< उत्पत्ति 25 >

1 अब्राहामाने दुसरी पत्नी केली; तिचे नाव कटूरा होते.
Potem Abraham pojął [drugą] żonę, której było na imię Ketura.
2 तिच्यापासून त्यास जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूह ही मुले झाली.
Ona urodziła mu Zimrana, Jokszana, Medana, Midiana, Jiszbaka i Szuacha.
3 यक्षानास शबा व ददान झाले. अश्शूरी, लटूशी व लऊमी लोक हे ददानाचे वंशज होते.
Jokszan spłodził Szebę i Dedana. A synami Dedana byli Aszszurim, Letuszim i Leummim.
4 एफा, एफर, हनोख, अबीदा व एल्दा हे मिद्यानाचे पुत्र होते. हे सर्व कटूरेचे वंशज होते.
Synami Midiana byli: Efa, Efer, Henoch, Abida i Eldaa. Wszyscy oni [byli] synami Ketury.
5 अब्राहामाने आपले सर्वस्व इसहाकास दिले.
I Abraham dał Izaakowi wszystko, co miał.
6 अब्राहामाने आपल्या उपपत्नीच्या मुलांना देणग्या दिल्या, आणि आपण जिवंत असतानाच त्याने आपला मुलगा इसहाकापासून त्यांना वेगळे करून दूर पूर्वेकडील देशात पाठवून दिले.
A synom nałożnic, które miał, Abraham dał upominki i jeszcze za swojego życia wyprawił ich z dala od swego syna Izaaka ku wschodowi, do ziemi wschodniej.
7 अब्राहामाच्या आयुष्याच्या वर्षाचे दिवस हे इतके आहेत, तो एकशे पंच्याहत्तर वर्षे जगला.
Oto liczba lat życia, których dożył Abraham: sto siedemdziesiąt pięć lat.
8 अब्राहामाने शेवटचा श्वास घेतला आणि तो वृद्ध होऊन व पूर्ण जीवन जगून चांगल्या म्हातारपणी मेला व आपल्या लोकांस जाऊन मिळाला.
Abraham oddał ducha i umarł w dobrej starości, podeszły w latach i syty [życia]; i został przyłączony do swego ludu.
9 इसहाक व इश्माएल या त्याच्या मुलांनी त्यास सोहर हित्ती याचा मुलगा एफ्रोन याचे शेत मम्रेसमोर आहे त्यातल्या मकपेला गुहेत पुरले.
I jego synowie, Izaak i Izmael, pochowali go w jaskini Makpela, na polu Efrona, syna Sochara Chetyty, które [było] naprzeciwko Mamre;
10 १० हे शेत अब्राहामाने हेथीच्या मुलाकडून विकत घेतले होते. त्याची पत्नी सारा हिच्याबरोबर तेथे अब्राहामाला पुरले.
Na polu, które Abraham kupił od synów Cheta. Tam zostali pochowani Abraham i Sara, jego żona.
11 ११ अब्राहामाच्या मृत्यूनंतर देवाने त्याचा मुलगा इसहाक याला आशीर्वादित केले आणि इसहाक बैर-लहाय-रोई जवळ राहत होता.
A po śmierci Abrahama Bóg błogosławił jego synowi Izaakowi, a Izaak mieszkał przy studni Lachaj-Roj.
12 १२ अब्राहामापासून सारेची दासी हागार हिला झालेल्या इश्माएलाची वंशावळ ही:
To są dzieje rodu Izmaela, syna Abrahama, którego urodziła Abrahamowi Hagar, Egipcjanka, służąca Sary.
13 १३ इश्माएलाच्या मुलांची नावे ही होती. इश्माएलाच्या मुलांची नावे त्यांच्या जन्मक्रमाप्रमाणे: इश्माएलाचा प्रथम जन्मलेला मुलगा नबायोथ, केदार, अदबील, मिबसाम,
I to są imiona synów Izmaela według ich rodów: Nebajot, pierworodny Izmaela, po nim Kedar, Abdeel i Mibsam;
14 १४ मिश्मा, दुमा, मस्सा,
Miszma, Duma i Massa;
15 १५ हदद, तेमा, यतूर, नापीश व केदमा.
Chadar, Tema, Jetur, Nafisz i Kedma.
16 १६ ही इश्माएलाची मुले होती, आणि त्यांच्या गावांवरून आणि त्याच्या छावणीवरून त्यांची नावे ही पडली होती. हे त्यांच्या वंशाप्रमाणे बारा सरदार झाले.
To są synowie Izmaela, a to ich imiona według ich miasteczek i zamków; dwunastu książąt w ich narodach.
17 १७ ही इश्माएलाच्या आयुष्याची वर्षे एकशे सदतीस आहेत. त्याने शेवटचा श्वास घेतला आणि मेला आणि आपल्या लोकांस जाऊन मिळाला.
A lat życia Izmaela było sto trzydzieści siedem. Oddał ducha i umarł, i został przyłączony do swego ludu.
18 १८ त्याचे वंशज हवीलापासून ते शूरापर्यंत वस्ती करून राहिले, अश्शूराकडे जाताना मिसराजवळ हा देश आहे. ते एकमेकांबरोबर वैराने राहत होते.
I mieszkali od Chawila aż do Szur, który leży naprzeciwko Egiptu, na drodze do Asyrii. I umarł w obecności wszystkich swych braci.
19 १९ अब्राहामाचा मुलगा इसहाक ह्याच्यासंबंधीच्या घटना या आहेत. अब्राहाम इसहाकाचा बाप झाला.
To zaś są dzieje rodu Izaaka, syna Abrahama: Abraham spłodził Izaaka.
20 २० इसहाक चाळीस वर्षांचा झाला तेव्हा त्याने पदन-अरामातील अरामी बथुवेलाची मुलगी व अरामी लाबानाची बहीण रिबका हिला पत्नी करून घेतले.
