम्र की बड़ाई और छोटाई के मुताबिक़ बैठे और आपस में हैरान थे।
34 ३४ योसेफाने त्याच्या पुढील पक्वान्नामधून वाटे काढून त्यांना दिले, पण त्याने बन्यामिनाला इतरांपेक्षा पाचपट अधिक वाढले. ते सर्व भरपूर जेवले व मनमुराद पिऊन आनंदीत झाले.
फिर वह अपने सामने से खाना उठा कर हिस्से कर — कर के उनको देने लगा, और बिनयमीन का हिस्सा उनके हिस्सों से पाँच गुना ज़्यादा था। और उन्होंने मय पी और उसके साथ खु़शी मनाई।

< उत्पत्ति 43 >