Izaak miał czterdzieści lat, gdy pojął za żonę Rebekę, córkę Betuela Syryjczyka, z Paddan-Aram, siostrę Labana, Syryjczyka.
21 २१ इसहाकाने आपल्या पत्नीसाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली कारण ती निःसंतान होती, आणि परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली, आणि रिबका त्याची पत्नी गरोदर राहिली.
A Izaak modlił się do PANA za swoją żonę, gdyż była niepłodna. I PAN go wysłuchał, i jego żona Rebeka poczęła.
22 २२ मुले तिच्या उदरात एकमेकांशी झगडू लागली, तेव्हा ती म्हणाली, “मला हे काय होत आहे?” ती परमेश्वरास याबद्दल विचारायला गेली.
A [gdy] dzieci walczyły ze sobą w jej łonie, powiedziała: Jeśli tak [się zdarza], dlaczego [poczęłam]? Poszła więc, aby zapytać PANA.
23 २३ परमेश्वर तिला म्हणाला, “दोन राष्ट्रे तुझ्या गर्भाशयात आहेत आणि तुझ्यामधून दोन वंश निघतील. एक वंश दुसऱ्यापेक्षा बलवान असेल आणि थोरला धाकट्याची सेवा करील.”
I PAN jej odpowiedział: Dwa narody są w twoim łonie i dwa ludy wyjdą z twego wnętrza. Jeden lud będzie mocniejszy niż drugi i starszy będzie służył młodszemu.
24 २४ जेव्हा तिची बाळंतपणाची वेळ आली तेव्हा तिच्या गर्भशयात जुळी होती.
A gdy nadszedł czas porodu, okazało się, że w jej łonie [były] bliźnięta.
25 २५ आणि पहिला मुलगा बाहेर आला तो तांबूस वर्णाचा असून, त्याचे सर्व अंग केसांच्या वस्त्रासारखे होते. त्यांनी त्याचे नाव एसाव असे ठेवले.
I wyszedł pierwszy [syn] czerwony [i] cały pokryty owłosieniem jak szatą; i nadali mu imię Ezaw.
26 २६ त्याच्यानंतर त्याचा भाऊ बाहेर आला. त्याच्या हाताने त्याने एसावाची टाच हाताने धरली होती म्हणून त्याचे नाव याकोब असे ठेवले. जेव्हा त्याच्या पत्नीने त्यांना जन्म दिला तेव्हा इसहाक साठ वर्षांचा होता.
A potem wyszedł jego brat, trzymając swą ręką za piętę Ezawa, i nadano mu imię Jakub. Izaak miał sześćdziesiąt lat, gdy oni mu się urodzili.
27 २७ ही मुले मोठी झाली, आणि एसाव तरबेज शिकारी झाला, तो रानातून फिरणारा मनुष्य होता; पण याकोब शांत मनुष्य होता, तो त्याचा वेळ तंबूत घालवीत असे.
A [gdy] dzieci urosły, Ezaw został człowiekiem biegłym w myślistwie i człowiekiem pola. Jakub zaś był człowiekiem spokojnym, mieszkającym w namiotach.
28 २८ एसावावर इसहाकाची प्रीती होती, कारण त्याने शिकार करून आणलेल्या प्राण्यांचे मांस तो खात असे, परंतु रिबकेने याकोबावर प्रीती केली.
I Izaak kochał Ezawa, bo jadał z jego łowu, Rebeka zaś kochała Jakuba.
29 २९ याकोबाने वरण शिजवले. एसाव शिकारीहून परत आला, आणि तो भुकेने व्याकुळ झाला होता.
I Jakub ugotował [sobie] potrawę, a [w tym czasie] przyszedł Ezaw z pola spracowany.
30 ३० एसाव याकोबास म्हणाला, “मी तुला विनंती करतो, मला थोडे तांबडे डाळीचे वरण खायला घेऊ दे. मी फार दमलो आहे!” म्हणून त्याचे नाव अदोम पडले.
Ezaw powiedział więc do Jakuba: Daj mi jeść, proszę cię, z tej czerwonej [potrawy], bo jestem spracowany. Dlatego nadano mu imię Edom.
31 ३१ याकोब म्हणाला, “पहिल्यांदा तुझ्या ज्येष्ठपणाचा हक्क मला विकत दे.”
Jakub powiedział: Sprzedaj mi dziś twoje pierworództwo.
32 ३२ एसाव म्हणाला, “पाहा, मी मरायला लागलो आहे. या ज्येष्ठपणाच्या हक्काचा मला काय उपयोग आहे?”
A Ezaw odpowiedział: Oto jestem bliski śmierci, na cóż mi pierworództwo?
33 ३३ याकोब म्हणाला, “प्रथम, तू माझ्याशी शपथ घे.” तेव्हा एसावाने तशी शपथ घेतली आणि अशा रीतीने त्याने आपल्या ज्येष्ठपणाचा हक्क याकोबाला विकला.
Jakub powiedział: Przysięgnij mi dziś. Przysiągł mu więc i sprzedał Jakubowi swoje pierworództwo.
34 ३४ याकोबाने त्यास भाकर व मसुरीच्या डाळीचे वरण दिले. त्याने ते खाल्ले व पाणी पिऊन झाल्यावर उठला व तेथून त्याच्या मार्गाने निघून गेला. अशा रीतीने एसावाने त्याच्या ज्येष्ठपणाचा हक्क तुच्छ मानला.
Jakub dał więc Ezawowi chleba i potrawę z soczewicy, a on jadł i pił, a potem powstał i poszedł. W ten sposób Ezaw pogardził [swoim] pierworództwem.

< उत्पत्ति 25 >